Mumbai Breaking News LIVE Updates: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी अधिक आक्रमकपणे अधिवेशनात सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ आता सरकारमधील दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News Update Today, 06 March 2025 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या बातम्या
ठाणे पालिकेत श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांची हसत-खेळत बैठक
ठाणे : कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि कळवा-मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचे चित्र गेले अनेक वर्षे दिसून येत असतानाच, बुधवारी मात्र वेगळे चित्र दिसून आले. ठाणे महापालिकेत बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी आमदार आव्हाड यांना निमंत्रण दिले आणि आव्हाडही बैठकीला आवर्जून उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या.
सविस्तर वाचा…
दोन बायका अन् फजिती ऐका! आते-मामे बहिणींशी बांधली लगीनगाठ; मग…
अकोला : एखाद्या ‘ड्रामेबाज’ चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. एका तरुणाने चक्क आते व मामे बहिणी असलेल्या दोन तरुणींशी गुपचुप लगीनगाठ बांधली. पहिल्या पत्नीला अंधारात ठेऊन पतीने दुसरीशी लग्न केले. नंतर अमरावती येथे गेलेल्या पहिल्या पत्नीला ‘व्हिडिओ कॉल’ करून आता येऊ नको, असे देखील नवरोबाने बजावले.
“अमरावतीत साडेचार हजार बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले”, किरीट सोमय्यांचा आरोप
अमरावती : अमरावतीत महापालिका क्षेत्रात सुमारे ४ हजार ५०० बांगलादेशी, रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाने जन्मदाखले दिल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गुरूवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला.किरीट सोमय्या यांनी आज येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहचून पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा केली. किरीट सोमय्या म्हणाले, मी आज ४६८ पानांचे पुरावे पोलिसांकडे सादर केले आहेत.
लोणारला येताहात? मग थोडे पुढे जा आणि पहा ‘खडकपूर्णा’मधील निसर्ग शिल्पे…
बुलढाणा : लोणार म्हटले की, पर्यटकासमोर केवळ आणि केवळ जगप्रसिद्ध खऱ्या पाण्याचे सरोवरच येते. पण इथे दैत्यसुदन मंदिर सारखी पुरातन अद्भुत मंदिरे आहेत, गोमूख धार, सीता न्हाणी भस्म टेकडी, हटकेश्वर, पाप हरेश्वर सारखी हेमाडपंथी मंदिरे आहेत. ही पुरातन कालीन स्थळे, धार्मिक, सांस्कृतिक वारसा आहे…
आदिवासी आश्रमशाळा ते अमेरिका…, डॉ. नितेश कास्देकर यांचा थक्क करणारा प्रवास
अमरावती : आदिवासी समाजातील डॉ. नितेश कास्देकर या मेळघाटच्या सुपूत्राचा अमेरिकेतील वैज्ञानिक म्हणून यशस्वी प्रवास सध्या चर्चेत आहे. मेळघाटातील चटवाबोड या लहानशा गावातून थेट अमेरिकेत पोहचलेल्या या संशोधक पुत्राचे गावाला कौतूक आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. नितेश यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला, पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उच्च शिक्षण घेत त्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात झेप घेतली.
डोंबिवलीतील ठाकुरवाडीत बेकायदा बांधकाम इमारतीचे बांधकाम भुईसपाट
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडीमध्ये एका विकासकाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता उभारलेले दोन माळ्याचे बेकायदा इमारतीचे बांधकाम ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी मंगळवारी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.
Rohit Pawar: रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसंवर हल्लाबोल
कुठे बैठका झाल्या ते बघा, सीडीआर बघा. यातून बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. ते पुरावा म्हणतात. त्यांच्या बंगल्यावर बैठक झाली याला पुरावा काय पाहिजे? सत्तेत असणारा एक आमदारच त्याबाबत बोलतोय. तुम्ही खोलात गेलात कुठे? आत्ता तर कुठे ते (मुंडे) मंत्रीपदावरून खाली आले आहेत. तुम्ही खोलात गेलात की इतर गोष्टी कळतील. एकदा बीडमध्ये गेल्यानंतर बघितलं तर अशा अनेक हत्या आहेत. तिथे एका कार्यकर्त्याचीही हत्या झालेली आहे. त्या खोलात जा. वेगळी चौकशी लावा. मग तुम्हाला खऱ्या गोष्टी समजतील. आत्ता चौकशीचा फोकसच त्यांच्यावर नव्हता – रोहित पवार
संदर्भ – देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडेंविरोधात पुरावे असते तर त्यांच्यावर कारवाई झाली असती अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यावर रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.
आनंदवार्ता! गर्दीच्या काळात रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा, वाचा नेमकी सुविधा काय?
अकोला : आगामी काळात उन्हाळ्याच्या सुट्या, लग्नसराई व सणासुदीच्या काळामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त गर्दीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला. विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येईल.
संतापजनक! विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, विकृत मुख्याध्यापक अटकेत…
गडचिरोली : राज्यात दररोज लैंगिक छाळाच्या गुन्ह्यांनी खळबळ उडत असताना गडचिरोलीत आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भामरागड तालुक्यातील एका आदिवासीबहुल गावातील शाळेत मुख्यधापकाने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे.
जखमी बिबट्याला जीवावर उदार होऊन जीवदान
नागपूर : राज्यातील कानाकोपऱ्यात बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. विदर्भात वाघांचा तर मुंबई, नाशिक या परिसरात बिबट्यानी धुमाकूळ घातलाय. म्हणूनच तिकडच्या राजकीय मंडळींकडून बिबट्याच्या नसबंदीची मागणी होत आहे. मात्र, अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. आता विदर्भातदेखील बिबट्यांची संख्या तेवढीच वाढली आहे. जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील जखमी झालेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनखात्याच्या चमुला यश आले.
सोने- चांदीच्या दरात मोठे बदल, तीनच दिवसांत…
नागपूर: सोने- चांदीचे दर स्थिर होण्याचे नाव घेत नाही. मध्यंतरी सोने- चांदीचे दर विक्रमी उंचीवर गेले होते. त्यानंतर दरात मोठी घसरण झाली. परंतु आता पून्हा सोने- चांदीच्या दरात सातत्याने मोठे बदल बघायला मिळत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. सोने- चांदीच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.
पुरणपोळी जाणिवेची तरुणांचा अनोखा उपक्रम…
ठाणे : संघ विचाराने प्रेरित होऊन प्रताप व्यायाम शाळा सेवा संस्था आणि अविरत थोडं सोशल यांच्या वतीने ‘एक पुरणपोळी जाणिवेची २०२५’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. होळीच्या दिवशी म्हणजे १३ मार्च रोजी संध्याकाळी ४ ते ८ यावेळेत पुरणपोळ्या संकलित केल्या जाणार आहेत.
बस वाहकाचा प्रामाणिकपणा; रोख व मूळ कागदपत्रे…
गोंदिया:- सध्याच्या काळात माणुसकी हरवत चालली व स्वार्थी पणाच्या समाजात प्रामाणिकपणा औषधाला मिळेनासा झाला आहे की काय ? आपले सख्खे अगदी जवळचे ही मतलबी झाले आहेत असे व्यवहारात बोलले जाते.
कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी दुमदूमले सात बस आगार, एसटी कामगार संघटनेची निदर्शने
बुलढाणा : वर्षानुवर्षे रखडलेल्या विविध प्रलंबीत मागण्याकडे राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ( महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना ) च्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने बुधवारी, पाच मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यात उत्साही प्रतिसाद मिळाला आहे .
‘एमएमआर’ क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण
कल्याण : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंंबईतील अधिकाऱ्यांना दिले.
समलैंगिक संबंधासाठी वृद्धाकडून बळजबरी, तरुणाने चाकूने भोसकले अन्…
नागपूर : शासकीय नोकरीतून निवृत्त झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला समलैंगिक संबंध ठेवण्याची सवय होती. त्यासाठी त्याने घराच्या काही अंतरावर सुरु असलेल्या एका युवकाला घरी बोलावले. त्याला खाऊ-पिऊ घालून समलैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिला. वृद्धाने त्याच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असता त्या युवकाने त्याच्यावर चाकूने हल्ला करीत ठार केले.
सविस्तर वाचा
खासदार सुनेत्रा पवारांची पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला सरप्राईज भेट; खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच..
पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट दिली. प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह तल्यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्याला स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करा, ठाकरे गटाची ठाणे पोलीस आयुक्तांकडे मागणी
ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत येत असलेल्या दिवा शहराची लोकसंख्या पाच लाखाच्या पुढे गेली असून येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिव्याला स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
डोंबिवलीतील नगरसेवकांच्या बेकायदा बांधकामाविरुध्द आझाद मैदानात बेमुदत उपोषण
कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील एक माजी नगरसेवक आणि एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाच्या मुलाने बनावट कागदपत्रांच्या आधारे जुनी डोंबिवली, ठाकुरवाडी भागात तीन ते चार बेकायदा इमारतींची उभारणी केली आहे. या बेकायदा इमारती उभारताना बनावट कागदपत्रे तयार करून या कागदपत्रांची सह दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्त नोंदणी करण्यात आली आहे.
कुणी आमदार पत्र देतो अन् नगरविकास मंत्री बंदी आणतात, सर्वोच्च न्यायालयाचेही ऐकत नाही; हायकोर्टाने आता…
नागपूर : दुकानांच्या लिलावाबाबत चिखलदऱ्याचा एक आमदार पत्र पाठवतो आणि तत्कालीन नगरविकास विभागाचे मंत्री काहीही कारण न देता बंदी आणतात, अशाप्रकारचे मौखिक ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वणीमधील दुकानांच्या लिलाव प्रकरणात ओढले.
एकनाथ शिंदेंच्या नगरविकास मंत्रालयात चाललंय काय? आता नियोजन विभाग बंद करण्याची वेळ…
नागपूर : महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याच्या अंतर्गत खुल्या भूखंडाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेणारा राज्याच्या नगरविकास मंत्रालयाचा नियोजन विभाग बंद करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विभागाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला.
कृषक भूखंडाच्या अकृषक रजिस्ट्रीने खळबळ; बांधकाम व्यावसायिक, अधिकारी व दलालांचा सहभाग
चंद्रपूर : महापालिकेने ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट नकार दिलेल्या कृषक भूखंडाची ‘रजिस्ट्री’ सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भूखंड खरेदी विक्री करणारे दलाल व या कार्यालयातील अधिकाऱ्यांची या प्रकरणात सक्रिय भूमिका आहे.
सविस्तर वाचा
रणरणत्या उन्हात ‘अग्नी’परीक्षा! विदर्भातील विद्यार्थ्यांना चटके सहन करत…
अमरावती : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी-२ चे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) जाहीर केले आहे. त्यानुसार ८ ते २५ एप्रिल या कालावधीत ही चाचणी होणार आहे.
राजकीय हेवेदावे विसरून सर्वपक्षीयांचा एल्गार, वाल्मीक कराडच्या फाशीसाठी बुलढाण्यातून थेट मुख्यमंत्र्यांना…
बुलढाणा: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध आणि या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी बुलढाणा येथे सर्वपक्षीयांचे वतीने निदर्शने करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना वरील मागणीचे निवेदन देण्यात आले.
शिवभोजन योजनाच उपाशीपोटी ? उपमुख्यमंत्री शिंदे हा ‘ मानबिंदू ‘ जपतील अशी आस
वर्धा :करोना काळाची एक आठवण म्हणजे शिवभोजन योजना. लॉक डाउन काळात ती सूरू झाली. गरजू गरिबास त्या काळात कमी दरात जेवण उपलब्ध करून देण्याचा हेतू त्यामागे होता. मात्र त्यास मिळत असलेला प्रतिसाद पाहून योजना आजही सूरू आहे. पण आता आचके देत आहे.
ठाण्यातील दुकानाला लागली आग, दुकानातील साहित्यासह परिसरातील तीन दुचाकी जळल्या
ठाणे येथील माजीवडा भागातील सिद्धार्थनगर परिसरातील एका इमारतीजवळ गुरुवारी पहाटे आग लागली. या आगीत एका दुकानातील सीसीटीव्ही, संगणक, इतर साहित्य तसेच परिसरातील तीन दुचाकी जळून नुकसान झाले.
टोळक्याचा डॉक्टरच्या घरात धुडगूस
नाशिक : तुमच्या खात्यात टाकलेले २० लाख रुपये कुठे आहेत, ते आम्हाला परत द्या, असे दरडावत सहा जणांच्या टोळक्याने डॉक्टरच्या घरात धुडगूस घातला. शहरातील कॉलेज रोडवरील येवलेकर मळा भागात ही घटना घडली. यावेळी टोळक्याने कुटुंबियांना धक्काबुक्की करुन डॉक्टरच्या भावास मारहाण केली.
खळबळजनक! अवैध रेती, खनिज वाहतुकीत महसूल मंत्र्यांपासून गृहमत्रांपर्यंत ‘देणे-घेणे’ ; सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर, जयंत पाटील यांनी…
भंडारा : मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेले रेती, मॅगनीज व गौण खनिज वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी असे पत्र या क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी तहसिलदार यांना पाठवले आहे.
डोंबिवलीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आठ लाखाची फसवणूक
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर गावमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाची आंबिवली मोहने येथील एका व्यक्ती आणि साथीदारांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आठ लाख ६७ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. नोकरी न लावता घेतलेले पैसेही इसमाने परत न केल्याने अखेर डोंबिवलीतील नागरिकाने संबंधितांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
कंपनीत नोकरी देताना महिलेकडे शरीर सुखाची मागणी, एमआयडीसीतील कंपनी मालका विरुध्द गुन्हा
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील सोनारपाडा भागात एका कंपनी मालकाने एका महिलेला आपल्या कंपनीत स्वीय साहाय्यक पदावर नेमणूक दिली. ही नेमणूक देताना कंपनी मालकाने महिलेला हे पद सांभाळत असताना आपणास माझ्या बरोबर शरीर संबंध ठेवावे लागतील, असे फोनवरून सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Maharashtra Live News Update Today, 06 March 2025 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या बातम्या