Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यात गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण तापलेले असताना, दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याआधीपासून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे विरोधकांच्या रडारवर आहेत. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. दुसऱ्या बाजूला ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं. या साहित्य संमेलनात काही राजकीय टीकाटिप्पण्या झाल्या. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना (शिंदे) नेत्या नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात शिवसेनेवर (ठाकरे) गंभीर आरोप केले. त्यावरही आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यासह राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा