Maharashtra Political Crisis Live Updates, 10 November 2022: मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेला यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत. तर दुसरीकडे पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले उद्धव ठाकरे गटतील नेते संजय राऊत यांना न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसरीकडे गुजरात, हिमचाल प्रदेश या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. भाजपा, काँग्रेस तसेच आप पक्षांकडून येथे पूर्ण ताकदीने प्रचार केला जात आहे.

यासह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Mumbai News Live, 10 November 2022 : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

10:30 (IST) 10 Nov 2022
पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई विशेष रेल्वेला मुदतवाढ; प्रवाशांच्या मागणीमुळे रेल्वेचा निर्णय

प्रवाशांची मागणी लक्षात घेता पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई एक्स्प्रेस (झाँसी) या विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या गाडीला दोन्ही बाजूने मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

10:23 (IST) 10 Nov 2022
पुणे:‘पीएमपी’च्या ताफ्यात आणखी १०० गाड्या, संचालक मंडळासमोर लवकरच प्रस्ताव

सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि ठेकेदारांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पीएमपीकडून शंभर गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. तसा विचार पीएमपी प्रशासनाकडून सुरू करण्यात आला असून संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सविस्तर वाचा

10:11 (IST) 10 Nov 2022
पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापन झालेल्या आणि समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्याने गेल्या निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींचा (सदस्य पदासह सरपंच पदाच्या) निवडणूक कार्यक्रम बुधवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला.

सविस्तर वाचा

10:01 (IST) 10 Nov 2022
नागपूर : उपचारासाठी बिबट्याचा नांदेड-नागपूर प्रवास

वन्यप्राण्यांवरील उपचारासाठी उपराजधानीतील सेमिनरी हिल्सवरील वनखात्याचे ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्र वरदान ठरले आहे. सोमवारी नांदेड शहरात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू जखमी झाले. तब्बल सात तासांच्या प्रवासानंतर त्याला केंद्रात आणले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या बिबट्याचा मागच्या पायाचे हाड मोडले आहे. सविस्तर वाचा…

09:53 (IST) 10 Nov 2022
पुणे: गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला

येरवड्यातील गोल्फ चौकातील उड्डाणपूल डिसेंबरअखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे.भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांनी उड्डाणपुलाच्या कामाची बुधवारी पाहणी केली.

सविस्तर वाचा

09:46 (IST) 10 Nov 2022
नागपूर : वाळू माफियांमध्ये खळबळ, गुड्डू खोरगडे कारागृहात स्थानबद्ध

विदर्भातील सर्वात मोठा वाळू माफिया गुड्डू ऊर्फ अमोल सेवाकर खोरगडे (३५, ग्रीन लॅव्हरेज कॉलनी, कोरडी) याच्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केली. नागपूर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच वाळू माफियाला स्थानबद्ध करण्यात आले हे विशेष. सविस्तर वाचा…

09:46 (IST) 10 Nov 2022
नागपूर : कर्जाचा डोंगर, धान्यविक्रेत्याची विष प्राशन करत केली आत्महत्या

धान्य खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून धान्यविक्रेत्याने दारूत विष टाकून प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना पारडीत उघडकीस आली. संजय सुंदरलाल राऊत (४०, रा. शिवशक्तीनगर, पारडी) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे.संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीने धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. सविस्तर वाचा…

09:45 (IST) 10 Nov 2022
नागपूर : ग्रामपंचायत निवडणुका, विदर्भातील २३३६ गावात आजपासून आचारसंहिता

विदर्भात २,३३६ ग्रामपंचायतींमध्ये १८ डिसेंबर रोजी सदस्य व सरपंचपदासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी बुधवारपासून आजारसंहिता लागू करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. आयोगाने बुधवारी राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार असल्याचे सांगितले. सविस्तर वाचा…

09:44 (IST) 10 Nov 2022
नागपूर: पहिल्याच दिवशी ‘पेट’मध्ये तांत्रिक गोंधळ, परीक्षा एक तास उशिरा, प्रश्नांचीही पुनरावृत्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन पीएच.डी. पात्रता परीक्षेमध्ये (पेट) पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाला. सकाळी दहा वाजताचा पेपर तांत्रिक अडचणींमुळे एक तास उशिरा सुरू झाला. ५० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत पाच प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने पेपर जमा करताना केवळ ४५ प्रश्न सोडवल्याचे दिसत आहे.

सविस्तर वाचा

09:40 (IST) 10 Nov 2022
‘हिंदू’ पर्शियन शब्द असल्याच्या दाव्याबाबत काँग्रेस नेत्याची माफी, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

कर्नाटकातील काँग्रेस नेते सतीश जारकीहोली यांनी ‘हिंदू’ शब्दाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. “हिंदू’ शब्दाचा अर्थ खूप घाणेरडा असून हा शब्द भारतातील नसून मूळ पर्शियन आहे”, असं विधान त्यांनी केलं होतं. या वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर जारकीहोली यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.

सविस्तर बातमी वाचा…

09:39 (IST) 10 Nov 2022
संजय राऊतांच्या जामीनावर मुख्यमंत्र्यांनी थेट भाष्य टाळलं; म्हणाले, “यावर आता…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांना तब्बल १०३ दिवसांनी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात त्यांनी ईडीने अटक केली होती. बुधवारी रात्री न्यायालयीन कोठडीतून सुटका होताच त्यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. त्यांच्या जामीनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट भाष्य करणं टाळलं आहे.

सविस्तर बातमी वाचा…

09:35 (IST) 10 Nov 2022
साताऱ्यात अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात, प्रतापगडाच्या पायथ्याशी चोख बंदोबस्त

साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास आज पहाटेपासून सुरवात करण्यात आली. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात बुधवारी रात्रीपासून दाखल झाले होते. पहाटे ही सर्व यंत्रणा प्रतापगडावर दाखल झाली. सकाळी सहा वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरवात झाली.

सविस्तर बातमी

09:34 (IST) 10 Nov 2022
‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर शरद पोंक्षे संतापले, प्रेक्षकांना मारहाण केल्याने सुनावलं, म्हणाले “हा हलकटपणा…”

राज्यात सध्या ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे असं चित्रं उभं राहिलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा दिला असून, निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे, नाशिक, ठाणे अशा अनेक ठिकाणी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपटाचे शो बंद पाडले आहेत. दुसरीकडे मनसे मात्र चित्रपटाच्या बाजूने उभी असून बंद पडलेले शो पुन्हा सुरु करण्यास लावत आहे. दरम्यान, या वादात आता अभिनेते शरद पोंक्षे यांनीही उडी घेतली आहे.

सविस्तर बातमी

09:34 (IST) 10 Nov 2022
…अन् राहुल गांधींनी रायगडावरील ‘त्या’ पायरीचा उल्लेख करताच श्रोते झाले अवाक्

काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. याच पदयात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधीं यांनी, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्यातील युवकांचा रोजगार, त्यांचे भवितव्य हिरावून घेत आहेत अशी टीका बुधवारी राहुल गांधींनी नांदेडमधील सभेत केली. मात्र राजकीय टीकेव्यतिरिक्त राहुल गांधींनी एका ठिकाणी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिल्याने कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. वाचा सविस्तर

maharashtra News