Mumbai News Updates Today : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणालाही वेग आला आहे. महाविकासआघाडीतील घटकपक्षांकडून बैठका घेऊन महाराष्ट्रातील रणनीती ठरवली जात आहे. यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसह मुंबई महानगरपालिका निवडणुकीचाही समावेश आहे. दुसरीकडे शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. यानंतर नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा वेगवान आढावा फक्त एका क्लिकवर…
Maharashtra News Updates Today: राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा वेगवान आढावा फक्त एका क्लिकवर…
धुळे – कामगार पुरविण्याच्या नावाने महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेसह मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी सूचना महापौर प्रतिभा चौधरी यांनी आयुक्त देविदास टेकाळे यांना केली आहे.
अकोला : शहरात दोन गटात घडलेल्या हिंसाचाराला आता राजकीय रंग दिला जात आहे. हिंसाचाराच्या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधी गटातील आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. शहरातील दंगल पूर्वनियोजित असल्याचे राजकीय आरोपदेखील झाले. काही तथ्यावरून शहरातील शांतता भंग करण्याचा हा सर्व सुनियोजित कट तर नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे. जातीय दंगलीचा राजकीय लाभ नेमका कुणाला यावरून आता चर्चा रंगत आहेत.
पुणे: जांभूळवाडी तलावामध्ये सोडण्यात येत असलेल्या सांडपाण्यामुळेच शेकडो माशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तलावामध्ये सांडपाणी येत असल्याने तलावालगतच्या बांधकामांना नोटीस दिली असून, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची सूचना बांधकाम विभागाला करण्यात आली आहे.
नाशिक – त्र्यंबकेश्वर मंंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रकाराची अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमून चौकशीस सुरुवात झाली असताना बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिर शुद्धिकरण करून आरती केली.
नागपूर: महामेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. याकरिता मोबाइल ऍप आणि महाकार्ड सह अनेक पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहेत.
नागपूर : भारतातीलच नाही तर परदेशातीलही संग्रहालये आता बोलकी होणार आहेत. येत्या १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनी केनिया आणि युगांडा येथील ‘मी किप्सिगिस म्युझियम आहे’ आणि ‘किगुलु म्युझियम’ ही दोन क्रांतीकारी संग्रहालये पर्यटकांशी संवाद साधणार आहेत.
नाशिक – मांजरीने कोंबडीची पिले खाल्ल्याच्या संशयावरून नातवाने वयोवृद्ध आजोबाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना सटाणा तालुक्यातील राजापूरपांडे शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी नातवाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे: महापालिकेच्या सेवेत तृतीयपंथींंची कंत्राटी सेवक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली असून महापालिकेच्या मिळकतींच्या संरक्षणासाठी प्रायोगिक तत्वावर २५ तृतीयपंथींची नियुक्ती ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे.
अलिबाग – स्नेहल जगताप यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेशानंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील संबध ताणले गेले आहेत. महाड मतदारसंघावरील दावा सोडणार नसल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेमुळे स्नेहल जगताप यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात ई- रिक्षा चालकांकडून नियम धाब्यावर बसवून क्षमतेहून दुप्पट प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
भाजपा आमदार दादाराव केचे निधी वाटपावरून नाराज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून व्यक्त केली नाराजी, आष्टी व कारंजा नगरपंचायतींसाठी निधी दिला नसल्याचा आरोप, ९ कोटी ८३ लाखांऐवजी १० कोटी रुपये निधी देण्याची मागणी, टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया
पुणे: राज्यातील गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून जुन्या गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी कर्ज पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
नाशिक – नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एका वाहन चालकाला लुटण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) प्रवाशांसाठी पुण्यदशम बस सुरू केल्या आहेत. प्रवाशांना दहा रुपयांत या वातानुकूलित बसमधून प्रवास करता येतो. प्रत्यक्षात या बसमधील वातानुकूलन यंत्रणा ऐन उन्हाळ्यात बंद आहे. कारण ही यंत्रणा सुरू केल्यास बस बंद पडत असल्याचे प्रकार घडत आहेत.
पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी असल्याने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याबरोबरच पाणी बचतीसाठी टँकर केंद्रही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे टँकरद्वारेही पाणी मिळणार नसल्याने लाखो नागरिकांना ‘पाणीबाणी’ला सामोरे जावे लागणार आहे.
पुणे: भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या २६ किलोमीटर जलवाहिनीच्या कामासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी मावळ आणि खेड उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच हे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा करण्यात आल्याने राज्यातील बेरोजगार तरुणांच्या सरकारी नोकरी मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा पूर्व परीक्षेची प्रत्येक पदनिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असल्याने एकच उमेदवार चारही पदांच्या यादीमध्ये पात्र ठरण्याची भीती असून यामुळे अन्य उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.
नागपूर: मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कुटुंबियांच्या विरोधात प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन पत्नीच्या वडिलासह तिघांनी युवकावर प्राणघातक हल्ला करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला.
नवी मुंबई – नव्या रुपात सुरू होणाऱ्या वंडर्स पार्कचे प्रवेशदर वाढवण्यात येणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत. करोनाकाळापासून जवळजवळ ३ वर्षांपेक्षा अधिक काळ हे पार्क बंद आहे. त्यामुळे पार्क कधी सुरू होणार याची उत्सुकता बच्चेकंपनीसह पालकांना आहे.
नागपूर : एका सुंदर दिसणाऱ्या रंगीत पालीचा शोध लावण्यात भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञांना यश आले आहे. काही पाली दिसायला साधारण पांढऱ्या किंवा काळपटच रंगाच्या दिसतात आणि सर्रास पाल म्हंटले की बहुतांश लोक पालीचा तिरस्कार करतात किंवा काहींना तिची किळसही वाटते आणि महिलाच काय, तर पुरुषही पालीला घाबरतात.
नागपूर : देशात एकीकडे भ्रमणध्वनी आणि ‘इंटरनेट बँकिंग’च्या सोयी वाढत असतानाच दुसरीकडे सायबर फसवणूकही वाढत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखेत २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ वर्षामध्ये तिप्पट वाढ झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.
नागपूर : उपराजधानीतील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निम्मे स्थायी डॉक्टर उन्हाळी सुट्ट्यांवर गेले आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. डॉक्टरांच्या सुट्ट्यांमुळे काही प्रमाणात वार्डातील डॉक्टर कमी झाल्याने रुग्णांना मन:स्ताप होत आहे.
सविस्तर वाचा…
गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी आष्टी येथे लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने सोनाक्षी मसराम या १२ वर्षीय मुलीला चिरडले. यावरून जिल्ह्यातील वातावरण तापले असून आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सूरजागड टेकडीवरील उत्खनन तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
वर्धा : ग्रामीण भागातील हुशार मुलांना चांगल्या दर्जाचे आधुनिक शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयात मुलांचा प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड असते. आगामी शैक्षणिक सत्रात अकरावीत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मे आहे.
नाशिक – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि लेंड हँड इंडिया संस्था यांच्या सहकार्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता पेठरोड येथील एकलव्य निवासी शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा आरोप असलेल्या ४ उरूस आयोजकांवर गुन्हे दाखल, हिंदू महासभा आक्रमक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण, मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करा, अन्यथा राज्यातील मंदिरं २ दिवस बंद ठेवणार, आनंद दवेंचा सरकारला अल्टिमेटम
नाशिक – ३० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेलेले जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या घरातून सुमारे १६ लाखांची रोकड, ३६ लाख रुपयांचे ५४ तोळे दागिने, दोन अलिशान मोटार, उच्चभ्रू वसाहतीत सदनिका, मालमत्तेची कागदपत्रे तसेच अनेक बँक खात्यांची पुस्तके सापडली आहेत.
वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव सुमित वानखेडे यांनी आर्वी मतदारसंघात विकास कामांसाठी लक्षणीय निधी आणला. त्यावर तीव्र आक्षेप घेत भाजपा आमदार केचे यांनी फडणवीस यांना पत्र लिहून एक प्रकारे जाबच विचारला आहे.
नाशिक – नृत्यांगना गौतमी पाटीलच्या शहरात झालेल्या कार्यक्रमात युवकांनी हुल्लडबाजी करीत गोंधळ घातला. यावेळी दोन छायाचित्रकारांना मारहाण करण्यात आली. हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
नागपूर : नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ही गाडी १४ मे २०२३ पासून बंद करण्यात आली होती. त्या ऐवजी तेजस एक्स्प्रेस सोडण्यात येत होती. आता पुन्हा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे. पण ही १६ डब्यांची नव्हे, तर ८ डब्यांची असणार आहे.
महाराष्ट् न्यूज लाइव्ह