Maharashtra News Live Update: मुंबई, ठाण्यासह १४ महानगरपालिका आणि २०० नगरपालिकांची निवडणूक तसंच वाढलेली उष्णता, वीजेचा प्रश्न आणि सुप्रीम कोर्टाने राजद्रोह कायद्याला दिलेला स्थगिती, शिवसेना आमदार लटके यांचं निधन असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जाहीर केली आहे, तर नरेंद्र मोदी ग्लोliveबल कोविड समिटमध्ये सहभागी होणार आहेत.
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates: राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट
राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलाताना विरोधकांकडून होणाऱ्या टीका, टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं आहे. “आज भारतामध्ये चुकीचे विचार पसरवले जात आहेत. त्यांनी लगतच्या देशांची परिस्थिती पहावी. केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये.” असं शरद पवारांनी बोलून दाखवलं.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह देशात उन्हाची दाहकता कमी झाली आहे. काल महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळल्या आहे. असं असताना आता भारतीय हवामानशास्त्र विभागानं मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी बातमी दिली आहे. वाचा सविस्तर बातमी
अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अकोला येथील एका किर्तनादरम्यान युट्यूबर्ससंदर्भात केलेलं वक्तव्यावरुन इंदुरीकर महाराज अडचणीत येण्याची शक्यता आहे.
देशात महागाईने सर्वसामान्य नागरिकांना जेरीस आणलं आहे. एप्रिलमध्ये महागाई दराने विक्रमी स्तर गाठला असून याबाबतची सरकारी आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर ७.७९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. हा आकडा मागील आठ वर्षातील सर्वाधिक आहे. सविस्तर बातमी
"भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे," असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांवर मोठं विधान केलं आहे. एहसान मनी यांनी म्हटलं की, "सध्या भाजपा सरकारकडून बीसीसीआय चालवली जात आहे. त्यामुळे दोन्ही देशात क्रिकेट सामना घ्यायचा असेल, तर आम्हीच त्यांच्या मागे का लागायचं. तेही पाकिस्तानात येऊ शकतात." सविस्तर बातमी
शरद पवारांनी जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवल्यानंतर त्यावरून भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपानं यावरून टीका केली असता त्याला आता काँग्रेसकडून सचिन सावंत यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
उत्तर प्रदेश सरकारने मदरशांबाबत एक नवीन आदेश जारी केला आहे. आजपासून राज्यातील मदरशांमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य करण्यात आलं आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सविस्तर बातमी
एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी आज औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, नेते वारीस पठाण यांची उपस्थिती होती. अकबरुद्दीन ओवेसी हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यावरून सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खेरे यांनी या ओवेसींच्या कृतीवर टीका केली आहे.
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी घेतलं औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन
अडीच हजार वर्षांपूर्वी सर्व बौद्ध होते. नंतर देशात हिंदू धर्म येऊन लोक हिंदू झाले. हिंदू-मुस्लिम असा तेढ निर्माण करू नका. देशातील मुसलमानही बाहेरून आलेले नाहीत. तेही आधी हिंदू आणि तत्पुर्वी बौद्ध होते, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून ६ कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सात पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. यामुळे ठाणे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्या प्रत्येक पोलिसाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर बातमीत...
देशाचा कारभार संविधानाने चालतो, त्यामुळे कोणी भोंगे काढण्याची, भोंगे वाजविण्याची विधाने करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. धर्माधर्मात तेढ निर्माण करू नये असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. संबंधित व्हिडीओ हा नेपाळमधील एका नाईट क्लबमधील असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला होता. संबंधित व्हिडीओवरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. पण राहुल गांधी हे नेपाळमध्ये मित्राच्या लग्नासाठी खासगी दौऱ्यावर गेले असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. संबंधित पार्टीचा वाद ताजा असताना आता भाजपानं आणखी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. सविस्तर बातमी
जवळपास साडेपाच महिने कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विस्कळीत झालेली एसटीची सेवा हळुहळू पूर्वपदावर आली आहे. रायगड जिल्ह्यात एसटीच्या १ हजार ६९८ फेऱ्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल थांबले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतात आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच लोक आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात, असंही नमूद केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जूनला औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. राज्यात सध्या मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांकडून टीका होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेतून विरोधकांना उत्तर देणार आहेत. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंचीही सभा पार पडली असल्याने यानिमित्तानेही निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजपाने या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सविस्तर बातमी
https://twitter.com/BJP4Mumbai/status/1524592703039676418?t=X7NqAtvdEzJesFEoRewLcg&s=19
मयत झालेल्या व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून त्याद्वारे अर्ज करत लघु पाटबंधारे विभागाच्या अंबरनाथ तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या कुशिवली धरणामध्ये भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला लाटणाऱ्या चौघांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनी वारसाचे बनावट कागदपत्र तयार केले होते. त्याद्वारे ४७ लाख २४ हजार ९४४ रूपये मिळवत शासनाची आणि मूळ जमीन वारसांची फसवणूक केली आहे. कुशवली धरणाच्या भूसंपादन प्रकरणात अशाच प्रकारे यापूर्वी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. चित्रपटाच्या या खास क्षणी अभिनेता सलमान खानही उपस्थित होता. यावेळी आनंद दिघे यांच्या रुपात प्रसाद ओकला पाहून सलमान अगदी थक्क झाला. तसेच प्रसादचं त्याने कौतुकसुद्धा केलं.
Photos : देवेंद्र फडणवीसांनी घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन; पाहा फोटो
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस श्री जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या ७५व्या वाढदिवनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी वाराणसीतील प्रसिद्ध अशा काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शंकरांच्या पिंडीला अभिषेक करून सहकाऱ्यांसमवेत दर्शन घेतले.
फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात सुनावणी झाली. या याचिकेत वर्षानुवर्षे बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्यात याव्यात आणि भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. वाचा नेमकं पुढे काय घडलं
Photos: नातवंडांच्या हट्टासाठी पुन्हा बोहल्यावर चढले राज्यातील माजी राज्यमंत्री
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत. ११ मे रोजी गुलाबराव गावंडे आणि त्यांच्या पत्नी आशा गावंडे यांच्या लग्नाचा ४१ वा वाढदिवस होता. नातवांच्या हट्टापायी लग्नाच्या वाढदिवशी गुलाबराव गावंडे पुन्हा एकदा बोहल्यावर चढले. अकोल्यातील फार्मसी महाविद्यालयात हा शाही विवाहसोहळा पार पडला.
“माझ्या राजकीय वाटचालीचा पहिलाच टप्पा असेल स्वराज्य संघटित करणं. आपली ताकद तिथे संघटित व्हायला हवी. मी सांगू इच्छितो की ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यात कुणीही वावगं समजू नये. माझी त्यासाठी तयारी देखील आहे. पण पहिल्या टप्प्यात आपण संघटित होणं गरजेचं आहे. स्वराज्य संघटित होण्यासाठी मे महिन्यातच माझा महाराष्ट्राचा दौरा आहे”, असं ते म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकीचं पत्र आल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत निवेदन दिलं. त्यानंतर नांदगावकरांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल, असा इशारा दिला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
भाजपाने बुधवारी (११ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत शरद पवारांवर सडकून टीका केली. या व्हिडीओत शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची एक कविता म्हटली होती. भाजपाच्या टीकेनंतर शरद पवार यांनी पुण्यात पुन्हा ती कविता वाचली आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलंय.
हरिद्वारमधील एका दांपत्याने आपला मुलगा आणि सूनेविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. यामागील कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. दांपत्याने आपला मुलगा आणि सून मूल जन्माला घालत नसल्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. जर मूल जन्माला घातलं नाही तर पाच कोटींची भरपाई द्यावी अशी या दांपत्याची मागणी आहे.
संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. “या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. यावर्षीची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे", असं ते म्हणाले. तसेच, त्यांनी 'स्वराज्य' या आपल्या नव्या संघटनेची देखील घोषणा केली आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचं दुबईमध्ये अकाली निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने लटके यांची प्राणज्योत मालवली. लटके यांच्या निधनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शोक व्यक्त केलाय. त्यांनी लटके हे लोकप्रिय लोकप्रितिनिधी होतो असा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिलीय.
शेअर बाजार उघडताच घसरणीला सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण दिसून आली. गुरूवारच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराची सुरुवात लाल चिन्हाने झाली. आणखी वाचण्यासाठी क्लिक करा
“काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एक वक्तव्य केलं की पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. वास्तविक नानांचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं. कारण नानाच मागे कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते तुम्हाला माहिती आहे. ते भाजपामध्ये होते. मग आता भाजपानं म्हणायचं का की पाठीत खंजीर खुपसून ते तिकडे गेले. हे तेवढ्यापुरतं हेडलाईन मिळवण्यासाठी पाठीत खंजीर खुपसणं वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल”, असं अजित पवार म्हणाले.
अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डयात गेली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात बीड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक टेकवाणी कुटुंबातील तीन भाऊ व एक तरूण असे चौघे जागीच ठार झाले.
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.