Mumbai Breaking News LIVE Updates: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी अधिक आक्रमकपणे अधिवेशनात सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ आता सरकारमधील दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Update highlights Today, 06 March 2025 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या बातम्या
देशाच्या केंद्रबिंदू ‘झीरो माईल’ नागपूर महापालिकेकडे सोपवणार
नागपूर : भौगोलिकदृष्ट्या देशाचा केंद्रबिंदू असलेला नागपुरातील ऐतिहासिक ‘झीरो माईल’ चे सौंदर्यीकरण आणि विकास करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाच्या अधीन असलेली ही जागा नागपूर महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. अनूप कुमार यांनी गुरुवारी दिले.
मानवी देहाला आनंद देणारा ग्रंथ श्रीमत भागवत ग्रंथ आहे ; ह.भ. प पुरुषोत्तम महाराज पाटील
कर्जत: मानवी देहाला खऱ्या अर्थाने आनंद देणारा एकमेव ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद् भागवत ग्रंथ आहे असे प्रतिपादन राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार व भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांनी प्रतिपादन करताना सांगितले. कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे कै. शहाजीराव तनपुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्रीमद संगीत भागवत कथा याचे आयोजन दिनांक पाच मार्च ते 9 मार्च असे करण्यात आले आहे. या कथेचे पहिले पुष्प गुंफताना पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले की, जगात फक्त देव सत्य आहे. त्याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, आपण अंधारामध्ये पुस्तक वाचायला सुरुवात केली तर आपल्याला काहीही दिसणार नाही. त्यासाठी प्रकाशाची गरज आहे. या उलट भगवंत हा स्वतःच प्रकाशमान आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करण्याचे काम हे भगवंत करत असतो. आपण जर पाहिले ते रामायण मध्ये जीवन कसे जगावे याचे ज्ञान दिले आहे. परंतु श्रीमद् भागवत या ग्रंथामध्ये मानवी जीवनाला आनंद कसा देता येईल याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. यावेळी या ग्रंथाचे महत्त्व श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथे प्रथमच अशा पद्धतीने संगीत श्रीमद् भागवत व त्याचे निरूपण याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे दूरवरून भाविक हा सुंदर कार्यक्रम ऐकण्यासाठी आले होते. या कथेच्या निमित्ताने या परिसरामध्ये सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. कै. हनुमंतराव शहाजीराव तनपुरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा सर्व परिसर भक्तीमय वातावरणामध्ये नाहून निघाला आहे. रोज सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत या संगीत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषोत्तम महाराज पाटील हे आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जातात. अतिशय सुंदर आवाजामध्ये या ग्रंथाचे प्रत्येक ओवीचे विवेचन ते त्यांच्या गोड वाणी मधून करतात. यामुळे वातावरणामध्ये एक प्रसन्नता निर्माण होते. आणि पहिलीच पुष्पगुताना उपस्थित सर्व स्रोत यांनी याचा अनुभव घेतला.
स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी हरित कुंभ, अडीच हजार विजेत्यांना ६० लाखांची बक्षीसे
नाशिक : शहरात वाढणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न म्हणून महानगर पालिकेच्या वतीने हरित कुंभ उपक्रमाची आखणी केली आहे. या उपक्रमातंर्गत आठ ते १८ मार्च या कालावधीत विविध स्पर्धांंचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धा : कामगारांची एकजूट व जिद्द यशस्वी ठरली. देवळी येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एसएमडब्लू इस्पात कंपनीत चार दिवसापासून सूरू असलेला संप मिटला आहे.कंपनी व्यवस्थापन, जिल्हा कामगार अधिकारी व देवळी पोलीस ठाणेदार यांनी चर्चा केली. संपचे नेतृत्व करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांना विश्वासात घेण्यात आले.
नाशिक शहरात आगीच्या दोन घटना; बांधकाम साहित्याचे गोदाम खाक
नाशिक – शहरात गुरूवार हा आगीचा दिवस राहिला. सकाळी पोकार काॅलनीतील रोहित्राने पेट घेतला. तर म्हसरूळ परिसरातील बांधकाम साहित्य ठेवलेल्या गोदामाला दुपारी तीन वाजता आग लागली. म्हसरुळची आग आटोक्यात आणण्यासाठी चारपेक्षा अधिक बंब मागविण्यात आले होते. कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, लाखो रुपयांचे नुकसान झाले.
“संघ व भाजपाला मुंबई, मराठी भाषेबद्दल नेहमीच आकस,” भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून अतुल लोंढेंची टीका
नागपूर : अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा केंद्र सरकारने दिला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले. यामुळे मराठी भाषकांत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना राष्ट्रीय स्वयंसेवसक संघाचे पदाधिकारी भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मुख्यमंत्र्यांची महत्त्वकांक्षी घोषणा वादात, गडचिरोलीत खाणविरोधी आंदोलन पेटणार; जल, जंगल, जमीन…
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व नवी आणि जुन्या खाणी त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी ७० गावांच्या ग्रामसभांनी निर्णायक संघर्ष पुकारला आहे.सुरजागड परिसरातील दमकोंडी पाहाड (गर्देवाडा ग्रामपंचायत हद्द) येथे पारंपरिक निसर्ग पूजेच्या निमित्ताने हजारो आदिवासी, वननिवासी आणि ग्रामसभा प्रतिनिधींनी एकत्र येत संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला.
नाशिक जिल्हा शिवसेना ठाकरे गटात फेरबदल, सुधाकर बडगुजर यांना उपनेतेपदी बढती, जिल्हाप्रमुखपदी डी. जी. सूर्यवंशी
नाशिक : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत पिछेहाट, माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर आणि आगामी महापालिका निवडणूक ही आव्हाने पेलण्यासाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत.
डोंगराळे टोल नाका व्यवस्थापनाविरुद्ध आंदोलन
मालेगाव : तालुक्यातील डोंगराळे येथील टोल नाका कार्यालयात असलेली महापुरुषाची प्रतिमा काढण्याचा निर्णय महाव्यवस्थापकाने घेतल्याने स्थानिकांनी गुरुवारी टोल नाका प्रशासनाविरोधात आंदोलन केले.
कचराकोंडी करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, कचराकोंडीच्या आठवडाभरानंतर स्थानिक आमदारांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
अंबरनाथ : कचरा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामगारांनी केलेल्या संपामुळे गेल्या काही दिवसात अंबरनाथ शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. आता आठवडाभरानंतर स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनी संबंधित कंत्राटदाराचे काम बंद करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
ठाणे महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प, अर्थसंकल्पातील घोषणांकडे ठाणेकरांचे लक्ष
ठाणे : करोना काळापासून आर्थिक संकटांचा सामना करीत असलेल्या ठाणे महापालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या, शुक्रवारी आयुक्त सौरभ राव हे सादर करणार आहेत.
भाऊ- बहिणीने बोगस दवाखाना थाटल्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट… महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून…
नागपूर: नागपुरात एका डॉक्टरच्या मृत्यूनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांनाही त्यांचे आपत्य असलेल्या बहीण- भावाने चक्क बोगस दवाखाना टाकल्याचे पुढे आले होते. या घटनेत आता एक महत्वाची अपडेट पुढे येत आहे. या घटनेची गंभीर दखल खूद्द राज्यातील महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) घेतली आहे. परिषदेकडून एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रशांत कोरटकर प्रकरणात कारवाई होत नसल्याच्या आरोपांना फडणवीसांचे उत्तर, म्हणाले….
प्रशांत कोरटकर प्रकरणी कारवाई होत नसल्याच्या विरोधात कोल्हापूर येथे महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर दौऱ्यावेळी कोरटकरवर कारवाई होत नसल्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” ते केवळ राजकारण करत आहेत. पोलिसांनी ताबडतोब याबाबत गुन्हा नोंद केला. त्यानंतर कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पोलिसांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि आता हायकोर्टात ती याचिका सुनावणीला येणार आहे. ज्यामध्ये पोलिसांनी मागणी केली आहे की आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे आणि सेशन कोर्टाने दिलेला दिलासा काढून टाका. पण काही लोकांना केवळ राजकारण करायचं आहे.”
जलपर्णीपासून सुंदर बहुउपयोगी वस्तुंची निर्मिती; लॅपटॉप बॅग, बास्केट, योगा मॅटसह…
नागपूर : जलस्त्रोतांना विळखा देणारी जलपर्णी अनेक सुंदर आणि उपयोगी वस्तूंची निर्मिती करु शकते, याची प्रचिती येते ती महापालिकेच्या महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये. बुधवारी ५ मार्च पासून रेशीमबाग मैदानामध्ये मनपाच्या समाज विकास विभागाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याला सुरुवात झाली.
कल्याणमध्ये रिक्षा चोरणारा कोळे गावाचा सराईत चोरटा अटकेत
कल्याण – कल्याणमध्ये गेल्या चार महिन्याच्या काळात रिक्षा चालकांच्या रिक्षा चोरणारा शिळफाटा रस्त्यावरील कोळेगाव येथील सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केला आहे. त्याच्याकडून चोरीच्या चार रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या रिक्षा चोरट्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात लपून ठेवल्या होत्या.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला नादुरूस्तीचे ग्रहण…भर उन्हाळ्यात विजेसाठी…
चंद्रपूर: महाऔष्णिक वीज केंद्राला नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. मागील दोन महिन्यांपासून संच क्रमांक ९ बंद अवस्थेत आहे. या संचाच्या जनरेटर मधील रोटर दुरूस्तीसाठी हरिव्दार येथे पाठविण्यात आले आहे. तर बुधवारी सलग दोन वेळा ५०० मेगावॅटचा संच बंद पडला. त्यामुळे २९२० मेगावॅट क्षमतेच्या वीज केंद्रातील उत्पादन सातत्याने १७०० ते १८०० मेगावॅट इतके कमी होत आहे.
टिटवाळा वासुंद्री येथील ६० चाळींची जोती भुईसपाट
कल्याण : टिटवाळ्यात गेल्या महिनाभरापासून बेकायदा बांधकामांच्या विरुध्द तोडकामाची मोहीम सुरू आहे. बुधवारी पालिकेच्या अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने टिटवाळा वासुंद्री रस्त्यावरील चाळींच्या उभारणीसाठी बांधलेली ६० हून अधिक जोत्यांची बेकायदा बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकली.
मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणलेला ३० लाखांचा गांजा जप्त; पिता-पुत्रांना अटक
अहिल्यानगर : मध्यप्रदेशमधून अहिल्यानगर जिल्ह्यात विक्रीसाठी आणलेला २९ लाख ६४ हजार २०० रुपये किमतीचा ६६.७१० किलो वजनाचा गांजा पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेच्या व शेवगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने हातगावमधून (ता. शेवगाव) जप्त केला. या संदर्भात पोलिसांनी पिता-पुत्रांना अटक करण्यात केली आहे.
कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची न्यायालयात धाव…फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे…
नागपूर : राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरटकरचा जामीन अर्ज रद्द व्हावा, अशा मागणीचा अर्ज गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कोल्हापूर पोलिसांनी‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
ठाणे पालिकेत श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांची हसत-खेळत बैठक
ठाणे : कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे आणि कळवा-मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचे चित्र गेले अनेक वर्षे दिसून येत असतानाच, बुधवारी मात्र वेगळे चित्र दिसून आले. ठाणे महापालिकेत बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी आमदार आव्हाड यांना निमंत्रण दिले आणि आव्हाडही बैठकीला आवर्जून उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या.
सविस्तर वाचा…
दोन बायका अन् फजिती ऐका! आते-मामे बहिणींशी बांधली लगीनगाठ; मग…
अकोला : एखाद्या ‘ड्रामेबाज’ चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. एका तरुणाने चक्क आते व मामे बहिणी असलेल्या दोन तरुणींशी गुपचुप लगीनगाठ बांधली. पहिल्या पत्नीला अंधारात ठेऊन पतीने दुसरीशी लग्न केले. नंतर अमरावती येथे गेलेल्या पहिल्या पत्नीला ‘व्हिडिओ कॉल’ करून आता येऊ नको, असे देखील नवरोबाने बजावले.
“अमरावतीत साडेचार हजार बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले”, किरीट सोमय्यांचा आरोप
अमरावती : अमरावतीत महापालिका क्षेत्रात सुमारे ४ हजार ५०० बांगलादेशी, रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाने जन्मदाखले दिल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गुरूवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला.किरीट सोमय्या यांनी आज येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोहचून पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा केली. किरीट सोमय्या म्हणाले, मी आज ४६८ पानांचे पुरावे पोलिसांकडे सादर केले आहेत.
लोणारला येताहात? मग थोडे पुढे जा आणि पहा ‘खडकपूर्णा’मधील निसर्ग शिल्पे…
बुलढाणा : लोणार म्हटले की, पर्यटकासमोर केवळ आणि केवळ जगप्रसिद्ध खऱ्या पाण्याचे सरोवरच येते. पण इथे दैत्यसुदन मंदिर सारखी पुरातन अद्भुत मंदिरे आहेत, गोमूख धार, सीता न्हाणी भस्म टेकडी, हटकेश्वर, पाप हरेश्वर सारखी हेमाडपंथी मंदिरे आहेत. ही पुरातन कालीन स्थळे, धार्मिक, सांस्कृतिक वारसा आहे…
आदिवासी आश्रमशाळा ते अमेरिका…, डॉ. नितेश कास्देकर यांचा थक्क करणारा प्रवास
अमरावती : आदिवासी समाजातील डॉ. नितेश कास्देकर या मेळघाटच्या सुपूत्राचा अमेरिकेतील वैज्ञानिक म्हणून यशस्वी प्रवास सध्या चर्चेत आहे. मेळघाटातील चटवाबोड या लहानशा गावातून थेट अमेरिकेत पोहचलेल्या या संशोधक पुत्राचे गावाला कौतूक आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. नितेश यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला, पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उच्च शिक्षण घेत त्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात झेप घेतली.
डोंबिवलीतील ठाकुरवाडीत बेकायदा बांधकाम इमारतीचे बांधकाम भुईसपाट
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडीमध्ये एका विकासकाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता उभारलेले दोन माळ्याचे बेकायदा इमारतीचे बांधकाम ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी मंगळवारी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.
Rohit Pawar: रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसंवर हल्लाबोल
कुठे बैठका झाल्या ते बघा, सीडीआर बघा. यातून बऱ्याच गोष्टी कळणार आहेत. ते पुरावा म्हणतात. त्यांच्या बंगल्यावर बैठक झाली याला पुरावा काय पाहिजे? सत्तेत असणारा एक आमदारच त्याबाबत बोलतोय. तुम्ही खोलात गेलात कुठे? आत्ता तर कुठे ते (मुंडे) मंत्रीपदावरून खाली आले आहेत. तुम्ही खोलात गेलात की इतर गोष्टी कळतील. एकदा बीडमध्ये गेल्यानंतर बघितलं तर अशा अनेक हत्या आहेत. तिथे एका कार्यकर्त्याचीही हत्या झालेली आहे. त्या खोलात जा. वेगळी चौकशी लावा. मग तुम्हाला खऱ्या गोष्टी समजतील. आत्ता चौकशीचा फोकसच त्यांच्यावर नव्हता – रोहित पवार
संदर्भ – देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडेंविरोधात पुरावे असते तर त्यांच्यावर कारवाई झाली असती अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यावर रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.
आनंदवार्ता! गर्दीच्या काळात रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा, वाचा नेमकी सुविधा काय?
अकोला : आगामी काळात उन्हाळ्याच्या सुट्या, लग्नसराई व सणासुदीच्या काळामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अतिरिक्त गर्दीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला. विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास करता येईल.
संतापजनक! विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, विकृत मुख्याध्यापक अटकेत…
गडचिरोली : राज्यात दररोज लैंगिक छाळाच्या गुन्ह्यांनी खळबळ उडत असताना गडचिरोलीत आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भामरागड तालुक्यातील एका आदिवासीबहुल गावातील शाळेत मुख्यधापकाने पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे.
जखमी बिबट्याला जीवावर उदार होऊन जीवदान
नागपूर : राज्यातील कानाकोपऱ्यात बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. विदर्भात वाघांचा तर मुंबई, नाशिक या परिसरात बिबट्यानी धुमाकूळ घातलाय. म्हणूनच तिकडच्या राजकीय मंडळींकडून बिबट्याच्या नसबंदीची मागणी होत आहे. मात्र, अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. आता विदर्भातदेखील बिबट्यांची संख्या तेवढीच वाढली आहे. जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील जखमी झालेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनखात्याच्या चमुला यश आले.
सोने- चांदीच्या दरात मोठे बदल, तीनच दिवसांत…
नागपूर: सोने- चांदीचे दर स्थिर होण्याचे नाव घेत नाही. मध्यंतरी सोने- चांदीचे दर विक्रमी उंचीवर गेले होते. त्यानंतर दरात मोठी घसरण झाली. परंतु आता पून्हा सोने- चांदीच्या दरात सातत्याने मोठे बदल बघायला मिळत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. सोने- चांदीच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)