Today’s Live News Update, 03 January 2024: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय व सामाजिक वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचवेळी दुसरीकडे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही बाजूंनी पक्षीय पातळीवर कामाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. त्यातच १० जानेवारीला शिवसेनेतील आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांचा निकाल येणार असल्यामुळे त्यावरही तर्क-वितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Mumbai Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एकाच क्लिकवर!
दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यवतमाळ : तू मला आवडतेस, माझ्यासोबत लग्न कर. नाही तर तुझे फोटो व्हायरल करून जीवानिशी ठार मारील, अशी धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध नेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नेर येथे मामाकडे शिक्षण घेत असलेल्या मुलीची एका तरुणाशी ओळख झाली. तो या मुलीचा पाठलाग करून ती आवडत असल्याचे वारंवार सांगायचा. ओळखीचा फायदा घेऊन तिचे फोटोही त्याने काढले.
या युवकाने २५ डिसेंबर रोजी युवतीचा हात धरला. तू माझ्याशी लग्न कर अन्यथा जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. अमरावती येथे ५ जानेवारीला विवाह नोंदणीकरिता आली नाही तर फोटो व्हायरल करीन, अशी धमकी दिली. घाबरलेल्या युवतीने गावी जावून ही बाब कुटुंबियांना सांगितली. अखेर मंगळवारी नेर पोलीस ठाण्यात त्रास देणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी अजय मेश्राम (२६) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब नाईक करीत आहेत.
पुणे: करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चे राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ३२ वर पोहोचली असून, त्यातील तब्बल १७ रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या दोन रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही रुग्ण सापडले होते. राज्यात जेएन.१ चे मंगळवारी पुण्यात दोन आणि साताऱ्यामध्ये १ असे तीन नवीन रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. राज्यातील जेएन.१ च्या एकूण रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक पुण्यात आहेत. पुण्यातील ही रुग्णसंख्या १७ वर पोहोचली आहे. त्याखालोखाल ठाण्यात ५ रुग्ण असून, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, कोल्हापूर १, अकोला १, सिंधुदुर्ग १, नाशिक १ आणि सातारा १ अशी रुग्णसंख्या आहे. पुण्यात मंगळवारी करोनाचे ११ नवीन रुग्ण आढळले.
मुंबई: मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सर्कस, आनंदबाजार यांचे प्रयोग व खेळ यांच्यावरील रंगभूमी करात वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. गेल्या १३ वर्षांत ही करवाढ करण्यात आली नव्हती.
३ ते ७ जानेवारीदरम्यान सिंदूर लेपनाकरता सिद्धिविनायक मंदिरातील गाभाऱ्याचं दर्शन बंद ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून या कालावधीत प्रतिमा मूर्तीचं दर्शन भाविकांना दिलं जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
नवी मुंबई : ऑनलाइन पद्धतीने फसवणूक होण्याच्या प्रकरणांत प्रचंड वाढ झाली असून सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती नवी मुंबईत गेल्या वर्षी करण्यात आली. नवी मुंबईत पोलिसांना २०२३ हे वर्ष संमिश्र गेले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद जास्त झाली असली तरी गुन्हे उकल टक्केवारीत आठ टक्क्यांनी प्रगती आहे.
डोंबिवली: काटई-बदलापूर रस्त्यावर रविवारी दुपारी तीन जणांनी एका वाहन चालकाला पलावा-खोणी भागात अडविले. आम्हाला वाशी येथे जायचे आहे असे सांगून त्याच्या वाहनात जबरदस्तीने बसले.
अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या सर्वच संपामध्ये सहभागी झाल्याने सर्व अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत.
नवी मुंबई : राज्य सरकारकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्येविषयी थेट प्रश्न उपस्थित करताना ‘आमच्या शहराचे कारभारी पाठविणारे तुम्ही कोण’ असा थेट सवाल केला. गेली ४० वर्षे आम्ही या शहराची सेवा करतो. आमच्या शहरात काय घडावे हे ठरविणारे तुम्ही कोण असा सवाल करताना गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केल्याची चर्चा आता रंगली आहे.
माझा प्रश्न त्यांना तेवढाच होता की मी काय ज्येष्ठ मंत्री नाही? मी या पक्षाचा कार्यकर्ता नाही? मला करोना झाला आणि दोन तासांत तुम्ही पालकमंत्रीपदावरून काढता? त्यानंतर करोना झालेल्या किती जणांना काढलं तुम्ही? या पक्षात सावत्र होतो का मी? का नाही सांगितलं की करोना झालाय तर बरा होईल आणि मग पुन्हा घेईल पालकमंत्रीपदाचा कार्यभार? मी झालो ना बरा? मेलो नाही ना? तुम्हाला स्वत:ला करोना झाला, का नाही राजीनामा दिला? मंत्रीमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांना करोना झाला, मग त्यांचा राजीामा का नाही घेतला? एकट्या जितेद्र आव्हाडचा राजीनामा घेतला – जितेंद्र आव्हाड</p>
पनवेल महापालिकेने मागील वर्षी अर्थसंकल्पावेळी यंदाचे वर्ष आरोग्यासाठी नियोजन करून जास्तीत जास्त आरोग्य सुविधा जनसामान्यांपर्यंत पोहोचेल असे आश्वासन दिले होते. पालिका प्रशासनाने महापालिका हद्दीतील तेरावे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबोली आणि चौदावे कामोठे येथे सुरू केले तसेच आसूडगाव येथे सहावे आणि तळोजा पंचानंद गावात सातवे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र (वेलनेस सेंटर) सुरू केले. यंदाच्या नवीन वर्षात महापालिका प्रशासनाकडून पनवेलकरांना मिळालेली ही आरोग्याची भेट असल्याचे बोलले जात आहे.
मला पालकमंत्रीपद देऊच दिलं नाही. ते फक्त एकनाथ शिंदे व अजित पवार मिळून ठरवत होते. मी अजित पवारांना स्वत: भेटून सांगितलं होतं की मला पालकमंत्रीपद द्या. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: भेटून म्हणाले की ‘जितेंद्र, आम्हाला रायगड हवं होतं. आम्ही तुम्हाला पालघर द्यायला तयार होतो. मी खास तुझ्यासाठी पालघर सोडलं होतं. पण ते म्हणाले अजित पवार कुठल्याही परिस्थितीत रायगड सोडायला तयार नाहीत. रायगड त्यांना आदिती तटकरेला द्यायचं आहे – जितेंद्र आव्हाड</p>
पुणे: सूस येथील २०० टन क्षमतेच्या कचराप्रक्रिया प्रकल्पाला विरोध होत असल्याने हा प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील नांदे-चांदे गावात स्थलांतरित करण्यात येणार आहे.
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या पवई वेन्चुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या जोडणीमध्ये गळती आढळून आली आहे. ही गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
नववर्षाच्या सुरूवातीस स्थानिक बुरड मोहल्ला परिसरात लाखो रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील निधी वाटपाचा वाद ऐरणीवर आला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यात निधी वाटपात पक्षपात केल्याच्या मुद्द्यावरून जुगलबंदी सुरू आहे.
पुणे: सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाला अतिक्रमणांचा अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले असून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने अतिक्रमणे हटविण्याची सूचना संबंधितांना केली आहे.
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अक्षता कलश पूजनावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, या कार्यक्रमासंबंधी परिपत्रक काढणारे प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी त्या घटनेचा या निर्णयाशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला आहे.
मांडीवर बसलेले ‘हे’ बंदर आता पोपट बनून बोलायला लागले आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पाच्या १७१०.८४ कोटींच्या अधिकच्या टिप्पणीला राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे कामाला वेग येणार आहे.
ठाणे: जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीने निराधार मुलांची दत्तक प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान मागील तीन ते चार वर्षाच्या कालावधीत मुलींना अधिक पसंती दिली जात असल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले होते.
तलाठी कार्यालयापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तसेच पोलीस ठाण्यापासून ते पोलीस आयुक्तालयापर्यंत काही कर्मचारी लाच घेतल्याशिवाय काम करीत नाहीत.
पुणे: आंबेगाव बुद्रुक येथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा धडाका महापालिकेने कायम ठेवला आहे. आंबेगाव येथील सर्वेक्षण क्रमांक ४३, २५ आणि १० येथील विनापरवाना बांधकामांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली.
कल्याण: ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. या तालुक्यातील आदिवासी वाडी, गावांमध्ये एक हजार १६१ कुपोषित बालके आहेत. यामधील ८३ बालकांमधील कुपोषणाची तीव्रता अधिक आहे.
जळगाव : यावल तालुक्यातील नायगाव- किनगाव रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने मध्यरात्री गस्त घालत असताना अवैध लाकूड तस्करी करणार्या मालवाहू वाहनावर कारवाई करीत सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
दोन महिन्यांत जर जातीनिहाय जनगणना पूर्ण होत असेल तर ती केली पाहिजे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांनी अटल बिहारी वाजपेयींच्या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करत भाजपाला खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्रातील..
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 3, 2024
श्रीमान फडणवीस
श्रीमान गिरीश महाजन
श्रीमान आशिष शेलार वैगरे वैगरे… तथाकथित राम भक्तांसाठी.. ही' स्मरण गोळी"
Memory tablets..
उगाळून घ्या..
आणखी देखील जालीम डोस आहेतं.. योग्य वेळी देऊच..@AUThackeray@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan@ShelarAshish pic.twitter.com/J5ZgUqHBmR
महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला. अमोल कोल्हेंनी पुणे जिल्ह्यात मोठा दौरा केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काही जण उचलायला लागले आहेत. पण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे, तोपर्यंत अमोल कोल्हे डरने की कोई बात नहीं. सगळा पक्ष तुमच्यामागे उभा राहील – जयंत पाटील</p>
पुणे: आंबेगाव बुद्रुक येथील बेकायदा अकरा इमारतींवर कारवाई केल्यानंतर गेल्या तीन वर्षांतील बेकायदा बांधाकामांना दिलेल्या नोटिशी आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मागविला आहे.
Maharashtra Mumbai Marathi News Live Updates: मराठा आरक्षणासंदर्भातील महत्त्वाच्या अपडेट