Marathi News Updates : EVM है तो मोदी है असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर टीका केली आहे. तसंच २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचं नियोजन केलं जातं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांचा पलटूराम असाही उल्लेख त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. लोकशाहीत भाजपाने चंदीगढ पॅटर्न आणू पाहतं आहे. चंदीगढमध्ये लोकशाहीरुपी सीतेचं अपहरण रामभक्तांनीच केलं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या एका दुकानात २०० ईव्हीएम सापडल्या आहेत असाही आरोप संजय राऊत यांनी केला. तसंच आज अनिल बाबर यांचं निधन झालं. ज्यानंतर सरकारची महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली आहे. अनिल बाबर यांच्या निधनानंतर राजकारणी शोक व्यक्त करत आहेत. बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. या बातम्या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपलंं लक्ष असणार आहे ते लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Today 31 January 2024|EVM है तो मोदी है म्हणत संजय राऊत यांची टीका
सांगली : सांगलीचे पोलीस अधिक्षक म्हणून संदीप घुगे यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली. विद्यमान अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांची पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागात उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली.श्री. घुगे यांनी यापुर्वी जिल्ह्यात उप अधिक्षक म्हणून काम केले आहे.
सांंगली : खानापूर-आटपाडीचे आमदार अनिल बाबर (वय ७४) यांचे बुधवारी पहाटे सांगलीतील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत गार्डी येथील ज्ञान प्रबोनिधी शाळेच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार आदींनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
सांगली : महापालिका क्षेत्रातील अनाधिकृत खोकी हटाव मोहीम शुक्रवार दि. २ फेब्रुवारीपासून हाती घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्या खोकीधारकांना महापालिकेने नोंदणी क्रमांक दिलेले नाहीत, त्यांनी स्वखर्चाने खोकी हटवावीत अन्यथा, अतिक्रमण समजून खोकी हटविण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे. तत्कालिन नगरपालिका, व सध्याच्या महापालिकेने निश्चित केलेल्या सात फूट बाय सहा फूट या आकारातच नोंदणीकृत खोकी असणे बंधनकारक असून या शिवाय किंवा जास्त क्षेत्रातील बांधकाम खोके धारकाने स्वत: काढून घ्यायचे आहे. अन्यथा सदर खोक्यावर जागेवर कारवाई होणार आहे. निर्धारित क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र खोक्याने व्यापले असल्यास पूर्ण खोके अनधिकृत ठरवून ते निष्कासित करून खोके परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
खोपोली हद्दीतील बोरेघाटातील वाहतूक पोलीस चौकीजवळ रस्त्यावर डिझेल सांडल्याने शिवशाही गाडी घसरून अपघात झाला. एमएच ०६ बीडब्ल्यू ४३३५ ही बस अलिबागहून स्वारगेट पुणेकडे जाताना हा अपघात झाला. अपघातात बसमधील सर्व ४४ प्रवाशी सुखरूप असून कुणीही जखमी नाही. महामार्ग पोलीस व आयआरबी यंत्रणा गाडी काढून वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असून पुणेकडे जाणऱ्या वाहतुकीसह मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली.
पुणे : पुण्यातील रामोशी गेट परिसरात शाळकरी मुलांनी एकावर चाकूने वार केले. गज, पट्ट्याने त्याला बेदम मारहाण केली. या घटनेत शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला असून, खडक पोलिसांनी चार शाळकरी मुलांना ताब्यात घेतले.
वर्धा : वर्धा लोकसभा क्षेत्रातील अमरावती जिल्हयात येत असलेल्या वरुड-मोर्शी मतदार संघातील मध्य रेल्वे नरखेड – अमरावती सेक्शनवरील चांदूर बाजार आणि मोर्शी रेल्वे स्थानकांदरम्यान तिर्थक्षेत्र रिद्धपूर येथे रेल्वे स्थानक सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाची (रेल्वे बोर्ड) व्दारा मंजुरी देण्यात आली आहे व या संदर्भातील लेखी आदेश रेल्वे बोर्डाकडून प्राप्त झाल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकार, गैरवर्तणूक करून नियमाचे उल्लंघन केलेल्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांना एमपीएससीच्या परीक्षांसाठी प्रतिरोधित करण्याची कारवाई करण्यात आली असून एमपीएससीने एक्स या समाजमाध्यमाद्वारे ही माहिती दिली.
अनिल बाबर यांचं आज निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज सांगली येथील खानापूर गावात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगलीतल्या खानापूर या ठिकाणी पोहचले आहेत. अनिल बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नंदुरबार – जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात बुधवारी सकाळी नवापूर- पुणे बसची मालमोटारीला मागून धडक बसल्याने १० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या दहिवेल आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग मृत्युचा सापळा झाला असून दररोज लहानमोठे अपघात या महामार्गावर होत आहेत.
नागपूर : राज्यातील वाढती बेरोजगारी आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक भांडवल याअभावी अनेक युवक रेल्वेस्थानक परिसरात आणि रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थ, पाणी बाटली तसेच सिगारेट, गुटखा व तत्सम पदार्थ अनधिकृतपणे विक्री करू लागले आहेत.
ठाणे : अगामी लोकसभा निवडणुकीत ठाण्याची जागा मिळावी यासाठी शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, आता शहरात शिवसेनेने उभारलेल्या कंटेनर शाखांवरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पुणे : राज्य सरकारने ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ राबवण्यास मंजुरी दिली आहे. त्या अंतर्गत राज्यात ड्रोन केंद्रांचे जाळे निर्माण करण्यात येणार असून, सहा विभागीय आणि बारा जिल्हास्तरीय ड्रोन केंद्र निर्माण केली जाणार आहेत. या ड्रोन केंद्राचे मुख्यालय आयआयटी मुंबईमध्ये उभारले जाणार आहे.
पुणे : शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मिळालेला निधी महापालिकेला खर्च करता आला नसल्यामुळे राज्य शासनाने महापालिकेवर ताशेरे ओढल्यानंतर निधी खर्च करण्यासाठी विजेवर धावणाऱ्या गाड्या (ई-बस) खरेदीचा घाट घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई : केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र मुंबईत २०२३ मध्ये तब्बल ६३ हजारांहून अधिक नवीन क्षयरुग्ण आढळले असून, दोन हजारांहून अधिक क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने क्षयमुक्तीबाबत केलेली घोषणा मुंबईत धूसर बनू लागली आहे.
पुणे : एकीकडे भारतातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत असताना परदेशातून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचा अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला. त्यात ही माहिती समोर आली आहे.
नाशिक : प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप होत असल्याने अद्दल घडवण्यासाठी पत्नीने दुसऱ्याच्या मदतीने पतीच्या अंगावर साप सोडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार म्हसरूळ परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : मराठा समाजाच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला सरकारने मान्यता दिली असली तरी सरकारने दिलेल्या मसुद्यानुसार ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला.
नागपूर : देशभरात केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक मोठ्या मंदिरात भ्रष्टाचार होत असल्यामुळे या मंदिराची चौकशी करण्यापेक्षा सरकारने ती भक्ताकडे सोपवावी, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समवन्वयक सुनील घनवट यांनी केली. राज्यातील वक्फ बोर्डाच्या अखत्यारित असलेल्या जमिनी सरकारने ताब्यात घ्याव्या, अशी मागणी त्यांनी केली.
वाशिम : जिल्ह्यात अंदाजे १ हजार ७६ अंगणवाड्या असून यामधील बालकांसाठी पोषण आहार दिला जातो. मात्र मागील काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्याने आहार वाटप बंद असताना पालकांच्या मोबाईल फोनवर आहार वाटप केल्याचे मॅसेज प्राप्त होत असल्यामुळे पोषण आहार वाटपातील गोंधळ समोर येत असल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
चंद्रपूर : सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी जी अधिसूचना काढली आहे, ती रद्द करावी आणि ओबीसी (विजा, भज, व विमाप्र), अनुसूचित जाती, जमाती व इतर समाजांची जातनिहाय जनगणना करावी, या मागण्यांसाठी ७ फेब्रुवारीला येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : शहर आणि जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे. मतदार यादीतील त्रृटींमुळे निवडणुका पुढे ढकलण्याची नामुष्की पुणे बार असोसिएशनवर आली आहे.
पिंपरी : महापालिकेच्या आकारणी व कर संकलन विभागाने वारंवार आवाहन करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या २८३ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
पुणे : राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या पेट्रोल पंपावर दहा हजारांची लाच घेताना पकडलेल्या वजन मापे निरीक्षकाच्या पुण्यातील घरात तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने ही कारवाई केली.
नाशिक : पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे निफाड तालुक्यातील चांदोरी येथे होणारा बालविवाह रोखण्यात आला. नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही केली.
पुण्यातील रस्त्यांवर सध्या तब्बल लाखभर रिक्षा धावत आहेत. रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसतात. प्रत्यक्षात मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओने) २०२३ मध्ये केवळ ८८ रिक्षांवर भाडे नाकारल्याप्रकरणी कारवाई केली आहे .
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून गोदावरी गौरवची मुहूर्तमेढ रोवली गेली. वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या बड्या व्यक्तींचा गौरव करायला हवा, यानिमित्ताने संबंधित व्यक्ती नाशिक नगरीत यावी आणि नाशिककरांनी त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करावा, या कल्पनेतून सुरू झालेल्या गोदावरी गौरव पुरस्काराने आजवर अनेकांना गौरविण्यात आले आहे. एका वर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची निवड करण्यात आली.
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात मुंबईत १० हजार ४६७ घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला या घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी ७१६ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
पुणे : ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला केलेल्या मद्य पार्टीवरून गदारोळ सुरू आहे. या पार्टीची छायाचित्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात दाखवून रुग्णालय प्रशासनाचे वाभाडे काढले होते. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने अंतिम अहवाल सादर केला आहे.
पुणे : देशातून होणाऱ्या हळद निर्यातीत वाढ झाली आहे. अरबी देशांसह अमेरिका आणि युरोपीय देशांतून मागणी वाढल्यामुळे आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये देशातून १ लाख ७० हजार ८५ टन हळदीची निर्यात झाली आहे. सन २०२१-२२च्या तुलनेत १७ हजार टनांनी निर्यातीत वाढ झाली आहे.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चालू वर्ष निवडणुकांचे असून लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ, दरवाढ होणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
EVM है तो मोदी है असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर टीका केली आहे. तसंच २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचं नियोजन केलं जातं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नितीश कुमार यांचा पलटूराम असाही उल्लेख त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. लोकशाहीत भाजपाने चंदीगढ पॅटर्न आणू पाहतं आहे असाही आरोप त्यांनी केला आहे.