Maharashtra News Live Update: मुंबई, ठाण्यासह १४ महानगरपालिका आणि २०० नगरपालिकांची निवडणूक तसंच वाढलेली उष्णता, वीजेचा प्रश्न आणि सुप्रीम कोर्टाने राजद्रोह कायद्याला दिलेला स्थगिती, शिवसेना आमदार लटके यांचं निधन असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जाहीर केली आहे, तर नरेंद्र मोदी ग्लोliveबल कोविड समिटमध्ये सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates: राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट

11:33 (IST) 12 May 2022
यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघातात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू

यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या या अपघातात मृत पावलेले सर्वजण पुण्याचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वाहनाने ट्रकला धडक दिली.

10:56 (IST) 12 May 2022
उत्तर कोरियात आढळला करोनाचा पहिला रुग्ण; लॉकडाउनचा आदेश

उत्तर कोरियाने गुरुवारी अधिकृतपणे करोनाचा रुग्ण सापडल्याची माहिती दिली आहे. यानंतर देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, प्योंगयांगमध्ये करोनाचा उपप्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. ओमायक्रॉन जास्त संसर्गजन्य असल्याने उत्तर कोरियाने लॉकडाउन जाहीर केला आहे.

10:43 (IST) 12 May 2022
विश्लेषण : आता दहशत ‘टोमॅटो फ्लू’ची! लहान मुलांना वेगाने होतोय संसर्ग

तामिळनाडू सरकारने राज्याच्या सीमेवर आरोग्यविषयक देखरेख वाढवली आहे. केरळमध्ये ‘टोमॅटो फ्लू’च्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लगाल्याने तामिळनाडू सरकारने खबरदाराचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय. पण तामिळनाडू सरकारने धसका घेतलेला हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय याबद्दल डॉक्टरांचं काय म्हणणं आहे जाणून घ्या सविस्तर माहिती येथे क्लिक करुन

10:36 (IST) 12 May 2022
“वादग्रस्त विषय दूर ठेवा, नाहीतर श्रीलंकेत राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेले…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात उपस्थित होणाऱ्या वादग्रस्त विषयांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. देशात काही काळ वादग्रस्त विषय दूर ठेवावे लागतील, नाहीतर श्रीलंकेत राष्ट्रपती, पंतप्रधान पळून गेलेत ती स्थिती भारतात निर्माण होईल, असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिला.

10:20 (IST) 12 May 2022
पंतप्रधान मोदी ग्लोबल कोविड १९ परिषदेत करणार संबोधित

जगभरातील करोना व्हायरसचा धोका अद्याप संपलेला नाही. यासाठी अमेरिकेनं आज दुसऱ्या ग्लोबल कोविड-१९ शिखर परिषदेचे आयोजन केलं आहे. यामध्ये करोनाच्या आणि भविष्यातील आरोग्य आव्हानांना कसे तोंड द्यावे लागेल, यावर चर्चा होणार आहे. अधिक वाचण्यासाठी क्लिक करा

09:51 (IST) 12 May 2022
हार्बरवरील वातानुकूलित लोकल बंद

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकल सेवा १४ मेपासून बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गावर १६ फेऱ्या होत होत्या. हार्बरवर वातानुकूलित फेऱ्यांऐवजी विना वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येतील. हार्बरवरील वातानुकूलित फेऱ्या बंद करून त्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

09:46 (IST) 12 May 2022
विवाहित महिलेला नाही म्हणण्याचा अधिकार नाही – दिल्ली हायकोर्ट

वैवाहिक बलात्काराच्या गुन्हेगारीकरणाच्या मुद्द्यावर दिल्ली उच्च न्यायालयामधील न्यायमूर्तींमध्ये मतभेद दिसून आले. त्यामुळेच या प्रकरणी विभाजित निर्णय देताना, न्या. सी. हरी शंकर यांनी बलात्काराच्या गुन्ह्याची निश्चित करणाऱ्या कलम ३७५ बद्दल बोलताना, “देहविक्री करणाऱ्या महिलेला ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार कायद्याने दिलाय. मात्र लग्न झालेल्या महिलेला तो दिलेला नाही,” असं म्हटलंय.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

09:44 (IST) 12 May 2022
सामनामधून शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मागील काही दिवसांपासून पंजाबमध्ये सुरु असणाऱ्या घडामोडी आणि मुंबईमध्ये दाऊद इब्राहिमशी संबंधित ठिकाणांवर होणारी छापेमारी याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेनं केंद्रामधील मोदी सरकावर निशाणा साधलाय. पंजाबमध्ये खलिस्तानी आंदोलन पुन्हा डोकं वर काढू लागलं असल्याचा आरोप करतानाच याकडे केंद्राकडून दुर्लक्ष होत असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

09:42 (IST) 12 May 2022
जाती, धर्मामध्ये जाणीवपूर्वक विद्वेष निर्माण करण्याचा काही शक्तींचा डाव – शरद पवार

काही शक्तींचा देशात वेगळे वातावरण निर्माण करण्याचा, तसेच जाती-धर्मात विद्वेष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसून येतो आहे. मात्र, आम्हाला जाती, धर्मातील संघर्ष नको आहे. आम्हाला विकास हवा आहे. सततच्या वाढत्या महागाईतून सुटका हवी आहे. रोजगार हवा आहे. राज्य व देश प्रगत करण्यासाठी पूरक परिस्थिती हवी आहे. यासाठी धर्म, भाषिक एकता गरजेची आहे, असे मत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भोसरीत बोलताना व्यक्त केले.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

09:41 (IST) 12 May 2022
शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन

शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं दुबईमध्ये आकस्मिक निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने लटके यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी लटके हे सहकुटुंब दुबईला गेले होते तेव्हाच हा प्रकार घडला.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

09:40 (IST) 12 May 2022
नरेंद्र मोदींवरील पुस्तक राजकारणातील लोकांसाठी ‘गीता’ ठरेल – अमित शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणातील २० वर्षांच्या नेतृत्वाला समजून घेण्यासाठी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील तीन दशकांमधील संघर्षाचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत. नवी दिल्लीत बुधवारी Modi@20: Dreams Meeting Delivery या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.