Maharashtra Vidhan Parishad Election update: लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीची पीछेहाट झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे विधानसभेच्या तयारीसाठी आपल्याला उपमुख्यमंत्रीपदावरून मुक्त करावं, अशी विनंतीही देवेंद्र फडणवीसांनी पक्ष नेतृत्वाला केली. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असताना त्याआधी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातल्या मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Maharashtra News: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

13:18 (IST) 26 Jun 2024
‘आयडॉल’चे प्रवेश आजपासून, विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) राबविण्यात येणाऱ्या पदवीस्तरावरील विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला २६ जूनपासून सुरुवात होत असून विद्यार्थ्यांना https:// mu. ac. in/ distance- open- learning या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

वाचा सविस्तर…

13:12 (IST) 26 Jun 2024
भाजपचे ‘ओबीसी’ नेतृत्व मागच्या बाकावर, केंद्रस्थानी भुजबळ

छत्रपती संभाजीनगर : भाजपने ‘माधव’ सूत्राच्या बांधणीसाठी मराठवाड्यात बळ दिलेले ओबीसी नेते निष्प्रभ ठरले असून ती धुरा जरांगे यांच्या आंदोलनामुळे छगन भुजबळ यांच्याकडेच असल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा….

13:05 (IST) 26 Jun 2024
जलसंकटाचे काळे ढग कायमच; मागील वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात ५.८६ टक्के घट

अकोला : राज्यावर जलसंकटाचे काळे ढग कायम आहेत. मोसमी पाऊस लांबल्याने यंदा राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात घट झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणातील जलसाठा ५.८६ टक्क्याने कमी आहे. राज्यातील धरणांमध्ये २५ जून रोजी २०.२८ टक्के जलसाठा असून गेल्यावर्षी याच दिवशी २६.१४ टक्के जलसाठा होता.

सविस्तर वाचा…

13:05 (IST) 26 Jun 2024
पदपथांना फेरीवाल्यांचा वेढा, बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची कसरत

मुंबई : कायम वर्दळ असलेल्या बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरपालिका प्रशासन अधूनमधून संबंधित फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहे. मात्र, पदपथांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी हटविण्यात पालिका पूर्ण अपयशी ठरली आहे. रस्त्यांवर पसरलेल्या पथाऱ्यांमुळे पादचारी, प्रवाशांना अडथळा ठरत आहेत.

13:04 (IST) 26 Jun 2024
चंद्रपूर : गाठीभेटी, उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजनांचा धडाका; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी सक्रिय

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार तयारीला लागले आहेत.

सविस्तर वाचा…

13:03 (IST) 26 Jun 2024
भारतीय पारपत्रावर ११ वर्षे परदेशात वास्तव्य, विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक

मुंबई : भारतात बेकायदेशिररित्या पारपत्र तयार करून कुवेतमध्ये ११ वर्षे नोकरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. पलासकुमार बिस्वास (३३) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून तो २० वर्षांपूर्वी बांगलादेशातून बेकायदेशिररित्या भारतात आला होता.

सविस्तर वाचा…

13:02 (IST) 26 Jun 2024
नागपूर : आधीच रस्ते अरुंद, त्यात जड वाहने, शहर बसेसची वर्दळ; अंबाझरी परिसरात वाहतूक कोंडीचा कळस

नागपूर : अंबाझरीपुढील रस्ता बंद केल्याने पर्यायी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. माटे चौक, अभ्यंकरनगर, बजाजनगर, गांधीनगर हा रस्ता मुळातच अरुंद असताना येथून मोठ्या प्रमाणात जड वाहने व शहर बसेस धावत असल्याने तासंतास वाहतूक कोंडीत सर्वसामान्य नागरिक अडकून पडत आहे.

सविस्तर वाचा…

12:57 (IST) 26 Jun 2024
पाणीकपातीबाबत गणेश नाईकांची तीव्र नाराजी, जलसंपन्न नवी मुंबई शहरात पाणीकपात करणे पालिकेला भूषणावह नसल्याचे मत

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण असल्यानेच नवी मुंबईला जलसंपन्न शहर संबोधले जात असताना शहरात सुरू असलेली पाणीकपात भूषणावह नसून पाणीकपात सहन केली जाणार नसल्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिला आहे.

सविस्तर वाचा….

12:51 (IST) 26 Jun 2024
पंढरीत विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ढकला ढकली; दर्शन रांगेचे गलथान व्यवस्थापन, आषाढी यात्रेपुर्वीच नियोजन कोलमडले

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत आज ढकला ढकलीचा प्रसंग घडला. सुदैवाने अनर्थ झाला नसला तरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे दर्शन रांगेतील त्रुटी आणि गलथान व्यवस्थापनाचा फटका भाविकांना बसला आहे. विशेष म्हणजे आषाढी यात्रेच्या नियोजनाची तयारी गेली दोन महिने प्रशासन करीत आहे.

वाचा सविस्तर…

12:32 (IST) 26 Jun 2024
पनवेलमध्ये सकाळपासून कोकण पदवीधरांचे उत्साहात मतदान

पनवेल : कोकण पदवीधर मतदारसंघाची बुधवारी निवडणूक पार पडत असून पनवेलमध्ये सकाळच्या सत्रात पदवीधर मतदार उत्साहात मतदान करताना दिसले. सर्वच पनवेल तालुक्यातील पदवीधरांना मतदानासाठी नवीन पनवेलमधील चार विविध मतदान केंद्रांवर यावे लागले. यामध्ये पोस्ट कार्यालयाशेजारील संत साईबाबा शाळा, पोदी येथील सेक्टर १५ ए येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा, सेक्टर १४ येथील सीकेटी विद्यालय, बांठिया हायस्कूल या मतदान केंद्रांवर मतदार मतदान करत होते.

सविस्तर वाचा….

12:23 (IST) 26 Jun 2024
राजर्षी शाहू जयंतीनिमित्त कोल्हापुरात शोभा यात्रा, समता दिंडीला रिमझिम सरीतही भरघोस प्रतिसाद

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या शोभा यात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

सविस्तर वाचा…

12:07 (IST) 26 Jun 2024
झोपेची गोळी दिली नाही म्हणून खोणी-पलावातील नागरिकाची औषध दुकानातील विक्रेत्याला मारहाण

डोंबिवली – दुकानात झोपेची गोळी नाही, असे कारण औषध खरेदीसाठी आलेल्या खोणी-पलावातील एका रहिवाशाला औषध विक्रेत्याने दिल्याने त्याचा राग येऊन रहिवाशाने आपल्या साथीदार मुलासह औषध विक्रेत्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडला आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 26 Jun 2024
Maharashtra Live News Update Today: उद्योगपती मुकेश अंबानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा १२ जुलै रोजी विवाह होणार असून त्यासाठी मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं.

11:28 (IST) 26 Jun 2024
Maharashtra MLC Election 2024 Live Updates: नाशिक शिक्षक मतदारसंघातील समीकरण…

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार किशोर दराडे, शिवसेना शिंदे गटाचे संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघातील निवडणूक ही पैसे, साड्या वाटपांच्या आरोपांमुळे अधिक गाजली. शिंदे गटाने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला.

11:27 (IST) 26 Jun 2024
Maharashtra MLC Election 2024 Live Updates: कोकण पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरण…

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होत आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सुमारे सव्वा दोन लाख मतदार आहेत. यापैकी सुमारे एक लाख मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत.

11:26 (IST) 26 Jun 2024
Maharashtra MLC Election 2024 Live Updates: मुंबई शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरण

मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत. सुमारे १५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात जास्त नोंदणी केलेल्या उमेदवाराला विजयाची नेहमी संधी असते

11:25 (IST) 26 Jun 2024
Maharashtra MLC Election 2024 Live Updates: मुंबई पदवीधरमध्ये काय आह चित्र?

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब, भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्यत्वे लढत होत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे ठाकरे गटापुढे मोठे आव्हान आहे.

11:24 (IST) 26 Jun 2024
Maharashtra MLC Election 2024 Live Updates: मतदानाची टक्केवारी किती वाढणार?

कोकण पदवीधर मतदारसंघ तर ठाण्यापासून पार सिंधुदुर्गमध्ये गोव्याची सीमा तर पालघरमध्ये गुजरातच्या सीमेपर्यंत पसरलेला असल्याने तेथे मतदानाची टक्केवारी किती प्रमाणात वाढते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

11:22 (IST) 26 Jun 2024
Maharashtra MLC Election 2024 Live Updates: पदवीधर, शिक्षक मतदारसंघात आज मतदान!

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसेच शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे.

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra News: विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग!