Maharashtra Latest News Updates : राज्यात मान्सून पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळे राज्यात शेती कामांची लगबग सुरू आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्याही अपडेट्स येत आहेत. याशिवाय करोना काळानंतर आता शाळाही सुरू झाल्यात. त्यामुळे शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांची हजेरी दिसत आहे. युक्रेन व रशियातील संघर्ष, शेअर बाजारातील चढउतार अशा विविध घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट

13:25 (IST) 20 Jun 2022
‘भारत बंद’मुळे दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी; कित्येक किमी लांब गाड्यांच्या रांगा

केंद्र सरकारने सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध अद्यापही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर काही संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे असून दिल्लीत याचा फटका बसला आहे. दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस-वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

सविस्तर बातमी

12:45 (IST) 20 Jun 2022
साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत असतानाच दुचाकीसह उघड्या गटारात बुडाले

पावसामुळे साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत आलेलं दांपत्य खड्ड्यात दुचाकी गेल्याने बुडाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिथे उपस्थित लोकांनी धाव घेतल्याने सुदैवाने दांपत्याचा जीव वाचला. पण त्यांची दुचाकी मात्र या गटारात वाहून गेली. उत्तर प्रदेशातील अलिगडमधील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी असणारी ही व्यक्ती आपल्या पत्नीसोबत अलिगडमधील रुग्णालयात चालली होती.

सविस्तर बातमी

12:34 (IST) 20 Jun 2022
देशात विचारभिन्नतेचा नव्हे तर विचारशून्यतेचा प्रश्न – नितीन गडकरी

“सत्ताकारण म्हणजे केवळ राजकारण नाही. देशात विचारभिन्नतेचा प्रश्न नाही, असलाच तर तो विचारशून्यतेचा आहे.”, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून समाजहितासाठी एकत्र येण्याचा आदर्श महाराष्ट्राने या देशाला दिला आहे, असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर बातमी…

12:13 (IST) 20 Jun 2022
Covid 19 : दहा जिल्ह्यांमध्ये ६० वर्षांखालील वर्धक मात्रेचे शून्य लसीकरण

राज्यात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वर्धक मात्रेच्या लसीकरणावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात ६० वर्षांखालील नागरिकांसाठी वर्धक मात्रेचे लसीकरण सशुल्क आणि खासगी रुग्णालयांपुरतेच मर्यादित असल्यामुळे राज्यात गडचिरोली, गोंदिया, परभणीसह दहा जिल्हयांमध्ये या वयोगटात वर्धक मात्रेचे शून्य लसीकरण झाले आहे.

वाचा सविस्तर बातमी…

12:12 (IST) 20 Jun 2022
राज्यात मागील वर्षभरात ४ हजार ९६६ विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाचा मृत्यू

हेल्मेटचा वापर टाळल्यामुळे अपघातांत दुचाकीवरील चालक आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशाला प्राणास मुकावे लागल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे मुंबईत दुचाकी चालविणाऱ्याबरोबरच सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मात्र हेल्मेट परिधान न केल्याने अपघातांत मृत्यू झालेल्यांचे प्रमाण मुंबईच्या तुलनेत राज्यातील अन्य जिल्हात अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

वाचा सविस्तर बातमी…

11:44 (IST) 20 Jun 2022
“…तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

“विधान परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला, तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. भाजपाचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. अकोल्यात एका विवाह समारंभात आले असताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अकोला महापालिकेसह राज्यातील आगामी महापालिका निवडणूका लढणार असल्याचीही घोषणा केली.

सविस्तर बातमी…

11:18 (IST) 20 Jun 2022
करण जोहर होता बिष्णोई गँगच्या निशाण्यावर; आरोपी महाकालचा धक्कादायक खुलासा

सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमधील आरोपी सौरभ महाकालने धक्कादायक खुलासा केला आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्माता करण जोहर बिष्णोई गँगच्या निशाण्यावर होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. पोलीस यामध्ये किती तथ्य आहे याची पडताळणी करत आहेत. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “करण जोहरकडून पाच कोटी वसूल करण्याची योजना होती असा महाकालचा दावा आहे. पण तो पोलिसांची दिशाभूल करत असल्याचीही शक्यता आहे”.

सविस्तर बातमी

Maharashtra Live News Today

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर