Mumbai Maharashtra Breaking News Updates : राज्यात एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून दुसरीकडे विविध मंत्र्यांवरील आरोप समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रचंड गदारोळ झाल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी काल (४ मार्च) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपद सोडल्याचे वृत्त आहे. तसंच, संजय राऊत यांनी आज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिला विनयभंग प्रकरणी मोठा आरोप केला आहे. विरोधकांनी या अधिवेशनात मंत्र्यांना घेरण्याची रणनीती आखल्याचं म्हटलं जातंय. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Maharashtra Live News Update Today, 05 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

19:11 (IST) 5 Mar 2025

Maharashtra Live Updates : “लोकांना माज आलाय, त्यांच्यावर…”, जालन्यातील त्या घटनेप्रकरणी पंकजा मुंडेनी व्यक्त केला संताप!

जालन्यात भोकरदनमध्ये एका मुलाला प्रचंड अमानुषपणे मारलं आहे. त्याचे भाऊ आणि कुटुंब मला भेटायला आले होते. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. हे अमानुष पद्धतीने मारून व्हिडिओ करत आहेत, लोकांना माज आलाय, हे चुकीचं आहे. यावर कडक कारवाई केली पाहिजे.

18:05 (IST) 5 Mar 2025

देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह महायुतीचे अनेक नेते ‘छावा’ पाहण्यासाठी रवाना!

17:41 (IST) 5 Mar 2025

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुन्हा मोठा घोटाळा समोर, सरकारच्या अडचणी वाढणार?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या.

सविस्तर वाचा…

17:30 (IST) 5 Mar 2025

अमरावती विमानत‌ळावरून उडणार ७२ आसनी विमान

अमरावती विमानतळाने ‘एअर कॅलिब्रेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ (पीएपीआय) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

सविस्तर वाचा…

17:17 (IST) 5 Mar 2025

दुकानाची पाटी मराठीतून नसल्यास आता एक लाख रुपयांचा दंड

नागपूर : दुकानांवरील नामफलक मराठी भाषेत ठळक असावेत, असा सक्तीचा दंडक केला. शहरात फेरफटका मारला असता, या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसते. हा नियम मोडणाऱ्यांवर अनेकदा कारवाई होताना दिसत नाही.

सविस्तर वाचा…

17:14 (IST) 5 Mar 2025

बीडचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे पडसात नागपुरात… शिवसैनिकांकडून…

आंदोलकांनी याप्रसंगी संतोष देशमुख सारख्या हत्येचे अमानवीय कृत्य करणाऱ्या सर्व नराधमांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणीही यावेळी केली.

सविस्तर वाचा…

17:03 (IST) 5 Mar 2025

ठाणे : नमाज पठण करुन घरी निघालेल्या तरुणावर जिवघेणा हल्ला

नमाज पठण करुन रमजान महिन्याचा रोजा (उपवास) सोडण्यासाठी घरी निघालेल्या एका तरुणावर लोखंडी फावड्याने जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला.

सविस्तर वाचा…

16:55 (IST) 5 Mar 2025

शेगावात शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त, न्यायालयाच्या आदेशानंतर…

बुलढाणा : न्यायालयाच्या आदेशानुसार शेगाव येथील तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आज बुधवारी, पाच मार्च रोजी संध्याकाळ अखेर कमीअधिक १९२ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

सविस्तर वाचा…

16:35 (IST) 5 Mar 2025

मराठवाड्यातून वजा झालेल्या मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच; संजय बनसोडे, प्रताप पाटील चिखलीकर, प्रकाश सोळंके, सतीश चव्हाण शर्यतीमध्ये

मस्साजोगचे दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निर्घृणतेची छायाचित्रे समोर आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.

सविस्तर वाचा…

16:24 (IST) 5 Mar 2025

Maharashtra Live Update : “…पुन्हा असं बोलण्याची हिंमत होता कामा नये”, आबू आझमींवरील कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि इतर महापुरुषांविषयी अपशब्द काढणाऱ्यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे निलंबन किती मिनिटांसाठी, तासांसाठी केलंय याची कल्पना नाही. पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये. त्यामुळे सरकारने यावर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांचं निलंबन कायमचं केलं पाहिजे – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

16:17 (IST) 5 Mar 2025

भिवंडीत हॉटेलबाहेर फेकला जातो कचरा, पालिका आयुक्तांनी घेतली हॉटेल मालक संघटनेबरोबर बैठक

भिवंडी शहरातील हाॅटेल आणि बारमधील कचरा, शिल्लक राहीलेले अन्न याचा कचरा दैनंदिन स्वरुपात हाॅटेलबाहेर फेकण्यात येत असल्याची बाब नवनियुक्त पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या निदर्शनास आली.

सविस्तर वाचा…

16:17 (IST) 5 Mar 2025

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाने शासकीय भूखंड केला तिसऱ्याच्या नावे, महसूल खात्याचा घोळ

राज्य सरकारने अधिग्रहित करून सोसायटीला दिलेली जमीन खोटा मालकी हक्क सांगणाऱ्या व्यक्तीला महसूल खात्याने दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा…

16:16 (IST) 5 Mar 2025

यवतमाळ : ‘सर’ म्हटले नाही म्हणून ठाणेदार भडकले; ‘डिलीव्हरी बॉय’ला…

चार पोलीस कर्मचाऱ्यांसह कुरिअरच्या ऑफिसमध्ये जावून त्याला मारहाण केली. आर्णी येथे २३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेने पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

सविस्तर वाचा…

15:46 (IST) 5 Mar 2025

नवनीत राणा म्हणतात, “अबू आझमींचे निलंबन; आता औरंगजेबाची कबर महाराष्ट्राबाहेर फेकून द्या…”

नवनीत राणा म्हणाल्या, अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज ज्या पद्धतीने कारवाई केली, त्याचा आनंद आहे.

सविस्तर वाचा…

15:33 (IST) 5 Mar 2025

नागपूर : तुरुंगातून सुटताच ‘इंस्टा रिल्स’ बनविली, सुमित ठाकूरला पोलिसांनी…

जीपममध्ये उभा राहून ‘इंस्टारील्स’ बनविणाऱ्या कुख्यात सुमित ठाकूरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

15:26 (IST) 5 Mar 2025

“मुख्यमंत्रीसाहेब, कोरटकर प्रकरणात तत्परता दाखवा”, राजे मुधोजी भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना…

कोरटकरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा महासंघाच्यावतीने राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे.

सविस्तर वाचा…

15:19 (IST) 5 Mar 2025

बुलढाणा : दोन कुटुंबातील वाद; चौघांचा चाकूने हल्ला, पित्याचा मृत्यू, पुत्र गंभीर

चौघा जणांनी केलेली अमानुष मारहाण आणि धारधार चाकूने सपासप वार केल्याने पित्याचा मृत्यू झाला तर पुत्र गंभीर जखमी झाला.

सविस्तर वाचा…

15:13 (IST) 5 Mar 2025

महोत्सवाच्या नावावर ‘या’ विद्यापीठात कोट्यवधींची उधळपट्टी! विद्यार्थ्यांच्या पैशाचा…

संलग्नित महाविद्यालये व विद्यार्थ्यांच्या शुल्कातून नुकताच चित्रपट महोत्सव व आता राष्ट्रीय पुस्तक मेळयासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

सविस्तर वाचा…

15:03 (IST) 5 Mar 2025

कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग कामाचा वेग वाढवा, आमदार राजेश मोरे यांची मेट्रो अधिकाऱ्यांकडे मागणी

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, शिळफाटा रस्ता ते काटई, कोळे, वडवली, उसाटणेमार्गे तळोजा असा कल्याण – तळोजा मेट्रोचा मार्ग आहे.

सविस्तर वाचा…

14:48 (IST) 5 Mar 2025

वीजदर वाढ सुनावणी; लोकप्रतिनिधी फिरकलेच नाही…

लोकप्रतिनिधींकडून झालेले दुर्लक्ष बघता वीजदराच्या प्रश्नाशी लोकप्रतिनिधींना देणे-घेणे नाही का, असा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित करण्यात आला.

सविस्तर वाचा…

14:38 (IST) 5 Mar 2025

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदवार्ता! होळीनिमित्‍त मध्‍य रेल्‍वेच्‍या ७६ अतिरिक्‍त विशेष गाड्या…

प्रवाशांना होळी सणानिमित्त आपल्‍या गावी जाण्यासाठी मध्य रेल्‍वेच्‍या मुंबई आणि पुणे विभागातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

13:55 (IST) 5 Mar 2025

“…तर मी महाराष्ट्राची माफी मागेन”, जितेंद्र आव्हाडांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान!

माझं वक्तव्य दाखवावं, संदर्भासहित दाखवावं. मी आव्हान देतो. मी महाराष्ट्राची माफी मागेन. ते मुख्यमंत्री आहेत, अत्यंत जबाबदारीच्या पदावर आहेत. मी नेहमी त्यांचा सन्मान करत आलो आहे. मी चुकलो असेन तर महाराष्ट्राची माफी मागेन – जितेंद्र आव्हाड</p>

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? वाचा

13:51 (IST) 5 Mar 2025

अकोला : मुलीच्या अपहरणाची तक्रार, आंदोलन, पोलिसांची धावपळ अन् वेगळेच सत्य…

शहरातील कृषी नगर भागात एका नामांकित शाळेच्या समोरून सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

13:51 (IST) 5 Mar 2025

सम्राट अशोकने निर्माण केलेले महाविहार, चंद्रपुरात धरणे आंदोलन…

बुद्धगया मंदीर कायद्यान्वये बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे युनेस्को नुसार बौद्धांचे जागतिक धरोहर असून सुद्धा ते बौद्ध ऐवजी हिंदूंच्या ताब्यात आहे.

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 5 Mar 2025

मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच… मुख्य सचिव न्यायालयात म्हणाल्या, “सहमतीनेच कंत्राट…”

शपथपत्रात मुख्य सचिवानी स्पष्टपणे सांगितले की या प्रकल्पातील मंजूरी जरी अधिकाऱ्यांच्या नावाने करण्यात आली असली तरी याला अधिकृत मंजुरी तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास विभाग मंत्री यांनी दिली होती.

सविस्तर वाचा…

13:26 (IST) 5 Mar 2025

चंद्रपूर : कोळशाचे अवैध उत्खनन सुरूच, कर्नाटक एम्टा कंपनीकडून…

भद्रावती तालुक्यातील बरांज लगतची निस्तार हक्काची ८५.४१ हेक्टर जमीन सन २०२२ मध्ये एम्टाला दिली.

सविस्तर वाचा…

13:26 (IST) 5 Mar 2025

भंडारा : मॉइल्स मॅग्नीज खाणीत मोठी दुर्घटना, छत कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू; एक जखमी

तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली चिखला येथील मॅग्नीज खाणीत मॅग्नीज काढण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे.

सविस्तर वाचा…

13:22 (IST) 5 Mar 2025

माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती!

माणिकराव कोकाटे यांनी शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती, त्यावर नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सध्या त्यांच्या मंत्रिपदाला कोणताही धोका दिसत नाही – माणिकराव कोकाटे यांचे वकील

13:06 (IST) 5 Mar 2025

अकोला : ट्रकमधून क्षमतेहून अधिक मालाची वाहतूक, अपघाताची वाढती शक्यता; आरटीओकडून…

अनेक वेळा क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता असते.

सविस्तर वाचा…

12:55 (IST) 5 Mar 2025

वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा, उपराजधानीत रस्ते अपघातांत महिलेसह तीन ठार

पहिल्या घटनेत, मोटारसायकलने जात असलेल्या दोन तरुणांना भरधाव टिप्परच्या चालकाने जबर धडक दिली आणि पळून गेला.

सविस्तर वाचा...

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

Maharashtra Live News Update Today, 05 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा