Maharashtra News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर होते. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सोलापूर दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शरद पवारांचा सोलापूर दौरा महत्वाचा मानला जातोय. तर, मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची गुरूवारी सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक निष्फळ ठरली आहे. जरांगे-पाटील २० जानेवारीला मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. यासह महाराष्ट्रातील विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
Maharashtra News Today 19 January 2024 : राज्यातील राजकीय, क्राइम आणि अन्य घडामोडी वाचा एका क्लिकवर…
“मराठा आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण करायचं असेल, तर मनोज जरांगे-पाटलांनी आंदोलनाबरोबर राजकीय भूमिका घेतली पाहिजे. लोकसभा लढवण्याबाबत पुढाकार घेतला पाहिजे. गरीब मराठ्यांचा रस्त्यावरील आवाज लोकसभेत गेला पाहिजे,” असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
पत्नीशी प्रेमसंबंध तसेच व्यावसायिक वाद असल्याने चाळ बिल्डर मस्तान शेख याने हा हल्ला घडवून आणला होता.
नागपूर: समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी ट्रॅव्हल्स अपघातात २५ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. २०० दिवसानंतरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनुसार पीडित कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत मिळाली नाही. त्यामुळे हे कुटुंबिय नागपुरातील संविधान चौकात शुक्रवारी दुपारी राम नाम जप करायला बसले आहे.
नाशिक : लूटमार, प्राणघातक हल्ला असे आरोप असणाऱ्या बाशी उर्फ शिवम बेहनवाल टोळीवर शहर पोलिसांनी केलेल्या मोक्का कारवाईस अप्पर पोलीस महासंचालकांनी शिक्कामोर्तब केले आहे. या टोळीविरोधात मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याचे आदेश अप्पर महासंचालकांनी दिले आहेत.
डोंबिवली – आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो, असे एका जेष्ठ नागरिक महिलेला सांगून तीन भामट्यांनी ज्येष्ठाची बुधवारी फसवणूक केली आहे.कल्याण पश्चिम येथील खडकपाडा भागातील लोटस डेंटल केअर सेंटर येथेही फसवणुकीची घटना घडली आहे.
डोंबिवली – डोंबिवलीतील फडके रोडवर अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने फडके रोडची शुक्रवारी सकाळी टँकरद्वारे पाणी मारून सफाई करण्यात आली.तसेच या रस्त्यावरील फेरीवाल्यांचे पक्क्या बांधकामाचे मंच जेसीबीच्या साह्याने तोडून टाकण्यात आले.
“रे नगरची घरे जेव्हा मी पाहात होतो, तेव्हा आपल्यालाही लहानपणी राहायला असे एखादे घर मिळाले असते तर…”, हे वाक्य उच्चारताच त्यांचे मन हळवे झाले.
डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव हद्दीत गुरुवारी रात्री एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर आल्याने सुमारे अर्धा ते एक तास शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पूजाला तिच्या पतीचा पाठिंबा मिळाला. एक वेळ स्वयंपाक राहू दे मात्र अभ्यास कर, असं तिच्या पतीने ठणकावून तिला सांगितलं.
नागपूर : अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य परिसरात हजारो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात करण्यात आला. त्यामुळे उच्च न्यायालयाने वन व महसूल विभागाच्या प्रधान सचिवांसह इतर संबंधित प्रतिवादींना यावर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
वाडा कोलमचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या एका कृषी उत्पादन संस्थेने दोन दिवसांपूर्वी १० टन वाडा कोलमचा तांदूळ अयोध्येकडे रवाना केला.
चंद्रपूर : भद्रावती लगतच्या बरांज येथील एम्टा कोळसाखान परिसरात एका कामगाराने सीट बेल्टच्या सहाय्याने एका ट्रकला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार १९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
बहुसंख्य शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी अध्यापनासाठी त्या विषयांतील पदवीधर शिक्षक नसल्याचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने केलेल्या अभ्यासातून उघड झाले आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम करण्यात येणार नाही, याठिकाणी उद्यान आणि हिरवळ तशीच राहील, अशी ग्वाही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.
मुंबई: सरकारी मालकीच्या यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेडच्या (यूटीआय आयटीएसएल) वतीने पॅनकार्ड सेवा प्रदान करत असल्याचा दावा करणाऱ्या संकेतस्थळांना ही सेवा देण्यापासून उच्च न्यायालयाने मज्जाव केला आहे.
गोंदिया : गोंदिया-कोहमारा मार्गाने धानाचे पोते भरून ट्रक जात होता. ट्रकच्या मागे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे चारचाकी शासकीय वाहन येत होते. ते वाहन बघून भरधाव वेगात ट्रक चालवित असताना नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जाऊन उलटला.
मनोज जरांगे-पाटील २० जानेवारीला मुंबईला रवाना होणार आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बच्चू कडू आणि शिष्टमंडळाने जरांगे-पाटलांची भेट घेतली आहे. मागासवर्ग आयोगाचं काम चालू आहे. डेटा गोळा करण्याचं काम चालू आहे. फेब्रुवारीत अधिवेशन घेऊन कायदा करणार आहोत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देत आहोत. सरकार सकारात्मक असताना जरांगे-पाटलांना सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. अनेक लोकांच्या नोंदी आढळल्या आहेत. प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
मुंबई: रासायनिक व अणुजीवीयदृष्ट्या पाणी आणि अन्नपदार्थ नमुन्यांच्या तपासणीसाठी राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ३५ पैकी २२ प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबई : गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानात शिवराज्याभिषेक, रामायणातील प्रसंग, लोकमान्य टिळक यांचा जीवनपट आणि मुंबई शहराची झलक हे सर्व काही आता लाईट एण्ड साऊंड शो च्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काळात विविध थोर पुरूष आणि विविध विषयांवर आधारीत लाईट अँड शो प्रोजेक्शन मॅपिंगच्या माध्यमातून पहायला मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
यवतमाळ : शहरालगत असलेल्या डोर्ली येथून शाळेत विद्यार्थी पोहोचण्यासाठी निघालेल्या रिक्षाचा यवतमाळ शहरातील टिळकवाडी श्रोत्री रुग्णालय चौकात अपघात झाला. मोकाट श्वान आडवा आल्याने ही रिक्षा उलटली. या घटनेत दोन विद्यार्थ्यांसह रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. दोन विद्यार्थ्यांना नागरिकांच्या मदतीने सुखरूप घरी पोहोचवण्यात आले.
ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून विद्युत पुरवठा खंडीत होऊन पोखरण रोड येथील लघु उद्योजकांना मोठा फटका बसत होता. अखेर विद्युत पुरवठ्याबाबत लघु उद्योजकांची चिंता मिटली आहे. महावितरण कंपनीने येथील उच्च आणि लघु दाब वाहिन्या भूमिगत केल्या असून नव्याने रोहित्र बसविले आहे.
गोंदिया : स्नॅप डिल अपवरून पाचशेचे कापड ऑनलाइन मागविले. ते पसंद न पडल्याने परत करण्यासाठी कस्टमर केअरशी संपर्क केला. हीच संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या, त्यांची आई आणि बहिणीच्या खात्यातून १ लाख १८ हजार ४९५ रुपये आपल्या खात्यात वळविले. ही घटना शहरातील संतोष नरेंद्रसिंग प्रमर (वय ६२, रा. रेलटोली) गोंदिया यांच्यासोबत घडली.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मुंबई: अगदी पहिलीपासून शाळेबरोबरच खासगी शिकवण्यांचे पेव गेली जवळपास तीन दशके देशभरात फोफावल्यानंतर आता केंद्र शासनाने दहावीच्या खालील किंवा १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीस प्रवेश देण्यास मनाई केली आहे.
पनवेल: कळंबोलीतील प्रियकराने प्रियसीची हत्या केल्यानंतर केलेल्या आत्महत्या प्रकरणातील अनेक कंगोरे महिन्याभरानंतर उजेडात येत आहेत. १२ डिसेंबरला प्रियकराचा मृतदेह नेरुळ जुईनगरच्या रेल्वेरुळावर सापडला. मात्र महिन्याभरात खारघरच्या डोंगररांगात प्रियसीचा मृतदेह सापडू शकला नाही.
पनवेल: २२ जानेवारीला अयोद्धा येथे होत असलेल्या प्रभु रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशभरातील ११ जोडप्यांना विशेष निमंत्रित केले आहे. यामध्ये खारघर वसाहतीमधील विठ्ठल आणि त्यांची पत्नी उज्वला कांबळे यांचाही समावेश आहे.
मुंबई: धारावी पुनर्विकासातील झोपडीवासीयांना मोफत तर अपात्र झोपडीवासीयांसाठी भाडेतत्त्वारील घरे उपलब्ध करुन देण्यासाठी मुलुंड येथे ६३ एकर भूखंड उपलब्ध करुन देण्याबाबत गृहनिर्माण विभागाने नगरविकास विभागाला पाठविलेल्या पत्रामुळे धारावीवासीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
वाशीम : रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघांचे काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या हस्ते पार पडणाऱ्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा निमित्त स्थानिक वर्तमान पत्रात दिलेल्या जाहिरातीमध्ये काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांचे छायाचित्र नसून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचा फोटो झळकत असल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत.
धारावी पुनर्विकासाअंतर्गत धारावीकरांना ३५० चौरस फुटांचे घर देण्यात येणार असल्याचे धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) एका अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे.