Maharashtra Political Crisis Live Updates in Marathi : राज्यातील सत्तासंघर्ष सुरु असून शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना सुरु आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून १ ऑगस्टला यासंबंधी सुनावणी होणार आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाकडून आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांकडून राहुल शेवाळेंची गटनेतेपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाला या याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे.
तेलंगणातील मेडीगट्टा धरणामुळे सिरोंच्या तालुक्यातील ५४ गावांना महापुराचा फटका बसला आहे. सोमनपल्ली गाव पुरामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. या गावातील २०६ कुटुंबांनी महामार्गावरील जंगलात ताडपत्रीच्या साहाय्याने तिथेच तंबू उभारून वास्तव्याला सुरुवात केली आहे. राज्यातील अशा विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर…
Maharashtra Latest News Today : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि विविध बातम्यांचे अपडेट एका क्लिकवर...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे शिवसेना पक्षवर्चस्वावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरु असताना दुसरीकडे शिंदेंनी या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डहाके यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचीही सदिच्छा भेट घेतली. मनोहर जोशी यांना भेटून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या भेटसत्राचे नेमके सांगितले आहे. या भेटींमागे कोणताही राजकीय होतू नाही. ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद मिळावेत याच उद्देशाने मी मनोहर जेशी यांची भेट घेतली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर
शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला असून शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद काय? निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा काय परीणाम होणार? तसेच निवडणूक आयोग कोणत्या आधारावर हा निर्णय घेणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. वाचा सविस्तर
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर येथे घडली. हवालदार सुनील नारायण शिंदे (वय ५०, रा. गल्ली क्र. एक गणराजपार्क, कवडी माळवाडी कदमवस्ती ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पत्नीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणातून मित्राच्या साथीने दोघांनी एका व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आखाड पार्टी साजरी करण्यासाठी बोलावून वादावादीतून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तरतालिकेसंदर्भातील याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट) फेटाळण्यात आल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले.
जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या धुडेशिवणी जंगल परिसरात खुशाल निकुरे (६०) या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. व्याघ्र हल्ल्यातील मृत्यूची ४८ तासातील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केला असला तरी पूरग्रस्त भागाचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून काम करणे, मंत्रिमंडळ गठित करून ३७ जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देणे, त्यांना जिल्ह्यात ठाण मांडून बसायला सांगायला हवे.
जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरांपाठोपाठ आता मिरा-भाईंदर, नवी मुंबई, अंबरनाथ आणि ग्रामीण भागात स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ६६ रुग्णांपैकी ४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. राज्यातील ९१ नगरापालिकांच्या निवणडणुका ओबीसी आरक्षणाविनाच घेण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालायाने दिले. त्यानंतर भुजबळ यांनी ही मागणी केली.
आज मुंबई येते फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या तथा प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोबवली. त्यांना पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले आहे. ठाकरेंनी ही घोषणा सर्वांसमोरच केली आहे. वाचा सविस्तर
शीळ, मुंब्रा तसेच कळवा भागातील तीस हजारहून अधिक ग्राहकांचा वीज वापर कमी असल्याची नोंद गेल्या महिनाभरापासून होत असून अशा संशयास्पद विद्युत मीटरची तपासणी टोरेंट कंपनीच्या पथकाने सुरु केली आहे. या तपासणीदरम्यान मुंब्रा येथील कौसा भागातील मलिक रेसिडेन्सी या आलिशान इमारतीत १७ विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी होत असल्याचे पथकाला आढळून आले आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकांवर वीज कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर बातमी...
घरगुती सिलिंडरमधील ‘एलपीजी’ अवैधरित्या चारचाकी वाहनांमध्ये वापरण्याचा प्रकार नागपूर शहरात सर्रासपणे सुरू असून याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. यामुळे अपघात होऊन प्राणहानी होण्याची भीती आहे. वाचा सविस्तर बातमी...
दीप अमावास्येच्या निमित्ताने कल्याण मधील बालक मंदिर शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक कलाकुसरी करून विद्यार्थ्यांनी जुन्या जमान्यातील, नवीन दिव्यांची आरास करून दीप प्रज्वलित केले होते. आकर्षक मनोहरी दृश्य या उत्सवामुळे निर्माण झाले होते. मराठी, इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
शहरातील रस्ते, गटारांची सफाई करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न देणाऱ्या ठेकेदारी संस्थांवर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्यास संबंधित ठेकेदारांकडून प्रतिदिन २५ हजार रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे.
ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात बुधवारी रात्री गटारीनिमित्ताने मद्याच्या पार्ट्या झोडून वाहने चालविणारे तळीराम आणि त्यांच्यासोबत असलेल्या सह प्रवाशी अशा एकूण ११४ जणांची पोलिसांनी झिंग उतरवली आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
कांदिवली पूर्व येथे आज (गुरुवार) २७ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला असून, महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलीस व्यक्त केला आहे. याप्रकरणी कुरार पोलीस अधिक तपास करीत आहेत. वाचा सविस्तर बातमी...
डेंग्यू, मलेरिया यासारख्या कीटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शहरात १ हजार २२८ डास उत्पत्ती स्थळे आढळून आली असून त्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.
शहरातील २८ लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये रहात असून एकूण अधिकृत झोपडपट्ट्यांची संख्या ३९० एवढी आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याचे नियोजित आहे. महापालिकेच्या २०२१-२२ या वर्षीच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून ही वस्तुस्थिती पुढे आली आहे.
कपाटाचे कुलूप दुरुस्त करण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी लोखंडी स्क्रू आणण्यासाठी मालकिणीला घराबाहेर पाठवून तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास करून गंडा घातला आहे. ताडीवाला रस्ता परिसरात मंगळवारी (२६ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने अलिशान बंगल्यात चोरी करणाऱ्याला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांनी निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम करत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढून आरक्षण निश्चित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांच्या सीबीआय संचालकपदी झालेल्या नियुक्तीला आव्हान देणारे प्रकरण ऐकण्यापासून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी (आज) गुरुवारी स्वतःला दूर ठेवले. याचिकाकर्त्याने आपल्याविरोधात सरन्यायाधीशांकडे तक्रार केल्याने आपण हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर बातमी...
ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांनी निवडणुकांसाठी प्रभाग रचना अंतिम करत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी सोडत काढून आरक्षण निश्चित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
इमारतींमधील अग्निसुरक्षा नियमांना अंतिम रूप देऊन त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणती पावले उचलली हे स्पष्ट करण्याचे आदेश साडेतीन महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. त्यानंतरही या नियमांची अंमलबजावणी कशी करावी याची शिफारस करणारी समिती स्थापन करण्यात आलेली नाही. यावरून उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राज्य सरकारला धारेवर धरले. सरकार ४०० अध्यादेश काढू शकते, पण अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करू शकत नाही?, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले. वाचा सविस्तर बातमी...
लोकसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी आमने-सामने आल्याने मोठा वाद झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसहित इतर महिला खासदारांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र यामुळे काही काळासाठी सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंबंधी केलेलं वादग्रस्त विधान या वादासाठी कारणीभूत ठरलं.
राज्यात सध्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सध्या दोन जणांचं अपंग मंत्रिमंडळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राज्याचंदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व प्रकारावर महामहीम राज्यपाल शांत का आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानतर्फे मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वाचा सविस्तर बातमी...
कल्याण पूर्वेतील नेतिवली ते मलंग गड १०० फुटी रुंद रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या वर्दळीच्या रस्त्यावर दररोज सकाळी, संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक होते.
अंबरनाथ आणि बदलापूर या अ वर्ग नगरपालिकांमध्ये अनुक्रमे १४ आणि १३ ओबीसी जागांची सोडत प्रक्रिया गुरूवारी पूर्ण झाली. यावेळी सर्वसाधारण महिला, ओबीसी महिला आणि ओबीसी सर्वसाधारण आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले.
एकीकडे स्वाईन फ्ल्यू चा धोका तर, दुसरीकडे वातावरण बदलामुळे साथीच्या आजारानेही डोके वर काढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.