Mumbai Maharashtra News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जागतिक योग दिन साजरा केला जात आहे. योग दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नेते, खेळाडू आणि कलाकार मंडळी या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. यापैकी महत्त्वाच्या कार्यक्रमांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच विधान परिषदेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक आणि पाचारावर आपलं लक्ष असेल. यासह मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरातील राजकीय घडामोडींचा तथा शरद पवारांच्या शेतकरी मेळाव्यांचा आढावा आपण घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. ते राज्यभर शेतकरी मेळावे घेत आहेत.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live : राज्यासह देशभरातील बातम्या एकाच क्लिकवर

21:19 (IST) 21 Jun 2024
मुंबई: आरक्षित तिकीट नसलेल्या प्रवाशांना रेल्वेगाडीतून प्रवास करण्यास बंदी, एका दिवसात १,६२८ प्रवाशांना एक्स्प्रेसमधून खाली उतरवले

आरक्षित तिकीट नसलेल्या सुमारे १,६२८ प्रवाशांना गुरुवारी रेल्वेगाडीमधून खाली उतरविण्यात आले.

सविस्तर वाचा...

21:18 (IST) 21 Jun 2024
येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेविरहीत होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबईतील चौपाट्यांवरही स्वच्छता मोहीम राबविली जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

20:44 (IST) 21 Jun 2024
महायुती शासनविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

देशातील, राज्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस कंगाल होत निघालाय आणि सरकारचे सगळे दलाल मालामाल होत आहेत.

सविस्तर वाचा...

20:44 (IST) 21 Jun 2024
शहरबात: गाळातील सोनं

पालघर जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी गाळ साचल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा लाभ घेऊन त्यातून सोने काढण्याची (उत्खनन) किमया केल्याचे दिसून आले आहे.

सविस्तर वाचा...

20:43 (IST) 21 Jun 2024
वडाळा – परळदरम्यानच्या जलबोगद्याचे खणन पूर्ण, प्रकल्प पूर्ण होण्यास एप्रिल २०२६ ची मुदत

पाणी पुरवठ्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मुंबईत अनेक ठिकाणी जलबोगदे तयार करीत आहे.

सविस्तर वाचा...

20:16 (IST) 21 Jun 2024
सासू सुनेचा आधुनिक वटसावित्री सण, लॅपटॉपवर वडाचे छायाचित्र ठेवून घरातच घातल्या फेर्‍या

वेळ कमी असला तरी सण साजरा करायचा होता. त्यामुळे सुन तृप्तीने अभिनव संकल्पना सुचवली.

सविस्तर वाचा...

20:08 (IST) 21 Jun 2024
आरती यादव हत्या प्रकरण: हत्येचे चित्रण करणार्‍या १४ जणांचे नोंदविले जबाब

घटनास्थळी हजर राहून चित्रिकरण करणारे नागरिक आणि हत्येसाठी ज्या कंपनीतून पाना आणला त्यांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा...

20:00 (IST) 21 Jun 2024
ओबीसी शिष्टमंडळाची सरकारबरोबरची बैठक संपली, मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक

ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे जालन्यातील वडीगोद्री गावामध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ना? यासह आदी प्रश्न लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला केले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. आज ओबीसी शिष्टमंडळाची राज्य सरकारबरोबर महत्वाची बैठक पार पडली. ही बैठक आता पार पडली असून राज्य सरकार ओबीसी शिष्टमंडळाच्या मागण्या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

19:52 (IST) 21 Jun 2024
पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडीलांना जामीन मंजूर

पुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडीलांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

19:29 (IST) 21 Jun 2024
मुलुंडमधील १७ इमारती टँकरच्या पाण्यावर अवलंबून, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी हैराण

रहिवासी संतप्त झाले असून पालिकेने तत्काळ या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

19:03 (IST) 21 Jun 2024
ओबीसी शिष्टमंडळाची सरकारबरोबर बैठक सुरु; काय निर्णय होणार?

ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे जालन्यातील वडीगोद्री गावामध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ना? यासह आदी प्रश्न लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला केले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. आज ओबीसी शिष्टमंडळाची राज्य सरकारबरोबर महत्वाची बैठक गेल्या एक तासापासून सुरु आहे. या बैठकीत काय निर्णय होतात? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

18:49 (IST) 21 Jun 2024
शारीरिक संबंधावरून होता वाद, पतीने केले पत्नीचे अपहरण, पिंपरीतील घटना

लैंगिक छळ, वेगवेगळ्या स्थितीत शारीरिक संबंध ठेवण्यावरून त्यांच्यात वाद होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सविस्तर वाचा...

18:18 (IST) 21 Jun 2024
कोल्हापुरात वटपौर्णिमेनिमित्त पूजा, व्रत, वाणवाटप

अनेक महिलांनी वडाचे रोप कुंडीत लावून घरातच वडाची पुजा करण्याला प्राधान्य दिले.

सविस्तर वाचा...

18:09 (IST) 21 Jun 2024
सातारा: सलमानच्या भेटीसाठी खासदार श्रीकांत शिंदे

सलमानने वास्तव्यासाठी हाच बंगला का निवडला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सविस्तर वाचा...

18:02 (IST) 21 Jun 2024
सांगली: प्रेमी युगुलाची गळफास लावून आत्महत्या

आठ दिवसांपुर्वी वास्तव्यास आलेल्या प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आरग (ता. मिरज) येथे गुरूवारी रात्री उघडकीस आला.

सविस्तर वाचा...

17:48 (IST) 21 Jun 2024
‘योग’दिनी कोल्हापुरात उपक्रमांना प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योगदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध स्तरातील लोकांनी सहभागी होऊन प्रतिसाद नोंदवला. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक योगा अंतर्गत योग प्रशिक्षक रविभूषण कुमठेकर यांनी प्रार्थना, आसने, प्राणायम, ध्यान, शांतिपाठ इत्यादी योग क्रिया करून घेतल्या.

कोल्हापुरातील चेतना अपंगमती विकास संस्था येथे गतिमंद विद्यार्थी , पालक, शिक्षक योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, असे पवन खेबुडकर यांनी सांगितले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद आणि पतंजली योग समिती इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात प्रशिक्षक सुहास पवळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग, प्राणायाम, ध्यान आदींची प्रात्यक्षिके सादर केली. आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, माजी आमदार सुरेश हाळवणकर सहभागी झाले होते.

17:43 (IST) 21 Jun 2024
गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी कार्यालयावर ठाकरेसेनेचा मोर्चा, आंदोलक- पोलिसांत शाब्दिक चकमक

आंदोलकांनी प्रांत कार्यालय परिसरात ठिय्या मारला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

सविस्तर वाचा...

17:39 (IST) 21 Jun 2024
मुंबईतील रिझवी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांचा खालापूरच्या धरणात बुडून मृत्यू

मुंबईतील वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पावसाळी सहलीतील चार जण बुडाले. खालापूर तालुक्यातील वावर्ले ग्रामपंचायत हद्दीतील पोखरवाडी जवळील सत्य साई बाबा धरणात चार युवक बुडाले. एकूण ३७ युवक, युवती सहलीला गेले होते पावसाळी सहलीला. खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांनी बचाव कार्य हाती घेतलं आहे.

17:28 (IST) 21 Jun 2024
अद्वय हिरे यांच्या तुरुंगातील मुक्कामात वाढ

नाशिक जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळाप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे हे सात महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

सविस्तर वाचा...

17:16 (IST) 21 Jun 2024
सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीला सुरुवात

सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. छगन भुजबळ, पंकजा मुंडे, अतुल सावे, गोपीचंद पडळकर, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे, धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित आहेत.

16:57 (IST) 21 Jun 2024
जामनेर पोलीस ठाण्यावर जमावाची दगडफेक, जाळपोळ; बालिका हत्या प्रकरणातील संशयितास ताब्यात देण्याची जमावाची मागणी

जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक व जाळपोळ करण्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दगडफेकीत पोलीस निरीक्षकांसह सात कर्मचारी जखमी झाले.

सविस्तर वाचा...

16:21 (IST) 21 Jun 2024
येत्या २४ तासात विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

नागपूर : मोसमी पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात प्रवेश केला. पण, हाच मोसमी पाऊस काही जिल्ह्यात दाखल झाला आणि त्याने विश्रांती घेतली. आता पुन्हा एकदा या मोसमी पावसाने राज्यातच नाही तर देशात पुढची वाटचाल सुरू केली आहे.

वाचा सविस्तर...

16:21 (IST) 21 Jun 2024
गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठा झटका! माजी आमदार रमेश कुथे यांचा भाजपला ‘रामराम’

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रमेश कुथे यांनी आज शुक्रवारी भाजपला रामराम केला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे. रमेश कुथे हे शिवसेनेकडून १९९५ आणि १९९९ असे दोनदा निवडून आले आहेत.

वाचा सविस्तर...

16:20 (IST) 21 Jun 2024
“चंद्रशेखर बावनकुळे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, एखाद्या चांगल्या रुग्णालयात…” राष्ट्रवादीच्या नेत्याचा उपरोधिक सल्ला

नागपूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते दररोज माध्यमांसमोर वायफळ बडबड करीत असतात. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे एखाद्या चांगल्या रुग्णालयात उपचार करावा, असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता वेदप्रकाश आर्य यांनी दिला आहे.

वाचा सविस्तर...

15:39 (IST) 21 Jun 2024
मुंबई: कृषी अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्या, पाच नवीन महाविद्यालये

यंदा कृषी अभ्यासक्रमाची चार तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे एक अशी एकूण पाच नवी महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत.

सविस्तर वाचा...

15:13 (IST) 21 Jun 2024
प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी का केली नाही? उच्च न्यायालयाची एमपीसीबीला विचारणा

वायू प्रदूषणाला जबाबदार ठरणाऱ्या मुंबईतील सगळ्या औद्योगिक प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) दिले होते.

सविस्तर वाचा...

15:08 (IST) 21 Jun 2024
मुंबई : दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ, आता २४ अतिरिक्त फेऱ्या

मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) घेतला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या दोन्ही मार्गिकांवर मेट्रोच्या अतिरिक्त २४ फेऱ्या होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

14:20 (IST) 21 Jun 2024
पुणे जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचे लक्षच नाही, रोहित पवारांचा पालकमंत्री अजित पवारांना टोला

राज्यातील शेतकरी वर्गापासून सर्व सामान्य नागरिकाचे जगणे मुश्किल झाले आहे. त्या सर्व गोष्टींना महायुती सरकार जबाबदार आहे. त्या विरोधात आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.

सविस्तर वाचा...

14:07 (IST) 21 Jun 2024
सातारा : कोयना खोरे जमीन गैरव्यवहार प्रकरण, दोषींच्या वकिलांचे वकीलपत्र रद्द

वाई : कोयना खोऱ्यातील जमीन खरेदीप्रकरणी आजच्या सुनावणीत दोषींच्या वकिलांचे वकीलपत्र आज चौकशी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी रद्द केले. कोयना खोऱ्यातील ‘झाडाणी’ (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा...

13:44 (IST) 21 Jun 2024
मुंबई : ड्रग्सच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक

मुंबई : थायलंड येथे पाठविण्यात आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची भीती दाखवून बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रक्रार उघडकीस आला आहे. तक्रारीनंतर याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

सविस्तर वाचा....

Sharad Pawar

मोदींनी सभा घेतलेले अर्ध्याहून अधिक उमेदवार पडले", शरद पवारांचा टोला; म्हणाले, "आता विधानसभेला..."

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या शेतकरी मेळावे घेत आहेत. गुरुवारी (२० जून) त्यांनी बारामतीमधील मोरगाव या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एनडीएच्या अपयशावरून चिमटा काढला. शरद पवार म्हणाले, नुकतीच महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे १८ दौरे केले. निवडणुकीत भाजपासह एनडीएच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी १८ वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. परंतु, त्या बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की त्यांनी ज्या १८ ठिकाणी सभा घेतल्या. त्यातले दहा उमेदवार पडले.

शरद पवार म्हणाले, मी उद्या दिल्लीला जाऊन मोदी यांना भेटून सांगेन तुम्ही महाराष्ट्रात जिथे जिथे गेलात तिथले ६० टक्के उमेदवार पडले. उद्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे तेव्हाही तुम्ही महाराष्ट्रात फिरा. मोदी या निवडणुकीत सतत मेरी गॅरंटी... मेरी गॅरंटी... असं ओरडत होते. परंतु, ते कोणी ऐकलं नाही. मोदींच्या गॅरंटीवर कोणाचा विश्वास बसला नाही. त्यांचं नाणं महाराष्ट्रात काही चाललं नाही. त्यांची गॅरंटी भाजपाच्या कामाला आली नाही.

Story img Loader