Mumbai News Updates Today : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणालाही वेग आला आहे. महाविकासआघाडीतील घटकपक्षांकडून बैठका घेऊन महाराष्ट्रातील रणनीती ठरवली जात आहे. यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसह मुंबई महानगरपालिका निवडणुकीचाही समावेश आहे. दुसरीकडे शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. यानंतर नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा वेगवान आढावा फक्त एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Updates Today: राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा वेगवान आढावा फक्त एका क्लिकवर…

20:58 (IST) 17 May 2023
बुलढाणा: शेगावात उष्माघाताचा बळी; अकोला जिल्ह्यातील रहिवाशाच्या मृत्यूने खळबळ

बुलढाणा: शेगावात आज, बुधवारी उष्माघाताने एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संतनगरीसह आरोग्य सेवा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

20:24 (IST) 17 May 2023
“भाजपाला सगळीकडूनच फटका बसेल, कारण…”; भास्कर जाधवांचं मोठं विधान

१ मे रोजी आमच्या वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरेंनी सांगितलं होतं की, २७ वर्षांपूर्वी जेव्हा आमच्याकडे मुंबई महानगरपालिका ताब्यात आली तेव्हा मुंबई महानगरपालिकेवर ६०० कोटींचे कर्ज होते. आज त्याच मुंबई महानगरपालिकेची ९९ हजार कोटी रुपयांची ठेव आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण कर्ज फेडून त्याच मुंबई महानगरपालिकेची ९९ हजार कोटींची ठेव आहे.

कर्नाटकमध्ये भाजपाला फटका बसला आहे. त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा घेतली जाते. ही सुरुवात आहे, भाजपाला सर्वच राज्यांमध्ये फटका बसेल.

– भास्कर जाधव (आमदार, ठाकरे गट)

20:19 (IST) 17 May 2023
नाशिक: सिटीलिंक बसमधून उतरताना महिला जखमी

नाशिक: सिटीलिंक या शहर बसमधून प्रवास करत असताना बुधवारी सायंकाळी रविवार कारंजा परिसरात बसमधून उतरताना महिला पडल्याने जखमी झाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

19:52 (IST) 17 May 2023
“संजय राऊतांनी २४ तासात माफी मागावी, अन्यथा उद्धव ठाकरे…”, तुषार भोसले यांचा इशारा

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना अल्टिमेटम दिला आहे. हिंदू महासभेने केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षे जुनी असल्याचा दावा केला. यानंतर आता तुषार भोसले यांनी संजय राऊतांकडे २४ तासात माफीची मागणी केली आहे. ते बुधवारी (१७ मे) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

सविस्तर वाचा…

19:39 (IST) 17 May 2023
‘त्या’ वाहनांना इंधनबंदी; अवैध रेती तस्करीला प्रतिबंधासाठी तहसीलदारांचे आदेश

बुलढाणा: अवैध रेती तस्करीला प्रतिबंध लावण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली असून कडक उपाय योजनांमुळे या गोरखधंद्याला चाप बसला आहे.

सविस्तर वाचा…

19:20 (IST) 17 May 2023
“मविआ फुटायला सुरुवात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…”; प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा

आम्ही वेगवेगळ्या पक्षातील असलो, तर माझे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. त्यामुळे मला कुणाकडेही जायला वेळ लागत नाही.

काँग्रेसने आधीच जाहीर केलंय की, मुंबई महानगरपालिकेत ते महाविकासआघाडीत नसून स्वतंत्र लढणार आहेत. त्यामुळे मविआ फुटायची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक जास्त घटना घडणार आहेत. तिथं काय होतं हे पाहून आणखी काही पक्ष भूमिका घेतील.

– प्रकाश आंबेडकर

19:15 (IST) 17 May 2023
डोंबिवलीतील गरीबाचापाडा भागात विजेचा लपंडाव

डोंबिवली: येथील पश्चिम भागातील गरीबाचापाडा, उमेशनगर, देवीचापाडा, नवापाडा भागात विजेचा अचानक लपंडाव सुरू झाल्याने रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत. महावितरणने या भागात छुपे वीज भारनियमन सुरू केले आहे का, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.

सविस्तर वाचा…

19:01 (IST) 17 May 2023
“…म्हणजे राहुल नार्वेकरांनी एखाद्या बाजूला सरकण्यासारखं आहे”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. तसेच फेब्रुवारी २०३ च्या पक्षाला जून २०२२ मध्ये आणून ठेवणार असाल तर ते हास्यास्पद आहे, असंही त्यांनी म्हटलं. ते बुधवारी (१७ मे) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा…

18:58 (IST) 17 May 2023
चंद्रपूर: घरभाड्याचा वाद; भाडेकरूने केली घरमालकीणची हत्या

चंद्रपूर: घरभाड्याच्या जुन्या थकीत रक्कमेवरून झालेल्या वादातून भाडेकरूने घरमालकीणची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील चोरखिडकी परिसरात घडली. सुवर्णा सकदेव (६५) असे मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

18:51 (IST) 17 May 2023
“जिल्ह्याचा उल्लेख संभाजीनगर नाही, तर औरंगाबाद करा”; कोर्टाने निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश, तक्रारदार म्हणाले…

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर सर्वत्र संभाजीनगर उल्लेख होत आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर या याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्ह्याचा उल्लेख आधीप्रमाणे औरंगाबादच करण्याचे निर्देश दिले. यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला तसे आदेशही दिले. मात्र, जिल्ह्याचा उल्लेख औरंगाबाद न होता संभाजीनगरच होत असल्याने आता इनामदार सय्यद मोइनुद्दीन व सय्यद अंजारोद्दीन कादरी यांनी सामान्य प्रशासनाच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. तसेच हे न्यायालयाच्या अवमाननेचं प्रकरण असल्याचं म्हटलं आहे.

सविस्तर वाचा…

18:50 (IST) 17 May 2023
“मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा…”, शिंदे फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर अनिल देशमुखांची मोठी प्रतिक्रिया

शिंदे फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला. महाविकासआघाडीने परमबीर घेतलेला निलंबनाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं रद्द केलं आणि परमबीर यांचं निलंबन मागे घेतलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (१७ मे) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर समितीच्या बैठकीआधी माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वाचा…

18:42 (IST) 17 May 2023
छायाचित्रणासाठी उत्सुक बिबट्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

नागपूर: समाजमाध्यमावर बिबट्याच्या एका व्हिडिओने चांगलीच धम्माल माजवली आहे. हा व्हिडिओ कोणत्या जंगलातला आणि कुणी काढला हे ठाऊक नाही, पण बिबट्याच्या अदांवर पर्यटक चांगलेच फिदा झाले आहेत.

सविस्तर वाचा…

18:18 (IST) 17 May 2023
‘गांज्याची शेती करू द्या किंवा किडनी तरी विकण्याची परवानगी द्या’ कर्जबाजारी शेतकऱ्याची मुख्यमंत्री, राज्यपालांकडे मागणी

बुलढाणा: ‘गांज्याची शेती करू द्या किंवा किडनी तरी विकण्याची परवानगी द्या’, अशी मागणी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आहे. या मागणीचे निवेदन या शेतकऱ्याने थेट राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

सविस्तर वाचा…

17:49 (IST) 17 May 2023
वर्धा बाजार समिती अध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा; सहकार गटाला ‘कात्रज’चा घाट

वर्धा: वर्धा बाजार समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी झाल्या. अध्यक्षपदी आमदार कांबळे गटाचे अमित गावंडे व याच गटाचे पांडुरंग देशमुख उपाध्यक्ष पदी निवडून आले.

सविस्तर वाचा…

17:13 (IST) 17 May 2023
नागपूर: बिल्डरची १.८० कोटींनी फसवणूक

नागपूर: बिल्डरची फसवणूक केल्या प्रकरणी क्रिएटीव्ह इंफ्रास्ट्रक्चरच्या दोन संचालकांना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली तर अन्य तिघे फरार झाले आहेत.

सविस्तर वाचा…

16:47 (IST) 17 May 2023
जारगाव शिवारातील गोदामात बोगस रासायनिक खतांचा साठा जप्त

जळगाव: जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, शेतकर्‍यांकडून आता शेतीकामांनाही वेग देण्यात आला आहे. बोगस रासायनिक खतांसह बियाण्यांच्या विक्रीवर कृषी विभागाचे अधिकारी नजर ठेवून आहेत.

सविस्तर वाचा…

16:31 (IST) 17 May 2023
भाजपचे “मिशन पुणे”

पुणे : कसब्याने शिकवलेला धडा, आगामी लोकसभेची पोटनिवडणूक आणि महापालिका निवडणुकांमध्ये विजयाचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने आता ‘मिशन बारामती’ आणि ‘मिशन शिरूर’नंतर ‘मिशन पुणे’ हाती घेतले आहे.

सविस्तर वाचा..

16:31 (IST) 17 May 2023
“संजय राऊतांनी २४ तासात माफी मागावी, अन्यथा उद्धव ठाकरेंनी…”, तुषार भोसले यांचा इशारा

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे हे आम्ही घसा ओरडून सांगतो आहे. आज त्यांनी सिद्ध केलं की, त्यांनी केवळ हिंदुत्व सोडलेलं नाही, तर हिंदू धर्मही सोडला आहे. मी संजय राऊतांना आव्हान देतो की, २४ तासात माफी मागा, अन्यथा उद्धव ठाकरेंनी याचे गंभीर परिणाम भोगायला तयार रहावं.

– तुषार भोसले (भाजपा, आध्यात्मिक आघाडी)

15:47 (IST) 17 May 2023
उद्धव ठाकरे गट हे भाजपचे प्रमुख ‘लक्ष्य’, पक्षाध्यक्ष नड्डा राज्याच्या दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला पुढील आठवड्यात नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजप व्यापक जनसंपर्क मोहीम राबविणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईत येत असून महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीनेही भाजप रणनीती आखत आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे गट हे भाजपचे ‘लक्ष्य’ असून महाविकास आघाडीला भुईसपाट करण्यासाठी जंग जंग पछाडले जाणार आहे.

सविस्तर वाचा…

15:37 (IST) 17 May 2023
राज्यात ३१ मे पर्यंत अनुभवता येणार शून्य सावली दिवस

चंद्रपूर: शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाते. राज्यात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.

सविस्तर वाचा…

15:15 (IST) 17 May 2023
मालेगाव : मंदिरातील दानपेटी, चरण पादुका चोरणाऱ्या तिघांना अटक

मालेगाव : येथील कॅम्प भागातील व्याघ्रंबरी देवीच्या मंदिरातील दानपेटी व चांदीच्या चरण पादुका अशा सुमारे २० हजारांच्या मुद्देमालाची चोरी करणाऱ्या तिघा भामट्यांना कॅम्प पोलिसांनी अटक केली असून एका संशयिताचा शोध घेण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

15:02 (IST) 17 May 2023
ठाकुर्लीतील श्वान संगोपन केंद्रातील कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याने रहिवासी हैराण

डोंबिवली: ठाकुर्ली पूर्वेतील नव्याने नागरी वस्ती झालेल्या भागात मोकळ्या जागेत एक श्वान संगोपन केंद्र आहे. या केंद्रातील कुत्री सतत भुंकत असल्याने बालाजी आंगण परिरातील सोसायट्यांमधील रहिवासी त्रस्त आहेत.

सविस्तर वाचा :

14:53 (IST) 17 May 2023
मुंबई: मुंबई विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई: मुंबई विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा भोंगळ कारभार आणि परीक्षा नियोजनातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना सातत्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यापीठाने मे महिन्यात होणाऱ्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. नवीन सुधारित तारखा व सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर न केल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरगावी उच्च शिक्षणासाठी जाणे, नोकरी शोधणे आणि प्रवासाचे नियोजन करणे कठीण झाले आहे.

वाचा सविस्तर…

14:48 (IST) 17 May 2023
धुळे : मनपाकडून अवैधपणे मालमत्तेचे मोजमाप; कर वसुली थांबविण्याची ग्राहक परिषदेची मागणी

धुळे – महानगरपालिकेतर्फे मालमत्तेचे लेसरगनद्वारे केलेले बेकायदेशीर मोजमाप आणि त्यातून वसूल करण्यात येणारा मालमत्ता कर तात्काळ थांबवावा, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शहराचा विस्तार वाढला असून आजूबाजूची काही गावेही महानगरपालिकेच्या हद्दीत सामील करण्यात आली आहेत. त्यादृष्टीने जुन्या आणि नवीन मालमत्तेचे मोजमाप करून फेरमुल्यांकन करण्याचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा..

14:37 (IST) 17 May 2023
मुंबई उपनगरांत उष्माघाताचा ताप, रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

मुंबई: मुंबई आणि उपनगरांमध्ये एप्रिलपासून उन्हाचा तडाखा वाढला असून उन्हाच्या वाढत्या झळांमुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबई उपनगरांत अवघ्या महिनाभरात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, तसेच रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

14:34 (IST) 17 May 2023
जळगाव : गुरुवारचा आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याची सूचना; ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचे कारण

जळगाव – जिल्ह्यात १३ तालुक्यांतील ८० ग्रामपंचायतींमध्ये ९३ सदस्य आणि एक थेट सरपंचाच्या रिक्त पदासाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून या दिवशीचे आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याचे आदेश ग्रामपंचायत शाखेतर्फे देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा..

14:23 (IST) 17 May 2023
कोल्हापूरमध्ये सर्वाधिक दर देणाऱ्या साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले

कोल्हापूर : उसाला पुरेसा दर दिला जात नसल्याच्या कारणावरून निवडणुकीचा रणसंग्राम जोमात असताना राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘बिद्री’ कारखान्याच्या संचालक मंडळाला निवडणुकीचे आव्हान पेलावे लागत आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर आता कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे.

सविस्तर वाचा..

13:45 (IST) 17 May 2023
“सुप्रियाताई कोणतंही ट्वीट करताना…” अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांची प्रतिक्रिया

पुणे प्रतिनिधी: पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी फेरीवाल्यां विरोधात कारवाई करतेवेळी वडापाव स्टॉलवर लाथ मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर ट्वीट करत भूमिका मांडली होती.

वाचा सविस्तर…

13:39 (IST) 17 May 2023
वर्धा: प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी आंदोलन; पोलीसांनी आंदोलनकर्त्याला केले स्थानबद्ध

वर्धा: प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे म्हणून नागरिक निकराचा लढा देत आहे. बंद, धरणे नंतर आज लोटांगण आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा…

महाराष्ट् न्यूज लाइव्ह