Maharashtra News Update: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही बाजूंनी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात तर शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापू लागला आहे.

उद्धव ठाकरे गटाची पत्रकार परिषद लाईव्ह…

Live Updates

Maharashtra Marathi News Today 16 January 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

13:11 (IST) 16 Jan 2024
कल्याण : विठ्ठलवाडीत मजुराला दारूसाठी जीवे ठार मारण्याचा तरूणांचा प्रयत्न

मी दिवसभर कष्टाचे काम करून घरी चाललो आहे. तुम्हाला देण्यासाठी माझ्या जवळ पैसे नाहीत, असे संदीपने तरूणांना सांगितले.

सविस्तर वाचा…

12:50 (IST) 16 Jan 2024
ट्रक टर्मिनल उभारणीसाठी वेगवान हालचाली; ठाणे शहराच्या वेशीवर उभारले जाणार ट्रक टर्मिनल

ठाणे: शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर रात्रीच्या तसेच अनेकदा दिवसाही ट्रक तसेच अवजड वाहने उभे राहत असल्याने अनेकदा शहरांतर्गत वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. यावर उपाय म्हणून शहराच्या वेशीवर असलेल्या नॅशनल हायवेच्या जागेत खारेगाव येथे ट्रक टर्मिनस उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 16 Jan 2024
निवडणुकीत विरोधकांचा पतंग नक्कीच कापू; येवल्यात छगन भुजबळांची पतंगबाजी

गेल्या निवडणुकांमध्ये अनेक लोक आपल्या विरोधात उभे राहिले होते. येवल्याच्या जनतेने मात्र त्यांचा दोर कापला. आगामी निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे. त्यांनी विरोधात लढावे. त्यांचा पतंग जनतेच्या बळावर नक्कीच कापू, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

वाचा सविस्तर…

12:18 (IST) 16 Jan 2024
राज्य कामगार विमा योजनेची रुग्णालये आरोग्य विभाग चालवणार!

मुंबई: राज्या कामगार विमा योजनेअंतर्गत असलेले एकूण विमाधारक आणि विमा योजनेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यांचे प्रमाण कमालीचे व्यस्त असल्याचे आढळून आले आहे.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 16 Jan 2024
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची स्त्री संवाद यात्रा उद्या रामटेकमध्ये, रश्मी ठाकरे करणार मार्गदर्शन

नागपूर: शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. कधी केंद्रीय चौकशी यंत्रणांच्या माध्यमातून तर कधी शिंदे गटांच्या माध्यमातून शिवसेना खिळखिळी करण्याचे प्रयत्न भाजपने केले आहेत. मात्र त्यानंतरही उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे असून येत्या लोकसभा निवडणुकीला तोंड देण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे.

वाचा सविस्तर…

12:08 (IST) 16 Jan 2024
शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिळणार आता अंडा बिर्याणी, शिक्षण खात्याचा निर्णय

वर्धा : शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांना सकस आहार देऊन त्यांची शाळेतील उपस्थिती नियमित करण्याचा हेतू आहे. आता नवा हेतू ठेवण्यात आला आहे. सध्या या आहारात तांदळापासून बनलेल्या पाककृतीच्या स्वरूपात लाभ मिळतो. आता नाविन्यपूर्ण उपक्रम आला.

वाचा सविस्तर…

11:50 (IST) 16 Jan 2024
मुंबईसह देशातील प्रमुख संग्रहालयांना धमकीचे ‘ई-मेल’

मुंबई: मुंबईसह देशातील प्रमुख संग्रहालये बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे आठ ई-मेल आसाममधील १२ वर्षांच्या मुलाच्या ई-मेल आयडीवरून पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. व्हिडीओ गेम खेळताना अनोळखी व्यक्तीने या मुलाला फसवून त्याच्याकडून हा ई-मेल तयार करून घेतल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 16 Jan 2024
जमिनीच्या माध्यमातून रायगडकरांशी जवळीक साधण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न

अलिबाग- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिबाग येथे जमीन परिषद घेऊन रायगडकरांना आपल्या जमिनी सांभाळा, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल असा इशारा दिला. रायगडमध्ये जमीन आणि जमिनीची मालकी हा विषय संवेदनशील असल्याने या मुद्द्याला हात घालत राज ठाकरे यांनी रायगडकरांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे.

सविस्तर वाचा…

11:48 (IST) 16 Jan 2024
सोलापूर : सिद्धेश्वर यात्रेत होमप्रदीपन सोहळ्यात भाविकांनी केला फळांचा वर्षाव

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात पोहोचली असून तिसऱ्या दिवशी रात्री नंदिध्वजांचा मिरवणूक सोहळा होम मैदानावर दाखल झाल्यानंतर तेथील होमकुंडामध्ये असंख्य भाविकांच्या साक्षीने पूर्वापार परंपरेने अग्निप्रदीपन सोहळा संपन्न झाला. यावेळी हजारो भाविकांनी होमकुंडाच्या दिशेने फळांचा वर्षाव केला.

सविस्तर वाचा…

11:48 (IST) 16 Jan 2024
पुणे : नदीसुधार योजनेला ‘खो’… जाणून घ्या कारण

पुणे : महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीसंवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेला पर्यावरणीय मंजुरी नाकारण्यात आली आहे. राज्य मूल्यांकन प्रभाव परिणाम प्राधिकरणाने ही मंजुरी नाकारताना आठ मुद्द्यांवर महापालिकेकडे स्पष्टीकरण मागितले आहे. मात्र त्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण देणे महापालिकेसाठी अडचणीचे आहे.

सविस्तर वाचा…

11:47 (IST) 16 Jan 2024
गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी विशेष अभियानाला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत ८१ हजार ८२५ कामगार पात्र

मुंबई : गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राप्त झालेल्या दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडाकडून विशेष अभियान राबविले जात आहे. याविशेष अभियानाला आता पुन्हा १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्या आली आहे.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 16 Jan 2024
नगरमध्ये भाजपमधूनच विखे-पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नापसंती

नगरः महायुतीतील घटक पक्षांचा पहिलाच मेळावा नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा होण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून घेतली गेली. या पूर्वतयारीच्या बैठकीतच घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी बाहेर पडली.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 16 Jan 2024
नागपूर : पतंगांच्या नादात २२ जण रुग्णालयात! नायलॉन मांजाचा वापर सुरूच

नागपूर : नायलॉन मांजाच्या वापरावर प्रतिबंध असला तरी संक्रांतीला अनेक भागात या मांजाचा उपयोग झाला. परिणामी, २२ जखमींना मेडिकल, मेयो रुग्णालयात दाखल करावे लागले.

वाचा सविस्तर…

11:36 (IST) 16 Jan 2024
“जर मांजा दुचाकीस्वारांच्या गळ्यात अडकला असता तर…”

नागपूर: नागपूरची संक्रांत पतंग उडविण्याचा छंदा मुळे प्रसिद्ध आहे. त्याला अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. येथे सहकुटुंब पतंग उडविली जाते, पेचा लावला जातो. पतंग कापली जाते. ओ काट म्हणत एकच जल्लोश केला जातो. अलीकडच्या काही वर्षांत पतंग उत्सवाला नॉयलॉन मांजामुळे गालबोट लागले.

वाचा सविस्तर…

11:36 (IST) 16 Jan 2024
चंद्रपूर : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाचा वीज पुरवठा खंडित

चंद्रपूर: ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या बल्लारपूर तालुक्यातील विसापूर क्रीडा संकुलाचे २ लाख ९१ हजाराचे बिल थकल्याने वीज मंडळाने सोमवारी दुपारी या क्रीडा संकुलाचा वीज पुरवठा खंडित केला.

वाचा सविस्तर…

11:35 (IST) 16 Jan 2024
येणाऱ्या काळात वर्धा जिल्हा स्वदेशीचे तीर्थक्षेत्र

वर्धा : जिल्ह्याची ओळख गांधी जिल्हा म्हणून करून दिल्या जाते. कारण गांधीजी यांचे वास्तव्य. मात्र, वर्धा जिल्हा स्वदेशीचे तीर्थक्षेत्र असल्याचा साक्षात्कार स्वदेशी जागरण मंचला झाला आहे. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानात मंचचे अखिल भारतीय संघटन मंत्री कश्मिर लाल यांची हजेरी लागली होती.

वाचा सविस्तर…

11:35 (IST) 16 Jan 2024
गडचिरोली : नक्षलग्रस्त गर्देवाडात २४ तासांत उभारले पोलीस मदत केंद्र

गडचिरोली: नक्षल्यांच्या बिमोडासाठी गडचिरोली पोलिसांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील गर्देवाडा येथे १५ जानेवारीला अवघ्या २४ तासांत पोलीस मदत केंद्र उभारुन आणखी एक विक्रम प्रस्थापित केला.

वाचा सविस्तर…

11:34 (IST) 16 Jan 2024
परिवहन खात्याचा ‘रस्ता सुरक्षा अभियान’बाबत गोंधळ!

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या परिवहन खात्याने १५ जानेवारीपासून राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत १३ जानेवारीला आदेश काढले. शनिवार, रविवारी सुट्टीमुळे या अभियानासाठी नवीन जनजागृती पत्रक छापण्यासह इतरही काही सोयी बऱ्याच कार्यालयांना करता आल्या नाहीत.

वाचा सविस्तर…

11:30 (IST) 16 Jan 2024
परेल ब्रिजवर अपघातात तीन जणांचा मृत्यू

मुंबईत परेल ब्रिजवर एक डंपर व मोटरसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

11:27 (IST) 16 Jan 2024
Mumbai Breaking News Live Today: दहिसर-कांदिवली टप्प्यात मेट्रो वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांना मनस्ताप!

काही तांत्रिक कारणांमुळे आज दहिसर ते कांदिवली या टप्प्यात मेट्रोच्या वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यासंदर्भात एमएमआरडीएकडूनही खुलासा करण्यात आला आहे.

11:09 (IST) 16 Jan 2024
Maharashtra Breaking News Live: रोहित पवार यांचं ट्वीट व्हायरल

परदेश दौऱ्यात होणारी उधळपट्टी पत्रकार परिषद घेऊन उघडकीस आणताच आज दावोस दौऱ्यात जाणाऱ्या अनेकांच्या स्वप्नावर पाणी फिरलं… काहींना हात चोळत घरी बसावं लागलं तर काहींच्या खिशाला झळ बसल्याने त्यांच्या पोटात नक्कीच कळ आली असणार.… मात्र यामुळं राज्याच्या तिजोरीवर पडणारा दरोडा वाचल्याचं समाधान काही औरच आहे! यामुळं MIDC ला काही प्रमाणात आर्थिक शिस्त लागली असेल, अशी अपेक्षा करू! सच्ची मिडिया का ये डर अच्छा है! – रोहित पवार यांचे ट्वीट

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट

Maharashtra Marathi News Today 16 January 2024: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसह सर्व अपडेट