Maharashtra Breaking News Today, 09 June 2022: राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना एक दिवसाचा जामीन मिळणार की नाही याचा निर्णय विशेष न्यायालय आज देणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीबरोबरच विधान परिषदेसाठी भाजपा आणि अन्य पक्षांनी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याने भाजपा नेत्यांकडून पक्षाच्या निर्णयाचं समर्थन तर विरोधकांकडून गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली जात आहे. त्यातच काल औरंगाबादमध्ये पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्यासभेवरुनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
एकीकडे हा राजकीय आखाडा रंगलेला असतानाच दुसरीकडे आज क्रिकेटचाहत्यांचं लक्ष दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याकडे असेल. या मालिकेमधून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी नव्या-जुन्या खेळाडूंची चाचपणी भारताकडून केली जाणार असल्याने चाहत्यांबरोबरच क्रिकेट समीक्षकांचंही या मालिकेकडे विशेष लक्ष असेल. क्रिकेटच्या मैदानाबरोबरच राजकारणाच्या मैदानावर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने आज दिवसभरामध्ये या दोन्ही सामन्यांची चर्चा असण्याची चिन्हं दिसत आहेत.
राज्यात करोना संसर्ग पुन्हा झपाटय़ाने वाढत असून मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील दैनंदिन रूग्णवाढीबाबत सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त केली जात आहे. करोना रुग्णांची वाढती संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
माजी मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील कट्टर मुंडे समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मुकुंद गर्जे असं या पंकजा मुंडे समर्थकाचं नाव आहे. त्यांनी रोगर हे किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावलले जात असल्याचा आरोप या समर्थकाने केलाय.
सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) मार्फत दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक २०० विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही संख्या १०० ने वाढवून ३०० करण्याचा निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.
पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मनोरूग्णाच्या मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या चौकशीअंती सक्करदरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार, हवालदारासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सीआयडीचे पोलीस उपाअधीक्षक सुरेंद्र धुमाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. आरोपींमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजीत पांडूरंग सीद, पोलीस हवालदार कैलास दामोदर, मेहरास सर्फुद्दीन शेख, युसूफ हसन खान, अनवर हुसैन जिगरीभाई तसेच एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे. १६ ते १८ डिसेंबर २०१९ दरम्यान ही घटना सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडा ताजबाग परिसरात घडली होती.
OHE wire broken near Vashi station on Trans Harbor line. Trains are not running b/w Vashi -Sanpada stations on Trans Harbor line frm 7.15pm.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) June 9, 2022
Trains are running on Thane – Juinagar/Panvel & Harbour lines.
Staff,officers are attending the problem.Will inform you once restored.
हार्बर लाईनवरील वाशी स्टेशन येथे ओएचई वायर तुटली, लोकल वाहतूक विस्कळीत, दिवा स्थानकाचाही विद्युत पुरवठाही खंडीत
वाशिममध्ये इयत्ता बारावीत असणाऱ्या साक्षी बोरकर या मुलीच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी तिच्या वडिलांचे निधन झाले. अशावेळी घरात वडिलांचा मृत्यूदेह असतानाही साक्षीने परीक्षा केंद्र गाठून १२ वीची परीक्षा दिली. बुधवारी (८ जून) १२ वीचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये साक्षीने ९० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या उमेदवारांमध्ये नसल्याने मुंडे समर्थकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. औरंगाबादमध्ये मुंडे समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला. यानंतर त्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काय भूमिका घेतात याकडे अनेकांचं लक्ष आहे. अशातच पंकजा मुंडे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले शिवसेना नेते अर्जून खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाबाबत बोलणार असल्याचं वक्तव्य केलं. ते जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावाजवळ कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या ठिकाणी केवळ सांगाडा शिल्लक असल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर होतं. मात्र, अशा स्थितीतही जळगाव पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केला. यामुळे जळगाव पोलिसांचं कौतूक होत आहे.
भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होईल या महाविकासआघाडी सरकारच्या आरोपवर सडकून टीका केली. “घोडेबाजार होईल असं म्हणणं म्हणजे राज्यातील १२ कोटी लोकांचा अपमान आहे,” असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. तसेच ज्यांना घोडेबाजार होईल असं वाटतं त्यांच्या खिशात चणे फुटाणे असतीलच, कारण घोड्याला खायला लागतं,” असं म्हणत त्यांनी मविआ नेत्यांना टोला लगावला. ते गुरुवारी (९ जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक व माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी त्यांचा एक दिवसाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) या संदर्भात निर्णय देत मतदानासाठी जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ‘गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने रस्ते बांधणीचा एक नवा विक्रम केलाय. येथे क्लिक करुन पाहा खास फोटो.
Photos: अमरावती, अकोला ‘गिनेस बुक'मध्ये… ७२० जणांचं रात्रंदिवस काम, १०७ तास अन् जंगी सेलिब्रेशन; नितीन गडकरींनी केली घोषणाhttps://t.co/8yldhaInIQ
— LoksattaLive (@LoksattaLive) June 9, 2022
पाहा काही खास फोटो#nitingadkari #GuinnessWorldRecord #amravati #akola #GuinnessRecord #Guinnessbook
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे या दोन नावांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवरुन भाजपावर टीका केली आहे. वाचा सविस्तर…
लोकशाहीत घोडेबाजार होऊ न देणं या सगळ्या चौकटीत राहून काम करणं गरजेचं आहे, असेही जयंत पाटील म्हणाले

https://t.co/MQ8ynpHY2J
दुग्ध उद्योग क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह असणाऱ्या अमूल कंपनीने १ जूनपासून लागू करण्यात आलेला छोट्या आकाराच्या प्लास्टिक नळ्यांवर (स्ट्रॉवर) बंदी आणण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची विनंती केंद्र सरकारकडे केलीय. या निर्णयामुळे शेतकरी आणि दुग्धव्यवसायात असणाऱ्यांवर नकारात्कम परिणाम होईल असं कंपनीचं म्हणणं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
“हा निर्णय सरकारने पुढे ढकलला तर १० कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल”; पत्राद्वारे ‘अमूल’ची पंतप्रधान मोदींना विनंतीhttps://t.co/oPZHVndgRy

जाणून घ्या नेमकं प्रकरण आहे तरी काय…#amul #narendramodi #modi #dairy
दिल्ली पोलिसांनी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही चिथावणी भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने अलीकडेच नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांच्यासह अनेकांवर चिथावणी भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सध्या वाद सुरु असताना भारत आणि इराणमध्ये चर्चा झाली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन यांची बुधवारी भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. वादग्रस्त वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील अनेक देशांत असंतोषाचे वातावरण असताना ही भेट झाली असल्याने महत्त्वाची समजण्यात येत आहे.
या दौऱ्यात अब्दुल्लाहियन यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडेही वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला.
राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा एक दिवसाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायालयाने गुरुवारी या संदर्भात निर्णय देत मतदानासाठी जामीन देण्यास नकार दिला आहे. वाचा सविस्तर…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा काल औरंगाबादमध्ये पार पडली. या सभेतून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष भाजपावर जोरदार टीका केली. शिवाय, हिंदुत्वाच्या मुद्य्यावरूनही उद्धव ठाकरेंनी सुनावले. यावेळी त्यांनी भाजपाचे औरंगाबादमधील आमदार अतुल सावे यांचे वडील दिवंगत खासदार मोरेश्वर सावे हे औरंगाबादहून अयोध्येला शिवसैनिकांसह गेले होते याची आठवण करून दिली आणि आमदार अतुल सावेंनी हे फडणवीसांना सांगावे, असे म्हटले. यावर आज भाजपा आमदार अतुल सावे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती होती. वाचा सविस्तर बातमी…
भाजपाकडून विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने समर्थक नाराज झाले आहेत. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी भाजपाचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत या कार्यकर्त्यांना रोखलं. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Vidhan Parishad: पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून भाजपा कार्यालय फोडण्याचा प्रयत्न; सतत अन्याय होत असल्याची भावना https://t.co/UDIhWvadBn @BJP4India @BJP4Maharashtra @Pankajamunde Pankaja Munde #VidhanparishadElection2022 #VidhanParishad #विधानपरिषद

विधानपरिषद निवडणुनकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. जवळपास सर्वच पक्षांकडून आपल्या उमेदवारांचा अर्ज दाखल केला जात आहे. आज भाजपाने आपल्या अधिकृत पाच उमेदवारांपैकी एक असलेल्या उमा खापरे यांचा अर्ज दाखल केला, याचसोबत माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, ज्यास भाजपाने समर्थन दिले आहे. हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली. वाचा सविस्तर बातमी…
मुंबईतील दुचाकीस्वार आणि त्यांच्यासोबतच्या सहप्रवाशाला करण्यात आलेल्या हेल्मेटसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोकनाका येथे मुंबई पोलिसांकडून चालकांना अडविले जात आहे. अनेकांना आजपासून कारवाई होणार असल्याची माहिती नव्हती. त्यामुळे नेहमीप्रमाणे सहप्रवाशांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. पहिला दिवस असल्याने पोलिसांकडून प्रवाशांना हेल्मेट परिधान करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. या निर्णयावर चालकांकडून तीव्र नाराजी उमटत आहे.
विधानपरिषदेसाठी काल भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही, यावरून आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून याबाबत टिप्पणी केली, शिवाय माध्यमांशी बोलताना “कोणीतरी पडद्यामागून मुंडे-महाजन यांचं नाव राज्यातून किंवा देशाच्या राजकारणातून पूर्णपणे संपावं अशाप्रकारचे प्रयत्न करतय का? ही शंका आहे.”असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी…
इस्लाम आणि पवित्र ग्रंथ कुराणचा अपमान केल्याप्रकरणी तालिबानने एका प्रसिद्ध फॅशन मॉडेलला अटक केली आहे. अजमलसोबत त्याच्या तीन सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. अफगाणिस्तान सरकारने यासंबंधी व्हिडीओ प्रसिद्ध करत माहिती दिली. ट्विटरला पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओत अटक करण्यात आलेल्या अजमलच्या हातात बेड्या दिसत आहेत. तालिबानच्या गुप्तचर विभागाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) जवान महिलेसह दोघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोहगाव परिसरातील सीआयएसएफच्या वसाहतीत ही घटना घडली असून आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. येथे वाचा सविस्तर वृत्त.
पुणे: विमानतळाची सुरक्षा करणाऱ्या CISF पथकातील दोघांची एकाच वेळेस वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आत्महत्याhttps://t.co/GP6lrGAoad

एका महिलेचाही समावेश#Pune #CISF #PuneAirport #PuneCrime #CrimeNews #PunePolice
एकीकडे प्रदुषणामुळे गटारगंगा झालेल्या वालधुनी नदीच्या संवर्धनाचा विषय गेल्या आठ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना दुसरीकडे उल्हासनगर शहरात मात्र वालधुनी नदीपात्रात अतिक्रमणे सुरूच असून त्यासाठी झाडांचाही बळी घेतला जातो आहे. हे प्रकार गंभीर असून याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला देणार असल्याची माहिती वनशक्तीतर्फे देण्यात आली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय कुणीही अतिक्रमणाची हिंमत करणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचीही मागणी केली जाणार आहे.
उल्हासनगरमध्ये वालधुनीच्या नदीपात्रात अतिक्रमणं सुरुच, झाडांचीही कत्तल; वनशक्ती सुप्रीम कोर्टाला देणार माहिती https://t.co/a04CWts1xv Ulhasnagar

कल्याण शहरातील मुख्य वर्दळीच्या बैलबाजार ते शिवाजी चौक, लालचौकी दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे रस्तारूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. पावसाळ्यात ही कामे सुरू राहिली तर अभूतपूर्व वाहतूक कोंडी आणि प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या चार महिन्यात ही कामे थांबवा, असे पत्र ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांना पाठविले आहे. वाचा सविस्तर बातमी…
राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. १० जून रोजी म्हणजेच उद्या राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये सात उमेदवार असल्याने चुरस अधिक वाढली आहे. मागील २४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यसभेसाठी मतदान पार पडणार आहे. मात्र ही निवडणूक नेमकी कशी होते. ती इतर निवडणुकींपेक्षा वेगळी कशी असते?, मतं कशी मोजली जातात? मतदान आणि मतमोजणीचे नियम काय आहेत याबद्दल अनेकांना माहिती नसते. उद्याच्या मतदानाच्या निमित्ताने याच साऱ्या पैलूंवर टाकलेली नजर… येथे वाचा सविस्तर लेख.
विश्लेषण: केवळ अंक, विशेष पेन अन् एक चूक झाली तरी मत बाद…; नेमक्या कशापद्धतीने आमदार राज्यसभा निवडणुकीत करतात मतदान?https://t.co/wbSbDZ0yP7

सर्वसामान्य निवडणुकींमधील मतदानापेक्षा ही पद्धत फारच वेगळी असते.#RajyaSabhaElection2022 #RajyaSabhaElection #RajyaSabhaElections2022
दुचाकीवर बसून होणारी खरेदी तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलसमोर दुचाकी लावून होणारी खाद्यंती यापुढे वाहनचालकांना महागात पडणार आहे. रस्त्याच्या कडेचे विविध स्टॉल आणि रस्त्यावर बसणारे भाजी विक्रते यांच्यापुढे दुचाकी उभी केल्यास महापालिकेकडून दंड आकारला जाणार आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आता रस्त्यावर वाहन उभे करून खरेदी करणं पडणार महागातhttps://t.co/1RW1STC3FR

या मुद्द्यावर थेट आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय#Pune #PuneNews #PunePolice #PMT #पुणे
भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करत या सभेवरुन मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. या फोटोमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे काही लोकांना पैसे देत असल्याचे दिसत आहे. विराट सभेचा फॉर्म्युला? असे कॅप्शनही नितेश राणे यांनी या फोटोला दिले आहे. मात्र याबाबत आता चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वाचा सविस्तर…
नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करत या सभेवरुन मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे

https://t.co/sTkJ0oU79T
शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला असे म्हणत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे अभिनंदन केले आहे. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांबाबत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. वाचा सविस्तर…
कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणहून निघालेली अकोले आगारात जाणारी बस माळशेज घाटात येताच वाहकाने बस थांबवून थेट दरीत उडी घेतली. गणपत इडे असे या वाहकाचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस अधिक तपास करत आहेत.
माळशेज घाट येताच बस थांबवून वाहकाने थेट दरीत घेतली उडी; घटनेनंतर एकच खळबळ

कल्याणहून निघालेली अकोले आगारात जाणारी बस माळशेज घाटात येताच वाहकाने बस थांबवून थेट दरीत उडी घेतलीhttps://t.co/J8m9SdYW1x
पत्नीचे नातेवाईक वारंवार घरी वास्तव्यास येत असल्याने संतोष चौरसिया याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराच्या जवळ असलेल्या पडवीतच जाळून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संतोषला अटक केली आहे.
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर