Latest Marathi News LIVE Updates : राज्यात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच विदर्भात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट असणार असून बुधवार, गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.तसेच विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे तीन उमेदवार जाहीर केले आहेत, यानंतर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत आहे या पार्श्वभूमिवर राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया तसेच इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.
Maharashtra News Live Today, 17 March 2025 : महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षांवर आमदार संजय गायकवाडांची टीका
“औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत”, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. या विधानावरून आता महायुतीचे नेते आक्रमक झाले आहेत. शिंगे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळ हे निजामाची वैचारिक औलाद आहे, अशा शब्दांत टीका केली आहे.
औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची विश्व हिंदू परिषद आणि बगजरंग दलाची मागणी
छत्रपती संभाजीनगर जिल्हातील औरंगजेबाची कबर खोदून काढावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. यासाठी राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे खुलताबादेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेने कबर खोदण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिले आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद बगजरंग दल संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
कोल्हापूरात बजरंग दल आक्रमक, औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तोडली
कोल्हापूर येथे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची प्रतिक्रात्मक कबर तोडल्याची घटना समोर आली आहे.
रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केल्याबद्दल बोलताना म्हणाले की, मला वाटते की औरंगजेबासारख्या व्यक्तीशी कोणाचीही तुलना करणे हे योग्य नाही. कदाचित काँग्रेस अध्यक्षांनी जे म्हटले त्यावरून त्यांना काहीतरी वेगळेच म्हणायचे असेल. त्यांना म्हणायचे असेल की औरंगजेबाच्या काळात श्रीमंत लोकांचा विचार केला जात होता, सामान्य लोकांचा विचार केला जात नव्हता. या सरकारमध्ये त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत आणि या सरकारमध्येही सामान्य लोकांच्या प्रश्नाची चर्चा होताना दिसत नाही. येथे फक्त मोठे लोक आणि नेत्यांबद्दल आणि त्यांच्या हितांची चर्चा होते. त्यामुळे बोलातना त्यांनी ही तुलना केली असू शकते.
“महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी संभाजीनगरला जावं आणि…”, औरंगजेबाच्या कबरीबाबत संजय राऊतांचे वक्तव्य
"छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय शौर्य या देशाला आणि महाराष्ट्राला दाखवलं, त्याचं स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर... महाराष्ट्रावर हल्ला करण्याआधी, हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीने संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाटेला या असं आम्ही सांगतो," असे विधान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.