Mumbai Breaking News LIVE Updates: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी अधिक आक्रमकपणे अधिवेशनात सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ आता सरकारमधील दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News Update Today, 06 March 2025 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या बातम्या
डहाणू : गुजरात मधील समुद्रात मासेमारी बोटीवर काम करण्यासाठी गेलेल्या तलासरी तालुक्यातील झाई येथील चार खलाशी कामगारांचा बोट अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
खारेगावमध्ये उभे राहणार छोटेखानी नाट्यगृह
ठाणे : खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालिका प्रशासनाला बुधवारी बैठकीत दिले. छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.
सिंहस्थासाठी ३०० नवीन बस उपलब्ध करा, सीमा हिरे यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
नाशिक : विभागात सात वर्षात सुमारे ३०० बस कालबाह्य झाल्या असून सध्या केवळ ७५० बसेस कार्यरत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून सिंहस्थात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे लक्ष वेधत बसेसचा तुटवडा दूर करण्यासाठी नाशिकसाठी ३०० नवीन बस तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.
ठाण्यात उभे राहणार कन्व्हेंक्शन सेंटर, कन्व्हेंक्शन सेंटरमध्ये २६० मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात मोघरपाडा जवळ खाडी किनारी २६० मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारणीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय, कन्व्हेंक्शन सेंटर, शॉपिंग मॉल, कार्यालये आदीचा त्या क्षेत्रात विकास होणार आहे. प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य कसे होतील, यावर महापालिका मुख्यालयात महत्वाची बैठक पार पडली.
Suresh Dhas on Satish Bhosle: सुरेश धस म्हणतात, “सतीश भोसले मागे काय करतो मला कसं कळणार?”
सतीश भोसलेला मी ओळखतो. तो कधीकधी मला भेटायला येतो. पण मागे तो काय करतो हे मला कसं माहिती असणार? अशा लोकांवर १०० टक्के कारवाई झाली पाहिजे – सुरेश धस
लाडकी बहीण योजना : अपात्र बहिणींमुळे पात्र बहिणींची कोंडी; अनुदानाची प्रतिक्षाच…
अमरावती : अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या पात्रतेची व्यापक तपासणी आता जवळपास पूर्ण झाली असून सुमारे १० हजार ३०० महिला अपात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडील चारचाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करीत आहेत. त्या दहा हजारावर महिला लाभार्थींची पडताळणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील ६ लाख लाभार्थी महिलांचा फेब्रुवारीचा लाभ थांबला आहे.
काय सांगता! महिनाभराआधीच उभारली जाते होळी, महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणचा इतिहास काय?
अमरावती : श्री अंबादेवी मंदिरासमोरील होळीला सुमारे दोनशे वर्षांचा सांस्कृतिक वारसा आहे. ती नवसाची होळी म्हणून प्रसिद्ध आहे. अंबामातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक या होळीला मोठ्या भक्तिभावाने नारळाची ओटी बांधतात.
सोन्याच्या बदामापायी वडिलांनी केला मुलाचा दगडाने ठेचून खून
सोलापूर : नातवाचा सोन्याचा बदाम घेतल्यानंतर परत न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात वडिलांनी तरुण मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे घडली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयित हल्लेखोर वृद्धाला अटक करण्यात आली आहे.
शिक्षण संस्थांमध्ये लोकशाही पध्दतीने कारभार व्हावा, कृती समितीची मागणी
मालेगाव : अनेक लोकांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही शिक्षण संस्था विशिष्ट कुटुंबाच्या दावणीला बांधल्या गेल्याचा आरोप करत सभासद संख्या वाढवून या संस्थांमधील कारभार लोकशाही पद्धतीने सुरू व्हावा, म्हणून शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही केली जावी, अशी मागणी संस्था बचाव कृती समितीतर्फे करण्यात आली आहे.
Anjali Damania Ultmatum to Devendra Fadnavis: अंजली दमानियांचा देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
सुरेश धसांचा मारहाण करणारा कार्यकर्ता उद्या वाल्मिक कराड होणार आहे. सतीष भोसले कोण आहे? आजच्या आज त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. सतीश भोसले सुरेश धसांना बॉस म्हणतो. अंगावर भरगच्च सोनं घालून कसला धाक दाखवायचा आहे? देवेंद्र फडणवीसांना असा महाराष्ट्र नको असेल, तर त्यांनी अधिवेशनात या सतीश भोसलेवर निवेदन करायला हवं. नाहीतर मी अधिवेशनाच्या बाहेर येऊन आंदोलनाला बसेन. देवेंद्र फडणवीस जोपर्यंत निवेदन करणार नाहीत, तोपर्यंत मी तिथे बसून राहीन. आजचा दिवस मी वाट पाहीन, उद्यापासून मी अधिवेशनाबाहेर ठिय्या देऊन बसणार आहे. आता हे सगळे धंदे बास झाले. महाराष्ट्रात आता अशी दहशत नको – अंजली दमानिया
भय्याजी जोशींनी महाराष्ट्रात येऊन मराठी भाषेचा अपमान करण्याची गरज नाही. मी म्हणतो ते इतर प्रांतात जाऊन त्या भाषेविषयी असं बोलू शकतात का? माझं आव्हान आहे, चेन्नई, कलकत्ता, बंगळुरूत जा आणि तिथे त्या त्या प्रांताची भाषा चालणार नाही असं बोलून दाखवा. फक्त महाराष्ट्रात हिंमत कशी होते? कारण इथे लाचार आणि मिंध्यांचं सरकार आहे – संजय राऊत</p>
संदर्भ – भय्याजी जोशींनी मुंबईतील मराठी भाषेसंदर्भात केलेलं विधान चर्चेत आलं आहे. ” मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही”, असं भय्याजी जोशी म्हणाल्यावरून वाद निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Maharashtra Live News Update Today, 06 March 2025 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या बातम्या