Maharashtra Vidhan Parishad Election update: लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीची पीछेहाट झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे विधानसभेच्या तयारीसाठी आपल्याला उपमुख्यमंत्रीपदावरून मुक्त करावं, अशी विनंतीही देवेंद्र फडणवीसांनी पक्ष नेतृत्वाला केली. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असताना त्याआधी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातल्या मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जात आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra News: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

19:58 (IST) 26 Jun 2024
अकरावीच्या प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी उद्या… कोट्याअंतर्गत आतापर्यंत किती प्रवेश निश्चित?

यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३४३ महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजार २६५ जागा उपलब्ध आहेत.

सविस्तर वाचा...

19:48 (IST) 26 Jun 2024
NEET घोटाळ्यात अटकेतील शिक्षक संजय जाधवचे शाळेतील कपाट सील

NEET परीक्षेतील कथित घोटाळ्याप्रकरणी संशयित म्हणून नांदेडच्या एटीएस विभागाने संजय जाधव यास अटक केली आहे.

सविस्तर वाचा...

19:48 (IST) 26 Jun 2024
छत्रपती संभाजीनगर: ‘स्वच्छ बसस्थानक’मध्ये अंबाजोगाई, निलंगा, वैजापूर अव्वल

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून बुधवारी हे निकाल जाहीर झाले आहेत.

सविस्तर वाचा...

19:29 (IST) 26 Jun 2024
“मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे थांबवा”, वंचितची मागणी; “सरकारचा ओबीसी कोट्यावर…”

सरकारने ओबीसी कोट्यावर डल्ला मारण्याचा आडमार्ग शोधला, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

सविस्तर वाचा...

19:18 (IST) 26 Jun 2024
विद्यार्थिनीच्या मृत्युनंतर दिवसभर शाळा बंद, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे आंदोलन

इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षाच्या विद्यार्थिनीचा मंगळवारी सकाळी चक्कर आल्याने शाळेतच मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

19:10 (IST) 26 Jun 2024
कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; शिंदे सेनेच्या झाडाझडतीत गंभीर त्रुटी निदर्शनास

कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील भोंगळ कारभार बुधवारी चव्हाट्यावर आला.

सविस्तर वाचा...

18:57 (IST) 26 Jun 2024
पदवीधर निवडणुकीत मतदानानंतर मतपत्रिकेसह सेल्फी; भाजप महिला शहर अध्यक्षांचा प्रताप, छायाचित्र व्हायरल

समाज माध्यमांवर या फोटोची चर्चा झाल्यानंतर सुजाता भोईर यांनी हा फोटो आपल्या सर्व समाज माध्यम खात्यांवरून काढून टाकला होता.

सविस्तर वाचा...

18:47 (IST) 26 Jun 2024
राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे, हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना 'भारतरत्न पुरस्कारा'ने सन्मानित करावे, अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

सविस्तर वाचा...

18:31 (IST) 26 Jun 2024
कोल्हापुरात आणखी एक कुस्ती संकुल; शिवाजी विद्यापीठाच्या कुस्ती संकुलात आंतरराष्ट्रीय स्तराचे कुस्तीपटू घडावेत – हिंदकेसरी दीनानाथ सिंह

कोल्हापूरसह राजर्षींचा आणि विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर करावा, असे प्रतिपादन हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी आज येथे केले.

सविस्तर वाचा...

18:17 (IST) 26 Jun 2024
पालघरच्या औषध निरिक्षिकेने मागितली १ लाखांची लाच, लाच स्विकारताना खासगी इसम रंगेहाथ अटक

पालघर जिल्ह्याच्या औषध निरिक्षका आरती कांबळी यांंच्यावर एका औषध विक्रेत्याकडून १ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वाचा...

18:02 (IST) 26 Jun 2024
सांगली: तंटामुक्ती अध्यक्षावर हल्ला करणाऱ्या संशयिताचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू

तंटामुक्ती अध्यक्षावर जीवघेणा हल्ला करणार्‍या संशयित तरूणाचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना कवलापूर (ता. मिरज) येथे बुधवारी घडली.

सविस्तर वाचा...

17:39 (IST) 26 Jun 2024
‘यशवंत’ पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना १५ व १० लाखांचा निधी देणार; हसन मुश्रीफ यांची घोषणा

'यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार' विजेत्या मोठ्या ग्रामपंचायतींना १५ लाख व छोट्या ग्रामपंचायतींना १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी येथे केली.

सविस्तर वाचा...

17:04 (IST) 26 Jun 2024
ठाण्यातील तरुणाईला गांजा, चरस आणि एमडीचा विळखा; मागील दीड वर्षांत चार हजाराहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल

ठाणे : ठाणे आयुक्तालय क्षेत्रात दीड वर्षांत सुमारे ६० कोटी रुपयांचे अमली पदार्थ ठाणे पोलिसांनी जप्त केले आहे. यामध्ये गांजा, चरस आणि एमडी हे अमली पदार्थ सर्वाधिक जप्त करण्यात आले आहे. तर याप्रकरणांत सेवन आणि विक्री करणाऱ्या सुमारे चार हजार जणांविरोधात गुन्हे दाखल आणि अटकेची कारवाई झाली आहे.

सविस्तर वाचा..

16:51 (IST) 26 Jun 2024
Maharashtra Live News Update Today: शरद पवार गटाचा सुनील तटकरेंच्या व्हिडीओवरून टोला!

फक्त तोंडाने बोलून कोण ओरिजनल होत नसतं. ब्रँड हा ब्रँड असतो. राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची अनेकांना इच्छा असली तरी बारामती आणि शिरुरच्या जनतेने ओरिजनल ब्रँडची ओळख दाखवून दिली. जर तुतारी वाजवणारा माणूस रायगडमध्ये उभा केला असता तर संसदेत मागच्या दाराने घुसण्याची वेळ आली असती - शरद पवार गटाची सोशल पोस्ट

https://twitter.com/NCPspeaks/status/1805914059860226196

16:51 (IST) 26 Jun 2024
प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी सीईटी कक्ष महाविद्यालयांच्या दारी, राज्यात विविध विभागात सुसंवाद कार्यक्रम

अमरावती, पश्चिम महाराष्ट्र, पुणे विभाग, खांदेश विभाग, कोकण विभाग व मुंबई विभागामध्ये हे ‘सुसंवाद मेळावे’ होणार आहेत.

सविस्तर वाचा...

16:40 (IST) 26 Jun 2024
मुंबई: चटईक्षेत्रफळाचा अतिरिक्त लाभ मिळालेल्या ११ झोपु योजना अडचणीत!

चटईक्षेत्रफळात आणखी वाढचा लाभ देण्यासाठी अधिकारात नसलेली नियमावली वापरल्यामुळे सुमारे ११ झोपडपट्टी पुनर्वसन योजना रद्द होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

16:28 (IST) 26 Jun 2024
बुलढाणा: वंचित आघाडी पदाधिकाऱ्यांच्या वाहनावर गोळीबार! काचा फोडण्याचा प्रयत्न

बुलढाणा:  वंचित बहुजन आघाडीच्या  दोन पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल मंगळवारी ( दिनांक २५) रात्री उशिरा घडली. त्यांच्या चारचाकी वाहनावर गोळी झाडण्यात आली तर लोखंडी रॉड ने कार चे काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सविस्तर वाचा

16:25 (IST) 26 Jun 2024
प्रेमविवाहाचा रक्तरंजित अंत; अनैतिक संबंध उघडकीस येताच पतीने पत्नीला संपवले

नागपूर : पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला मिळाल्यानंतर पत्नीशी वाद करून तिच्या डोक्यात सळाखीने वार करून खून केला. ही घटना कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीक्षितनगरातील पंचमवैद्य आर्य सोसायटीत घडली. मन्नत ऊर्फ मीनू दिलप्रीत विर्क (२४) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी पती दिलप्रीत ऊर्फ विक्की कुलविंदरसींह विर्क (३०) याला अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा....

16:14 (IST) 26 Jun 2024
मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात पाण्याची चणचण

परीक्षेसंबंधित विविध गोंधळांमुळे मन:स्ताप सहन करणारे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी सध्या पाण्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहेत.

सविस्तर वाचा...

15:20 (IST) 26 Jun 2024
"लोकशाहीचा अपमान करणाऱ्या संविधान विरोधकांच्या विरोधातील लढा तीव्र करा," सुधीर मुनगंटीवार यांचे आणीबाणी निषेध सभेत आवाहन

चंद्रपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेत असताना काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे काही नेते पोरकटपणा करीत होते. लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान करीत होते. पण मला त्याचे नवल वाटले नाही, कारण संविधानाचा अपमान करण्याची त्यांची वृत्ती जुनी आहे.

सविस्तर वाचा

15:19 (IST) 26 Jun 2024
डोंबिवलीतील नवापाडा भागातील बेकायदा इमारतीवर हातोडा; ह प्रभागातील १० इमारतींवर कारवाईची तक्रारदारांची मागणी

डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील शेवंता हाईट्स या बेकायदा इमारतीवर पालिकेच्या ह प्रभागाच्या तोडकाम पथकाने मंगळवारी कारवाई केली. सहा वर्षापूर्वी ही बेकायदा इमारत भूमाफियांनी उभारली होती.

सविस्तर वाचा

14:46 (IST) 26 Jun 2024
एक जुलैपासून ‘नैना’विरोधी आंदोलन

सिडको महामंडळाचा नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी पुन्हा प्रकल्पग्रस्त एकवटणार आहेत.

सविस्तर वाचा...

14:45 (IST) 26 Jun 2024
तळोजा कारागृहातून अन्य कारागृहात हलवू नका, अबू सालेमची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली

मुंबईतील १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड अबू सालेम याचा विशेष न्यायालयात मंगळवारी फेटाळला.

सविस्तर वाचा...

14:26 (IST) 26 Jun 2024
नाशिक शिक्षक मतदारसंघात २३ टक्के मतदान

नाशिक – विविध वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २३.१६ टक्के मतदान झाले. नाशिक शहरातील केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक (२६.६५ टक्के) तर, अहमदनगरमध्ये सर्वात कमी (१९.९१ टक्के) मतदान झाले.

सविस्तर वाचा....

14:12 (IST) 26 Jun 2024
जागतिक बँकेच्या पथकाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरप्रवण क्षेत्राची पाहणी

बारा महिने चोवीस तास कार्यरत असलेल्या कक्षाच्या कामकाजाने पथकातील प्रतिनिधी प्रभावित झाले.

सविस्तर वाचा...

14:12 (IST) 26 Jun 2024
जलवहन क्षमतेत पुन्हा वाढ? अंधेरी सबवे नाल्याचे नव्याने काम होणार असल्याने खर्चवाढीची शक्यता

पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनाला हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा नियोजन करावे लागणार आहे.

सविस्तर वाचा...

14:09 (IST) 26 Jun 2024
Maharashtra MLC Election 2024 Live Updates: मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदानानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया.. "या मतदारसंघाची परंपरा पाहिली, तर मुंबईचा पदवीधर मतदार आणि यावेळी शिक्षकदेखील शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील याची मला खात्री आहे".

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1805880218852139402

13:23 (IST) 26 Jun 2024
पनवेलमध्ये ३७ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

पनवेल ः पनवेल महापालिकेने पुन्हा एकदा प्लास्टिक पिशवीविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. मंगळवारी केलेल्या कारवाईत पालिकेने ३७ किलोग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त केल्यानंतर व्यापाऱ्यांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारची कारवाई महापालिकेच्या खारघर, कामोठे आणि कळंबोली या तीन विविध प्रभागांमध्ये करण्यात आली.

सविस्तर वाचा...

13:20 (IST) 26 Jun 2024
‘मेट्रो ९’ मार्गिकेतील डोंगरी कारशेडच्या कामासाठी तीन निविदा

मुंबई : ‘दहिसर - मिरारोड मेट्रो ९’ मार्गिकेतील डोंगरी येथील कारशेडच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मागविलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन नामांकित कंपन्यांनी डोंगरी कारशेडच्या कामासाठी उत्सुकता दर्शविली आहे. लवकरच आर्थिक निविदा खुल्या करून कंत्राट अंतिम करण्यात येईल. ‘दहिसर-मिरा रोड मेट्रो ९’ मार्गिकेतील डोंगरी येथील कारशेडच्या कामाचा मार्ग आता लवकरच मोकळा होईल.

‘एमएमआरडीए’च्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘दहिसर - मिरारोड मेट्रो ९’ मार्गिका १०.५ किमी लांबीची आहे. या मार्गिकेचे काम मागील काही वर्षांपासून एमएमआरडीए करीत आहे. आतापर्यंत या मार्गिकेचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. असे असताना या मार्गिकेतील महत्त्वाच्या अशा कारशेडच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. ही मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी कारशेड उभारणे गरजेचे आहे. ‘मेट्रो ९’ मार्गिकेच्या कारशेडसाठी भाईंदर येथील राई, मुर्धा, मोर्वा गावातील जागा प्रस्तावित होती. मात्र या ठिकाणी कारशेड बांधण्यास स्थानिकांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे कारशेड रखडली. राज्य सरकारने स्थानिकांची मागणी लक्षात घेत राई, मुर्धा, मोर्वा येथील कारशेड रद्द केली. एकीकडे कारशेड रद्द करतानाच दुसरीकडे ‘मेट्रो ९’ मार्गिका उत्तनपर्यंत नेत डोंगरी येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार डोंगरी येथील ५९.६३ हेक्टर जागेचा ताबा काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएने घेतला. तर दुसरीकडे जानेवारीत निविदा प्रसिद्ध केल्या.

13:18 (IST) 26 Jun 2024
वहिनीचा जीव घेणाऱ्या दिराला जन्मठेप, बुलढाणा न्यायालयाचा निकाल; न्यायाधीशांनी केली होती…

बुलढाणा : वहिनीने चोरीचा आरोप केला म्हणून डोक्यात लाकडी दांड्याने वार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या दीरास बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे.

सविस्तर वाचा...

Maharashtra Live Updates

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra News: विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग!