MLA Disqualification Hearing : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर एका आठवड्याच्या आत सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कामाला लागले आहेत. आमदार अपात्रतेप्रकरणी आज (२५ सप्टेंबर) विधीमंडळात विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेतील. तर दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि कॅनडा वाद पेटू लागला आहे. खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्या प्रकरणावरून उभय देशांकडून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या किंवा तात्पुरत्या स्वरुपात प्रवास करणाऱ्या आपापल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दोन्ही देशांनी दिल्या आहेत

Live Updates

News Today : महाराष्ट्रासह देशभराती महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर

17:25 (IST) 25 Sep 2023
आमदार अपात्रतेप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं? शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले...

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी नुकतीच पार पडली. आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणीसाठी वेळापत्रक आखण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. संजय शिरसाट म्हणाले, आज पार पडलेल्या सुनावणीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी राखून ठेवला आहे. तसेच आमच्या गटाच्या वकिलांना काही पुरावे दाखल करायचे आहेत, त्यावर सुनावणी झाली पाहिजे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे. यासाठी आजचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.

17:17 (IST) 25 Sep 2023
पुण्यात भाविकांच्या सोयीसाठी लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहे; गरोदर महिलांना आरामासाठी तीन व्हॅनिटी व्हॅन

गरोदर महिलांना आरामासाठी तीन व्हॅनिटी व्हॅन स्वरूपात हिरकणी कक्ष, पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

17:16 (IST) 25 Sep 2023
“माथाडी कायद्यात बदल आवश्यक”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

राज्यातील अनेक उद्योग माथाडी कायद्यांमुळे शेजारील राज्यात जात आहे, त्यामुळे मूळ गाभ्याला हात न लावता त्यात अत्यावश्यक बदल आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

16:58 (IST) 25 Sep 2023
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास कोणी केला? शरद पवार की अजित पवार? दोन्ही गटाचे शहराध्यक्ष म्हणाले…

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास कोणी केला यावरून सध्या शहरात राजकारण रंगत आहे. गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. शहराचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्याचा दावा त्यांनी केला. यावरून राजकारण रंगल असून अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आपापल्या नेत्यांची नावे घेऊन शहराचा विकास केल्याचा दावा केला आहे.

सविस्तर वाचा...

16:57 (IST) 25 Sep 2023
कोल्हापूर भाजपमधील वाद शिगेला, जिल्ह्यातील नेत्यांसमोर कटुता मिटविण्याचे आव्हान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप अंतर्गत कलह आणखीनच वाढत चालला आहे. कोल्हापूर शहर, आजरा, चंदगड तालुक्यानंतर आता गडहिंग्लज, करवीर, शिरोळ या तालुक्यांसह कोल्हापुरातील मतभेद पुढे आले आहेत.

सविस्तर वाचा...

16:25 (IST) 25 Sep 2023
नाशिक : कुपोषण मुक्तीसाठी स्तनपान, पोषणावर भर, आरोग्य सेवक प्रशिक्षणासाठी ८९ जणांची निवड

एकूण २५९७ कुपोषित बालके आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मुंबई आयआयटीच्या सहकार्याने प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम राबविला जात आहे.

सविस्तर वाचा...

16:24 (IST) 25 Sep 2023
मुंबई : वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले हेल्मेट, आरोपीला अटक

आरोपीवर दंडात्मक कारवाई केली असता आरोपीला राग आला. त्याने हातातील हेल्मेट वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले

सविस्तर वाचा...

16:10 (IST) 25 Sep 2023
“फडणवीस, गडकरींच्या विकासाच्या पोकळ गप्पा अन् भाजपाचा भ्रष्ट कारभार उघड”, असे का म्हणाले नाना पटोले? वाचा…

नागपूर : एका दिवसाच्या पावसाने देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या विकासाच्या पोकळ गप्पा, बोगस दावे आणि भाजपाचा भ्रष्ट कारभार उघडा पडला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते आज नागपुरात बोलत होते.

सविस्तर वाचा...

15:53 (IST) 25 Sep 2023
उचकीने हैराण

एक काळ होता ज्या काळात ‘मला लागली कुणाची उचकी..’ हे गाणं फार प्रसिद्ध झालं होतं, आजही आपल्याला फार उचक्या लागू लागल्या की लगेच विचारतो, ‘कोण आठवण काढत आहे?’ खरंच काही नातं असेल का या समजुतीच्या पाठीमागे? आणि बऱ्याचदा ही उचकी कशी काय थांबते? याचे नेमके शास्त्रीय कारण काय? यासाठी प्रथम आपण ‘उचकी’ म्हणजे काय ते समजून घेऊ. सविस्तर वाचा…

15:52 (IST) 25 Sep 2023
समुपदेशन : माझं नशीबच फुटकं – तुम्हीही देता स्वत:ला दोष?

 “विमलबाईचं हे नेहमीचंच आहे, घरात सणवार असले, माझ्याकडं कुणी येणार असलं की हिची दांडी ठरलेली असते. सरला तर आठ दिवसांची सुट्टी घेऊन तिच्या गावाला गेली आहे, घरात दोन बायका कामाला ठेवल्या आहेत, पण माझ्या मदतीला कुणीही नाही.

सविस्तर वाचा…

15:50 (IST) 25 Sep 2023
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग; महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांकडून स्वच्छता मोहीम

पाच दिवसाचे विसर्जन पार पडल्यानंतर गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा आदी किनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सविस्तर वाचा...

15:50 (IST) 25 Sep 2023
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या रात्री आठ विशेष लोकल

पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत आठ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला.

सविस्तर वाचा...

15:49 (IST) 25 Sep 2023
विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळावर एक निळी बॅग ठेवण्यात आली असून त्यात बॉम्ब असल्याचे सांगितले.

सविस्तर वाचा...

15:49 (IST) 25 Sep 2023
“देवेंद्र फडणवीस सत्तेच्या नशेत की सत्तेने भ्रष्ट?”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल; म्हणाले, “इतकी मस्ती…”

अकोला : ”देवेंद्र फडणवीस सत्तेच्या नशेत? सत्तेने भ्रष्ट की दोन्हीची इतकी मस्ती?”, असा सवाल करीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर खरमरीत टीका केली. याच मुजोर वृत्तीचा अकोला शिकार असल्याचेही ते म्हणाले.

सविस्तर वाचा...

15:48 (IST) 25 Sep 2023
माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने पती संतापला; सासूसह मेहुण्याची हत्या करून स्वत:ही केली आत्महत्या

माहेरी गेलेली पत्‍नी नांदण्‍यासाठी परत येत नसल्‍याने संतप्‍त झालेल्‍या जावयाने सासू आणि मेहुण्याची हत्‍या केली. त्‍यानंतर स्‍वत:ला जाळून घेत त्‍याने आत्‍महत्‍या केल्‍याची घटना वरूड तालुक्‍यातील वंडली येथे घडली. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

15:47 (IST) 25 Sep 2023
देखावे पाहण्यासाठी जळगावात जनसागर; गणेशोत्सवादरम्यान व्यावसायिकांनाही लाभ

रस्त्यांवरच ठाण मांडलेल्या विविध वस्तू व्यावसायिकांचीही चांदी होत असून, दिवसाला सुमारे दीड कोटींवर उलाढाल होत आहे. त्यात परराज्यांतील व्यावसायिकांचा सर्वाधिक समावेश आहे.

सविस्तर वाचा...

15:43 (IST) 25 Sep 2023
यवतमाळ : गणरायाच्या निरोपाचे वेळापत्रक तयार; अडीच हजार मंडळांकडून…

जिल्ह्यात गणेशोत्सव धडाक्यात सुरू आहे. दोन हजार ४६८ मंडळानी गणपतीची प्रतिष्ठापणा केली. दीड, अडीच दिवसांच्या घरगुती गणपतीस निरोप दिल्यानंतर आता सार्वजनिक मंडळांनी गणरायाच्या निरोपाची तयारी सुरू केली आहे. सविस्तर वाचा…

15:39 (IST) 25 Sep 2023
नवी मुंबई : दांडी मारलेल्या नेत्यांच्या विषयी नाराजी, एक दिड महिन्यांपूर्वी वेळ घेतली होती … माथाडी नेते नरेंद्र पाटील

२५ सप्टेंबरला माथाडी कामगार नेते स्व. अण्णासाहेब पाटील जयंती निमित्त नवी मुंबई एपीएमसी मध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याला राज्यातील प्रमुख नेते आवर्जून हजेरी लावतात. सविस्तर वाचा…

15:38 (IST) 25 Sep 2023
पनवेल महापालिकेच्या उपनगरांमध्ये कॉंक्रीटच्या रस्ते बांधणीचा श्रीगणेशा; ४२१ कोटींच्या निधीला सर्वसाधारण सभेत मंजूरी

पनवेल  पनवेल महापालिकेत नूकत्याच (शुक्रवारी) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शहर आणि उपनगरांमध्ये रस्ते बांधणी आणि कळंबोली येथील धारणतलावातील गाळ काढणे या धारणतलावामध्ये पंपहाऊस नव्याने कार्यान्वित करणे, धारण तलावाचे सुशोभिकरण करणे अशा विविध कामांसाठी ४२१ कोटी रुपयांच्या ठरावांना मंजूरी दिली आहे. सविस्तर वाचा…

15:01 (IST) 25 Sep 2023
"पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रात यात्रा काढली म्हणूनच त्यांच्यावर कारवाई झाली", बच्चू कडूंचं वक्तव्य

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाने दणका दिला आहे. रविवारी (२४ सप्टेंबर) जीएसटी विभागाने पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली असून सुमारे १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पंकजा मुंडे यांच्यावरील कारवाईनंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. “पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं मला वाटतं” असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.

14:29 (IST) 25 Sep 2023
अकोला : खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्यासाठी रेल्वे प्रशासन ‘अलर्ट मोड’वर, उपहारगृहांची कसून तपासणी; भुसावळ विभागात विशेष मोहीम

अकोला : स्वच्छ अन्न दिनानिमित्त भुसावळ विभागातील रेल्वेस्थानकांवर असलेल्या उपहारगृहांची आरोग्य निरीक्षकांकडून रविवारी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये खाद्यपदार्थांचा दर्जा राखल्या जावा म्हणून नमुने घेण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...

14:20 (IST) 25 Sep 2023
सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची अडचण होणार; पश्चिम व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना…

अकोला : दमरे व पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ न दिल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांची चांगलीच अडचण होणार आहे. विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सविस्तर वाचा...

14:19 (IST) 25 Sep 2023
चंद्रपूर जिल्ह्यातील २८३ उद्योग ‘रेड झोन’मध्ये, तर ७०८ ग्रीन अन् ३५४ ऑरेंज झोनमध्ये

चंद्रपूर : जिल्ह्यात एकूण १ हजार ३४५ उद्योग आहेत. यात ग्रीनझोनमध्ये ७०८, ऑरेंज झोन ३५४ तर रेड झोनमध्ये २८३ उद्योग आहेत. प्रदूषणाच्या व तापमानाच्या बाबतीत जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रदूषणात ज्या उद्योगाचा काहीही संबंध व भागीदारी नाही, अशा टाटा ग्रुपने १०० कोटी रुपये टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी उपलब्ध करून दिलेत. रेड झोनमधील कंपन्यांनी याबाबत मुल्यांकन करुन आत्मचिंतन करावे असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सविस्तर वाचा...

13:42 (IST) 25 Sep 2023
ई-पीक पाहणीनुसारच केळी उत्पादकांना विमा नुकसान भरपाई; मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

पात्र सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीच्या अहवालानुसार केळी विमा नुकसानभरपाई देण्याबाबत कृषिमंत्री मुंडे यांनी मान्य केले असल्याचे महाजन यांनी सांगितले

सविस्तर वाचा...

13:26 (IST) 25 Sep 2023
स्वातंत्र्य संग्रामात झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन

१९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या चिरनेर येथील मूळ स्मारकांच्या परिसरात पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.

सविस्तर वाचा...

13:16 (IST) 25 Sep 2023
..अन् चक्क जावयाने थाटला सासूसह संसार!

नागपूर : प्रेम हे प्रेम असतं. प्रेमात जात-पात, वय, नातं आणि सीमेचे बंधन नसतं. परंतु, सख्ख्या मुलीच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या सासूवर जावयाचा जीव जडला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सासूनेही मुलीच्या संसाराचा विचार न करता स्वतःच जावयासह नव्याने संसार थाटला. त्यामुळे पत्नीने पती आणि आईविरुद्ध भरोसा सेलमध्ये धाव घेतली.

सविस्तर वाचा...

13:16 (IST) 25 Sep 2023
गोंदिया : गणेशोत्सवावर चांद्रयानाची छाप; रॉकेट, विक्रम लॅडर अन् प्रज्ञान रोव्हरच्या प्रतिकृती ठरताहेत लक्षवेधी

गोंदिया : जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्येच उत्साहाचे वातावरण आहे. यंदा भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी केल्याने, या मोहिमेची छाप घरगुती गणेशोत्सवासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

13:16 (IST) 25 Sep 2023
पालकमंत्र्यांच्या पुत्रप्रेमापोटी भाजपला गटबाजीचे ग्रहण

सांगली : जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी राजकीय वारसदार म्हणून पुत्राला पुढे केल्याने मिरज विधानसभा मतदारसंघातील गटबाजीचे परिणाम पक्ष विस्तारावर होऊ लागल्याने सावध झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा कौटुंबिक वाद कुटुंबातच आणि सत्वर मिटवावा अन्यथा पक्षाला पर्याय शोधावा लागेल असा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा..

12:58 (IST) 25 Sep 2023
सावधान! तीन दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात ‘यलो अलर्ट’

आज विदर्भातील काही जिल्हे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

12:57 (IST) 25 Sep 2023
गुप्तधनाचा मोह अंगलट; व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक

पिशवीत सोन्याची नाणी आहेत. पिशवी लगेच उघडू नका, असे चोरट्यांनी व्यावसायिकाला सांगितले.

सविस्तर वाचा...

Supriya Sule

सुप्रिया सुळे

"फडणवीसांनी घरं आणि पक्ष फोडण्यात…”, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, जालन्यात जेव्हा महाराष्ट्रातल्या सुना, लेकी आणि लहान मुलांवर हल्ला झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस प्रचाराला गेले होते. नागपूरमध्ये ज्या घटना घडल्या त्यात मी म्हणेन की त्यांची गाडी अडवणं योग्य नाही, कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र त्याचवेळी मी असंही म्हणेन की देवेंद्र फडणवीस यांनी घरं फोडणं आणि पक्ष फोडण्यासाठी सगळा वेळ दिला नसता आणि विकासाला वेळ दिला असता तर ही वेळ आली नसती

Story img Loader