Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यात गेल्या काही काळापासून राजकीय वातावरण तापलेले असताना, दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याआधीपासून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे विरोधकांच्या रडारवर आहेत. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. दुसऱ्या बाजूला ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच पार पडलं. या साहित्य संमेलनात काही राजकीय टीकाटिप्पण्या झाल्या. त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना (शिंदे) नेत्या नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात शिवसेनेवर (ठाकरे) गंभीर आरोप केले. त्यावरही आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यासह राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News Update Today, 24 February 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या
काँग्रेसचे विजय वडेट्टीवार वादग्रस्त असे नेमके ‘काय’ बोलले?
भाजपने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक साधू-संतामुळे जिंकली, असा दावा नरेंद्र महाराज यांनी केला आहे, याविषयीचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
नांदेड गोळीबारातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बब्बर खालसा इंटरनॅशनलचा अतिरेकी हरविंदरसिंघ ऊर्फ रिंदा संधू याच्या सांगण्यावरूनच हा गोळीबार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
दुबई येथे लवकरच ‘महाराष्ट्र सदन’! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणतात, “आखाती देशात…”
आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे शिवजयंती उत्सव सोहळा पार पडला.
मैत्रीपूर्ण लढती झाल्यास महायुतीचाच फायदा – हसन मुश्रीफ यांचा दावा
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढेल. ज्या ठिकाणी शक्य नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी, अखेरीस महापौर, नगराध्यक्ष महायुतीचेच होतील, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
परभणीत दुसर्यांदा अवयवदान; ग्रीन कॉरिडॉरद्वारे पाचही अवयव गरजूपर्यंत पोहोचले, प्रत्यारोपणही यशस्वी
‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’असे म्हणतात. जगाचा निरोप घेतल्यानंतरही अवयवदानाच्या प्रक्रियेत एका युवकाचे डोळे, दोन किडनी, हृदय, फुफ्फुस असे अवयव पाच गरजू रुग्णांच्या कामी आले.
सांगली : तीव्र उन्हाने बर्फगोळे विक्रेत्याचा रस्त्यावरच मृत्यू
गेल्या चार दिवसापासून दिवसेंदिवस किमान आणि कमाल तपमानात वाढ होत आहे.
आयुक्तालयाला चव्हाण यांचा स्पर्श, पण नांदेडमध्ये महायुती आमदारांचे मौन
विभागातील दुसरे महसूल आयुक्तालय नांदेड येथे स्थापण्याचा निर्णय अशोक चव्हाण यांनी जानेवारी २००९ मध्ये घेतला होता.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेता येणार घरबसल्या!
विविध सेवांचा लाभ आता शहरातील नागरिकांना घरबसल्या घेता येणार आहे.ॉ
मालवणमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान झिंदाबादच्या घोषणा; बांगलादेशी भंगार व्यवसायिकाची अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त
रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्या दरम्यान मालवण वायरी आडवन येथील एका मुस्लिम भंगार व्यावसायिक आणि त्याच्या कुटूंबियांने भारताच्या विरोधात घोषणा देतानाच पाकिस्तान झिंदाबाद , अफगाणिस्तान झिंदाबादचे नारे दिल्याची खळबळजनक घटना घडली.
घोडबंदर भागात बंद पडलेली क्रेन दुरुस्तीसाठी सहा तास
ठाणे : घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी आणलेली क्रेन अचानक बंद पडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी तब्बल सहा तास लागले. या घटनेमुळे परिसरातील वाहतुक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.
घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. सोमवारी पहाटे येथील नागला बंदर परिसरात ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर गर्डर उभारणीचे काम सुरू होते. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे क्रेन अचानक बंद पडली. ही क्रेन अवजड असल्याने मुंबईतील कुर्ला भागातून वाहन दुरुस्त करणाऱ्या अभियंत्याला बोलाविण्यात आले. अखेर दुपारी १२ वाजता येथील क्रेन दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर ही क्रेन रस्त्यामधून बाजूला करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. अनेक वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे कोंडीत भर पडली.
पालकांनो मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मिटला! नव्या संशोधनाची ही बातमी वाचाच….
आज मुली प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्वाच्या बळावर स्वत:चे नाव कमावत आहे. मुलींच्या या प्रगतीसोबतच असुरक्षितता यासारखे आव्हानही समाजापुढे निर्माण झाले.
नागपुरातील ‘या’ रुग्णालयात हाडांच्या ६६ टक्के शस्त्रक्रिया नि:शुल्क…
महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील उपचार झालेल्या रुग्णांची एकूण संख्या बघता सर्वाधिक शस्त्रक्रिया व उपचार अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णांवर झाल्याचीही माहिती आहे.
कोथरूड पुन्हा हादरले; शास्त्रीनगरमध्ये तरुणाचा खून, पिस्तुलातून गाेळीबार करुन तलवार, कोयत्याने वार
पुणे : वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर तलवारीने वार करुन खून केल्याची घटना कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात रविवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला.
‘कसब्याचे’ आमदार हेमंत रासने यांची मोठी घोषणा ! म्हणाले…
पुणे : कचरा मुक्त कसबा झाल्यानंतर आता फ्लेक्स मुक्त कसबा विधानसभा मतदार संघ करण्याचा संकल्प आमदार हेमंत रासने यांनी केला आहे. कसब्यात सार्वजनिक ठिकाणी कोणतेही बेकायदा फ्लेक्स लावणार नाही, अशी घोषणा आमदार रासने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
संगणक अभियंत्याला मारहाण प्रकरणात गज्या मारणेसह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई
पुणे : कोथरुडमध्ये संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना गज्या मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गज्या मारणेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यन्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले.
भ्रष्टाचार दडपण्यासाठी नीलम गोऱ्हेंनी २५ लाख मागितले, ‘या’ आमदारांच्या आरोपाने खळबळ
शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हेंचा निषेध नोंदवला असून अनेक नेत्यांनीही त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याची दिरंगाई, अडीच वर्षांपासून ६०३ पोलीस उपनिरीक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत
‘एमपीएससी’ जून २०२२ मध्ये पोलीस उपनिरीक्षकांच्या ६०३ पदांसाठी जाहिरात दिली होती. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२२ ला पूर्व परीक्षा झाली.
जिल्हा परिषदेच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात! सरकारच्या ‘या’ नव्या धोरणामुळे….
मुलांच्या शिक्षणाच्या हक्काचे केंद्र असणाऱ्या जि. प. शाळांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केसगळतीपाठोपाठ बुलढाण्यावर आता नवे संकट, आठ वर्षीय बालकाला…
राज्यात अनेक ठिकाणी प्रामुख्याने पुणे सारख्या महानगरात जीबीएस अर्थात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ चे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहे.
“धनंजय मुंडे व वाल्मिक कराडचे मैत्रीपूर्ण संबंध”, आठवलेंचं वक्तव्य; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मांडली भूमिका
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आठवले म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेईल. बीड प्रकरणातील सर्व आरोपी पकडले आहेत आणि त्यांच्यावर मकोका देखील लावण्यात आला आहे. नैतिक आधारित धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी अनेकांची मागणी आहे. याबाबत पक्षाने ठरवावं. धनंजय मुंडे व वालिमीक कराड यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि हे सत्य आहे.
नीलम ताई माझ्याकडे तुमची पूर्ण कुंडली, लवकरच भांडाफोड करणार – ठाकरे गटाचे नेते अशोक हरणावळ
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं, असं वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल केलं.
सविस्तर वाचा…
बेरोजगार हाताना ‘हा’ उपक्रम देणार काम, जाणून घ्या ‘ऑपरेशन प्रस्थान’बाबत…
यवतमाळ जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योगधंदे नसल्याने कमी वेळात अधिक पैसा कमवण्याच्या मोहात अनेक तरूण गुन्हेगारी क्षेत्रात वळत आहे.
युवकाच्या मृत्युमुळे धुळ्यातील काळापाणी गावात जमावाकडून घरांची तोडफोड
शिरपूर तालुक्यातील उमरदा येथील तरूणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने संतापलेल्या जमावाने शिरपूर तालुक्यातील काळापाणी येथे जाऊन ग्रामस्थांवर हल्ला केला. घरांची तोडफोड करत दागिने, धान्य व रोख रकमेसह सुमारे एक लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
युट्यूबर्स आशिष चंचलानी व रणवीर अलाहबादिया यांनी महाराष्ट्र सायबर सेलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या दोघांना त्यांचे जबाब नोंदवायचे आहेत. त्यानंतर सायबर सेलने त्यांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवले आहेत.
‘पूर्वप्राथमिक’च्या प्राथमिक पातळीवरच संभ्रम; बालवाडी नोंदणीची केवळ चर्चाच
पुणे : आकर्षक जाहिराती करून सध्या गल्लोगल्ली भरणाऱ्या खासगी पूर्वप्राथमिक शाळांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार कायदा आणणार असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, कायदा प्रत्यक्षात आलेला नसताना येत्या शैक्षणिक वर्षापासून खासगी शाळांना नोंदणी बंधनकारक करण्याची चर्चा सुरू झाल्यामुळे संभ्रम आणि अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
मुंबई : आरोग्य सेवेतील खाजगीकरणाला कामगार सेनेचा विरोध, अर्थसंकल्पातील घोषणेमुळे कामगारांमध्ये असुरक्षितता
मुंबई : परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक खाजगी भागीदारीचे (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) धोरण अवलंबण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबतची घोषणा आगामी अर्थसंकल्पात केली आहे. मात्र या धोरणाला शिवसेना (ठाकरे) प्रणित कामगार सेनेने विरोध दर्शवला आहे.
मुंबई : अश्लील छायाचित्राद्वारे तरुणीकडे खंडणीची मागणी, २८ वर्षीय आरोपीला अखेर अटक
मुंबई : अश्लील छायाचित्राद्वारे धमकावून २७ वर्षीय तरुणीकडे खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीला अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी अखेर अटक केली. आरोपीने पीडित मुलीच्या नातेवाईकाला छायाचित्र पाठवून तिची बदनामीही केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता मध्यवर्ती प्राणिगृह… राज्यातील ठरणार एकमेव विद्यापीठ
पुणे : संशोधनातील प्रयोगांमध्ये वापरण्यात येणारे ससे, उंदीर अशा प्राण्यांची पैदास करण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती प्राणिगृहाची निर्मिती करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. मध्यवर्ती प्राणिगृहाची सुविधा उभारणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्य विद्यापीठांमध्ये एकमेव विद्यापीठ ठरणार आहे.
मुंबई : महालक्ष्मीच्या धोबीघाटावर पालिकेच्या खर्चाने पीएनजी, प्रदूषण रोखण्यासाठी निर्णय
मुंबई : लाकडावरील भट्टया स्वच्छ इंधनावर रुपांतरित करण्यासाठी बेकरी उद्योगाला पालिका प्रशसानाने नोटीसा धाडल्या आहेत व कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र महालक्ष्मी येथील सुप्रसिद्ध धोबीघाटाला पालिकेच्या खर्चाने पीएनजी (पाईप नॅचरल गॅस)ची जोडणी देण्यात येणार आहे.
मंत्रिपद नाकारलेल्या नाराज अनिल पाटील यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी
जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अमळनेरमधील आमदार अनिल पाटील यांनी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही म्हणून, आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मंत्री असताना मिळालेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था नाकारली होती.