Mumbai Maharashtra News Live : लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून एकमेकांवर दबाव वाढविण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. राज्याचे पावसाळी अधिवेशन २९ जून पासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी २६ जून रोजी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडेल. त्यानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या ११ जागांच्या विधानपरिषदांची चुरस दिसून येईल.

Live Updates

Mumbai Maharashtra News | मुंबई आणि महाराष्ट्राशी निगडित बातम्या वाचा लाईव्ह

20:36 (IST) 25 Jun 2024
यूपीएससी, एमपीएससीचे मोफत प्रशिक्षण, १३ हजार रुपये मासिक विद्यावेतनही मिळणार, फक्त येथे अर्ज करा

केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे १३ हजार रुपये विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येईल.

सविस्तर वाचा...

20:28 (IST) 25 Jun 2024
छत्रपती संभाजीनगर: परधर्मीय तरूणीशी बोलल्यावरून तरुणाला जमावाकडून मारहाण

दोन वेगवेगळ्या धर्मांमधील तरुण-तरुणीला गजबजलेल्या भागात एकत्र बोलताना पाहून आलेल्या जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली.

सविस्तर वाचा...

20:20 (IST) 25 Jun 2024
छत्रपती संभाजीनगर: तामिळनाडूतील टेक्सटाईल कंपनीकडून एक कोटींची फसवणूक

कंपनीच्या पाच संचालकांनी ७४ बिलांपैकी १४ बिलाचा मालच मिळाला नाही, असे खोटे भासवून तो माल दुसऱ्याला विकला.

सविस्तर वाचा...

20:13 (IST) 25 Jun 2024
ओबीसी, मराठा नेत्यांनी संयमाने बोलावे; प्रश्न सुटण्याच्या मार्गावर – शंभूराज देसाई

देसाई म्हणाले, मराठा समाजाच्या आंदोलनाला कोणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. मराठा समाजासह ओबीसी समाजही आपल्या मागण्यांसाठी आग्रही आहेत.

सविस्तर वाचा...

19:55 (IST) 25 Jun 2024
देवेंद्र फडणवीसांच्या पुतळ्याला काळे फासले…. बावनकुळेंच्या वाहनावर जोडा…..

आंदोलकांनी फडणवीस यांच्या पुतळ्याला काळे फासले व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनावर जोडा भिरकावला.

सविस्तर वाचा...

19:43 (IST) 25 Jun 2024
नाशिक: आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरुंचा विद्यार्थ्यांना दिलासा

वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असलेली नीट परीक्षा आणि यूजीसी घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

सविस्तर वाचा...

19:26 (IST) 25 Jun 2024
युजीसीकडून पदव्युत्तर पदवीसाठीचा नवा आराखडा जाहीर… कोणते बदल होणार ?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार पदवी अभ्यासक्रमात केलेल्या बदलांनंतर आता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...

19:14 (IST) 25 Jun 2024
असदुद्दीन औवैसींच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसेना शिंदे गटाचा संताप, खासदारकी रद्द करण्याची मागणी

ओवैसी यांच्या प्रतिमेला जोड्यांनी मारून संताप व्यक्त करताना त्यांची खासदारकी तातडीने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.

सविस्तर वाचा...

18:46 (IST) 25 Jun 2024
बापरे…४६ लाखाला ऑनलाईन गंडा, आमिषाला बळी पडलेल्या शिक्षकाची फसवणूक

‘आम्ही युनायटेड नेशन्ससोबत काम करत असून भारतात शिक्षणावर गुंतवणूक करावयाची आहे.'

सविस्तर वाचा...

18:33 (IST) 25 Jun 2024
‘जय पॅलेस्टाईन’ बोलल्यामुले सोलापूरात असदुद्दीन ओवेसींच्या विरोधात आंदोलन

संसदेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू असून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘जय पॅलेस्टाईन’ म्हणत खासदारकीची शपथ घेतली. यानंतर त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोलापूरमध्ये शिंदे गटाच्या वतीने ओवेसींच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

18:03 (IST) 25 Jun 2024
२८८ जागा लढायच्या की पाडायच्या? हे १३ जुलै रोजी ठरवू – मनोज जरांगे

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पुन्हा आंतरवाली सराटी येथे आंदोलनासाठी येऊन बसले. यावेळी त्यांनी ओबीसी आंदोलनावर भाष्य करताना मराठा समाजाला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. तसेच ओबीसी - मराठा यांच्यातील संघर्षाला छगन भुजबळ जबाबदार असल्याचे म्हटले. यापुढे विधानसभेला २८८ जागी उभा राहायचे की २८८ जागा पाडायच्या? याचा निर्णय १३ जुलै रोजीच्या बैठकीत घेऊ, असे त्यांनी सांगितले.

17:35 (IST) 25 Jun 2024
सांगली: दुष्काळ मदत निधीचा अपहार करणाऱ्या १३ जणांवर गुन्हा दाखल

अपहार उघडकीस येताच संबंधित शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

17:23 (IST) 25 Jun 2024
सलून चालकाने चालवली मिनी स्कूल बस, बस शिरली दुकानात, व्हिडीयो व्हायरल

मिरा रोड येथील पूनम सागर परिसरात रात्री ८ च्या सुमारास एक शाळेच्या बसचा चालक केस कपाण्यासाठी आला होता.

सविस्तर वाचा...

17:13 (IST) 25 Jun 2024
नागपूर : वेळापत्रकात बदल करताच मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ

नागपूर : सोमवार २४ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महामेट्रो मेट्रो गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करत दर १० मिनिटांनी प्रवासी फेऱ्या सुरू केल्या. त्याचाच फायदा होताना दिसत असून पहिल्याच दिवशी मेट्रोची प्रवासी संख्या ९० हजारावर गेली आहे.

सविस्तर वाचा...

17:00 (IST) 25 Jun 2024
छत्रपती संभाजीनगर, नाशिक व नागपूर शहर गोव्याला हवाई मार्गाने जोडणार, शक्तिपीठ महामार्ग तूर्तास थंडबस्त्यात

नागपूर : लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीच्या सरकारने नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग तूर्तास थंडबस्त्यात टाकला आहे. मात्र, इंडिगोने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर या शहरांना गोव्याला हवाई मार्गाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

16:16 (IST) 25 Jun 2024
‘बिद्री’च्या इथेनॉल प्रकल्पावरील कारवाईचा कामगारांकडून निषेध; काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज

बिद्री साखर कारखान्याच्या आसवणी , इथेनॉल प्रकल्पावर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर सर्व कामगारांनी निषेध सभा घेतली.

सविस्तर वाचा...

16:08 (IST) 25 Jun 2024
इंग्रजीतून शपथ घेत निलेश लंकेंचं सुजय विखेंना प्रत्युत्तर; शरद पवारांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले…

लोकसभा अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू असून त्यानुसार आज महाराष्ट्रातील अनेक खासदारांनीही शपथ घेतली. मात्र, यावेळी निलेश लंकेच्या शपथीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर आता त्यांचं कौतुक होऊ लागलं आहे. निलेश लंके यांची इंग्रजीतून घेतलेली शपथ म्हणजे त्यांनी सुजय विखे यांच्या टीकेला दिलेलं प्रत्युत्तर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सविस्तर वाचा

16:03 (IST) 25 Jun 2024
Mumbai Maharashtra News Live : पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल आणि पबबाहेर अतिक्रमण कारवाई सुरू

पुण्यात पबमध्ये अमली पदार्थाचे सेवन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पुणे पोलीस आणि पालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे.

15:36 (IST) 25 Jun 2024
मुंबई: चटईक्षेत्रफळ उल्लंघनप्रकरणी नगरविकास विभागाच्या स्पष्टीकरणाची झोपु प्राधिकरणाला प्रतीक्षा

झोपु प्राधिकरणात कमी प्रिमिअम भरावे लागत असल्यामुळे शासनाला मिळणाऱ्या महसुलाचे नुकसान होत आहे, असा दावा केला जात आहे.

सविस्तर वाचा...

15:24 (IST) 25 Jun 2024
आळंदी: इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी ‘कॉमन ॲक्शन प्लॅन’ची गरज; लांडगे अधिवेशनात मांडणार मुद्दा!

इंद्रायणी नदी प्रदूषण आणि पुनरूज्जीवन हा पिंपरी- चिंचवडसह सभोवतालच्या परिसरासाठी अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे.

सविस्तर वाचा...

15:08 (IST) 25 Jun 2024
शाळेतील मुलांच्या डब्यात आता जंक फूड नको, तर… प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मत

नागपूर : आधुनिक जीवनशैलीमुळे नवीन खाद्यसंस्कृती जन्माला आली आहे. यात जंक फूडचे महत्त्व वाढत आहे. या जंक फूडने आता शालेय विद्यार्थ्यांच्या डब्यातही जागा मिळवली आहे. परंतु, त्याचा धोकादायक परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे शाळेच्या डब्यात जंक फूड नव्हे तर सकस पोषण आहार दिला गेला पाहिजे, असे मत शासनाची पाककृती समिती व परसबाग, खान्देश समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा....

15:06 (IST) 25 Jun 2024
“पोलिसांवरील कारवाई म्हणजे केवळ नौटंकी”; पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचं टीकास्र; म्हणाले, “जोपर्यंत…”

पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका पबमध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. महत्त्वाचे म्हणजे याप्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कारवाई करत तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबीतही केले होते. दरम्यान, या प्रकरणावरून आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांना लक्ष्य केलं आहे.

सविस्तर वाचा -

15:02 (IST) 25 Jun 2024
Mumbai Maharashtra News Live : पुणे पोर्श प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

पुणे पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीला त्याच्या आत्याच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

14:49 (IST) 25 Jun 2024
गडचिरोलीत नक्षलवाद्यांची चहूबाजूंनी कोंडी; आणखी पाच गावांनी केली प्रवेशबंदी

गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी नक्षल नेता गिरीधर याने पत्नीसह आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळीला हादरा बसल्याचे बोलल्या जात असताना गडचिरोलीतील आणखी पाच गावांनी नक्षलवाद्यांना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे आधीच पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानामुळे शेवटची घटका मोजत असलेल्या या चळवळीची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा....

14:37 (IST) 25 Jun 2024
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरींची चौकशी सुरूच राहणार; न्यायालयाचा अंतरिम स्थगिती देण्यास…

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवर मंगळवारी न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली.

सविस्तर वाचा...

14:23 (IST) 25 Jun 2024
मुंबईच्या जोगेश्वरीतून सायबर लुटारूंची आंतरराज्यीय टोळी जेरबंद, नऊ आरोपींचा समावेश

अमरावती : एका महिलेची ऑनलाइन शेअर खरेदी-विक्री व्यवहारात तब्बल ७४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण सायबर पोलिसांनी मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एका हॉटेलमधून अटक केली.

सविस्तर वाचा....

14:13 (IST) 25 Jun 2024
आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरण : चंदा कोचर यांना दिलासा नाहीच

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने फौजदारी कारवाईसाठी दिलेल्या मंजुरीला बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारी त्यांची ही मागणी मान्य करण्यास नकार दिला.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 25 Jun 2024
अर्नाळा किल्ल्यातील समुद्रात २५ फुटांचा व्हेल मासा मृत अवस्थेत आढळला

विरार जवळील अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनारी मृत अवस्थेत व्हेल मासा आढळून आला आहे.

सविस्तर वाचा...

13:37 (IST) 25 Jun 2024
Maharashtra Breaking News Live : “मी एकटा पडलो, मराठ्यांचे नेते काय करत आहेत?”, मनोज जरांगे व्यथित

ओबीसी समाजाचे काही नेते आंदोलन करत असताना सर्व ओबीसी नेते एकवटले गेले. मात्र मी आंदोलन करत असताना मराठ्यांचे नेते कुठे आहेत? मी एटका पडलो आहे. तरी समाज माझ्यापाठी असून मी जरी एकटा पडलो तरी ठासून सांगतो, शेवटपर्यंत लढत राहणार, अशी भूमिका मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

13:14 (IST) 25 Jun 2024
कुर्लावासियांचे पोस्टकार्ड आंदोलन सुरू, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना किमान पाच हजार पत्र पाठविणार

मुंबई : कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडला (डीआरपीपीएल) देण्यास विरोध करीत कुर्लावासियांनी सोमवारपासून पोस्टकार्ड आंदोलन सुरू केले आहे. मदर डेअरीची जागा डीआरपीपीएलला देण्याचा शासन निर्णय रद्द करावा आणि मदर डेअरीची संपूर्ण २१ हेक्टर जागेत उद्यान विकसित करावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

suryakanta patil

सूर्यकांता पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

Story img Loader