Marathi News Today, 24 April 2023 : उद्धव ठाकरेंनी पाचोऱ्यात सभा घेतली. त्यानंतर त्या भाषणाचे पडसाद उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भाषणावर टीका केली आहे. तर तिकडे दुसरीकडे शरद पवार यांनी एक वक्तव्य करून मविआच्या भवितव्यावरच प्रश्न निर्माण केला आहे. तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंमुळे आणि मिंधे गटामुळे भाजपा रसातळाला चालली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणारच आहे. लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण या घडामोडी जाणून घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra News Update एकनाथ शिंदेंमुळे भाजपा रसातळाला, संजय राऊत यांचा आरोप; सर्व महत्त्वाच्या घडामोडी

उद्धव ठाकरेंनी पाचोऱ्यात सभा घेतली. त्यानंतर त्या भाषणाचे पडसाद उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भाषणावर टीका केली आहे.

13:19 (IST) 24 Apr 2023
ठाकरेंच्या सभेने जळगावमध्ये शिवसैनिकांना बळ

ज्या जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे सर्व आमदार बंडखोर गटास जाऊन मिळाले, अशा जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेस कितपत प्रतिसाद मिळेल, हा बंडखोरांसह सर्वांच्या उत्सुकतेचा विषय होता. पाचोऱ्यातील मैदान तुडूंब भरल्याने गर्दीचे समीकरण जुळून आले.

सविस्तर वाचा

13:07 (IST) 24 Apr 2023
मालेगावात सहा हरणांचे मांस जप्त

मालेगाव: शहरातील दरेगाव भागातील एका शेतघरावर कारवाई करत पवारवाडी पोलिसांनी सहा हरणांचे सुमारे १२० किलो मांस तसेच गावठी बंदूक, एक गोळी व एक लोखंडी कोयता असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

13:01 (IST) 24 Apr 2023
आरेतील १७७ झाडांवर कुऱ्हाड, कडक पोलीस बंदोबस्तात पहाटे आरेत वृक्षतोड

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कामासाठी आरे कॉलनीतील १७७ झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) सोमवारी झाडे कापण्याची कार्यवाही केली. सोमवारी पहाटे पाच वाजता कडक पोलीस बंदोबस्तात आरेतील झाडे कापण्यात आली.

सविस्तर वाचा

12:40 (IST) 24 Apr 2023
मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चेंबूरमध्ये तक्रार दाखल

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी वादग्रस्त विधान केले. जयंतीच्या दिवशी पुरुष मंडळी दारू पिण्यासाठी गेल्याचा उल्लेख एका व्हायरल ध्वनिचित्रफितीतून समोर आला आहे. त्यांच्या या विधाना विरोधात जनतेने संताप व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा

12:14 (IST) 24 Apr 2023
डोंबिवलीत विवाहितेवर हल्ला करणाऱ्या तरुणास नाशिकमधून अटक

डोंबिवली: येथील पाथर्ली भागात एकतर्फी प्रेमातून एका विवाहितेवर गेल्या आठवड्यात हल्ला करून फरार झालेल्या तरुणाला टिळकनगर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. तरुणाने हल्ल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. जिग्नेश जाधव (२५, रा. देसलेपाडा, डोंबिवली पूर्व) असे अटक आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 24 Apr 2023
सावधान! अवकाळी पावसाचे संकट कायम; आजपासून पुन्हा नागपूरसह विदर्भाला तडाखा बसण्याचा इशारा

नागपूर: उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. आता पुन्हा एकदा २४ ते २७ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 24 Apr 2023
अकोल्यात ६१२ जणांनी तब्बल ५.१७ कोटींची वीज चोरली

अकोला: चोरीमुळे शहरात वीज गळतीचे प्रमाण वाढले आहे. वीज चोरीच्या प्रमाणात तब्बल ११ टक्क्याने वाढ झाल्याचे समोर आले आहे. गत वर्षभरात तब्बल ६१२ वीज चोर आढळून आले. त्यांनी पाच कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 24 Apr 2023
चंद्रपूर: वाघाची रस्त्यावर डौलदार चाल; दोन्ही बाजूची वाहतूक थांबली, ताडोबात पर्यटकांनी घेतले मनसोक्त दर्शन

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात उन्हाच्या तीव्रतेने वाघ जंगलाबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी पर्यटकांच्या गर्दीत वाघ मोहरली मुख्य रस्त्यावर सायंकाळी दिसून आला. वाघ रस्त्यावर असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळासाठी थांबली होती.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 24 Apr 2023
हृदयद्रावक..! पुण्यात प्रेयसीच्या सव्वा वर्षीय बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून केले ठार; प्रियकर फरार

पुणे : प्रेयसीच्या सव्वा वर्षीय चिमुकल्या बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून जीवे ठार मारल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील खेड शेलपिंपळगाव येथे घडली आहे. ही घटना सहा एप्रिल रोजी घडली असून, उपचारादरम्यान सव्वा वर्षीय बाळाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा..

11:13 (IST) 24 Apr 2023
कॉंग्रेसमधून निलंबित माजी आमदार बावनकुळेंच्या भेटीला, तर्कवितर्क सुरू

नागपूर : कॉंग्रेसमधून निलंबित माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. डॉ. देशमुख पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार का? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा..

11:12 (IST) 24 Apr 2023
कल्याणमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहनिर्माण सोसायटी स्थापन

कल्याण – कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात एका गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्र तयार केली. ती कागदपत्र येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दाखल करून त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहनिर्माण सोसायटी स्थापन करणाऱ्या सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध एका सोसायटी सद्स्याच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:10 (IST) 24 Apr 2023
कुठे आहे भारतातील एकमेव सीता मंदिर? काय होता शाप? का होते गर्दी जाणून घ्या..

वर्धा : रामायणातील सीता हे प्रमुख स्री व्यक्तिमत्व. मात्र, सीतेचे एकमेव मंदिर भारतात तर दुसरे श्रीलंकेत आहे. जीर्ण अवस्थेत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात रावेर यागावी असलेल्या या सीता मंदिराकडे पहिले लक्ष गेले शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांचे. त्यामागची आख्यायिका त्यांनी प्रथम समजून घेतली.

सविस्तर वाचा..

11:08 (IST) 24 Apr 2023
दातांची कीड, हिरड्यांचा आजार असलेल्यांना हृदयरोगाची जोखीम अधिक; नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील दंतशास्त्र विभागाचे निरीक्षण

नागपूर : आजच्या धावपळीच्या काळात एकीकडे नागरिकांचे मुखाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे दातांची कीड, हिरड्यांचा आजार असलेल्यांना हृदयरोगाची जोखीम अधिक असते, असे निरीक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) दंतशास्त्र विभागाने नोंदवले आहे. आज, राष्ट्रीय मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र दिन असून त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.

सविस्तर वाचा..

11:07 (IST) 24 Apr 2023
एक लाखापेक्षा जास्त शेतकरी कृषीपंपासाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत; महावितरणकडून सर्वाधिक जोडणी दिल्याचा दावा

नागपूर : महावितरणकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षात १ लाख ७० हजार कृषी पंपांना वीज जोडणीची सर्वोत्तम कामगिरी केल्याचा दावा होत आहे. परंतु, राज्यात अद्यापही १ लाख ६ हजार ३४० शेतकरी कृषीपंपासाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे.

सविस्तर वाचा..

11:07 (IST) 24 Apr 2023
नागपूर : अल्पवयीन मुलीवर लॉजमध्ये नेऊन बलात्कार

नागपूर : फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर युवकाने बाराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला लॉजमध्ये नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रवीण लहारे (नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा..

11:06 (IST) 24 Apr 2023
काँग्रेसकडून कारवाईची शक्यता असल्याने भाजपा प्रदेशाध्यक्षांना भेटायला आले का? आशिष देशमुख म्हणाले…

काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महिन्याला एक खोका मिळतो असा गंभीर आरोप केला. याशिवाय मी माफी मागायला राहुल गांधी नाही असंही वक्तव्य केलं. यानंतर काँग्रेसने आशिष देशमुख यांना नोटीस बजावली. आता आशिष देशमुख भाजपा प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटायला त्यांच्या घरी पोहचले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यांना या भेटीचं कारण विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (२४ एप्रिल) नागपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना बोलत होते.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 24 Apr 2023
“मला बोलायला लावू नका, नाहीतर तुमच्या आसपास…”, संजय राऊतांचा फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेवर इशारा!

संजय राऊत म्हणतात, “कशाला आम्हाला तोंड उघडायला लावता? हुडी घालून चोरून कसे भेटत होते हे देवेंद्र फडणवीसांच्या घरातूनच…!”

वाचा सविस्तर

11:04 (IST) 24 Apr 2023
“मविआ म्हणून लढण्याची इच्छा आहे, पण फक्त…”, शरद पवारांचं सूचक विधान; आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह?

शरद पवार म्हणतात, “कुणी फोडायचं काम करत असेल, त्यांचा तसा काही कार्यक्रम असेल तर ते करत राहतील. आम्हाला जेव्हा…!”

वाचा सविस्तर

11:03 (IST) 24 Apr 2023
“एकत्र लढण्याची फक्त इच्छा…”, शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांच्या बोलण्यावरून…!”

संजय राऊत म्हणतात, “महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा आहे. अनेकदा त्यांच्या बोलण्याचा…!”

वाचा सविस्तर

11:03 (IST) 24 Apr 2023
“…तर उर्वरित पन्नास टक्के आरक्षण कोणासाठी?”, छगन भुजबळ यांचा सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत बैठक घेतली आहे. सरकार याबाबत सकारात्मक आहे. मात्र, त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणामध्ये आधीच खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे ओबीसी समाजासाठी फक्त १७ टक्केच आरक्षण शिल्लक आहे.

सविस्तर वाचा

10:59 (IST) 24 Apr 2023
कर्नाटकातील भाजपच्या उत्साही नेत्यांना अमित शहा यांनी लावला चाप

महाराष्ट्रातील मराठा समाजाप्रमाणेच कर्नाटकात लिंगायत समाज हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या समाजाची मते निर्णायक असतात. गेली अनेक वर्षे हा समाज भाजपच्या पाठीशी उभा राहतो, हे अनुभवास येते. येडियुरप्पा यांना बदलल्यावर मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई या लिंगायात समाजातील नेत्याकडे राज्याचे नेतृत्व सोपविण्यात आले.

सविस्तर वाचा

10:58 (IST) 24 Apr 2023
कामशेत रेल्वे स्थानकाच्या आवारात तरुणाचा खून, आरोपी अटकेत

विजय सतू भोंडवे (वय २२, रा. भाजेगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष महादेव घाटे याला अटक करण्यात आली आहे. कामशेत रेल्वे स्थानकाच्या आवारात फलाटावर भोंडवे थांबला होता. त्या वेळी आरोपी घाटे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन ते तीन साथीदारांनी भोंडवेवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.

सविस्तर वाचा

10:56 (IST) 24 Apr 2023
मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू, पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघात

दुचाकीस्वार नंदगावे आणि जाधवर लोणी काळभोरहून हडपसरकडे निघाले होते. लोणी काळभोर फाटा चौकात अचानक एक मोटार आडवी आली. त्यामुळे दुचाकीस्वार नंदगावे यांनी दुचाकी थांबविली. त्या वेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने दुचाकीला धडक दिली.

सविस्तर वाचा

10:45 (IST) 24 Apr 2023
मराठा आरक्षणावरून विदर्भात ओबीसी समाजात संतप्त प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता पुन्हा या समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. मात्र ओबीसी संघटनांचा त्याला विरोध आहे. त्यांच्या आरक्षणात वाटेकरी झाल्यास विदर्भाच्या राजकारणावर वर्चस्व असलेला हा समाज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तविला जाते.

सविस्तर वाचा

10:41 (IST) 24 Apr 2023
चंद्रशेखर राव यांना मराठवाड्याचे एवढे आकर्षण का?

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची जाहीर सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. गेल्या दोन महिन्यांतील त्यांची मराठवाड्यातील ही तिसरी सभा आहे. मराठवाड्याचे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना एवढे आकर्षण का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चंद्रशेखर राव यांची मराठड्ड्यातील ही तिसरी सभा आहे.

सविस्तर वाचा