Maharashtra Political Crisis Live Updates in Marathi : राज्यातील सत्तासंघर्ष सुरु असून शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना सुरु आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून १ ऑगस्टला यासंबंधी सुनावणी होणार आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाकडून आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांकडून राहुल शेवाळेंची गटनेतेपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाला या याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तेलंगणातील मेडीगट्टा धरणामुळे सिरोंच्या तालुक्यातील ५४ गावांना महापुराचा फटका बसला आहे. सोमनपल्ली गाव पुरामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. या गावातील २०६ कुटुंबांनी महामार्गावरील जंगलात ताडपत्रीच्या साहाय्याने तिथेच तंबू उभारून वास्तव्याला सुरुवात केली आहे. राज्यातील अशा विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra Latest News Today : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि विविध बातम्यांचे अपडेट एका क्लिकवर…

15:06 (IST) 28 Jul 2022
ओवळा-माजिवडा मतदारसंघात बनणार ५ फुटबॉल प्रशिक्षण केंद्र ; राज्य शासनाकडून निधी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत

ओवळा-माजिवडा मतदारसंघात ५ फुटबॉल प्रशिक्षण केंद्र उभारणीस राज्य शासनाने मान्यता दिली असून प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे ५ कोटी रूपयांचा निधी राज्य शासनाने ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग केला आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महापालिकेच्या माध्यमातून फुटबॉलचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सविस्तर वाचा

15:06 (IST) 28 Jul 2022
कडोंमपा संगणकीकरणाचा ऑनलाईन गोंधळ कायम ; मालमत्ता कर वसुलीवर परिणाम, करदाते, कर्मचारी त्रस्त

लोकांना तत्पर सेवा देता यावी या उद्देशातून तयार केलेली कल्याण डोंबिवली पालिकेतील संगणकीकरणाची ऑनलाईन सेवा उन्नत्तीकरणाच्या नावाखाली विस्कटून टाकण्यात आली आहे. पालिका अधिकाऱ्यां बरोबर करदाते नागरिक त्रस्त आहेत.उन्नत्तीकरणाच्या नावाखाली मार्च ते एप्रिल ही सेवा संथगतीने, कधी ठप्प पध्दतीने काम करत होती.

सविस्तर वाचा

15:05 (IST) 28 Jul 2022
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल ; बीएसयूपी योजनेत घर मिळवून देतो असे सांगून फसवणूक

राष्ट्रवादी कॉग्रेसचा पदाधिकारी सौरभ वर्तक याच्याविरोधात अडीच लाख रूपयांच्या फसवणूकी प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएसयूपी योजनेत घर मिळवून देतो असे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. सौरभ विरोधात यापूर्वीही फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वाचा

15:04 (IST) 28 Jul 2022
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील सरकता जिना बंद ; वारंवार जिना बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल

डोंबिवली आठवड्यातून दोन ते तीन वेळा बंद पडत असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील जिना सुस्थितीत चालू राहिल अशी कोणतीही व्यवस्था मध्य रेल्वे प्रशासनाकडून केली जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा

15:04 (IST) 28 Jul 2022
रस्ते अडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल ; उल्हासनगरात वाहनचालक, गॅरेज चालकांवर गुन्हे

रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून माल उतरवणे, गॅरेजमधील वाहनांची रस्त्यावर दुरूस्ती करणे आणि अवजड वाहने रस्त्यावर उभी करणे अशा विविध कारणांनी वाहतुकीसाठी महत्वाचे रस्ते अडवणाऱ्यांवर उल्हासनगर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

सविस्तर वाचा

15:03 (IST) 28 Jul 2022
रेती लिलाव शून्य प्रतिसाद ; रेती व्यावसायिकांना अधिकृत परवाना नकोच !

जानेवारी महिन्यात राज्य शासनाने रेतीचे शासकीय दर कमी केले होते. या कमी दरानुसार जिल्हा रेती गट विभागाने रेती लिलावाच्या नव्याने निविदा जाहीर केल्या होत्या. दर कमी झाल्याने व्यावसायिक यात सहभागी होतील अशी खात्री जिल्हा महसूल विभागाला होती. परंतु, रेती व्यावसायिकांनी याकडेही सपशेल पाठ फिरवली आहे.

सविस्तर वाचा

15:02 (IST) 28 Jul 2022
कल्याण पूर्व शहरप्रमुखपदी शरद पाटील

कल्याण पूर्वेतील ज्येष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक शरद पाटील यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुख पदी निवड केली. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शरद पाटील यांची ओळख आहे.

सविस्तर वाचा

15:02 (IST) 28 Jul 2022
कल्याण : महावितरणची वीज देयक भरणा केंद्रे शनिवार, रविवार सुरू

महावितरणच्या वीज ग्राहकांना वीज देयकाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी जुलै अखेर शनिवारी, रविवारी (३० व ३१ जुलै) वीज देयक भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा

14:37 (IST) 28 Jul 2022
पुणे शहरात वाहने ३३ लाखांपुढे; नव्या वाहनांची भर कायम

पुणे शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याची वस्तुस्थिती महापालिकेच्या अहवालातून समोर आली आहे. जून महिन्याअखेरपर्यंत शहरात ३३ लाख २४ हजार ५८२ एवढी वाहनांची नोंद असून, वर्षभरात (२०२० ते २०२१) १ लाख ७० हजार ११५ एवढ्या नव्या वाहनांची नोंद झाली आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता माणशी एक वाहन असेच चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे. २०१९ ते २०२० या कालावधीत १ लाख ५० हजार ४८४ नव्या वाहनांची नोंद झाली होती. वाचा सविस्तर बातमी….

14:26 (IST) 28 Jul 2022
नागपूर : फेसबुकवरून मैत्रीकरून तरुणीचे लैंगिक शोषण; प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

फेसबुकवरून मैत्री करून तरूणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रियकर तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. हेमंत मनोहर मेश्राम (२८, शुभम कॉलनी, यवतमाळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे. वाचा सविस्तर बातमी…

14:15 (IST) 28 Jul 2022
पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे सुनील नारायण शिंदे या कर्मचाऱ्यानी लोणी काळभोर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर बातमी…

14:13 (IST) 28 Jul 2022
Monkeypox Cases Rise: सेक्स पार्टनर्सची संख्या कमी करा, मंकीपॉक्सला रोखण्यासाठी WHO चा सल्ला

करोनानंतर जगभरात सध्या मंकीपॉक्स आजाराने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने पुरुषांना मंकीपॉक्सची लागण होण्याचा धोका जास्त असून, सेक्स पार्टनरची संख्या कमी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटेनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी ही माहिती दिली आहे. नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

सविस्तर बातमी

14:05 (IST) 28 Jul 2022
अकोला : शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांना घरातूनच धक्का; बंधू संजय जाधव शिवसेनेतच!

एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झालेले बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना त्यांच्या घरातूनच मोठा धक्का बसला आहे. कारण, प्रतापराव जाधव यांचे धाकटे बंधू, मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गटनेता संजय जाधव यांनी आपण अजूनही मूळ शिवसेनेतच असल्याचे जाहीर केले आहे. प्रतापराव जाधव यांना बंडखोरीत घरातूनच साथ न मिळाल्याने राजकीय वर्तुळात हा मुद्दा चर्चेचा ठरत आहे. वाचा सविस्तर बातमी..

13:47 (IST) 28 Jul 2022
गोंदिया : नवेगावबांधजवळ भीषण कार अपघात; चार ठार, एक जखमी

गोंदियामधील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांधजवळ ग्राम खोबा येथे काल (बुधवार) रात्री ११.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाचा अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:35 (IST) 28 Jul 2022
दोन वर्षांनी भरणार वांद्रे येथील ‘माऊंट मेरी जत्रा’ ; ११ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आयोजन

गेल्या दोन वर्षांपासून करोना, टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे होऊ न शकलेल्या वांद्रे येथील माऊंट मेरी जत्रेचे यंदा ११ ते १८ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर सगळे सण, उत्सव निर्बंधमुक्त झाले असून उत्सवप्रेमींची लगबग सुरू झाली आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:42 (IST) 28 Jul 2022
महाराष्ट्र सदन प्रकरण : सार्वजनिक विभागाच्या तत्कालिन सचिवाला आरोप निश्चितीपासून तूर्त दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून आपल्यालाही दोषमुक्त करण्यात यावे या मागणीसाठी सार्वजनिक विभागाचे तत्कालिन सचिव आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर २५ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली असून खटल्याला गैरहजर राहण्यास त्यांना दिलेली मुभा आज (गुरुवारी) कायम ठेवली. तसेच देशपांडे यांना आरोप निश्चितीपासून दिलासा दिला. वाचा सविस्तर बातमी…

12:33 (IST) 28 Jul 2022
मंत्रीमंडळ विस्तारावरून फडणवीसांचे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद? अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले…

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला आहे. पण अद्याप या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या प्रार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केलं आहे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना यावेळी मंत्रीपद देऊ नये, असं अमित शाह किंवा केंद्रातील भाजपाच्या हायकमांडचं म्हणणं आहे, असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

सविस्तर बातमी

12:26 (IST) 28 Jul 2022
नागपूरच्या उमरेडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; नऊ आरोपींना अटक

एका १२ वर्षीय मुलीवर तब्बल ९ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उमरेडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणाना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १२ वर्षांची मुलीचे आई-वडिल शेतमजुर आहेत. वाचा सविस्तर बातमी…

12:18 (IST) 28 Jul 2022
एकनाथ शिंदेंच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरुन संजय राऊतांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. बहुतेक ते आपला मुक्काम दिल्लीत हलवतील असा टोला त्यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. हा त्यांचा सहावा दिल्ली दौरा होता. मात्र रात्री अचानक हा दौरा रद्द करण्यात आल्याने चर्चांना उधाण आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नसल्याने एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचं बोललं जात होतं.

सविस्तर बातमी

12:14 (IST) 28 Jul 2022
महाराष्ट्रात सत्तांतर होणार म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले “त्यांना स्वप्नातच…”

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल असं भाकीत वर्तवलं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांना स्वप्नातच राहू द्या असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर बातमी

12:13 (IST) 28 Jul 2022
मुंबईत स्वाईन फ्लूचा वेगाने प्रसार; आठवडाभरातच रुग्णसंख्येत सुमारे पाच पटीने वाढ

मुंबईत सध्या ‘एच१ एन१’ म्हणजेच स्वाईन फ्लूचा धोका वाढत असून आठ दिवसांतच रुग्णसंख्या सुमारे पाच पटीने वाढून ६२ वर पोहोचली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी अद्याप एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. वाचा सविस्तर बातमी…

11:45 (IST) 28 Jul 2022
मुख्यमंत्री शिंदेना भेटीसाठी दिल्लीतील श्रेष्ठींनी वेळ दिली नसावी, कारण… – अजित पवार

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार होते, परंतु त्यांना ज्यांना भेटायचे होते त्यांनी वेळ दिली नसावी. कारण, दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पाहायचा असतो.”, अशी टिप्पणी करून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा श्रेष्ठींकडे शिंदेंसाठी वेळ नाही, याकडे लक्ष वेधले. वाचा सविस्तर बातमी…

11:34 (IST) 28 Jul 2022
“महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल”, संजय राऊतांचं मोठं विधान

महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल असं भाकित शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील असा विश्वासही संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरुनही त्यांनी टीका केली आहे.

सविस्तर बातमी

11:18 (IST) 28 Jul 2022
पुणे : नदीपात्रात तरुणाचा खून; मध्यरात्री मित्रांसोबत केली आखाड पार्टी अन् पहाटे आढळला मृतदेह

नदीपात्रात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. बारक्या जोरी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो नवी पेठेत राहात होता. वाचा सविस्तर बातमी…

10:43 (IST) 28 Jul 2022
पुणे : झारखंडमधील चोरटे गजाआड; दीड कोटींचे मोबाइल संच जप्त

झारखंडमधील चोरट्यांच्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून दीड कोटी रुपयांचे महागडे १९७ मोबाइल संच, तीन लॅपटॅाप, सात आयपॅड असा एक कोटी ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाचा सविस्तर बातमी…

10:30 (IST) 28 Jul 2022
पुणे : रस्ते ठेकेदारांचा ‘प्रताप’; देखभाल-दुरुस्ती कालावधीतच झाली रस्त्यांची चाळण

रस्त्याची कामे केल्यानंतर त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्याच्या कालावधीतच चाळण झाल्याचा ‘प्रताप’ शहरातील रस्ते ठेकेदारांनी घडविला आहे. मात्र, पाच हजार खड्डे बुजविल्यानंतर महापालिकेला अखेर जाग आली असून, देखभाल-दुरुस्तीचे दायित्व असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात ११ ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी…

10:08 (IST) 28 Jul 2022
पुणे : नेहरू स्टेडियम मधील ढोल-ताशा पथकाच्या सरावाविरोधात पोलिसांत तक्रार

स्वारगेट परिसरातील नेहरू स्टेडियममध्ये सुरु असलेल्या ढोल-ताशा पथकाच्या सरावात आवाजाची मर्यादा पाळली जात नसल्याबाबत पुणे जिल्हा क्रिकेट संघटना आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेकडून स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या पथकाने सरावासाठी मैदानाच्या परिसरात अनधिकृत शेड उभारले असून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…

09:58 (IST) 28 Jul 2022
पुणे शहरासह जिल्ह्यात नवी ७८१ महा-ई-सेवा केंद्रे – जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

महसूल विभागाने ४० सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या असून अजून ५९ सेवा ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. सेवा पुरवण्यासाठी महा ई-सेवा केंद्रे महत्वाची असून सध्या १४३२ सेवा केंद्रे सुरू असून अजून आवश्यक ७८१ केंद्रांसाठी येत्या महिन्याभरात सर्व मंजुरी प्रक्रिया करुन सुरू करण्यात येतील, अशी घोषणा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. वाचा सविस्तर बातमी…

09:57 (IST) 28 Jul 2022
आरोग्य सेवेतील महिलांवर वेतनाबाबत जगभरातच अन्याय

आरोग्य क्षेत्रातील महिलांवर वेतन श्रेणीच्या बाबतीत जगभरातच अन्याय होत असल्याचे वास्तव आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेतर्फे समोर आले आहे. दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालानुसार इतर आर्थिक क्षेत्रांच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रात महिला आणि पुरुष यांच्या वेतनातील तफावत अधिक असून आरोग्य क्षेत्रातील महिलांना पुरुषांच्या तुलनेत २४ टक्के कमी वेतन मिळत असल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे. वाचा सविस्तर बातमी…

09:56 (IST) 28 Jul 2022
नागपूर : शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कर्करोग विभागाला उतरती कळा

मध्य भारतातील गरीब कर्करोगग्रस्तांच्या उपचाराचे प्रमुख केंद्र असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागाला उतरती कळा लागली आहे. येथील रुग्णांना लाईट्स देणारे बहुतांश यंत्र बंद आहेत.त्यात आता कोबाल्ट यंत्राची भर पडली. वाचा सविस्तर बातमी…

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स