Maharashtra News Update: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही बाजूंनी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात तर शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापू लागला आहे.

उद्धव ठाकरे गटाची पत्रकार परिषद लाईव्ह…

Live Updates

Maharashtra Marathi News Today 16 January 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

17:04 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live:

विधिमंडळ पक्ष व्हिप ठरवू शकत नाही, मूळ राजकीय पक्ष व्हिप ठरवू शकतात. अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्षानं नियुक्त केलेलाच व्हिप मान्य केला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने निकालात नमूद केलं आहे. उद्धव ठाकरेंनी नेमलेल्या व्हिपच्या आधारेच निर्णय झाला पाहिजे, इतकं स्पष्ट सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे – असीम सरोदे

16:58 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live:

एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते, तेव्हा त्यानं तटस्थ, निरपेक्ष व प्रामाणिकपणे वागलं पाहिजे अशी अट कायद्याला अपेक्षित आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी आल्यानंतर त्यानं पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष नसल्यावर तो पुन्हा त्या पक्षात जाऊ शकतो. राहुल नार्वेकरांनी राजीनामा दिला नव्हता – असीम सरोदे

16:57 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live:

दोनतृतीयांश लोक बाहेर गेले, तर त्यांना संरक्षण मिळू शकतं. त्यासाठी गट स्थापन करणे किंवा विलीनीकरण करणे ही अट आहे. पण एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले लोक दोन तृतीयांश संख्येनं गेले नाहीत. आधी १६ जण गेले. नंतर काही सूरतला मिळाले, नंतर काही गुवाहाटीला मिळाले. असे ते ४० जण झाले. सगळे दोन तृतीयांश संख्येनं बाहेर पडले नाहीत. त्यामुळे त्यांना कायद्याचं कोणतंही संरक्षण नाही – असीम सरोदे

16:56 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live:

२(१)(अ) मध्ये कुणाला स्वेच्छेने राजकीय पक्ष सोडायचा असेल, तर ते सोडू शकतात. त्यानंतर ते अपात्र ठरतात. दुसरं व्हिपचं पालन केलं पाहिजे. विधिमंडळ पक्षाच्या आमदारांवर ही जबाबदारी आहे. पक्षशिस्तीचा संदर्भ राजकीय स्थैर्याशी असल्यामुळे तशी व्यवस्था करण्यात आली आहे. ते झालं नाही, तर ते अपात्र ठरू शकतात. तिसरं जर पक्षात उभी फूट पडली असेल, तर आधी निम्मे लोक फुटल्यामुळे अपात्र ठरवता येत नव्हते. पण नंतर सुधारणा झाल्यानंतर ती तरतूद काढण्यात आली. त्यामुळे आता असे लोक एकतर इतर पक्षात विलीन होऊ शकतात किंवा वेगळा गट स्थापन करून त्याला मान्यता मिळवून वेगळा पक्ष स्थापन करू शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदे कधीही कोणत्या पक्षात विलीन झाले नाही किंवा कुठला गट स्थापन केला. ते शिवसेनेत आहोत हेच सांगत आहेत – असीम सरोदे

16:53 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live:

त्यामुळे एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर पळून गेलेले सदस्य विधिमंडळ पक्ष या अस्थायी पक्षाचे सदस्य आहेत. त्यांना कायद्यात सांगितलं तेवढंच महत्त्व आहे – असीम सरोदे

16:52 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live:

कायद्यात १ब मध्ये सांगितलंय विधिमंडळ पक्ष म्हणजे काय १ क मध्ये मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय हे सांगितलं आहे. विधिमंडळ पक्षाचं आयुष्य ५ वर्षांचं असतं. त्यामुळे ती अस्थायी स्वरुपाची व्यवस्था आहे. त्यामुळे कायद्यात विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही. मूळ राजकीय पक्षाला महत्त्व आहे. इथे मूळ राजकीय पक्ष शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे – असीम सरोदे

16:51 (IST) 16 Jan 2024
‘त्या’ तरुणीचा मृतदेह खारघरच्या निर्जनस्थळी सापडला

कळंबोली वसाहतीमध्ये राहणाऱ्या वैभव आणि वैष्णवी यांच्या प्रेम प्रकरणाचा अंत अशा दुर्दैवीपणे झाला आहे.

सविस्तर वाचा…

16:51 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live:

दहाव्या परिशिष्टाचं नाव आहे पक्षांतरबंदी कायदा. पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्याचा कायदा असं त्याचं नाव नाहीये. संवैधानिक नैतिकता आणण्याचा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून राजीव गांधींनी केला. प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा राहिली पाहिजे या उद्देशाने पक्षांततरबंदी कायदा अस्तित्वात आला – असीम सरोदे

16:49 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live: असीम सरोदेंनी मांडली राजकीय टीकेवर भूमिका…

या निर्णयाची चिरफाड करणं आवश्यक आहे. लोकशाही कशी मारली जाते, हे यातून दिसणार आहे. लोक माझ्यासारख्या वकिलांना म्हणतात की तुम्ही वकील आहात, राजकारणावर बोलू नका. भारतीय संविधान एक राजकीय डॉक्युमेंट आहे. राज्यव्यवस्था म्हणून भारत कसा चालेल, याविषयीचं ते पोलिटिकल डॉक्युमेंट आहे. अगदी नागरिक असणंही राजकीय संकल्पना आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने राजकारणावर बोललं पाहिजे – असीम सरोदे

16:45 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live: असीम सरोदेंकडून खटला कसा चालला त्याचं सादरीकरण

खटल्याचं स्वरूप काय होतं, शिवसेनेनं कसा हा खटला लढला, सत्याची कशी हत्या झाली यावर असीम सरोदे सुरुवातीला माहिती देतील. त्यानंतर लवादाला तेव्हा कदाचित मोतीबिंदू झाला असेल, त्याला काही पुरावे दिसले नसतील, ऐकू येत नसेल, त्यामुळे काही पुरावे समजले नसतील.. आपण न्यायालयासमोर सादर केलेल्या पुराव्यांचं प्रेझेंटेशनही असीम सरोदे सादर करतील – संजय राऊत</p>

16:42 (IST) 16 Jan 2024
पदवी प्रमाणपत्रावरील मराठीतील नाव तपासता येणार; मुंबई विद्यापीठातर्फे विशेष नियोजन

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा वार्षिक पदवी प्रदान (दीक्षान्त) समारंभ बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठामार्फत प्रथम सत्र २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावरील मराठी (देवनागरी लिपी) भाषेतील संभाव्य चुका टाळण्यासाठी विद्यापीठाने विशेष नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांचा तपशील विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in या संकेतस्थळावर १७ जानेवारीपासून २३ जानेवारीपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

16:41 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live: लवादाचा निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही – संजय राऊत

बाळासाहेबांची शिवसेना या लवादानं कोणताही पुढचा-मागचा विचार न करता शिंदे गटाच्या हातात दिली, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र खदखदतोय. लवादाचा निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही – संजय राऊत</p>

16:40 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live: लवादांनी दिलेल्या निकालाच्या अंत्ययात्रा काढल्या – संजय राऊत

राहुल नार्वेकरांनी एक निकाल दिला आणि महाराष्ट्रात जागोजागी त्या निकालाच्या अंत्ययात्रा निघाल्या. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं – संजय राऊत</p>

16:40 (IST) 16 Jan 2024
Uddhav Thackeray PC Live: आजचा दिवस इतिहासात नोंदला जाईल – संजय राऊत

आजचा दिवस इतिहासात नोंदला जाणार असून हा एक अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज न्यायाधीशाच्या भूमिकेत महाराष्ट्राची दनता आहे – संजय राऊत</p>

16:21 (IST) 16 Jan 2024
Maharashtra Marathi News Live Today: राहुल नार्वेकरांची ५ वाजता पत्रकार परिषद

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेदेखील पत्रकार परिषद घेणार असून त्यात उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या मुद्द्यांवर ते उत्तर देण्याची शक्यता आहे.

16:14 (IST) 16 Jan 2024
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेसाठी रवाना…

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले असून थोड्याच वेळात वरळीमध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे राहुल नार्वेकरांनी नुकत्याच दिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालावर सविस्तर भाष्य करण्याची शक्यता आहे.

16:08 (IST) 16 Jan 2024
ठाकरे गटात पुन्हा मोठी फुट पडणार? शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे चर्चेला सुरूवात

नियमानुसार आम्ही आधी उच्च न्यायालयात जाऊन उबाठा गटातील १४ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा…

16:02 (IST) 16 Jan 2024
“आदित्य ठाकरे दावोसला बर्फात कुणाबरोबर खेळत होते”, नरेश म्हस्के यांचा सवाल

उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रीया होणार होती. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे हे दावोस दौऱ्यावर निघून गेले होते, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

15:33 (IST) 16 Jan 2024
नाशिक : सहलीसाठी आलेल्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे २० भ्रमणध्वनी लंपास, संशयिताकडून १८ भ्रमणध्वनी जप्त

नाशिक – यवतमाळ जिल्ह्यातील शाळेची सहल आली असता शिक्षकांसह २० विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी गोदाघाटावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेतून चोरणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली. चोराकडून एक लाख ५० हजार रुपयांचे भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

15:32 (IST) 16 Jan 2024
सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; चार आठवड्यात पदोन्नती देण्याचे ‘मॅट’चे आदेश

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी चातकाप्रमाणे वाट बघत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या चेहऱ्यांवर हसू फुलले. सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. अखेर ‘मॅट’ने चार आठवड्यात पदोन्नती देण्याचे आदेश दिले. ‘मॅट’च्या आदेशाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंदी-आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी पाठपुरावा केला, हे विशेष.

सविस्तर वाचा…

14:59 (IST) 16 Jan 2024
पनवेल : मालमत्ताधारकांच्या माथी १३६ कोटींचा दंड, चालू आर्थिक वर्षात ३६ कोटी जमा

मागील काही वर्षांचा मालमत्ता कर पनवेल महापालिकेने वसूल करू नये म्हणून विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी आंदोलने केली.

सविस्तर वाचा…

14:47 (IST) 16 Jan 2024
लॅपटॉप लोकेशन सुविधेमुळे लॅपटॉप चोरणारे आंतरराज्य त्रिकुट जेरबंद, ८ गुन्ह्यांची उकल

लॅपटॉपमध्ये लॅपटॉप कुठे आहे हे लॅपटाॅपचे लोकेशन बदलताच मोबाईलवर संदेश देणारी यंत्रणा असल्याने पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला.

सविस्तर वाचा…

14:28 (IST) 16 Jan 2024
नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालय नव्या इमारतीत सुरू

नव्या कार्यालयासाठी इमारत बांधून पूर्ण असताना निव्वळ उद्घाटनासाठी या इमारतीत कारभार सुरू होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

सविस्तर वाचा…

14:27 (IST) 16 Jan 2024
आंदोलनातील हुतात्म्यांचा भूमिपुत्रांनाच विसर

शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वातील सिडको आणि सरकारच्या भूसंपदानाच्या विरोधात झालेल्या संघर्षमय लढ्यात पाच शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले.

सविस्तर वाचा…

13:34 (IST) 16 Jan 2024
नव्याकोऱ्या सीएसएमटी – जालना वंदे भारतमध्ये तांत्रिक बिघाड

मुंबई: सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्सप्रेसला बैलाने धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी याच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. सविस्तर वाचा…

13:29 (IST) 16 Jan 2024
अकोला : ‘फरदड’मुळे कापूस पिकाला गुलाबी बोंडअळीचा धोका

अकोला : कापसाचे अतिरिक्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचा फरदड घेण्याकडे कल असतो. मात्र, फरदडमुळे पुढील हंगामात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड निर्मूलन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जनजागृती कृषी विभागाकडून केली जात आहे.

वाचा सविस्तर…

13:18 (IST) 16 Jan 2024
जानेवारीमध्ये बोनसचे वाटप, क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कामगारांना अखेर बोनस

दिवाळीत बोनस देण्याची पद्धत असली तरी मुंबई महानगरपालिकेच्या जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कामगारांना चक्क जानेवारीत बोनस मिळाला आहे.

सविस्तर वाचा…

13:15 (IST) 16 Jan 2024

मुंबई विमानतळावर काही प्रवासी विमानाची वाट पाहाताना धावपट्टीच्या बाजूलाच खाली बसून जेवण करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकाराची दखल केंद्र सरकारने घेतली असून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी मुंबई विमानतळ प्रशासन व इंडिगो प्रशासन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

वाचा विमानतळावर नेमकं काय घडलं?

13:12 (IST) 16 Jan 2024
कल्याण जवळील अटाळी गावात बैलांच्या झुंजीत दोन्ही बैल जखमी, बैल मालकांवर गुन्हा दाखल

या दोन्ही बैल मालकांनी प्राण्यांना निर्दयीपणे वागवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला म्हणून खडकपाडा पोलिसांनी बैल मालकांविरूध्द गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

13:12 (IST) 16 Jan 2024
तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे खोळंबली; कार्यालयात पोहोचण्यास कर्मचाऱ्यांना विलंब

मुंबई: गेले दोन दिवस ब्लाॅकमुळे प्रवाशांना वेठीस धरल्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे लोकल रखडल्या. त्यामुळे मंगळवार सकाळी लवकर कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट

Maharashtra Marathi News Today 16 January 2024: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसह सर्व अपडेट