Today’s News Update, 01 January 2024 : काही तासांपूर्वी भारतासह जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सर्वत्र नववर्षानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आहे. राम मंदिरावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. दिवसभर या सर्व बातम्यांवर आपलं लक्ष असेल. महाराष्ट्रात मराठा आंदोलनाची तयारी चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईत चक्काजाम आंदोलन करणार आहे. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा या न्यूज लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Updates in Marathi : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

21:27 (IST) 1 Jan 2024
मंत्री हसन मुश्रीफ यांचे बनावट फेसबुक खाते, कागल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

बोगस फेसबुक खात्याचा फटका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही बसला आहे . त्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

21:06 (IST) 1 Jan 2024
सोलापूर महापालिकेत दुसऱ्या अभय योजनेत ६८.३६ कोटींचा थकीत कर जमा

अभय योजनेचा लाभ घेत ३४ दिवसांत नागरिकांनी एकूण ६८ कोटी ३५ लाख ७४ हजार १५८ रूपयांचा महसूल कर रूपाने महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.

सविस्तर वाचा…

20:53 (IST) 1 Jan 2024
पंढरीच्या विठुरायाला अयोध्येच्या रामरायाचे निमंत्रण; किशोर व्यास म्हणाले, “बाकीच्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ…”

सतत देणग्यांचा ओघ सुरूच असल्याने आज अखेर २ हजार ९०० कोटी रूपये शिल्लक असल्याचे व्यास यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

20:27 (IST) 1 Jan 2024
बँक अधिकाऱ्यांना मिळणार धडे, नव्या अभ्यासक्रमाची निर्मिती

बँक अधिकाऱ्यांसाठी विद्यापीठाने पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे.

सविस्तर वाचा…

20:14 (IST) 1 Jan 2024
मनमाड : नववर्षातही रेल्वे गाड्यांना विलंब

गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर -नांदेड सचखंड एक्स्प्रेस ही गाडी तब्बल ३० तासांच्या विलंबाने धावत होती.

सविस्तर वाचा…

20:04 (IST) 1 Jan 2024
पिंपरी चिंचवड : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर, ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बारा संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

19:31 (IST) 1 Jan 2024
महिलांना धमकावून पैसे उकळणाऱ्याला राजस्थानमध्ये अटक

समाजमाध्यमांवर महिलांसोबत मैत्री करून त्यांची अश्लील छायाचित्रे पतीला पाठवण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या एका आरोपीला देवनार पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली.

सविस्तर वाचा…

19:18 (IST) 1 Jan 2024
नागपुरात स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी “रास्तो रोको” आंदोलन, शहरात वाहतूक कोंडी

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या सहा दिवसांपासून नागपुरातील संविधान चौकात उपोषण सुरू केले.

सविस्तर वाचा…

19:13 (IST) 1 Jan 2024
“यात्रेला जनतेतून विरोध म्हणजे सरकारचे दिवस…”, संकल्प यात्रेबाबत वडेट्टीवार म्हणाले…

केंद्र सरकारच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनावर ‘मोदी सरकारची हमी’ असे शब्द लिहिले असल्यामुळे लोकांचा विरोध वाढत आहे.

सविस्तर वाचा…

18:48 (IST) 1 Jan 2024
इचलकरंजीतील गणपती कलश यात्रेत भाविक, महिलांचा उत्साही सहभाग

कोल्हापूर : इचलकरंजी येथे सोमवारी सायंकाळी निघालेल्या १०८ कुंडीय श्री गणपती कलश यात्रेत भाविक, महिलांचा उत्साही सहभाग होता. सुमारे पाच हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ यांच्या वतीने पंचगंगा वरदविनायक मंदिर परीसर इचलकरंजी येथे २ ते १० डिसेंबरपर्यंत १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम राजस्थानचे थोर संत श्री सितारामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. यानिमित्त आज कलश यात्रा काढण्यात आली होती.

18:41 (IST) 1 Jan 2024
सांगली : राजारामबापू कारखान्यावर राममंदिर कलशाचे पूजन

सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील राम मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदिरातील अक्षता कलशाचे मोठया उत्साहात स्वागत करून सोमवारी विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम जय राम जय जय रामाच्या उद्घोषात राम मंदिरातील वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेले.

18:38 (IST) 1 Jan 2024
कोल्हापुरातील मालवाहतूक ठप्प; दोन हजारांहून अधिक ट्रक अडकले, ४० कोटींची उलाढाल ठप्प

केंद्र सरकारच्या प्रस्तावित नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघातास जबाबदार ट्रकचालकास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

18:13 (IST) 1 Jan 2024
मिरजेत शिंदे अन् ठाकरे गटात राडा, कार्यालयावरून कार्यकर्ते समोरासमोर

ठाकरे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा करीत आपल्याच शिवसेनेच्या नावे ही जागा असल्याचा दावा केला.

सविस्तर वाचा…

17:55 (IST) 1 Jan 2024
ट्रक चालकांच्या आंदोलनावर फडणवीस म्हणाले, “माहिती घेतो त्यानंतर…”

केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी सोमवारी नागपूरसह देशभर विविध ठिकाणी ट्रक चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

सविस्तर वाचा…

17:43 (IST) 1 Jan 2024
नाशिक : इंदिरानगरात गॅस गळतीमुळे आगीत दोन जण जखमी

दुकान उघडले असता अंधार असल्याने त्यांनी दिवे लावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी गॅस गळतीमुळे कोंडलेला वायू मोकळा झाला.

सविस्तर वाचा…

17:22 (IST) 1 Jan 2024
महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार? जयंत पाटील म्हणाले, “या आठवडाभरात…”

जयंत पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले येत्या एक-दोन दिवसांत जागावाटपाचं चित्र सर्वांसमोर स्पष्ट केलं जाईल. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची दिल्लीत एक बैठक झाली आहे. काँग्रेसच्या पक्षांतर्गत काही बैठका दिल्लीत पार पडल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. तिन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र बसतील आणि या आठवड्याभरात सर्व गोष्टी ठरतील अशी मला अपेक्षा आहे.

17:02 (IST) 1 Jan 2024
‘कालही सोबत होतो, उद्याही..’, केदार यांच्या समर्थनार्थ फलक

नागपूर: काँग्रेस नेते सुनील केदार यांना जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शिक्षा झाली. ते सध्या तुरुंगात आहेत. एक धडाडीचा नेते अशी प्रतिमा असलेल्या केदारांचे असंख्य समर्थक यामुळे हळहळले. संकटाच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा संदेश देणारे फलक युवक काँग्रेसचे नेते बंटी शेळके यांनी नागपूरमध्ये लावले असून त्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सविस्तर वाचा…

17:01 (IST) 1 Jan 2024
नागपूर : मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वडिलांना का जावे लागले न्यायालयात? वाचा काय आहे प्रकरण…

नागपूर : आपल्या नऊ वर्षीय मुलाचा वाढदिवस साजरा करण्याकरिता नागपूरमधील एका वडिलाला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर कौटुंबिक वादातून अशाप्रकारचे अनोखे प्रकरण आले. उच्च न्यायालयाने २५ हजार रुपये प्रतिमाह देण्याच्या अटीवर वडिलांना मुलासह वाढदिवस साजरा करण्याची परवानगी दिली.

सविस्तर वाचा…

16:31 (IST) 1 Jan 2024
बोईसर : युरिया खताच्या बेकायदा साठ्यावर कारवाई

पोलिसांची गस्त सुरू असताना गुंदले येथील वाघोबा खिंडीजवळ आतल्या रस्त्यावर काही तरुण पोलिसांना बघून पळून गेले.

सविस्तर वाचा…

16:18 (IST) 1 Jan 2024
“फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली”, सुप्रिया सुळेंचा आरोप

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहेत. पोलिसांना पारदर्शकपणे काम करु दिलं जात नाही, असाही आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.

15:51 (IST) 1 Jan 2024
नाशिक विभागात लाचलुचपत प्रतिबंधकचे १६१ सापळे, २३५ लाचखोरांवर कारवाई

सुनीता धनगर यांच्यावर कारवाई केल्यानंतर तपासात उघड चौकशीत त्यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा…

15:30 (IST) 1 Jan 2024
VIDEO : ट्रक चालकांच्या आंदोलनास हिंसक वळण, पोलिसांवरच दगडफेक अन् काठ्यांनी मारहाण

या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून जेएनपीटी मार्गावर बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरु केले.

सविस्तर वाचा…

15:29 (IST) 1 Jan 2024
वसई : ट्रकचालकांनी महामार्ग रोखला, आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

पोलिसांच्या गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने काही काळ महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सविस्तर वाचा…

14:28 (IST) 1 Jan 2024
राज्यात १५,४६६ बालमृत्यू!

मुंबई : आदिवासी विभागातील माता-बाल मृत्यू कमी करण्यासाठी करावयाच्या उपयायोजनंसदर्भतीला अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला गेल्या वर्षी सादर करण्यात आला असला तरी त्यातील अनेक शिफारशींची अंमलबजावणी झालेली दिसत नाही तसेच यासाठी आरोग्य विभागाकडून अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीचा निम्म्याहून कमी वापर झाल्याचे दिसून येत आहे.

वाचा सविस्तर…

14:11 (IST) 1 Jan 2024
पाण्याची टाकी उभारणीवरून झालेल्या वादात ४० आदिवासी बांधवांवर बहिष्कार, डहाणू तालुक्यातील सिसने गावातील प्रकार

गावकऱ्यांनी पाच शनवार कुटुंबीयांतील ४० सदस्यांना वाळीत टाकले असून त्यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याला दगड व दोरी बांधून बंद करण्याचा प्रयत्न केला.

सविस्तर वाचा…

13:20 (IST) 1 Jan 2024
नवी मुंबई : केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात ट्रक चालक रस्त्यावर

रात्रभर नववर्षाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना या आंदोलनाकडे मोर्चा वळवावा लागला. एनआरआय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत ट्रक चालकांची समजूत काढत मार्ग मोकळा केला.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 1 Jan 2024
डोंबिवलीत किराणा दुकानात विमल पान मसल्याची विक्री, देवी चौकातील दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल

डोंबिवली : गुटखा विक्री कायद्याने बंदी असताना येथील पश्चिमेतील देवी चौकातील एका किरणा दुकानदाराने आपल्या दुकानात विमल पान मसाल्याचा साठा करून त्याची विक्री केल्याबद्दल विष्णुनगर पोलिसांनी संबंधित दुकानदारा विरुध्द अन्न आणि सुरक्षा कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. दुकानदाराकडून ६९ हजाराचा पान मसल्याचा साठा जप्त केला आहे.

वाचा सविस्तर…

12:44 (IST) 1 Jan 2024
विशेष रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा उदंड प्रतिसाद; ‘या’ गाड्यांना मुदतवाढ

अकोला : प्रवाशांचा प्रतिसाद आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून ओखा-मदुराई, सूरत-ब्रह्मपुर (ओडिसा) विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या दोन गाड्या जानेवारी अखेरपर्यंत धावतील.

सविस्तर वाचा…

12:43 (IST) 1 Jan 2024
वाघाची डरकाळी आता स्पष्ट ऐकू येणार; ताडोबातील पर्यटक वाहनात होतोय बदल, जाणून घ्या सविस्तर…

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांना आता पर्यटक वाहनाच्या आवाजाचा त्रास कमी होणार आहे. पर्यटकांनासुद्धा वाघाची डरकाळी स्पष्टपणे ऐकता येणार आहे. या व्याघ्रप्रकल्पातील पर्यटक वाहनांपैकी चार जुन्या वाहनांचे रुपांतर पेट्रोलवरुन बॅटरीवर करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

12:40 (IST) 1 Jan 2024
“त्या किंकाळ्या विसरलो नाही, त्यामुळे आता जीव गेला तरी…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

आम्ही ठरवलं आहे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांसाठी ओबीसीतूनच आरक्षण घेणार. आमचा जीव गेला तरीही मुंबईचं आंदोलन होणारच. अंतरवाली-सराटीत झालेल्या लाठीचार्जमध्ये हात-पाय मोडले गेले. मी ते काहीही विसरलो नाही. त्या किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरलं होतं. पण आता गाव त्याच ताकदीने पेटून उठलं आहे. जे रक्त सांडलं त्याचं बळ निर्माण झालं आहे. तो विषय काढण्यासारखा नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.

वंचितला इंडिया आघाडीत प्रवेश मिळणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

२०६ व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून चर्चा सुरू आहे. त्या सर्व चर्चांदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामुळे कधी ना कधी औपचारिक अनौपचारिकरित्या भेट होणारच आहे. त्यामुळे अफवा पसरवण्यात काहीही अर्थ नाही. इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी घ्यायचे हे आत्ता त्यांनी ठरवायचं आहे. पण आत्ता तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीचे दार बंद आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.