Marathi News Today, 24 April 2023 : उद्धव ठाकरेंनी पाचोऱ्यात सभा घेतली. त्यानंतर त्या भाषणाचे पडसाद उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भाषणावर टीका केली आहे. तर तिकडे दुसरीकडे शरद पवार यांनी एक वक्तव्य करून मविआच्या भवितव्यावरच प्रश्न निर्माण केला आहे. तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंमुळे आणि मिंधे गटामुळे भाजपा रसातळाला चालली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणारच आहे. लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण या घडामोडी जाणून घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra News Update एकनाथ शिंदेंमुळे भाजपा रसातळाला, संजय राऊत यांचा आरोप; सर्व महत्त्वाच्या घडामोडी

उद्धव ठाकरेंनी पाचोऱ्यात सभा घेतली. त्यानंतर त्या भाषणाचे पडसाद उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भाषणावर टीका केली आहे.

19:27 (IST) 24 Apr 2023
पुणे: ससून रुग्णालयातून आरोपी पसार

पुणे: ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

19:09 (IST) 24 Apr 2023
पुणे: खडकीतील दारुगोळा कारखान्यातील महिलेचा भररस्त्यात भोसकून खून

पुणे: खडकीतील दारुगोळा कारखान्यात कामाला असलेल्या महिलेचा भररस्त्यात चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

सविस्तर वाचा…

18:35 (IST) 24 Apr 2023
नाशिक: आर्टिलरी सेंटरजवळ बिबट्या जेरबंद

नाशिक: गांधीनगर येथील आर्टिलरी सेंटरच्या प्रवेशव्दाराजवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सोमवारी सकाळी बिबट्या जेरबंद झाला. गांधीनगर जवळील आर्टिलरी सेंटर परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने तेथे बिबट्याचा वावर वाढला आहे.

सविस्तर वाचा…

18:28 (IST) 24 Apr 2023
सापडलेला भ्रमणध्वनी परत करणे बेतले जीवावर, मारहाणीत मृत्यू , दोन जण ताब्यात

नाशिक : सापडलेला भ्रमणध्वनी परत देण्यासाठी गेलेल्या युवकाला संबंधित महिलेच्या कुटूंबियांनी सळईने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखम झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार अंबड परिसरात घडला. या प्रकरणी चार संशयितांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

18:21 (IST) 24 Apr 2023
पुणे: सिंहगड रस्त्यावर चोरट्यांकडून हवेत गोळीबार; मद्यविक्रेत्याला धमकावून रोकड लुटण्याच्या प्रयत्न

पुणे: मद्यविक्री दुकानातील रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली.

सविस्तर वाचा…

18:08 (IST) 24 Apr 2023
संजय राऊत यांच्या सरकार पडण्याच्या भविष्यवाणीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारला धोका नाही, मात्र..”

गोंदिया : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुढील १५ दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडेल, त्यांचा डेथ वॉरंट निघाला आहे, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी, सरकारमधील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तरी सध्या त्यांच्याकडे १६५ असा बहुमताचा आकडा असल्यामुळे माझ्या मते सध्या तरी सरकारला धोका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई झाल्यास नवीन मुख्यमंत्री राज्याला प्राप्त होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा..

18:07 (IST) 24 Apr 2023
डोंबिवलीत चार भूमाफियांवर गुन्हे दाखल; कुंभारखाणपाडा, नवापाडामध्ये उभारल्या बेकायदा इमारती

डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील कुंभारखाणपाडा, नवापाडा भागात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता सात माळ्यांच्या बेकायदा इमारत बांधणाऱ्या चार भूमाफियांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) कायद्याने गुन्हे दाखल करण्यात आले. पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा..

18:06 (IST) 24 Apr 2023
वादळी पावसाचा फायदा घेत नागपूरच्या अजनी वसाहतीतील शेकडो वृक्षांवर कुऱ्हाड; महापालिकेकडून केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार

नागपूर : इंटर मॉडेल स्थानकामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अजनी रेल्वे वसाहतीत आता स्थानक विस्तारीकरणासाठी शेकडो झाडे विनापरवाना तोडल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेने केवळ नोटीस देऊन हात आखडता घेतल्याने वृक्षप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा..

18:06 (IST) 24 Apr 2023
धुळे : बनावट बियाणांची विक्री थांबविण्यासाठी पाच भरारी पथके

धुळे – खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना निविष्ठा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषि विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बनावट बियाण्याची विक्री होऊ नये याकरीता जिल्ह्यात पाच भरारी पथके तयार केली असून या पथकांमार्फत बनावट बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली.

सविस्तर वाचा..

18:05 (IST) 24 Apr 2023
पुणे : रॅप साँग चित्रीकरण प्रकरणाचा अहवाल उद्या मिळणार, संबंधितावर कारवाई होणार – कुलगुरू डॉ. कारभारी काळे

पुणे : रॅप साँग चित्रीकरण प्रकरणी संबंधित तरुणाविरोधात पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात आली असून तिची आज बैठक होणार आहे. त्या बैठकीचा प्राथमिक अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत मिळणार आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई होणार, असे पुणे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

सविस्तर वाचा..

18:04 (IST) 24 Apr 2023
बुलढाणा : नवीन महागडी कार पेट्रोल टाकून पेटवून दिली, ‘सीसीटीव्ही’त कैद झाला थरार

बुलढाणा : घरासमोर उभी असलेली वीस लाखांची कार तिघा अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. परिसरात असलेल्या ‘सीसीटीव्ही’मध्ये कार जळणारे व क्षणार्धात पेटलेली चारचाकी टिपल्या गेली आहे.

सविस्तर वाचा..

18:04 (IST) 24 Apr 2023
बुलढाणा : खारघर दुर्घटनेत पन्नासपेक्षा जास्त मृत्यू; काँग्रेसचे राहुल बोन्द्रे म्हणाले, “सरकार आकडे लपवित आहे..”

बुलढाणा : खारघर येथील महाराष्ट्र भूषण वितरण सोहळ्यातील मृत्युमुखी पडलेल्या सेवकांचे आकडे सरकार लपवित असून या दुर्घटनेत ५० पेक्षा जास्त सेवकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी येथे केला. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून यावर व्यापक चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

सविस्तर वाचा..

18:03 (IST) 24 Apr 2023
अमरावती : सातपुड्यात वैदिकपूर्व अद्भूत शिवलिंग आढळले!भारतीय इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण – संशोधकांच्या चमूचा दावा

अमरावती : सातपुडा पर्वतरांगांमध्‍ये अमरावती जिल्‍ह्यातील मोर्शी नजीक सुमारे १६ वर्षांपूर्वी अश्‍मयुगीन चित्रगुहा आढळून आल्‍यानंतर आता अभ्‍यास आणि संशोधनातून अनेक नवनवीन बाबी समोर येत असून या परिसरात वैदिक संस्कृतीपूर्वीचे अद्भूत शिवलिंग आढळून आले आहे. त्याची लाल रंगाने पूजा होत असल्याच्या स्पष्ट खुणा दिसतात, असा दावा संशोधकांच्‍या चमूने केला आहे.

सविस्तर वाचा..

18:02 (IST) 24 Apr 2023
‘देशाच्या गृहमंत्र्यांनी खारघर येथे केवळ शक्तीप्रदर्शन केले, मात्र अनेकांचे जीव गेले’, आमदार अमित झनक यांचा आरोप

वाशीम : ज्येष्ठ निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी खारघर येथे १६ एप्रिल रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. परंतु, आयोजकांनी लोकांच्या जिवांची पर्वा न करता ढिसाळ नियोजन केले. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे सदर प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी केले.

सविस्तर वाचा..

18:02 (IST) 24 Apr 2023
पुणे : व्यावसायिकांना करोडो रुपयांना फसविणारी महिला अटकेत

पुणे : मुद्रण व्यवसायात पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाला दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी एका महिलेला अटक केली.

सविस्तर वाचा..

18:01 (IST) 24 Apr 2023
“नेत्‍यांची एसीमध्‍ये शाही मेजवानी, तर श्री सदस्‍यांना भर उन्‍हात छावणी”, यशोमती ठाकूर आक्रमक, म्हणाल्या, “मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्र्यांवर..”

मरावती : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात १४ लोकांचा मृत्यू हे शिंदे-फडणवीसांच्या निर्लज्ज सरकारचे बळी आहेत. सरकार आजही या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहे. ही घटना गंभीर आणि मनाला वेदना देणारी असून या प्रकरणात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली

सविस्तर वाचा..

17:58 (IST) 24 Apr 2023
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र प्रकरण, रायगड पोलिसांनी पुण्यातून घेतले एकाला ताब्यात

अलिबाग : ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र प्रसिद्ध केल्या प्रकरणी रायगड पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. या प्रकरणाचे बारामती कनेक्शन समोर आलंय.

सविस्तर वाचा…

17:44 (IST) 24 Apr 2023
सांगली : वाढदिवसानिमित्त सचिनच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक

सांगली : भारतरत्न क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पन्नासावा वाढदिवस शिराळा तालुक्यातील औंढी येथे गुढ्या-तोरणे उभा करून सचिनच्या अर्धपुतळ्याची पालखीतून मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. या गावातीलच सचिन जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या ’तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमने एकत्रित येत आज येथे मोठा जल्लोष केला.

सविस्तर वाचा..

17:38 (IST) 24 Apr 2023
रामदास भटकळ यांना जीवनगौरव पुरस्कार

पुणे : अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने पॉप्युलर प्रकाशनाचे संचालक रामदास भटकळ यांना जीवनगौरव पुरस्कार तर, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांना साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

17:17 (IST) 24 Apr 2023
ठाण्यात नियोजनाविनाच रस्त्यांची कामे सुरू केल्याने वाहतूक कोंडी; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची पालिकेवर टिका

ठाणे: शहरात कोणत्याही प्रकारच्या नियोजनाविनाच एकाच वेळेस अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचा फटका सबंध ठाणे शहराला बसला असून वाहतूक कोंडीची तीव्रता अधिकाधिक वाढू लागली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे.

सविस्तर वाचा…

17:15 (IST) 24 Apr 2023
वाशीम: बिबट्याच्या बछड्यांचा क्षणभर विसावा

वाशीम: वाशीम जिल्ह्यातील कोळंबी वन परीक्षेत्रात दोन बिबट्याची पिल्ले आढळून आलीत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या वतीने त्यांचा शोध घेतला जात आहे.

सविस्तर वाचा…

14:13 (IST) 24 Apr 2023
हिंगणा: कारखान्याला आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू

हिंगणा: एमआयडीसीमधील कटारिया एग्रो कंपनीला आग लागून तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत, उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे.

सविस्तर वाचा…

13:53 (IST) 24 Apr 2023
वादळी पावसाचा फायदा घेत नागपूरच्या अजनी वसाहतीतील शेकडो वृक्षांवर कुऱ्हाड; महापालिकेकडून केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार

नागपूर : इंटर मॉडेल स्थानकामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अजनी रेल्वे वसाहतीत आता स्थानक विस्तारीकरणासाठी शेकडो झाडे विनापरवाना तोडल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेने केवळ नोटीस देऊन हात आखडता घेतल्याने वृक्षप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा..

13:52 (IST) 24 Apr 2023
डोंबिवलीत चार भूमाफियांवर गुन्हे दाखल; कुंभारखाणपाडा, नवापाडामध्ये उभारल्या बेकायदा इमारती

डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील कुंभारखाणपाडा, नवापाडा भागात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता सात माळ्यांच्या बेकायदा इमारत बांधणाऱ्या चार भूमाफियांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) कायद्याने गुन्हे दाखल करण्यात आले. पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा..

13:52 (IST) 24 Apr 2023
भंडारा जिल्हा परिषदेच्याच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका आहे का? ‘शाळांना सुट्टी’बाबत राज्य शासन परिपत्रकात दुटप्पीपणा

भंडारा : तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना २१ एप्रिलपासून सुटी देण्यासंदर्भात शासन परिपत्रक काढण्यात आले. मात्र, यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवण्याबाबत स्पष्ट निर्देश असून इतर मंडळाच्या शाळांना सोयीस्करपणे शाळा सुरू ठेवण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा..

13:50 (IST) 24 Apr 2023
“भेंडवळचे अंदाज अशास्‍त्रीय आणि ‘बोगस’..!”; शेतकरी नेते अरविंद नळकांडे यांची टीका

अमरावती : बुलढाणा जिल्‍ह्यातील भेंडवळ येथील ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत केले जाते. पण, ही भेंडवळ मांडणी अशास्त्रीय व ‘बोगस’ असल्याची टीका शेतकरी नेते आणि श्रमराज्‍य परिषदेचे अध्‍यक्ष अरविंद नळकांडे यांनी केली आहे.

सविस्तर वाचा..

13:49 (IST) 24 Apr 2023
यवतमाळ : कुमारी मातेची फरफट; नोकरीचे आमीष दाखवून दीड लाखांत विक्री, मध्यप्रदेशात अत्याचार

यवतमाळ : जिल्ह्यात सामाजिक चिंतेचा विषय ठरलेल्या ‘कुमारी मातां’ची कशी फरफट होते हे सांगणारी संतापजनक घटना मारेगाव तालुक्यात उजेडात आली. कुमारी माता म्हणून समाजाकडून अवहेलना सहन करीत असलेल्या एका २७ वर्षीय तरुणीस नोकरीचे आमीष दाखवून मध्यप्रदेशात नेण्यात आले. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिचा दीड लाख रुपयांत सौदा केला आणि तिची विक्री केली.

सविस्तर वाचा..

13:49 (IST) 24 Apr 2023
कल्याण-डोंबिवली वळण रस्त्याच्या दुतर्फा वनराई बहरणार, बाराशे झाडांच्या लागवडीचे नियोजन

कल्याण – कल्याण-डोंबिवली ते हेदुटणे या २१ किलोमीटर लांबीच्या वळण रस्त्याच्या टप्प्यातील टिटवाळा ते कल्याण हा महत्त्वाचा टप्पा बांधून पूर्ण झाला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा बाराशेहून अधिक सावली देणारे वृक्ष लावण्याचे नियोजन पालिकेच्या उद्यान विभागाने केले आहे. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून रविवारी गांधारी ते दुर्गाडी चौकापर्यंतच्या रस्त्यावर चारशे रोपांची लागवड करण्यात आली.

सविस्तर वाचा..

13:42 (IST) 24 Apr 2023
यवतमाळ: अबब.. पहिलीतील विद्यार्थी लिहितात ४००० पर्यंत रोमन संख्या; आनंदी मुलांच्या बचत बँकेतील व्यवहारांची शिक्षण आयुक्तांना भुरळ

यवतमाळ: जिल्हा परिषद शाळांमधील दर्जाबाबत कायमच नकारात्मक मत समाजात व्यक्त होतात. मात्र शिक्षकांनी ठरविले तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळाही शहरी भागातील खासगी शाळांपेक्षाही काकणभर सरसच राहू शकतात, याची प्रचिती राज्याच्या शिक्षण आयुक्तांना कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आली.

सविस्तर वाचा…

13:26 (IST) 24 Apr 2023
वर्धा: बाजार समित्यांच्या निवडणुका ठरल्या राजकीय कुटुंबातील वारसदारांच्या अभिषेकाची संधी; दिग्गजांची मुले रिंगणात

वर्धा: राजकीय कुटुंबातील पुढील पिढीसाठी राजकीय पदार्पणाची संधी म्हणून बाजार समितीची निवडणूक आयतेच साधन ठरले आहे. थेट आमदारकी, खासदारकी किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुटुंबातील सदस्यास संधी देण्याची भूमिका सर्वच प्रमुख पक्षात दिसून येते.

सविस्तर वाचा…