Mumbai Maharashtra News : लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याचं लक्ष आता विधानसभेकडे लागलं आहे. लोकसभेत झालेल्या चुका टाळण्याकरता आता महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. सध्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. कोणाला किती जागा मिळणार, कोणत्या जागा मिळणार यावर खल सुरू आहे. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री पुन्हा दिल्लीत गेल्याची चर्चा आहे. दिल्लीवरून त्यांनी पुन्हा आज पहाटे पुन्हा नागपूर गाठलं असल्याचंही वृत्त आहे. त्यांच्या अचनाक दिल्लीवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय, आजपासून संसदेतील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीसह इतर अनेक कार्यक्रम आज होतील. तर दुसरीकडे राज्यात सर्वत्र पावसाचं वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मुंबई-ठाण्यात उन-पावसाचा खेळ सुरू असून त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.
Mumbai Maharashtra News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
मुंबई : इंधनावरील होणारा खर्च टाळण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी डिझेल इंजिनावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना विदयुत इंजिन जोडण्यात येत आहे. मुंबईतून सुटणाऱ्या राज्यराणी, देवगिरी, हिंगोली जनशताब्दीला डिझेलऐवजी विद्युत इंजिन जोडण्यात आले आहे.
पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’कडून होणाऱ्या कांदा खरेदी करण्यात येत असून, एकाच प्रतीच्या कांद्याची खरेदी करताना जिल्हानिहाय खरेदीचे दर वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचे नाहक नुकसान होत आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या याचिकेवर सोमवारी न्या. विभा कंकणवाडी आणि न्या.वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद ऐकल्यावर उद्या मंगळवारी सकाळी १०.३० वाजता न्यायालय चौकशीवर अंतरिम स्थगितीबाबत निर्णय देणार आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींपैकी यंदा २० इमारती अतिधोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट आहेत. या इमारतीतील ४१२ घरे रिकामी करुन घेण्याचे आव्हान म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळासमोर होते. त्यानुसार ४१२ पैकी २०० हून अधिक घरे रिकामी झाले आहेत. मात्र अजूनही १७६ कुटुंबे अतिधोकादायक इमारतीत वास्तव्यास असून शक्य तितक्या लवकर या कुटुंबांना संक्रमण शिबिरात किंवा इतरत्र स्थलांतरीत करण्यासाठी दुरूस्ती मंडळाचे प्रयत्न सुरु आहेत.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या दिशेने एक पाऊल! पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्तारासाठी बहुप्रतिक्षित OLS सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाने आज मंजुरी दिली आहे. माझ्या आधीच्या पाठपुराव्याला प्रतिसाद म्हणून या तत्काळ निर्णयाबद्दल राजनाथ सिंह यांचे आभार मानतो. पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एएआय ओएलएस सर्वेक्षण करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. अशा सर्वेक्षणामुळे धावपट्टीचा विस्तार करणे शक्य होईल, मोठ्या आकाराच्या विमानांना (सामान्यत: आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरले जाणारे) पुण्यातून उड्डाण करता येईल - मुरलीधर मोहोळ, खासदार
https://twitter.com/mohol_murlidhar/status/1805222112627728845
राष्ट्रीय प्रवेश पात्रता परिक्षा (नीट) पेपरफुटीप्रकरणी आता नवीन खळबळजनक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.
आ. पाटील म्हणाले, जिल्हा बँकेचे कामकाज नियम व कायद्यानुसारच चालविले पाहिजे.
‘लोहियानगरमें मसिहा बन रहा है, आज इसको मारने का’ असे म्हणून आरोपींनी अक्षय यांना जातीवाचक शिवीगाळ केली.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये एक वोट आणि एक नोटचे नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला गंडवले.
भंडारा जिल्हा दौऱ्या दरम्यान जल पर्यटन करताना प्रसारमाध्यमांचे १० ते १५ प्रतिनिधी एका बोटीत होते.
नागपूर : आगामी विधानसभा निवडणूक लढविता यावी यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार प्रयत्न करीत आहे. त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती केदार यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. राज्य शासन या प्रकरणात सुनावणी जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्नरत असल्याचा दावा केदारांच्या वकिलांनी केला.
नागपूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने काँग्रेसला मदत केली. आमच्या मतांवर यांचे अनेक खासदार निवडून आले. परंतु, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना केवळ ओबीसी समाजाचीच काळजी आहे असे दिसून येते.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये एक वोट आणि एक नोटचे नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला गंडवले.
अकोला : जिल्ह्यात यंदाही पीककर्ज वाटपाची कूर्मगती कायम आहे. खरीप हंगामाचा पहिल्या महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरी अद्यापपर्यंत केवळ ५२.५८ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. विविध कारणांवरून अपात्र ठरवले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे पेरणीसाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सावकाराची वाट निवडावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
भंडारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी २५ जून रोजी भंडारा येथे ५४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी कार्यक्रमस्थळी येऊन निषेध व्यक्त केला.
मावळमधील वन्यजीव रक्षक संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या संस्थेतील स्वयंसेवकांनी बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला.
नागपूर : विविध क्षेत्रातील ‘सेलिब्रिटी’ जिच्या दर्शनासाठी आसुसतात, तिचे दर्शन झाले नाही तर दोन-दोन दिवस मुक्काम ठोकतात आणि तिचे दर्शन झाल्यानंतरच ते परतीच्या प्रवासाला लागतात. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मदनापूर बफर क्षेत्राची ही राणी म्हणजे ‘जुनाबाई’. एकदा, दोनदा नाही तर पाचवेळी तिने मातृत्त्वाचा अनुभव घेतला आणि १७ पेक्षा अधिक बछड्यांना तिने जन्म दिला. सुमारे नऊ वर्षांची ही ‘जुनाबाई’ कुणा ‘सेलिब्रिटी’पेक्षा कमी नाही.
मुळात आरक्षणाचं आंदोलन भरकट चाललं आहे. याचं गांभीर्य कमी होत चाललंय. आमच्या सरकारने १० टक्के आरक्षण दिल्याचं निर्णय झाला. सभागृहात एकमुखी निर्णय़ झाला. जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिल पाहिजे असं नाही. आम्हीही मराठ्यांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत - राधाकृष्ण विखे पाटील
------------------------------
मी एकटा पडलो आहे. सर्वांनी ताकदीने आम्हाला उघडं पाडलंय. सत्ताधारी तर माझ्याबाजूने बोलत नाहीत, विरोधकही माझ्या बाजूने बोलत नाहीत. त्यामुळेमराठा समाजातील बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही एकजूट राहा. माझी जात संकटात सापडली आहे, मराठ्यांच्या नेत्यांनी ताकदीने उभं राहा, हसू नका. वाटोळं होईल - मनोज जरांगे पाटील
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे दूषित पाणीमुळे जवळपास ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली. शनिवारी काहींना उलटी, मळमळचा त्रास उद्भवला. रविवारी अनेकांना अत्यवस्थ वाटत असल्याने वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अंकली ते चोकाक या मार्गावरील रस्त्यावर महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दुप्पट मोबदल्याच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
मुंबई : नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केवळ ११ तास अगोदर नीट पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. २३ जून रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र आता ती रद्द झाल्याचे व परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे सरकारकडून सांगण्यात आले.
मुंबई : भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीची प्रक्रिया असलेल्या अंजायनाला नियंत्रित केल्यास हे प्रमाण कमी होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘दी असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ने (एपीआय) अंजायनाला रोखण्यासाठी ‘ऑप्टा’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
पायाच्या घोड नस कापून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ करून मारहाण करीत गंभीर जखमी केले.
पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एल ३ लिक्विड लिजर लाऊज या पब मधील बाथरूममध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडीओ काल व्हायरल झाला होता.
अकोला : जिल्ह्यात यंदाही पीककर्ज वाटपाची कूर्मगती कायम आहे. खरीप हंगामाचा पहिल्या महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरी अद्यापपर्यंत केवळ ५२.५८ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. विविध कारणांवरून अपात्र ठरवले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे पेरणीसाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सावकाराची वाट निवडावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
गुंतवणूकदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक करणारा सनदी लेखापाल (सीए) अंबर दलालविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला.
उडीसा राज्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात अमलीपदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) यश आले आहे.
स्वामींचे दर्शन घेतल्यामुळे आपण अत्यंत प्रभावित झालो असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते नवोदिता घाटगे यांची वीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाणे मध्ये दाखल होऊन पंधरा दिवस लोटले. लहान सहान कारणावरून पत्रकार परिषद घेणारे समरजीत घाटगे अजून गप्प का, असा प्रश्न करून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष शितल रोहित फराकटे यांनी याप्रकरणी उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गुन्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध अमली पदार्थ याचा समावेश असल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व राष्ट्रीय अंमल अमली पदार्थ विभाग नियंत्रण ( एनसीबी) कडे तपास सोपवावा, अशी मागणी केली.
याबाबत कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्वपक्षीय महिला यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जयश्री देसाई यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यामध्ये कोल्हापूर सह कागल मधील अजितदादा गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा समावेश अधिक प्रमाणात होता. यानंतर या महिलांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.
Mumbai Maharashtra News Live : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.