Today’s News Update, 01 January 2024 : काही तासांपूर्वी भारतासह जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सर्वत्र नववर्षानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आहे. राम मंदिरावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. दिवसभर या सर्व बातम्यांवर आपलं लक्ष असेल. महाराष्ट्रात मराठा आंदोलनाची तयारी चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईत चक्काजाम आंदोलन करणार आहे. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा या न्यूज लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Updates in Marathi : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या
मुंबई : सध्या मोबाइलवर यूट्युब, इन्स्टाग्रामवरील रिल पाहण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. कार्यालयात काम करतानाही रिल पाहण्यात अनेक नागरिक दंग असतात. त्यामुळे कामावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन कामा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मोबाइलचा वापर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.
पुणे : कोरेगाव भीमा येथील २०६ व्या शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायांनी विजयस्तंभास अभिवादन केले. अभिवादनासाठी अनुयायी आणि नेत्यांची उपस्थिती लक्षात घेत पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पालघर : शनिवारी (३० डिसेंबर) दुपारी शिर्डी पालघर बसला एका डंपरने धडक दिल्यानंतर जागीच मृत पावलेल्या ११ महिन्याच्या आदित्य गवते याचा पाच वर्षीय थोरला भाऊ हर्षद गवते याने आपले वडील पोहोचतात मुंबईच्या केईएम रुग्णालयात काल रात्री प्राण सोडले.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काळाघोडा महोत्सवाच्या धर्तीवर महोत्सवाचे आयोजन करता यावे यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल येथे ‘बीकेसी आर्ट प्लाझा’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच काम वेगाने सुरू असून सन २०२४ च्या अखेरीस या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे या वर्षाअखेरीस बीकेसीमध्ये कला महोत्सव, प्रदर्शनांचे आयोजन करणे शक्य होणार आहे.
कल्याण : मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या ९० वाहन चालकांवर कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये मागील दोन दिवसात वाहतूक पोलीस, पोलिसांनी कारवाई केली आहे. नववर्षाच्या उत्साहात अनेक वाहन चालक मद्य पिऊन वाहन चालवून अपघात करत असल्याने पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम शहरात राबवली. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील पाचपाखाडी भागात सोमवारी सकाळी मोटारीचे चाक पंक्चर होऊन चालकाचा ताबा सुटून रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला मोटार धडकली. या धडकेत पाच प्रवासी गंभीर जखमी झाली असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
पुणे : २०६ व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि क्रिडा युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी अभिवादन केले. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर अजित पवार यांनी भाष्य केले.
पुणे : २०६ व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून चर्चा सुरू आहे. त्या सर्व चर्चांदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पिंपरी : महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने नवीन वर्षानिमित्त शहरवासीयांना मालमत्तेची ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजपासून होणाऱ्या सर्व नोंदी फक्त ऑनलाइन होणार आहेत. मालमत्ता कर उताराही ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ता नोंदणीसाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
नाशिक – नाताळ सुट्टीत जिल्ह्यातील वायनरींमधील पर्यटनात लक्षणीय वाढ झाली असून वाइनचा खपदेखील २० टक्क्यांनी वाढला आहे. नववर्ष स्वागतासाठी देशभरातून सहकुटुंब दाखल झालेल्या हजारो पर्यटकांनी जिल्ह्यातील वायनरी बहरल्या आहेत. विशेष म्हणजे वाइनची चव चाखण्यात महिला पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे नसल्याचे अधोरेखित होत आहे.
मालेगाव – सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने सर्वत्र साग्रसंगीत पार्ट्यांची धामधूम सुरु असताना आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे वेगळ्या पद्धतीने सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. समितीतर्फे व्यसनमुक्ती विरोधात जनजागृतीसाठी व्यसनरुपी भस्मासुराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. व्यसनमुक्तीसाठी सर्वच शासकीय यंत्रणांनी कणखर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
२०२४ वर्षाची दमदार सुरुवात इस्रोने केली आहे. २०२३ ला अलविदा करत २०२४ चे स्वागत करतांना पहिल्याच दिवशी म्हणजेच सूर्य माथ्यावर येण्यापूर्वीच इस्रोने XPoSat नावाची अवकाश दुर्बिण नऊ वाजून ३० मिनिटांनी प्रक्षेपित केली.
पुणे : महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याने जाब विचारणाऱ्या आईला एकाने पट्ट्याने मारहाण केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. तरुणीवर कर्कटकने हल्ला करून आरोपी तरुण पसार झाला.
नववर्षाचा पहिला दिवस आणि शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला लाखो आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी अभिवादन केले. विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पंचक्रोशीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना आगामी निवडणुकीत पराभूत करू असं आव्हान दिलं आहे. दरम्यान, शिवसनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याची भर सभेत नक्कल केली आणि म्हणाले, “हवा बहुत तेज चल रही हैं अजितराव, टोपी संभालो, नहीं तो टोपी उड जायेगी (वारा वेगाने वाहतोय, टोपी सांभाळा, नाहीतर टोपी उडून जाईल). आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्हीच पडाल.” संजय राऊत यांच्या या टीकेवर प्रतिक्रिया विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, “सोम्यागोम्या काही बोलला असेल तर त्यावर मी उत्तर देत नाही.”
वंचितला इंडिया आघाडीत प्रवेश मिळणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले…
२०६ व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून चर्चा सुरू आहे. त्या सर्व चर्चांदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामुळे कधी ना कधी औपचारिक अनौपचारिकरित्या भेट होणारच आहे. त्यामुळे अफवा पसरवण्यात काहीही अर्थ नाही. इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी घ्यायचे हे आत्ता त्यांनी ठरवायचं आहे. पण आत्ता तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीचे दार बंद आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.