Mumbai News Today, 25 August 2023 : राष्ट्रवादी पक्षासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यातील फलटण येथे असून अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. हे दोन्ही नेते जनतेला संबोधित करून काय आवाहन करतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे. तर, अजित पवार आमचे नेते आहेतच, असं ठामपणे शरद पवारांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चेला उधाण आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात राष्ट्रवादीबाबत काय निर्णय होतोय आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतोय हे पाहावं लागणार आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.
Marathi Breaking News : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
देशाची व राज्याचीही सत्ता ज्यांच्या हाती आहे. त्यांना संकटग्रस्त जनता, दुष्काळ, पाणी प्रश्नाची जाण नाही. या लोकांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असताना, ते याकडे डूंकनही पाहत नसल्याची टीका ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केली.
कल्याण – मोठ्या घोषणा करायच्या, विकास कामे आणायची आणि त्यानंतर त्या कामांकडे दुर्लक्ष करायचे. अशाने विकास कामे मार्गी लागत नाहीत. या गोंधळामुळे माणकोली येथील पोहच रस्त्यांसारखे गोंधळ निर्माण होतात, अशी टीका मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी शिवसेनेवर केली.
पुणे : नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर, काँग्रेस पक्षाने सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई केली होती. तरीदेखील पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मतांनी सत्यजीत तांबे हे निवडून आले होते. या निवडणुकीला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी होऊन गेला. त्यादरम्यान राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या, पण सत्यजित तांबे नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्यापही निश्चित झाले नाही. या राजकीय घडामोडीदरम्यान सत्यजीत तांबे पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस प्रवेशावर भाष्य केले आहे.
मुंबई : विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी नवी मुंबईतील डायल ११२ क्रमांकावर आला होता. दूरध्वनीनंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. तपासणीत सातारा येथे राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलाने दूरध्वनी केल्याचे उघड झाले.
मुंबई : मुंबईमधील भटक्या कुत्र्यांचे जानेवारी २०२४ मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दर १० वर्षांनी श्वानगणना करण्यात येते. यापूर्वी २०१४ मध्ये श्वानगणना करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या १० वर्षांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली की कमी झाली ते कळू शकणार आहे.
पिंपरी : चांद्रयानऐवजी चंद्रकांत असे विधान करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चूक झाल्याचे सांगत माफी मागितली. उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना चूक झाली नाही पाहिजे. पण, कामाच्या व्यापात चुकलो, असेही ते म्हणाले.
मुंबई : मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात पादचारी पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले असून मध्य रेल्वेने या कामासाठी शनिवारी मध्यरात्री १२.५० ते रविवारी पहाटे ५.५० पर्यंत पाच तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉककाळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर, काही मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावतील.
गडचिरोली : काही काळापासून गडचिरोली जिल्ह्यात वाघांचे हल्ले कमी झाले असले तरी वाघांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. परिणामी हे वाघ आता गावात प्रवेश करू लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. असाच एक व्हिडीओ सार्वत्रिक झाला असून यात दोन वाघ देसाईगंज तालुक्यातील कोकडी गावाच्या वेशीवरील पाणवठ्यावर पाणी पीत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रसंग एका भाजी विक्रेत्याने आपल्या मोबाईलमध्ये टिपला.
नवी मुंबईमध्ये डेंग्यूसारख्या साथीचे आजार बळावत आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये १४० डेंग्यू संशयित रुग्ण होते, यंदा मात्र २३ ऑगस्टपर्यंतच १३२ रुग्ण आढळे आहेत. ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. खासगी रुग्णालयात तापाने बेजार झालेल्या रुग्णांची रीघ लागली असून खासगीमध्ये डेंग्यू संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राष्ट्रवादीचे दोन प्रदेशाध्यक्ष आहेत, मग फूट नाही तर काय? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
“राष्ट्रवादी पक्षात फूट पडली नसून अजित पवार आमचेच नेते आहेत”, असं शरद पवार आज सकाळीच म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्याच्या राजकारणात आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या विधानावर अजित पवार काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष असताना अजित पवारांनी अवघ्या दोनच शब्दांत प्रकरण मिटवलं आहे.
नियोजनबध्दरित्या वसवलेल्या नवी मुंबई शहरात पामबीच मार्गावर दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न निर्माण अतिशय बिकट बनत चालला असून बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून वाशीपर्यंत पामबीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नसताना वाशी उपनगर लागताच रस्त्याच्या दुतर्फा पामबीच मार्गावर पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाफेडने थेट बाजार समितीत खरेदीला नकार दिल्याने शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी देवळा बाजार समितीत आंदोलन करून लिलाव बंद पाडले. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही नाफेड, एनसीसीएफने कांदा खरेदी न केल्याचा शेतकऱ्यांनी निषेध केला. सविस्तर वाचा…
कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्त्यावरील भाल गाव हद्दीत सरकारी जमिनींवर काही भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचे काम सुरू केले होते. या चाळींच्या बांधकामांसाठी माफियांनी या भागातील जुनाट झाडे तोडली होती. सविस्तर वाचा…
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील दोन किराणा मालकांकडून पोलिसांनी विना परवाना जवळ बाळगलेल्या ४२ औषधाच्या बाटल्यांचा साठा जप्त केला. आरोग्याला अपायकारक होईल अशी विनापरवाना औषधे बाळगल्याने पोलिसांनी दुकान मालका विरुध्द औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा…
"सकाळच्या शपथविधीनंतर अजित पवारांना संधी दिली होती. पुन्हा असं होणार नाही अशी भूमिका घेऊन त्यांना संधी देण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा संधी मागायची नसते आणि द्यायचीही नसते", असं शरद पवार म्हणाले आहेत.
“राज्यकर्ते शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची टिमकी वाजविण्यात आणि नंतर चांद्रयानाच्या यशाची पुंगी वाजविण्यात मग्न आहेत,” अशी टीका ठाकरे गटाने पक्षाचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात केली. तसेच तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा, अशा शब्दांत ठाकरे गटाने टीका केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ज्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला मुख्यमंत्री व्हावा अशी भावना असतेच. त्याला असं…”
“शरद पवारांना कायद्याच्या लढाईत अडकायचं नाहीये. शरद पवार म्हणतात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पण…”
“अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
Marathi Breaking News Live : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर