Maharashtra Breaking News Updates : राज्यात गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण तापलेले असताना, दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याआधीपासून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे विरोधकांच्या रडारवर आहेत. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. दुसऱ्या बाजूला ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं. या साहित्य संमेलनात काही राजकीय टीकाटिप्पण्या झाल्या. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना (शिंदे) नेत्या नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात शिवसेनेवर (ठाकरे) गंभीर आरोप केले. त्यावरही आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यासह राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News Update Today, 24 February 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या
ही पावले हे संघराज्याच्या संकल्पनेला सुरुंग लावू शकतात…
दक्षिणेतील राज्यांच्या बाबतीत केंद्र सरकारच्या भूमिकेवर अनेकदा आक्षेप घेतले जातात. उत्तर आणि दक्षिण भारत यांच्यात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत पुष्कळच भिन्नता आढळते. या दोन्ही भागात इतिहास, भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक संस्कृती यांच्या प्रभावामुळे हे फरक निर्माण झाले आहेत. इथे या मुद्द्यांचा क्रमशः विचार करूया आणि त्याचा सध्याचा राजकीय परिस्थितीशी काय संबंध ते तपासून पाहूया.
अनधिकृत इमारती बांधल्या जाण्यापासून रोखण्यासाठी एवढे तरी कराच…
कल्याण – डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केली आहे.
मालगाडीच्या रुळाखाली ‘ती’ आली अन् बचावलीही..
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकात नेहमीप्रमाणे सकाळी दूर पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची लगबग सुरू असताना पलिकडे थांबलेली मालगाडी हळूहळू सुरू होऊन कलबुर्गी-वाडीच्या दिशेने हळूहळू वेग घेण्याच्या तयारीत असताना तेथे अचानकपणे मोठा आरडाओरडा सुरू झाला.
सविस्तर वाचा….
उत्सव मिरवणुकीत ध्वनिवर्धकांच्या समोर सक्तीने थांबविले अन् आला कायमचा बहिरेपणा
सोलापूर : नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक उत्सवाच्या मिरवणुकीत ध्वनिवर्धकांच्या भिंतींनी घरातील ८० वर्षांच्या वृद्ध आणि आजारी आईला त्रास होत असल्याने ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करा, अशी विनंती करणा-या एका व्यक्तीला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ध्वनिवर्धकांजवळच सक्तीने थांबवून ठेवले.
सोलापूर : बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
सोलापूर : बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात घडली. विनायक नागनाथ कुंभार (वय १८) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.
राज्यात आता दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धा : चंद्रशेखर बावनकुळे
नांदेड : येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाने अव्वल राहत जेतेपद पटकावले आहे. दुसरा क्रमांक यजमान छत्रपती संभाजी नगरला तर पुणे विभागाला तिसरा क्रमांक मिळाला.
“उबाठा गटाने पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिल्या” : संजय शिरसाट
संजय शिरसाट म्हणाले, “शिवसेना उबाठा गटाने विधानसभा निवडणुकीत ज्या ज्या लोकांना तिकीटं दिली त्यांना जाऊन विचारा की त्यांच्याकडून किती रुपये घेतले. मी माझ्या जिल्ह्याचं सांगतो. विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाने माझ्याविरोधात ज्याला उमेदवारी दिली होती तो पक्षात येऊन केवळ आठच दिवस झाले होते. तरी देखील उबाठा गटाने त्याला तिकीट दिलं. मग २५-३० वर्षांपासून जे लोक शिवसेनेत होते त्यांना तिकीट का दिलं नाही? आणि ज्याला त्यांनी तिकीट दिलं तो उमेदवार आज कुठे आहे माहिती आहे का?”
दिव्यातील बेकायदा बांधकामावरील कारवाई तूर्तास थांबवा, वनमंत्री गणेश नाईक यांचे ठाणे पालिकेला आदेश
कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना न्याय कसा देता येईल याचा विचार केला जाईल, असे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी जनता दरबारात व्यक्त केले. तसेच दिव्यातील ५४ इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा , असे आदेश त्यांनी यावेळी दिले आहे.
संगणक अभियंता मारहाण प्रकरण : गज्या मारणे टोळीला मोका
पुणे : कोथरूड संगणक अभियंता मारहाण प्रकरणात गज्या मारणे टोळीला मोका. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. जे कोणी कायदा हातात घेणार त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या श्रीपाल सबनीस यांची आता ब्राह्मण समाजावर टीका; म्हणाले, “नथुराम गोडसे…”
नथुराम गोडसे नीच आणि नालायक ब्राह्मण होता. त्यांने महात्मा गांधींमधील महात्म्याला ठार मारले. आजचे हिंदुत्ववादी त्याच नथुराम गोडसेचे पुतळे व मंदिरे उभारत आहेत. हे धर्माचे नसून धर्माच्या घातकपणाचे कार्य आहे, असे वक्तव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. सविस्तर वाचा…
मध्यप्रदेश पोलिसांवर नागपुरात जमावाचा हल्ला, कुख्यात गुंडाला अटक करताना…
मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात जवळपास २१ पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला गँगस्टर बंडू उर्फ अंकित पटेल हा वेश बदलून नागपूरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होता. सविस्तर वाचा…
कल्याण पूर्वेत वसार येथे बेकायदा चाळी उभारणाऱ्या चार जणांवर फौजदारी गुन्हे
कल्याण पूर्वेतील वसार गाव हद्दीतील डावलपाडा येथील पुंडलिक म्हात्रे शाळेच्या पाठीमागे बेकायदा चाळी उभारणाऱ्या चार बांधकामधारकांच्या विरुध्द कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून हिललाईन पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले.
पंकजा मुंडे महाकुंभमेळ्यात
#WATCH | Maharashtra Environment Minister Pankaja Gopinath Munde takes a holy dip at Triveni Sangam in UP's Prayagraj#Mahakumbh pic.twitter.com/1pXK5LNSTl
— ANI (@ANI) February 24, 2025
“जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर…”, वनमंत्री गणेश नाईक यांचे स्पष्टीकरण
ठाणे येथील खारकर आळी भागातील रघुवंशी हॉल मध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला. यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले.
‘त्या’ व्हिडिओमध्ये छेडछाड, दहावी परीक्षा केंद्रावरील ‘रील’बाबत शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी पहिला पेपर सोडवतांना चक्क रील बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला. समाज माध्यमावर ती चित्रफित मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. सविस्तर वाचा…
कल्याणमध्ये स्कायवाॅकवर भाजी विक्रेत्यावर दगडाने हल्ला करणाऱ्या दोन जणांना अटक
कल्याण पूर्व सिध्दार्थनगरमध्ये रेल्वे स्थानकाजवळील स्कायवाॅक परिसरात गुरुवारी पहाटे तीन वाजता दोन जणांनी एका भाजी विक्रेत्याबरोबर भांडण करून त्याच्यावर दगडाने हल्ला केला. याप्रकरणी भाजी विक्रेत्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
काँग्रेसला नागरिकांनीच दाखवला आरसा; जिल्हाध्यक्ष, खासदारांसमोर सुनावले खडेबोल
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे नेते मतदान यंत्र, वाढीव मतदान आणि पैसेवाटपाचे आरोप करून मोकळे झाले. आता नागरिकांनीच या पराभवामागील कारणे काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आणून दिली आहेत. सविस्तर वाचा…
भक्त अंधारात! संत गजानन महाराज देवस्थानाचे दागिने परस्पर विकले…
सार्वजनिक संस्था या विश्वस्त मंडळीच्या विश्वासावर चालतात. त्यांच्याकडे पाहून लोकं विविध स्वरूपात मदत करतात. पण हेच विश्वस्त घातकी निघाल्यास भक्तांनी काय करावे ? असा प्रश्न चर्चेत आला आहे. सविस्तर वाचा…
पत्नीचे अनैतिक संबंध; पतीने संपविले जीवन…
पती-पत्नीचा सुखी संसार सुरु असतानाच पत्नीच्या आयुष्यात प्रियकर आला. ती प्रियकराच्या एवढी प्रेमात गुंतली की ती विवाहित असल्याचेही विसरली. पती घरात असतानाही ती प्रियकराला घरी भेटायला बोलवायची. पतीने विरोध केल्यास प्रियकराच्या मदतीने पतीला मारहाण करीत होती. सविस्तर वाचा…
फलाटावरील निवारा काढल्याने डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांना उन्हाचे चटके
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते पाचच्या दरम्यान पादचारी पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी फलाटावरील छताच्या काही भागातील निवारे काढण्यात आले आहेत. सविस्तर वाचा…
वाहनांच्या वाढत्या संख्येने दिवा रेल्वे फाटक उघडे ठेवावे लागल्याने प्रवाशांचा खोळंबा
दिवा रेल्वे स्थानकाजवळील फाटकातून जाणाऱ्या वाहनांची संख्या रविवारी संध्याकाळी अचानक वाढली. ही वाहने दिवा पूर्व-पश्चिम भागात जात होती. दिवा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक उघडल्यानंतर दोन्ही बाजुची वाहने पुढे जाण्यासाठी चढाओढ करत होती.
अंबरनाथचे अग्नीशमन दल आणखी सक्षम होणार; सात नव्या वाहनांच्या खरेदीसाठी पालिकेने मागवल्या निविदा
वाढत्या शहराची अग्नीसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने नव्या सात वाहनांसाठी निविदा मागवल्या आहेत. दोन फायर वॉटर टेंड़र वाहने, दोन मल्टी पर्पस फायर टेंडर वाहने, एक वॉटर ब्राऊजर, दोन क्विक रिस्पोन्स वाहने अशी सात वाहने पालिका खरेदी करणार आहे. सविस्तर वाचा…
सलग खूनाच्या घटनांनी सांगली हादरली, महिलेसह दोघांची हत्या
विशेष पोलीस महानिरीक्षक सांगली दौऱ्यावर असतानाच महापालिका क्षेत्रात घातक हत्याराने खून करण्याचे प्रकार रविवारी रात्री घडले. एका घटनेत सांगलीतील आयर्विन पुलाजवळ विवाहित महिलेचा पतीने, तर दुसऱ्या घटनेत मिरजेतील कमानवेसमध्ये मोकातून सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचा खून झाला. सविस्तर वाचा…
बसमध्ये हरवलेली दहा लाखांच्या दागिन्यांची पिशवी प्रवासी महिलेला परत; करमाळ्यात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
नादुरुस्त एसटी बसेस, कमालीची अस्वच्छता आणि खराब रस्ते यामुळे सार्वत्रिक नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेल्या करमाळा एसटी बस आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभावना जागृत ठेवल्याची प्रचिती नुकतीच आली आहे. सविस्तर वाचा…
“ती बाई आर्थिक व्यवहाराशिवाय…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक पांडे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (शिंदे) नेत्या नील गोऱ्हे यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. पांडे म्हणाले, मी गेली अनेक वर्षे शिवसेनेत आहे. मी शहरप्रमुख, जिल्हाप्रमुखपदासह अनेक पदं भूषवली. मी उपमहापौर व महापौरपदही भूषवलं आहे. परंतु, या पदांसाठी उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून एक रुपया मागितला नाही. मात्र नीलम गोऱ्हे या कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत नेण्यासाठी देखील पैसे घ्यायच्या. आम्हाला त्या बाईची कीव येते. पैशांचा व्यवहार केल्याशिवाय ती बाई कुठल्याही कार्यकर्त्याला पुढे येऊ द्यायची नाही.
Sanjay Raut : “शरद पवार गप्प कसे राहू शकतात? त्यांनी…”, संमेलनातील नीलम गोऱ्हेंच्या विधानाप्रकरणी संजय राऊतांचा संताप!
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या असून खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे. तसंच, या प्रकरणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनीही निषेध व्यक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
“नीलम गोऱ्हे ५० लाख रुपये व मर्सिडीज कार देऊन…”, ठाकरे गटाचा पलटवार
नवी दिल्ली येथे ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं. साहित्य संमेलनाच्या ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेनेच्या (शिंदे) नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेवर (ठाकरे) मोठा आरोप केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज कार दिल्यावर एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. त्यावर ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केलं आहे की काय? सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी. त्याचबरोबर नीलम गोन्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच वार्ताहरांना सांगितल की “मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले आणि उषा तांबे यांना त्याआधी मी एक मर्सिडीज कार भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले. हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे.