Today’s Live News Update, 03 January 2024: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय व सामाजिक वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचवेळी दुसरीकडे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही बाजूंनी पक्षीय पातळीवर कामाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. त्यातच १० जानेवारीला शिवसेनेतील आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांचा निकाल येणार असल्यामुळे त्यावरही तर्क-वितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Mumbai Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एकाच क्लिकवर!
सोलापूर : दोन वर्षानंतर पुन्हा वेगळ्या स्वरूपात फिरून आलेल्या करोना साथीची लागण सोलापुरात सुरू झाली असून यात एका ७२ वर्षाच्या वृध्दाचा मृत्यू झाला. तर १४ रूग्ण करोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या वृध्दाला रक्तदाब आणि मधुमेह होता. त्याची हृदय शस्त्रक्रियाही होती. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यास एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यास करोनाचे निदान झाले होते. उपचार सुरू असताना अखेर त्याचा मृत्यू झाला.
मुंबई: ‘ना विकसित क्षेत्रा’त परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांसाठी ‘विशेष विकसित क्षेत्र’ निर्माण करण्याची योजना राज्य शासनानेच रद्द केली आहे.
मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळातील एका भाडेवसुलीकाराने वसूल केलेली सेवाशुल्काची रक्कम म्हाडाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर लाटल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबई मंडळातील एका कर्मचाऱ्याने केलेला अपहार निदर्शनास आला आहे.
डोंबिवली: दोन दिवसाच्या कालावधीत डोंबिवली ते कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
त्यांनी जर आमचं डिझेल बंद केलं तर विनाडिझेलच्या गाड्या चालवणार आहोत. आमची सगळी तयारी झाली आहे. आमचा गॅस बंद केला तर आम्ही चुलीवर स्वयंपाक करू - मनोज जरांगे पाटील
मुंबई: घरफोडी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोराने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटे गोवंडी परिसरात घडली. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
सरकारनं आंतरवालीचं स्वप्न पुन्हा बघू नये. तुम्हाला ते आता जड जाईल. आम्हाला कुणी अडवलंच तरी चारही बाजूंनी आम्ही तयारी केली आहे. आम्ही आंदोलन शांततेतच करणार आहोत. कुणावरही हात उचलणार नाही - मनोज जरांगे पाटील
मुंबईतलं आरपारचं शेवटचं आंदोलन आहे. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, कुणीही घरी जायचं नाही. करोडोंच्या संख्येनं मुंबईत यायचं आहे. कुणाच्याच गाड्या अडवल्या जाणार नाहीत - मनोज जरांगे पाटील
अमित साहूने सना यांच्या काही अश्लील चित्रफिती तयार करून ‘ब्लॅकमेलिंग’ सुरु केली होती.
कल्याण: कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्याला समांतर परळीकर वखार ते डाॅ. म्हस्कर रुग्णालय दरम्यानचा आठ वर्षापूर्वी बांधलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता तोडून पुन्हा नव्याने पालिकेने रस्ता बांधण्यास सुरूवात केल्याने या भागातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मागील १५ दिवसांमध्ये राज्यात करोनाचे ९०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यात अचानक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांचा मुखपट्टीच्या वापरण्याकडे कल वाढला आहे.
नागपुरातील सिव्हिल लाईन परिसरात ‘इन्फिनिटी’ या नावाने १०७ मीटर उंच इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.
नागपूर विभागातून कोळसा, सिमेंट आणि धान्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे रेल्वेमार्ग व्यस्त असतात.त्यावर उपाय म्हणून नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यात येत आहेत.गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेने तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे एकूण १८५.४८ किलोमीटर पूर्ण केले.
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाने दादरमधील प्लाझा चित्रपटगृहालगतच्या पदपथावर स्वच्छता मोहीम राबविली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा या पदपथावर भाज्यांच्या कचऱ्याचा खच पडला आणि मातीमुळे पादचाऱ्यांना चिखल तुडवत वाट काढावी लागली.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने उद्योजकतेला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली आहे.
पुणे: भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात आंबेडकरी चळवळीतील अनुयायांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह सात जणांना अटक केली आहे.
मुंबई: करोनासाह वेगवेगळे साथरोग आजार, महामार्गांवरील वाढते अपघात तसेच राज्य व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसह आरोग्य विभागाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मोठ्या दुर्घटना वा विशिष्ट भागात अचानक पसरणारी साथरोग आदी लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणांचा समन्वय तसेच आवश्यक त्या ठिकाणी वेगाने आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी आरोग्य विभागाची ‘वॉर रूम’ सुरू करण्याचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले.
आता तीन पागडं सरकार आहे. तंगड्यात तंगडं.. खेकडा बरा. मी ऐकलं देशभर रेल्वे स्थानकांवर सेल्फ पॉइंट तयार केले आहेत. मोदींसोबत फोटो काढण्यासाठी. एका पॉइंटसाठी साडेसहा लाख रुपये खर्च सांगितलाय. असे देशभरात किती झाले असतील? सरकारच्या जाहिरातीचे चोचले पुरवले जात आहेत, पण इथल्या सामान्य माणसाला काय मिळतंय? मीही राम मंदिरात जाणार आहे. मला कुणाच्या आमंत्रणाची गरज नाहीये. पण घरी गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना काय द्यायचं आहे खायला? कुपोषणावर तोडगा कुणी काढायचा? - उद्धव ठाकरे<
सरपण गोळा करण्यात माय-लेकी व्यस्त असतानाच वाघाने मंगलाबाई यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यानंतर त्या जोराने ओरडल्या.
सरकार पाडलं नसतं तर इथे अंगणवाडी सेविकांना आंदोलनाला यावं लागलं नसतं हे नक्की. नुसत्या जाहिराती बघायच्या. गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि म्हणायचं सुदृढ भारत. आरोग्यमंत्री सुदृढ असतील खेकडे खाऊन. खरा सुदृढ भारत तुम्ही करताय - उद्धव ठाकरे</p>
कल्याण: शिळफाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी ठेकेदाराने रस्ता दुभाजकाची पक्की बांधणी केलेली नाही. या मोकळ्या जागेतून अनेक वाहन चालक वाहने घुसवित असल्याने शिळफाटा रस्त्यावर अलीकडे नियमित कोंडी होत आहे. काही ठिकाणी सरकते दुभाजक उभे करण्यात आले आहेत.
अंगणवाडी सेविका प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन करत असून त्यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत.
ठाणे: मालवाहतूकदारांनी मंगळवारी रात्री उशिरा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. असले तरी ठाणे शहरातील अनेक पेट्रोल पंपवर बुधवारी सकाळी इंधन पुरवठा करणाऱ्या गाड्या दाखल झाल्या नव्हत्या.
पुणे: पुणे मेट्रोची रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील सेवा मागील वर्षाच्या अखेरीस सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, त्यासाठी आता नवीन वर्ष उजाडले आहे. या मार्गाचे काम पूर्ण होत आले असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे पथक या आठवड्यात तपासणीसाठी येत आहे.
पालघर मधील डहाणू आणि तलासरी तालुक्यात २०१८ पासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रकार सुरू आहेत.
मुंबई: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीतीसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच म्हाडाकडे कागदपत्र जमा करणाऱ्या कामगारांची संख्या आता एक लाखापार गेली आहे.
उपस्थित महिलांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. “जग कुठे चालले आहे आणि तुम्ही कुठे चालला आहात”, असे म्हणून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
सोलापूर : मालवाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आला तरी उतरलेला कांदा बाहेर पाठविण्यासाठी विलंब होत असल्यामुळे व्यापा-यांनी बुधवारी कांदा लिलाव केला नाही. त्यामुळे शेतक-यांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागला.
सकाळी पोहोचणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसचे व सायंकाळी पोहोचणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसचे वेळापत्रक पूर्णपणे ढासळले आहे.
मुंबई: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी निरनिराळ्या कारणांमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा खोळंबली होती. तर दाट धुक्याने बुधवारी पहाटे मध्य रेल्वेची वाट अडवली. तसेच बुधवारी सकाळी डोंबिवली – कोपरदरम्यान एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला.
Maharashtra Mumbai Marathi News Live Updates: मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट