Maharashtra Politics : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने सरकारला धारेवर धरत असताना सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनीही या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार बजरंग सोनावणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर यांनी हे प्रकरण लावून धरले असून भाजपाचे आमदा सुरेश धसही या प्रकरणी आक्रमक झाले आहे. दरम्यान या संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे महायुती सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद सोपवले आहे. अशात पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज पवार प्रथमच बीड दौऱ्यावर आहेत.

दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून, आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आमदार सुरेश धस यांनी नुकतेच मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे पाटील यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. येत्या काही काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अशात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरवल्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यासह विविध घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Live Updates
19:55 (IST) 30 Jan 2025

द्राक्ष बागायतदाराची व्यापाऱ्याकडून फसवणूक

नाशिक - चांदवड येथील द्राक्ष बागायतदाराची स्थानिक व्यापाऱ्यानेच दोन लाख ६२ हजार रुपयांना फसविले. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यात द्राक्ष काढणीवेळी शेतकऱ्यांची परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. स्थानिक व्यापाऱ्यांकडून सहसा फसवणूक होत नाही. परंतु, चांदवड येथे असा प्रकार घडला आहे. चांदवड तालुक्यातील भयाळे येथे सचिन आहेर यांची द्राक्षबाग आहे. चांदवड येथील संशयित व्यापारी भगवान रकिबे याने आहेर यांच्या द्राक्षबागेतील ३१ रुपये प्रतिकिलो असा भाव ठरवत १३३ क्विंटल द्राक्षमाल चार लाख १२ हजार रुपयांना खरेदी केला. त्यातील दीड लाख रुपये आरटीजीएसव्दारे दिले. उर्वरीत दोन लाख ६२ हजार रुपये देण्यात टाळाटाळ केली. पैसे न देता फरार झाला. याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात आहेर यांनी तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रकिबे यास ताब्यात घेतले आहे.

18:57 (IST) 30 Jan 2025

श्री मंगलमूर्तींच्या माघी रथयात्रेचे चिंचवड येथून मोरगावकडे प्रस्थान

श्री मोरया गोसावी महाराजांनी सुमारे ५२६ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही यात्रा अखंडपणे सुरू असून, यंदाही मोठ्या भक्तसमुदायाच्या उपस्थितीत तिचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

18:37 (IST) 30 Jan 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २ फेब्रुवारी रोजी परीक्षा होणारच, प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप खोटा – आयोगाच्या सचिव

४० लाख रुपये दिल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २ फेब्रुवारीला होणा-या परिक्षेची प्रश्नपत्रिका देतो असे सांगणारे फोन आल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला होता.

सविस्तर वाचा...

18:19 (IST) 30 Jan 2025

अभ्युदयनगर पुनर्विकास : विकासकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने निविदेला मुदतवाढ देण्याचे सत्र सुरूच

काळाचौकी येथील अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने ऑक्टोबर २०२४ मध्ये निविदा प्रसिद्ध केली. मात्र विकासकांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने निविदेला वारंवार मुदतवाढ देण्याची वेळ मुंबई मंडळावर ओढवली आहे. सविस्तर वाचा

18:18 (IST) 30 Jan 2025

चालत्या एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशाच्या मंगसूत्राची चोरी

एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चोराने खेचून पळ काढल्याची घटना बुधवारी सायंकाळी कुर्ला आणि घाटकोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अज्ञाच चोराविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सविस्तर वाचा

18:17 (IST) 30 Jan 2025

ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत; यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल

राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ राबविली असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाण्यातील बिल्डरांनीही घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहिण विशेष सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा

18:16 (IST) 30 Jan 2025

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी आणखी ५६ एकर जागा, कचराभूमी आणि जकात नाक्यांच्या जागांचा समावेश

मुलुंडमधील मिठागराची ५८.५ एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आली असून आता येथील आणखी ५६ एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी दिली जाणार आहे. ही जागा जून २०२५ पर्यंत धारावी पुनर्वसन प्रकल्पाला (डीआरपी) देण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा

18:15 (IST) 30 Jan 2025

ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड

टेमघर येथील पाणी पुरवठा केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने तेथे चारच पंप सुरू असून यामुळे शहराला ५० दशलक्षलीटर इतका कमी पाणी पुरवठा होत आहे. परिणामी, गुरूवारी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून दुरुस्तीनंतरही म्हणजेच रात्री वेळेत होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने केला जाणार आहे. सविस्तर वाचा

18:14 (IST) 30 Jan 2025

नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात आर्थिक संकट; आयआयटी मुंबईने सुचविल्या उपाययोजना

हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण आणि तीव्रता वाढत असल्याने भविष्यात भारतातील राज्यांना मोठ्या आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पूर व चक्रीवादळासारख्या संकटांमुळे आपत्ती निवारण योजनांवर सरकारचा बराचसा निधी खर्च होतो. सविस्तर वाचा

18:11 (IST) 30 Jan 2025

आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान दोन वेळा अचानक भेटी द्या, आरोग्य मंत्र्यांच्या आरोग्य विभागातील वरिष्ठांना सूचना

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीपासून महिन्यातून किमान दोन वेळा आरोग्य संस्थांना अचानक भेटी द्याव्यात, अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

सविस्तर वाचा...

18:11 (IST) 30 Jan 2025

Madhav Gadgil : ज्ञानातील विषमता दूर करण्याचे सामाजिक कार्यकर्त्यांपुढे आव्हान, डॉ. माधव गाडगीळ यांचे मत

खरे ज्ञान पोहोचवून ज्ञानातील विषमता दूर करण्याचे आव्हान देशातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पेलावे, असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा...

17:29 (IST) 30 Jan 2025

निवृत्त शिक्षकासह मुलाची ३० लाखांची फसवणूक; आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर

छत्रपती संभाजीनगर : स्टॉक एक्सचेंज कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त शिक्षकासह त्यांच्या मुलाची मिळून तीस लाख रुपयांची फसवणूक केली.

वाचा सविस्तर...

17:29 (IST) 30 Jan 2025

जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणातील समन्यायी पाणीवाटपाचे सूत्र बदलून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जर कोणी पळवून नेण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. ‘मेरी’ च्या संचालकांनी केलेली शिफारस राज्य सरकारने स्वीकारू नये असा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आला.

वाचा सविस्तर...

17:28 (IST) 30 Jan 2025

शिवकालीन शस्त्रे पाहताना आबालवृद्ध भारावले, कराडमधील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड : भारत इतिहास संशोधन मंडळाचे आजीव सदस्य असलेले वाळवा तालुक्यातील वाटेगावचे इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांच्या संग्रहातील शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनातील हे प्रदर्शन पाहताना आबालवृद्ध भारावून गेले.

वाचा सविस्तर...

17:27 (IST) 30 Jan 2025

डांबर चोरणारी आंतरराज्य टोळी मुद्देमालासह पकडली

कराड : सुर्ली (ता. कराड) येथे डांबर चोरी करणारी आंतरराज्य टोळी कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने पकडली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे चार टन डांबर व १५ लाख रुपये किमतीचा टँकर असा १७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

वाचा सविस्तर...

17:09 (IST) 30 Jan 2025

गरिबी निर्मूलनासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात चार टक्के निधीची गरज, ‘सीएचएचडीआर’ची जनअर्थसंकल्पाद्वारे मागणी

गरिबी, स्त्रियांवरील अत्याचार आणि कुपोषण यासंबंधी जनअर्थसंकल्पाद्वारे अभ्यासपूर्ण मागण्या करण्यात आलेल्या ‘सीएचएचडीआर’च्या जनअर्थसंकल्पाचे प्रकाशन झाले.

सविस्तर वाचा...

17:09 (IST) 30 Jan 2025

ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 

टेमघर येथील पाणी पुरवठा केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने तेथे चारच पंप सुरू असून यामुळे शहराला ५० दशलक्षलीटर इतका कमी पाणी पुरवठा होत आहे.

सविस्तर वाचा…

16:51 (IST) 30 Jan 2025

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची ३२ लाखांची फसवणूक

मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी मे महिन्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविण्यात आला होता.

सविस्तर वाचा...

16:40 (IST) 30 Jan 2025

Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!

सरकार अपयशी ठरत आहे. नागरिकांना किमान शुद्ध पाणीदेखील सरकार देऊ शकत नसेल तर ही मोठी खेदजनक बाब असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.

सविस्तर वाचा...

16:10 (IST) 30 Jan 2025

खासदार सुप्रिया सुळे घेणार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट, काय आहे कारण ?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा या घटनेची माहिती देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

15:42 (IST) 30 Jan 2025

धुळ्यातील संशयास्पद कॅफेंवर पोलीस महापालिका पथकांचे संयुक्त छापे

नाशिक : धुळे शहरातील देवपूर या शैक्षणिक व उच्चभ्रु समजल्या जाणार्‍या परिसरातील वेगवेगळ्या कॅफेंवर गुरुवारी पोलिसांनी छापे टाकून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. अल्पवयीन मुलामुलींना ताब्यात घेण्यात आले असून संबंधित कॅफे मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

सविस्तर वाचा...

15:05 (IST) 30 Jan 2025

पिंपरी : नळजोड तोडणीबाबतचे ‘एसएमएस’ फसवणुकीचे; महापालिकेने केले ‘हे’ आवाहन

शहरामध्ये ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे, अशा मालमत्तेचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे.

सविस्तर वाचा...

14:48 (IST) 30 Jan 2025

राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवेळी गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाऱ्या शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परीक्षेसंबंधीचे काम न करण्याबाबत घेतलेल्या निर्णयात बदल केला आहे.

सविस्तर वाचा....

14:47 (IST) 30 Jan 2025

काळ्या जादूची भीती घालून ज्येष्ठ महिलेची २९ लाखांची फसवणूक

पुणे : काळी जादू केल्याची भीती दाखवून एकाने बालेवाडी भागातील ज्येष्ठ महिलेची २८ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा....

14:45 (IST) 30 Jan 2025

पुणेकर झाले खूश, यंदा करवाढ नाही!

पुणे : पुणेकरांच्या मिळकत करात यंदाच्या वर्षी कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. यामुळे सलग नवव्या वर्षी पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत राज्यात सत्ताधारी असलेल्या मंडळींनी कोणतीही करवाढ न करण्याच्या सूचना महापालिकेला केल्याची चर्चा आहे.

सविस्तर वाचा...

14:45 (IST) 30 Jan 2025

अहमदनगरच्या नामांतराला आव्हान, उच्च न्यायालयाची केंद्रासह राज्य सरकारला नोटीस

अहमदनगरच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेबाबत औरंगाबाद न्यायालयाने अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून, युक्तिवाद सादर करण्यासाठी त्यांना चार आठवड्यांची मुदत दिली आहे. याबाबत बोलताना याचिकाकर्ते अर्शद शेख म्हणाले, "अहमदनगर नामांतराचा मुद्दा पूर्णपणे सदोष आहे, म्हणूनच आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. काल, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्काळ कारवाई केली आणि केंद्र, राज्य सरकार, अहमदनगर आणि महानगरपालिकेसह सर्व संबंधित विभागांना नोटिसा बजावल्या."

14:45 (IST) 30 Jan 2025

विद्यार्थ्यांसाठीच्या पोषण आहारात बदल; आता बारा पाककृती निश्चित

पुणे : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना त्रिस्तरीय आहार (‘थ्री कोर्स मील’) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्रिस्तरीय आहार देण्यात स्थानिक पातळीवर अडचणींमुळे त्यात बदल करून पोषण आहारासाठी बारा पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा...

14:38 (IST) 30 Jan 2025

विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन

वसई : वसई विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून पुढील २० वर्षात ही लोकसंख्या ५० लाखांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे प्रस्तावित विकास आराखड्यात या लोकसंख्येनुसार नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी विकास आराखड्याचे १० विभागात तयार करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

14:37 (IST) 30 Jan 2025

राजापुरातील कशेळी गाव राज्यातील पहिले ‘सोलर गाव’

राजापूर : राज्यामध्ये पहिले ‘सोलर गाव’ म्हणून राजापूर तालुक्यातील कशेळी गाव ओळखले जाणार आहे. संपुर्ण गाव सोलरने प्रकाशमय करण्यात येणार असून लवकर या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे या कशेळी गावचे नाव देशाच्या नकाशावर आणखी ठळक होणार आहे.

वाचा सविस्तर...

14:37 (IST) 30 Jan 2025

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी सहा आत्महत्या

पोलीस आयुक्तालयाच्याहद्दीत एकाच दिवशी सहा आत्महत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे.

सविस्तर वाचा...

Story img Loader