Maharashtra News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर होते. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सोलापूर दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शरद पवारांचा सोलापूर दौरा महत्वाचा मानला जातोय. तर, मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची गुरूवारी सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक निष्फळ ठरली आहे. जरांगे-पाटील २० जानेवारीला मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. यासह महाराष्ट्रातील विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
Maharashtra News Today 19 January 2024 : राज्यातील राजकीय, क्राइम आणि अन्य घडामोडी वाचा एका क्लिकवर…
आरोग्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठातंर्गत राज्यात ६०० वैद्यकीय महाविद्यालये असून त्यात ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना संजीवनी विद्यार्थी सुरक्षा योजनेचा लाभ मिळतो. या योजनेच्या नियमावलीत अंशत: बदल करून विद्यार्थ्यांना जास्तीची आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे विद्यार्थी कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
तासगाव तालुक्यातील तमाशा कलावंत हिराबाई शामराव कांबळे बस्तवडेकर (वय ९३) यांना महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
नागपूर : उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रावरसुद्धा होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वातावरण कोरडे झाले असून किमान तापमानात देखील घट होत आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असून पुढील दोन दिवस ही थंडी कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
बुलढाणा: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना काल गुरुवारी पोलिसांनी अटक केल्यावर रात्रीतून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आज सकाळी मलकापूर स्थानकात रेल्वे रोको करण्यापूर्वीच ऍड शर्वरी तुपकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गडचिरोली : दोन महिलांचा बळी घेऊन दक्षिण गडचिरोलीत धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या चमूने १८ जानेवारीरोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ही मोहीम फत्ते केली. त्यामुळे दहशतीत असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
नागपूर : पदवीच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी एका युवकाशी सूत जुळले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत प्रेमविवाहाचे स्वप्न रंगवले. त्याला भावी पती मानून सर्वस्व अर्पण केले. मात्र, तो युवक दोन मुलांचा बाप निघाला. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार केली.
नागपूर : आईवडील घरात नसताना तीन मुलांनी शेकोटी पेटवल्यामुळे घराला आग लागली. ही आग घरात पसरल्याने संपूर्ण घराने पेट घेतला. या आगीत ७ व ३ वर्षीय भावडांचा मृत्यू झाला. तर एक १० वर्षीय मुलगी घरातून पळाल्याने सुदैवाने वाचली.
चंद्रपूर : महापालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेत गेल्या एक ते दीड वर्षांपासून ‘प्रशासक राज’ आहे. त्यामुळे प्रभागातील विविध समस्या, छोटी-मोठी कामे तथा रस्ते, पाणी, स्वच्छता व अतिक्रमण, याबाबतच्या तक्रारी घेऊन नागरिक थेट आमदारांची कार्यालये गाठतात.
“सोलापुरातील कामगारांना घर मिळतेय, याचा मला आनंद आहे. सोलापुरातील कामगारांसाठी केलेला संकल्प पूर्ण होत आहे. देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचा लोकर्पण होत आहे. लहाणपणी अशा हक्काच्या घरात राहणं माझं स्वप्न होतं. पण, आता हजारो कुटुंबाची स्वप्न साकार झाली. कामगारांना घर मिळतेय, याचा मला आनंद आहे,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले.
नाशिक : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना मदतीसाठी जिल्ह्यात वेगवेगळी जबाबदारी सांभाळण्यासाठी १६ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधितांच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली.
मेटे यांचे बंधू राम हरी मेटे यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ‘जय शिवसंग्राम’ या नवीन संघटनेची घोषणा केली.
नाशिक : शहरातील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार आणि नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार व लेखक निरंजन टकले यांना गौरविण्यात येणार आहे.
कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार मुंबई येथील कोबाड गांधी यांना फ्रॅक्सर्च फ्रीडम या आत्मकथनासाठी, जयसिंगपूर येथील नीलम माणगावे यांना भैरवायन या कादंबरीसाठी, नाशिक येथील ज्येष्ठ लेखक प्रा. जयप्रकाश म्हात्रे यांना उत्क्रांतीच्या वाटेवरील संस्कृतीची पावले या पुस्तकासाठी, गुहागर येथील बाळासाहेब लबडे यांना ब्लाटेटिया या काव्यसंग्रहासाठी, जळगाव येथील राहुल निकम यांना संवर्ग या कथासंग्रहासाठी जाहीर झाला आहे.
कवी भीमराव कोते विशेष काव्य पुरस्कार सावंतवाडी येथील स्नेहा कदम यांना शिल्लक भिंतीच्या गर्भकोशातून या काव्यसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे तसेच वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयात पुरस्कार सोहळा होणार आहे.
माजी आमदार नरसय्या आडम यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री असा चुकून उल्लेख करण्यात आला. यानंतर नरसय्या आडम यांनी माफी मागितली आहे
नाशिक : येथील दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अक्षय्य पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात ३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे.
व्यक्ती तसेच संस्थेच्या कार्याचा आदर्श घेत समाजातील विविध घटकांनी भविष्यकालीन वाटचाल करावी, यासाठी अक्षय्य पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. करोनामुळे दोन वर्ष हा सोहळा झाला नव्हता. याआधी डॉ. विकास आणि डाॅ. भारती आमटे, आंतरराष्ट्रीय धावपटू एक्सप्रेस कविता राऊत, माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेते सचिन पिळगांवकर, प्रशांत दामले यांना गौरवण्यात आले आहे. डॉ. काकोडकर यांना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
निर्भया बलात्कार-हत्याकांडानंतर प्रत्येक राज्यातील शहर आणि जिल्ह्यात स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांलयातून घेण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्रात अजुनही एकही स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली नाही.
भाजप आणि कम्युनिस्ट हे पक्ष म्हणजे दोन टोकाच्या उजव्या आणि डाव्या विचारांचे पक्ष. दोघेही एकमेकांना प्रथम क्रमांकाचे शत्रू मानत आले असताना सोलापुरात मात्र या दोन्ही विचारधारांचे सध्या मनोमीलन दिसत आहे.
“दोन फुटीर गटांना घेऊन भाजपाला काहीही फायदा होत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सतत यावं लागत आहे. उत्तर प्रदेशात प्रभू श्री रामाच्या दृष्टीनं प्रचार करत आहेत. महाराष्ट्रातही राजकीय प्रचार करत आहे,” अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली.