Maharashtra Political Crisis Live Updates, 10 November 2022: मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेला यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत. तर दुसरीकडे पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले उद्धव ठाकरे गटतील नेते संजय राऊत यांना न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरीकडे गुजरात, हिमचाल प्रदेश या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. भाजपा, काँग्रेस तसेच आप पक्षांकडून येथे पूर्ण ताकदीने प्रचार केला जात आहे.
यासह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
Mumbai News Live, 10 November 2022 : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
डोंबिवली महापालिका निवडणुका तोंडावर दिसू लागल्या तशा काठावर बसून असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ यांच्या पक्षातील चार नगरसेवक आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत वर्षा निवासस्थानी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात जल्लोषात प्रवेश केला.
रायलादेवी तलावाच्या सुशोभिकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम ठाणे महापालिका करणार असून या कामाचा कार्यादेश देऊनही कंत्राटदाराने काम सुरू केलेले नसल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय आयुक्त अभिजीत बांगर यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान तलावाजवळ एकही कामगार हजर नसल्याचे दिसून आले आहे. सविस्तर वाचा…
अफझलखान वधाच्या दिनीची जावळी खोर्यातील शिवप्रताप भूमी मुक्त करण्याचे काम होत आहे. गेली वीस वर्षे सुरू असलेल्या शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या लढ्याला हिंदूत्ववादी सरकारच्या भूमिकेमुळे यश आले असल्याचे आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
एका महत्त्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेला ‘सुमी’ चित्रपट ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. ‘६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२’मध्ये या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटा'चा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर हेही ‘सर्वोत्कृष्ट बाल कलाकार’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
आदिवासी शेतकऱ्यांचे नेते, क्रांतिकारी, हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी, १५ नोव्हेंबर रोजी किसान सभेच्या वतीने देशभर किसान सभेच्या झेंड्यांचा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यातील आदिवासी दुर्गम भागातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी मेट्रोमधून प्रवासाचा आनंद लुटला. कस्तुरचंद पार्क, खापरी आणि झिरो माईल आणि फ्रीडम पार्कला भेट दिली. महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडाराआदी जिल्ह्यातील एकल विद्यालयातील इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थी नागपूर मध्ये सहलीसाठी आले होते. त्यांनी मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेतला. सविस्तर वाचा…
डोंबिवली शहराच्या दोन वेगळ्या भागात दोन घटनांमध्ये दुचाकी वरुन आलेल्या दोन जणांनी मोठ्या चलाखीने पादचाऱ्यांच्या गळ्यातील सुमारे दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. एक घटना ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता तर दुसरी घटना मानपाडा रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी रामनगर, टिळकनगर पोलीस ठाण्यात दोन्ही व्यक्तिंनी तक्रार केल्या आहेत. सविस्तर वाचा…
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्य सरकारने सुरू केलेली भूसंपादन प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरोप गोदरेज ॲण्ड बॉईस कंपनीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला. प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला कंपनीने केलेला विरोध, संपादन प्रक्रियेत निर्माण केलेेले अनावश्यक अडथळे यामुळे हा प्रकल्प रखडल्याबाबत राज्य सरकारने केलेल्या आरोपाचे कंपनीने खंडन केले. सविस्तर वाचा…
गोरेगाव येथील पत्रा चाळ प्रकल्पाचे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे मत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये स्थापित विशेष न्यायालयाने व्यक्त करून, सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. मात्र या प्रकरणातील मूळ घोटाळ्याकडे तपास यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. सविस्तर वाचा…
जळगाव शहराचे गेल्या पाच वर्षांत गिरीश महाजनांनी वाटोळे केले आहे. महाजनांनी शहर विकासासाठी शंभर-दोनशे कोटी रुपये देण्याच्या फक्त वल्गना केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र निधी आला नाही आणि जो आला त्यातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीतून ३० ऑक्टोबर रोजी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. यापूर्वी हाच बिबट्या दोन वेळा जेरबंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. अंदाजे चार वर्षांच्या या बिबट्याला यापूर्वी ठाण्यातील येऊर जंगलातून आणि त्यानंतर बिंबीसार नगर येथील एका शाळेतील स्वच्छतागृहातून जेरबंद करण्यात आले होते. मात्र दीड वर्षांच्या मुलीचा बळी घेणारा बिबट्या हा नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सविस्तर वाचा…
महावितरणच्या प्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाच्या ‘सवाल अंधाराचा’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. कोल्हापूर परिमंडलाच्या ‘इस्किलार’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.
शहर स्वच्छतेच्या मुद्द्यावरून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घनकचरा विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली असतानाच, त्यांनी बुधवारी उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडून घनकचरा विभागाचा पदभार काढून तो नव्याने रुजू झालेले तुषार पवार यांच्याकडे दिला आहे. उपायुक्त पवार यांनी यापूर्वी नवी मुंबई महापालिकेत घनकचरा विभागाची जबाबदारी सांभाळली. सविस्तर वाचा…
लोकलमधून पडून होणाऱ्या प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे अपघात रोखण्यासाठी सेवेत वातानुकूलित लोकल दाखल करावी, तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा उभारावी यासह विविध उपाययोजना करण्याची मागणी लोहमार्ग पोलीस आयुक्तानी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंबई विभागात २०२१ पासून आतापर्यंत लोकलमधून पडून एकूण ७६४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा…
भिवंडी येथे एका इमारतीवर अतिक्रमण विभागाची कारवाई टाळण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हातोहात पकडले आहे. रमाकांत म्हात्रे असे सफाई कामगाराचे नाव असून एसीबीने त्याला ताब्यात घेतले आहे. तक्रारदार हे परिसरातील एका इमारतीचे देखरेखीचे काम करतात. सविस्तर वाचा…
ॲक्सिस बँकेची ४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ६३ वर्षीय सराफाला अटक केली. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात सराफ अपयशी ठरला होता. याप्रकरणी बँकेने केलेल्या पडताळणीत कर्जाची रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर याप्रकणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.
आतापर्यंत १ जानेवारी किंवा तत्पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदारयादीत नोंदणी करता येत होती. मात्र, आता २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा तत्पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना आधीच मतदार म्हणून नोंदणी करण्याचीही सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. सविस्तर वाचा…
शहरातील वाहतूक कोंडीला आणि रस्त्यांच्या दुरवस्थेला मेट्रोची कामे जबाबदार असल्याचा ठपका पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून ठेवण्यात आल्यानंतर महामेट्रोकडून रस्ते दुरुस्तीची कामे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर टीका करताना “राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी”, असा खोचक सल्ला दिला होता. त्याला आज संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. काल संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाला होता. दरम्यान, आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. सविस्तर वाचा
साताऱ्यातील किल्ले प्रतापगडावर असलेल्या अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सकाळपासून सुरूवात झाली आहे. या कबरीवरून काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. “अफझलखानाला हिरो बनवण्याचा प्रयत्न भाजपा आणि त्यांचे सहकारी पक्ष करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे” असं वाघमारे यांनी म्हटलं आहे.
करोना महासाथीच्या सर्वस्तरांतील दुष्परिणामांचे गांभीर्य सातत्याने समोर येत आहे. साथरोगाच्या काळात महिलांच्या रोजगारांवर कायमस्वरूपी गदा आली असून त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरही झाल्याचे ‘विधी’ या कायदा आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत संस्थेने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
पारपत्र मिळवणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी केली जाते. पोलिसांकडून केली जाणारी पडताळणी पारपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग मानला जातो. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून गेल्या दहा महिन्यांत एक लाख नागरिकांची पारपत्र पडताळणी केली आहे.
अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याचा आरोप असलेले पोलीस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांचा जबाब बुधवारी नोंदवण्यात आला. दरम्यान, त्यांचा जबाब गुन्हे गुप्तवार्ता कक्षात (सीआययू) नोंदवण्यात आला नाही. जबाब नोंदविण्यात आलेल्या ठिकाणाबाबत मुंबई पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. सविस्तर वाचा…
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’साठी आरे वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या कारशेडच्या कामात अडथळा बनणारी ८४ झाडे कापण्याची आवश्यकता असून ही झाडे कापण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) बुधवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. एमएमआरसीएलने ८४ झाडे कापण्यासंबंधी मुंबई महानगरपालिकेला सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती या प्रतिज्ञापत्रानुसार करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील जेवण निकृष्ट असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी बुधवारी भोजनगृह बंद केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला.विद्यापीठाच्या भोजनगृहातील खाद्यपदार्थांचा दर्जा निकृष्ट झाला आहे.
यंदाच्या उसाच्या गळीत हंगामाला अद्याप गती आली नाही. मागील वर्षीच्या हंगामात दोनशे कारखाने सुरू होते. यंदा सात नोव्हेंबरअखेर केवळ ९३ कारखाने सुरू आहेत. त्यात ४६ सहकारी आणि ४७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी काल संजय राऊतांना १०२ दिवसांनंतर पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच ‘एकच शिवसेना खरी आहे, बाकी सर्व धोतऱ्याच्या कडू बिया’, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कदाचित १०२ दिवस ते कारागृहात होते, त्यामुळे त्यांना बाहेर घडणाऱ्या गोष्टींची कल्पना नसेन. मात्र, आमच्या पक्षाचे नावच ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे, असे ते म्हणाले. सविस्तर वाचा
विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणीची मुदत संपली असली तरी आक्षेप घेण्याच्या तारखेदरम्यान नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, सीबीएससी व आयसीएससी शाळेतील शिक्षकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
गोरेगाव येथे राहणार्या एका २२ वर्षांच्या तरुणीवर तिच्याच पित्याने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल. याप्रकरणी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी पित्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आरोपी पिता सध्या पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सविस्तर वाचा…
हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राज्यातील स्वराज्याचे शत्रू असलेल्या औरंगजेब आणि अफजलखानाच्या कबरी नेस्तनाबूत करून टाकाव्यात, अशी मागणी केली आहे. वाचा सविस्तर