Maharashtra News Live Update, 14 May: एकीकीडे महागाईमुळे सर्वसामान्याचे जगणे अवघड झालेले असताना, दुसरीकडे राजकीय घडामोडींनी देखील वातावरण तापलेलं आहे. हनुमान चालीसाच्या मुद्य्यावरून खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा या राणा दाम्पत्यामध्ये आणि शिवसेनेत सुरू झालेला वाद, मशिदीवरील भोंग्याच्या मुद्य्यावरून राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केली जात असलेली टीका तसेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाचं दर्शन घेऊन राज ठाकरेंवर साधलेला निशाणा. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता अन्य नवीन घडामोडी घडत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates
09:44 (IST) 14 May 2022
राज ठाकरे भूमिका बदलतात हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आलंय – जयंत पाटील

मशिदींवरील भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन ते खाली उतरवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. राज ठाकरेंनी मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवण्याची सूचना केल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सांगली येथे बोलत असताना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना राज ठाकरेंना टोला लगावला आहे. वाचा सविस्तर…

09:42 (IST) 14 May 2022
शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निखील भामरे या ट्विटर युजर विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

09:37 (IST) 14 May 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकऱेंच्या आजच्या सभेसाठी राज्यभरातून शिवसैनिक येणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत.

09:34 (IST) 14 May 2022
राणा दाम्पत्य दिल्लीतील हनुमान मंदिरात महाआरती करणार

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे राणा दाम्पत्य दिल्लीतील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. यासाठी ते आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह मंदिराकडे रवाना झाले आहेत. दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागातील हनुमान मंदिरात महाआरती केली जाणार आहे