Today’s News Update, 04 January: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रभू राम क्षत्रिय होता आणि वनवासात असताना मांसाहार करत होता असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. भाजपाने आणि अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी रामायणाचं उदाहरण देऊन प्रभू रामाने आई वडिलांचा शब्द पाळण्यासाठी वनवास पत्करला. आत्ताच्या इतिहासात काकाला वनवासात ढकलण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं म्हणत अजित पवारांना टोला लगावला. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका केली आहे. यांसह सगळ्याच महत्त्वाच्या बातम्यांवर आपली नजर या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.

Live Updates

Maharashtra News Updates in Marathi |’राम मांसाहारी होता’ या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर भाजपा आक्रमक आणि इतर बातम्या

13:27 (IST) 4 Jan 2024
राज्याचे साखर उत्पादन ९५ लाख टनांवर जाणार

राज्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बिगरमोसमी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे उसाची उत्पादकता व साखर उताऱ्यामध्ये दहा ते बारा टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 4 Jan 2024
नापास झाल्यामुळे पळालेली मुले मुंबई विमानतळावर सापडली, ‘एआय’च्या मदतीने करायचा होता व्यवसाय

आसाममधील १४ आणि १५ वर्षांची दोन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी दुमदुमा पोलीस ठाण्यात केली होती.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 4 Jan 2024
ठाणे : रेव्ह पार्टी प्रकरणी कासारवडवली पोलिसांची चौकशी

कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईतून उघडकीस आले.

सविस्तर वाचा…

13:01 (IST) 4 Jan 2024
सायबर क्राईमच्या नाना तऱ्हा, यवतमाळ जिल्ह्यात ५३ सायबर गुन्ह्यांची नोंद

यवतमाळ: आभासी जगात रमण्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. सायबर गुन्हेगार अशा युजर्सची मानसिकता हेरून त्यांना जाळ्यात ओढून लुटत असल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा…

12:43 (IST) 4 Jan 2024
मुंबई : महापालिकेचे अधिकारी एवढे अतार्किक कसे ? पदपथावरील बोलार्डमधील कमी अंतरावरून उच्च न्यायालयाने फटकारले

बोलार्ड बसवण्याचे काम सुरू असताना त्यावर देखरेख ठेवणारे महापालिकेचे अधिकारी एवढे अतार्किक किंवा बेफिकीर कसे असू शकतात या प्रश्नाचाही खंडपीठाने पुनरूच्चार केला.

सविस्तर वाचा…

12:39 (IST) 4 Jan 2024
पिंपरी : टास्कच्या बहाण्याने संगणक अभियंत्याची २० लाखांची फसवणूक

पिंपरी : टास्कच्या बहाण्याने संगणक अभियंत्याची २० लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २८ मार्च ते ३ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून थेरगाव येथे घडला. अविनाश क्रिश्ननकुट्टी कुन्नूबरम (वय ४०, रा. स्विस काउंटी, थेरगाव, मूळ – केरळ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेलिग्राम ग्रुपधारक, खोटे संकेतस्थळ बनवणारा व्यक्ती, दोन बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी फिर्यादीस व्हाटस ॲपवरून संपर्क केला. त्यांना नोकरी संदर्भात संदेश करून एका टेलिग्राम ग्रुपमध्ये समावेश करवून घेतले. त्यानंतर वेळोवेळी प्रीपेड टास्क निवड करण्यास सांगितले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २० लाख ३२ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला अथवा त्यांची रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

12:35 (IST) 4 Jan 2024
नाशिक : घरफोडीतील पैशांतून शेअर बाजारात गुंतवणूक; उच्चभ्रू वसाहतीत घर हेरणारी दुकली ताब्यात

नाशिक: शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात उच्चभ्रू वसाहतीतील बंद घरे हेरून घरफोडी करणाऱ्या उच्च वर्गातील दुकलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित चोरटे हे चोरलेल्या मोटारीतून भ्रमंती करायचे.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 4 Jan 2024
राज्यातील १६ जिल्ह्यातील इंधन उपलब्धतता पूर्ववत होण्यास ४८ तास लागणार, पानेवाडीतील १४०० टँकरमधून इंधन पुरवठा

मनमाड : इंधन टँकर चालकांनी संप मागे घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पानेवाडीस्थित इंधन प्रकल्पांमधून बुधवारी रात्रीपर्यंत राज्यातील १६ जिल्ह्यांत सुमारे १४०० टँकरमधून पेट्रोल, डिझेल पाठविण्यात आले. सर्व १६ जिल्ह्यातील अनुशेष भरून निघण्यास ४८ तासांचा कालावधी लागणार असून त्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, कुठेही टंचाई जाणवणार नाही, असा दावा इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

वाचा सविस्तर…

12:33 (IST) 4 Jan 2024
रेल्वेचे असेही ‘कोट्यधीश’ तपासनीस! फुकट्या प्रवाशांना भरवताहेत धडकी

पुणे विभागात डिसेंबरमध्ये तिकीट तपासणीदरम्यान १६ हजार २२ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले.

सविस्तर वाचा…

12:13 (IST) 4 Jan 2024
धक्कादायक… प्रसूतीदरम्यान नवजात बाळासोबत ४ किलोचा ट्युमरही आला बाहेर! पुढे काय झाले? वाचा…

नागपूर: उपराजधानीतील विम्स रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेत गुंतागुंत वाढली. ज्येष्ठ प्रसूती तज्ज्ञ डॉ. जुझार फिदवी यांनी सिझरने नवजात बाळाची शस्त्रक्रिया करताच चार किलोचा ट्युमरही बाहेर निघाला. हा प्रकार बघून सगळेच थक्क झाले.

सविस्तर वाचा…

11:58 (IST) 4 Jan 2024
पर्यावरण तज्ज्ञ अजित उर्फ पापा पाटील यांचे निधन

पक्षी, प्राणी, निसर्ग संवर्धनाप्रती केलेल्या कामाबद्दल नुकतेच त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 4 Jan 2024
“जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू”, आनंद परांजपे यांचा इशारा

ॠषी वाल्मिकी यांच्या रामायणात प्रभू श्री रामांनी मांसाहार केल्याचा कुठेही उल्लेख नाही, असे परांजपे यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

11:21 (IST) 4 Jan 2024
इंद्रायणी, पवना घेणार मोकळा श्वास… घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी तीन नद्यांच्या खोऱ्यात आहे. शहराच्या उत्तरेकडून इंद्रायणी, दक्षिणेकडून मुळा आणि मध्यातून पवना नदी वाहते.

सविस्तर वाचा…

11:18 (IST) 4 Jan 2024
चतुर्थीच्या दिवशी मटण खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये-अंबादास दानवे

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाविषयी जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेधच करतो आहोत. त्याचं समर्थन करण्याचा प्रश्न नाही. पण चतुर्थीच्या दिवशी जे मटण खातात, कोंबड्या कापतात त्यांनी आम्हाला कुठलीही गोष्ट शिकवू नये. गोमांसाचं समर्थन करणाऱ्यांनी जरा आधी स्वतःच्या पक्षाचे नेते काय बोलले आहेत ते आठवावं असं म्हणत अंबादास दानवेंनी टीका केली आहे.

11:09 (IST) 4 Jan 2024
कल्याण डोंबिवलीत १.६५ लाख बेकायदा बांधकामे, उच्च न्यायालयाचा संताप

महापालिकेचे अधिकारी सतर्क असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 4 Jan 2024
जीवनवाहिनीवर जीव धोक्यात! गेल्या नऊ वर्षांत ११,३१६ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू

काही वेळा गाड्यांमधील गर्दीच्या रेट्याने दरवाजावरील प्रवासी बाहेर फेकले जातात. त्यात अनेकांना स्वत:चा जीव गमवावा लागतो.

सविस्तर वाचा…

11:08 (IST) 4 Jan 2024
दहिसर आणि मुलुंड करोना केंद्रांप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, ३७ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप

राहुल गोम्स हे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 4 Jan 2024
ठाण्यातील झाडांची माहिती मिळणार क्यू आर कोडद्वारे, २१ उद्यानांतील दोन हजार झाडांवर लावले क्यू आर कोड

‘उद्यानांमधील नावीन्यपूर्ण संकल्पना’ या उपक्रमाअंतर्गत ठाणे महापालिकेच्या २१ उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुमारे दोन हजार झाडांवर हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 4 Jan 2024
इंद्रायणी पुन्हा फेसाळली! आळंदीत सलग दुसऱ्या दिवशी नदीची दुरवस्था

वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. राज्य सरकार इंद्रायणी नदीतील प्रदुषणाकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न आळंदीतील नागरिकांना पडला आहे.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 4 Jan 2024
रायगड : मुंबई- गोवा महामार्गावर उद्या अवजड वाहतुकीला बंदी, जाणून घ्या काय आहे कारण…

मुंबई- गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक ५ जानेवारीला बंद ठेवली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी योगश म्हसे यांनी जारी केली आहे.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 4 Jan 2024
जितेंद्र आव्हाड यांची प्रतीकात्मक तिरडी काढून भाजपाने नोंदवला निषेध

जितेंद्र आव्हाड यांनी रामाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपाने त्यांचा निषेध नोंदवण्यात सुरुवात केली आहे. पुण्यातल्या अलका टॉकिज चौकात जितेंद्र आव्हाड यांची प्रतीकात्मक तिरडी काढून निषेध नोंदवण्यात आला. तसंच पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मांसााहारी होता असं वक्तव्य केलं आहे. शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. ज्याचे पडसाद आज राज्यभरात उमटताना दिसत आहेत.

11:05 (IST) 4 Jan 2024
१३ व्या शतकातील पाषाण मूर्ती बुध्द विहारात आढळली; पाच फूट लांब, ४४ सेंटिमीटर रुंद व दीड फूट जाड

वर्धा: सेलू तालुक्यातील केळझर येथील बुद्ध विहार परिसरात शेतात काम करणाऱ्यांना पाषाण मूर्ती सापडली. पुरातत्व विभागाच्या सांगण्यानुसार ही मूर्ती १३ व्या शतकातील यादवकालीन वृषभनाथ महाराजांची आहे.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 4 Jan 2024
मुंबईच्या किमान तापमानात चढ – उतार सुरुच

मुंबई: मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात चढ – उतार सुरुच आहे, पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 4 Jan 2024
अकोल्यात कोविडचा धोका; चाचण्यांच्या प्रमाणात वाढ

अकोला: नववर्षाच्या सुरुवातीला कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 4 Jan 2024
सचिन पाठोपाठ आता अनिल कुंबळे सुद्धा “भानुसखिंडी” च्या दर्शनाला…

नागपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची खाण असे म्हणले तर खोटे ठरणार नाही. त्यांची एक झलक पाहण्यासाठी देशविदेशातील कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात. त्यात आपले सेलिब्रिटी कसे मागे राहणार!

सविस्तर वाचा…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात बोलताना सदर विधान केले. (Photo – Loksatta Graphics)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रभू राम क्षत्रिय होता आणि वनवासात असताना मांसाहार करत होता असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. भाजपाने आणि अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.