Mumbai Maharashtra News : लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याचं लक्ष आता विधानसभेकडे लागलं आहे. लोकसभेत झालेल्या चुका टाळण्याकरता आता महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. सध्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. कोणाला किती जागा मिळणार, कोणत्या जागा मिळणार यावर खल सुरू आहे. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री पुन्हा दिल्लीत गेल्याची चर्चा आहे. दिल्लीवरून त्यांनी पुन्हा आज पहाटे पुन्हा नागपूर गाठलं असल्याचंही वृत्त आहे. त्यांच्या अचनाक दिल्लीवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय, आजपासून संसदेतील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीसह इतर अनेक कार्यक्रम आज होतील. तर दुसरीकडे राज्यात सर्वत्र पावसाचं वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मुंबई-ठाण्यात उन-पावसाचा खेळ सुरू असून त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Maharashtra News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.

13:21 (IST) 24 Jun 2024
Video: पिंपरी- चिंचवडमध्ये रिल्स बनवत वाहनांची तोडफोड; दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून सर्वसामान्य नागरिकांच मोठं नुकसान केलं आहे.

सविस्तर वाचा…

12:58 (IST) 24 Jun 2024
Maharashtra Live News : नव्या संसदीय अधिवेशनात सुप्रिया सुळेंना आठवली शरद पवारांची ‘ती’ वाक्ये, म्हणाल्या…

12:40 (IST) 24 Jun 2024
दि.बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त जासई जन्मगावी अभिवादन, विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सोमवारी उरणच्या जासई या त्यांच्या जन्मगावी विविध कार्यक्रमांतून अभिवादन करण्यात आले.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 24 Jun 2024
Maharashtra Live News : “ओबीसीने कधी महाराष्ट्रात दंगली घडवल्या आहेत का?”, लक्ष्मण हाकेंचा सवाल

ओबीसीने कधी महाराष्ट्रात दंगल, उठाव केलाय, संघटितरित्या एकत्र येऊन मालमत्तेचे नुकसान केले आहे का? असा काही संदर्भ असेल तर छगन भुजबळांच्या वक्तव्याला आधार मिळतो. ओबीसी आजही निर्णय प्रक्रियेत नाहीत – लक्ष्मण हाके

12:22 (IST) 24 Jun 2024
वर्धा : विद्यापीठाची सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ते आता थेट फोर्ब्सच्या यादीत मानांकन, जाणून घ्या अ‍ॅड. क्षितिजा यांचा प्रवास

वर्धा : शहर, विभाग, राज्य आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप. अशी चौफेर कामगिरी बजावण्याचा मान वर्धेकर कन्येने पटकावला आहे. येथील सेवानिवृत्त प्रा. गुणवंतराव वडतकर यांची कन्या असलेल्या क्षितिजा सुमित वानखेडे यांना जगप्रसिद्ध फोर्ब्स यादीत उच्च स्थान मिळाले आहे. जगातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची नोंद घेण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:22 (IST) 24 Jun 2024
चंद्रपूर : बेरोजगारीचे संकट गडद! पोलीस भरतीत डॉक्टर, अभियंता, एमबीए, एमटेक उमेदवार, बारावी, बीए झालेल्यांची अडचण

चंद्रपूर : पोलीस शिपाई पदाच्या १३७ पदांसाठी बीएचएमएस डॉक्टरपासून तर एमबीए, बीटेक, एमटेक, बीई, एमसीए, बीफार्म, एमएससी, बीएससी, बीसीए, एमएसडब्ल्यू अशा उच्च शिक्षित उमेदवारांनीही अर्ज केले आहे.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 24 Jun 2024
नागपूर : प्रेयसीच्या मुलाला रेल्वेत सोडून प्रियकराचे पलायन

नागपूर : प्रेयसीचा साडेचार वर्षांचा मुलगा प्रेमात अडथळा ठरत असल्यामुळे प्रियकराने मुलाला रेल्वेत सोडून सुटका मिळविण्याचा कट रचला. कटानुसार प्रेयसीच्या मुलाला रेल्वेत सोडून त्याने पळ काढला. मुलाच्या वडिलाने अपहरण केल्याचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आणि मुलाला वर्धा शहरातून सुखरुप ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 24 Jun 2024
नागपूर : कुलगुरू डॉ. चौधरींचे आज निलंबन की दिलासा! आज राज्यपालांसमोर…

नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निलंबन रद्द केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी ११ एप्रिलला पुन्हा पदभार स्वीकारला. परंतु, यानंतर लगेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्या समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली.

सविस्तर वाचा…

12:08 (IST) 24 Jun 2024
घर खरेदीदारांसाठी आतापर्यंत फक्त १९५ प्रकल्पात ‘तक्रार निवारण कक्ष’, विकासकांच्या उदासीनतेची दखल

विकासकांच्या या उदासीनतेची महारेराने गंभीर दखल घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, यासाठी महारेरा विशेष प्रयत्न करणार आहे.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 24 Jun 2024
बदलापूरच्या उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे, किरकोळ पावसातच खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसरत

अवघ्या काही दिवस पडलेल्या किरकोळ पावसातच बदलापूरच्या एकमेव उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत.

सविस्तर वाचा…

11:43 (IST) 24 Jun 2024
पुणे – सातारा रस्त्यावर खंबाटकी घाटात कंटेनरचा अपघात

सुदैवाने या अपघातात चालक बाबुराव आप्पाबा पाटणे (वय – २२ रा . अक्कलकोट जि. सोलापुर ) हे थोडक्यात बचावले.

सविस्तर वाचा…

11:21 (IST) 24 Jun 2024
मुंबईत संपूर्ण आठवडा मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई तसेच राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सविस्तर वाचा…

11:10 (IST) 24 Jun 2024
फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन प्रकरण : शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकासह तीन अधिकारी निलंबित

फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्येच पहाटे पाचपर्यंत सुरू असलेल्या पार्टीत प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत रविवारी प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली.

सविस्तर वाचा…

11:10 (IST) 24 Jun 2024
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या रखडलेल्या फाईली मार्गी लागूनही मदतीत अडचण!

काही रुग्णांनी अगोदरच पैसे भरल्यामुळेही त्यांना आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षातून मदत मिळविण्यात अडचणी येत आहेत.

सविस्तर वाचा…

11:09 (IST) 24 Jun 2024
स्नॅपचॅट डाऊनलोड करण्यास वडिलांनी विरोध केल्याने डोंबिवलीत तरूणीची आत्महत्या

वडिल ओरडल्याने राग अनावर झाल्याने मुलीने आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली.

सविस्तर वाचा…

11:08 (IST) 24 Jun 2024
ओटीपी दिला नाही, तरी बँक खात्यातून रक्कम गायब

पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे.

सविस्तर वाचा…

10:19 (IST) 24 Jun 2024
Maharashtra Live News : “संसदेत आता मोदी आणि शाहांचा आवाज घुमणार नाही, इंडिया आघाडीच्या….”, संजय राऊतांचं विधान

लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकत्रित आवाज उठवणार. संसदेत आता मोदी आणि शाहांचा आवाज नाही चालणार. इंडिया आघाडीच्या २४० लोकांचा आवाज चालणार. सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य आणि बेकायदा आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. परंतु तरीही हे सरकार मोदी आणि शाहाने महाराष्ट्रावर बसवलं आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही बांबू घातला आहे तो अजून निघाला नाहीय. तो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेला हा बांबू आरपार जाईल, हे लिहून घ्या. त्यांना स्वप्नातसुद्धा बांबू बांबू दिसतोय. याच बांबूचे फटके लोक गद्दारांना रस्त्यारस्त्यावर मारतील. हा सगळा प्रयोग त्यांच्यावर होणार आहे. या आता बांबूवर ते अभ्यास करतील. त्यावर त्यांना एखादी डिग्री मिळू शकते – संजय राऊत</p>

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra News Live : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.