Maharashtra Breaking News Today, 09 June 2022: राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना एक दिवसाचा जामीन मिळणार की नाही याचा निर्णय विशेष न्यायालय आज देणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीबरोबरच विधान परिषदेसाठी भाजपा आणि अन्य पक्षांनी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याने भाजपा नेत्यांकडून पक्षाच्या निर्णयाचं समर्थन तर विरोधकांकडून गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली जात आहे. त्यातच काल औरंगाबादमध्ये पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्यासभेवरुनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
एकीकडे हा राजकीय आखाडा रंगलेला असतानाच दुसरीकडे आज क्रिकेटचाहत्यांचं लक्ष दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याकडे असेल. या मालिकेमधून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी नव्या-जुन्या खेळाडूंची चाचपणी भारताकडून केली जाणार असल्याने चाहत्यांबरोबरच क्रिकेट समीक्षकांचंही या मालिकेकडे विशेष लक्ष असेल. क्रिकेटच्या मैदानाबरोबरच राजकारणाच्या मैदानावर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने आज दिवसभरामध्ये या दोन्ही सामन्यांची चर्चा असण्याची चिन्हं दिसत आहेत.
राज्यात करोना संसर्ग पुन्हा झपाटय़ाने वाढत असून मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील दैनंदिन रूग्णवाढीबाबत सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त केली जात आहे. करोना रुग्णांची वाढती संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल(बुधवार) औरंगाबादमध्ये जाहीरसभा झाली. या सभेच्या अगोदर आणि नंतरही विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका टिप्पणी केली गेली. यावर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं. वाचा सविस्तर बातमी…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. औरंगाबाद शिवसेनेच्या ३७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वाभिमान सभेत ते बोलत होते. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या सभेत ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपला लक्ष्य केले. भाजपाच्या प्रवक्त्यांमुळे जगात देशाची बदनामी झाली. दुसरीकडे, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था संकटात असून, लोक महागाईत होरपळत आहेत. त्यामुळे कुठे नेऊन ठेवणार देश माझा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरेंच्या सभेतनंतर विरोधकांकडून त्यांना उत्तर दिले जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेवर मनसेची टीका; म्हणाले "ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, फक्त लवंगीच्या…." https://t.co/Kz3mwIr2FV @SandeepDadarMNS @mnsadhikrut @OfficeofUT @ShivSena
— LoksattaLive (@LoksattaLive) June 9, 2022
भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की झालेली असून आखाती देशांनीही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या वादावर बॉलिवूडमधील खान मंडळींनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. यावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
बॉलिवूमधील खानमंडळींनी या वादावर बोललं पाहिजे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ते ज्या स्थितीत आहे तिथे सध्या मी नाही. पण मला वाटतं ते अशा स्थितीत आहेत जिथे त्यांच्याकडे गमावण्यासारखं फार आहे. त्यांना यामध्ये फार जोखीम पत्करावी लागू शकते”.
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी बॉलिवूडमधील खान शांत का? नसीरुद्दीन शाह म्हणाले "त्यांच्याकडे फार काही…" https://t.co/E43WKqg54C #NaseeruddinShah #NupurSharma #ProphetMuhammad

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात सांगलीमधील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. राज ठाकरेंना ११ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी २८ एप्रिल २००२ रोजी राज ठाकरे यांच्यासह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. याप्रकरणी ८ जूनला सुनावणी झाली असता राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे.
विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळामधून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. असं असतानाच राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना तिकीट नाकारणं हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं षड्यंत्र असल्याची टीका केलीय. बुधवारी विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा भाजपाने केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मिटकरी यांनी खोचक शब्दांमध्ये भाजपावर टीका केली. येथे वाचा सविस्तर वृत्त.
विधान परिषद निवडणूक : “पंकजा मुडेंचा पत्ता कट करणं हे फडणवीसांचं षड्यंत्र”https://t.co/0MZxzZ6ATO

भाजपाने पंकजा यांना डावलत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली.#BJP #VidhanParishad #pankajamunde #NCP
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. १० ग्रॅम २२ कॅरेट आणि १० ग्रॅम २४ कॅरेटची महाराष्ट्रातील आजची किंमत जाणून घ्या. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन व्हिडीओ पोस्ट करत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केलीय. ते नेमकं काय म्हणाले आहेत जाणून घ्या येथे क्लिक करुन.
Vidhan Parishad: "दोन, तीन दिवस मी जेवणार नाही…"; NCP चे अमोल मिटकरी 'या' दोन नेत्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजhttps://t.co/T5jUsJuSab

ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली नाराजी#NCP #VidhanParishad #AmolMitkari #BJP
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी नव्या-जुन्या खेळाडूंची चाचपणी भारताकडून केली जाणार आहे. भारतीय संघ गुरुवारी सलग १३ ट्वेन्टी-२० सामन्यांत विजयाचा विक्रम नोंदवण्यासाठी उत्सुक आहे. परंतु दुखापतीमुळे केएल राहुलने संपूर्ण मालिकेतून माघार घेतल्याने यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने कोण बाजी मारेल याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. भाजप व शिवसेनेने अपक्ष व छोट्या पक्षांच्या २९ आमदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. महाविकास आघाडी किंवा भाजपची मते फुटणार का, अपक्ष किंवा छोट्या पक्षांचे आमदार पाठिंबा दिलेल्या पक्षांबरोबर ठाम राहणार का, असे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. येथे वाचा सविस्तर लेख
लडाखनजिक सुरू असलेल्या चीनच्या कारवाया ‘डोळे उघडणाऱ्या’ असून, तो देश ज्या पायाभूत सुविधा उभारत आहेत त्यापैकी काही धोकादायक आहेत, असे अमेरिकेच्या एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना एक दिवसाचा जामीन मिळणार की नाही याचा निर्णय विशेष न्यायालय गुरुवारी देणार आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यावर शिवसेनेनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा यांना डावलत भाजपाने महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिलीय. याचसंदर्भात सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करताना शिवसेनेनं राजकीय ईर्षेने मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झाले आहे, असं म्हटलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त…
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर