Today’s Breaking News Updates : भाषा सूत्रानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयास शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी या पक्षांनी विरोध दर्शविला आहे. तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. तर यावरून संजय राऊतांनीही टीका केली. दुसरीकडे निलंबित पोलीस उपनिरिक्षक रणजीत कासले यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शरण जाण्याआधीच त्याला ताब्यात घेतलंय. यासह राज्यातील विविध चर्चेतील बातम्या पाहुयात.

Live Updates

Mumbai-Maharashtra News Live Today 18 April 2025 : राज्यातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

20:35 (IST) 18 Apr 2025

कणकवली - वरवडे फणसनगर येथे मधमाशांच्या हल्ल्यात ४० जण जखमी, गुड फ्रायडेचा कार्यक्रम सुरू असताना अचानक हल्ला

गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने तब्बल ४० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. ...सविस्तर वाचा
19:46 (IST) 18 Apr 2025

दिनदयाल अंत्योदय योजनेतील गैरप्रकार, वसई विरार महापालिकेच्या नावाची बेकायदेशीर दुकाने

केंद्र शासनाच्या दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियानाअंतर्गत चालणारा आणखी एक गैरप्रकार समोर आला आहे. ...सविस्तर वाचा
19:25 (IST) 18 Apr 2025

निष्ठावंतांना घेऊन पक्षाची पुनर्बांधणी करू, ऍड. विक्रांत चव्हाण

काँग्रेस पक्षाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने निरीक्षक पदी नेमणूक झाल्यानंतर ऍड. विक्रांत चव्हाण यांनी ६ एप्रिल रोजी प्रथम जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांशी चर्चा केली. ...अधिक वाचा
19:09 (IST) 18 Apr 2025

कल्याणमधील सापाड येथे टेमघर जलशुध्दीकरणाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

स्टेम वाॅटर वितरण कंपनी नियंत्रित टेमघर येथील जलशुध्दीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणारी एक जलवाहिनीला शहाड ते टेमघर दरम्यानच्या कल्याणमधील सापाड येथे शुक्रवारी दुपारी गळती लागली आहे. ...सविस्तर वाचा
18:59 (IST) 18 Apr 2025

त्र्यंबकेश्वरमधील पंगती भेदाची कूप्रथा बंद, अंनिसच्या लढ्याला यश

त्र्यंबकेश्वर येथे शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावाने गाव जेवणाची परंपरा आहे. लोकवर्गणीतून जमा झालेल्या शिद्यातून विशिष्ट जातीतील व्यक्तींसाठी वेगळा स्वयंपाक करण्याची आणि त्यांची वेगळी पंगत बसविण्याची परंपरा महाराष्ट्र अंनिसच्या पाठपुराव्याने बंद झाली आहे. ...अधिक वाचा
18:45 (IST) 18 Apr 2025

जळगावमध्ये सोने ९८ हजारांवर

शहरातील सराफ बाजारात गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत होते. ...सविस्तर वाचा
18:26 (IST) 18 Apr 2025

हरवलेल्या महिला, बालकांच्या शोधासाठी धुळे जिल्ह्यात तीन पथके

हरवलेल्या महिला आणि बालकांचा शोध घेण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांतर्फे महिनाभर शोध मोहिम ...सविस्तर वाचा
17:20 (IST) 18 Apr 2025

नॅशनल हेराल्ड प्रकरणी पुण्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस भवनासमोर आंदोलन

पुण्यात भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत उत्तर दिले.

17:12 (IST) 18 Apr 2025

डोंबिवली ठाकुर्लीत पती, सासऱ्याने सोन्याचा ऐवज चोरल्याची महिलेची तक्रार

डोंबिवली जवळील ठाकुर्ली भागात एका इमारतीमध्ये राहत असलेल्या एकाच कुटुंबातील एका महिलेचा दीड लाखाहून अधिक किमतीचा सोन्याचा ऐवज घरातील पती, सासऱ्याने चोरला असल्याची तक्रार महिलेने केली आहे. ...वाचा सविस्तर
17:04 (IST) 18 Apr 2025

शिंदे सेनेच्या सोशल मीडियाची जबाबदारी श्रीकांत शिंदेच्या निकटवर्तीयाकडे, प्रतिक शर्मा यांची सोशल मिडियाच्या उप राज्यप्रमुख पदी निवड

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे माध्यम सल्लागार प्रतीक शर्मा यांची शिवसेनेच्या सोशल मीडिया उपराज्य प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
16:55 (IST) 18 Apr 2025

शाळेत घेऊन जातो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शहापूर येथील आदिवासी पाड्यावरील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ...सविस्तर वाचा
16:51 (IST) 18 Apr 2025

हिंदी सक्तीला मराठी एकीकरण समितीचा विरोध

त्रिभाषा सुत्रानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता या निर्णया विरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलन केले जात आहे.या निर्णयास मराठी एकीकरण समितीने देखील विरोध केला आहे. ...सविस्तर बातमी
16:39 (IST) 18 Apr 2025

बंदी आदेश झुगारून सुरुर वाई रस्त्यावर वृक्षतोड, ठेकेदाराची मनमानी झाडांच्या मुळावर

प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी वृक्षतोड करण्यास बंदी घातली आहे. हा बंदीचा आदेश झुगारून ठेकेदाराकडून बेसुमार वृक्षतोड केली आहे. ...वाचा सविस्तर
16:34 (IST) 18 Apr 2025

कराड : युवतीची ऑनलाइन आर्थिक फसवणूकप्रकरणी दोघांना अटक

दिन मोहम्मद जाकीर (२७, रा. किनगाव, ता. पुन्हाना, जि. नुह, मेवात, हरियाणा) व आसिफ अली ताहीर हुसेन (२२ रा. खानपूर-घाटी, मेवात, हरियाणा) या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...सविस्तर वाचा
16:29 (IST) 18 Apr 2025

भीम गीत कार्यक्रमातील वादातून तरुणावर जमावाचा सशस्त्र हल्ला

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा जोश सर्वत्र दिसत असताना एका मंडळासमोर भीम गीतांजली कार्यक्रमात गीते सादर करताना उपस्थितांपैकी एका प्रमुख कार्यकर्त्याच्या नावाचा गौरवपूर्ण उल्लेख केल्याने दोन गटात वाद झाला. त्याचे पर्यवसान सशस्त्र हल्ल्यात झाले. याप्रकरणी एका माजी नगरसेवकासह १५ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील देगाव नाका हब्बू वस्तीत रात्री हा प्रकार घडला.

नंदित दत्तात्रय गायकवाड (वय २७, रा. हब्बू वस्ती) असे या सशस्त्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर लोखंडी सळई, लाकूड आणि दगडांनी हल्ला करण्यात आला.

डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळात रात्री भीम गीतांचा कार्यक्रम सुरू असताना गायकाने गीत म्हणताना तेथील एका उपस्थित कार्यकर्त्याच्या नावाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ही बाब काही जणांना खटकली. आम्ही सुद्धा वर्गणी देतो, आमचे नाव गाण्यातून का घेतले जात नाही, असा जाब विचारला गेल्याने गोंधळ उडाला. नंदित गायकवाड यास एका माजी नगरसेवकासह पंधरा जणांनी घेरून त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्याने दिलेले फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सर्व हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हल्लेखोरांपैकी कोणालाही लगेचच अटक झाली नाही.

16:29 (IST) 18 Apr 2025

अक्कलकोटमध्ये कुरनूर धरणातून पाणी सोडल्याने दिलासा

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात धरणातील अपुरा पाणीसाठा लक्षात घेता सोडण्यात आलेले पाणी अत्यल्प असून, ते शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्याबाबत साशंकता वर्तविण्यात येत आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने, तसेच उजनी धरणातून पाणी सोडल्याने सुमारे अडीच टीएमसी क्षमतेचे कुरनूर धरण भरले होते. या धरणावर अक्कलकोट शहरासह लगतची काही गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. धरणातून यापूर्वी गरजेनुसार पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. त्यानंतर आता उन्हाळ्याची तीव्रता वाढली असताना, शेतातील पिके पाण्याअभावी धोक्यात आहेत, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न भेडसावत चालला आहे.

सध्या कुरनूर धरणात फक्त एकूण २८ टक्के पाणीसाठा असून, २० टक्क्यांच्या खाली मृत पाणीसाठा मानला जातो. पाणीसाठा मृत पातळीत गेल्यास धरणातील पाणी शेतीसाठी सोडता येणार नाही. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी हा पाणीसाठा राखून ठेवण्यात येणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तसे आदेश यापूर्वीच दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर धरणातून पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात येत असून, त्यामुळे आठ ते दहा टक्के पाणी संपणार आहे. म्हणजेच धरणातील पाणी मृतसाठ्यात जाणार आहे.

तथापि, सध्या ४३ अंशांपर्यंत तापमानाचा पारा वाढलेला असताना धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणातून सर्व आठ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरले जाण्याची शक्यता दिसून येत नाही. दुसरीकडे प्रखर उन्हाळ्यामुळे काही गावांत पाणीटंचाई प्रकर्षाने जाणवत आहे. तेथे ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. यातच धरणातून सोडलेले पाण्याचे आवर्तन शेवटपर्यंत पोहोचण्याची शक्यता धूसर दिसत असल्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

16:28 (IST) 18 Apr 2025

उदयसिंह उंडाळकरांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, साताऱ्यातील काँग्रेसची स्थिती केविलवाणी

उंडाळकर यांचा हा प्रवेश म्हणजे सातारा जिल्ह्यात अगोदरच अडचणीत आलेल्या काँग्रेस पक्षाला मोठा फटका असल्याचे समजले जाते. ...सविस्तर बातमी
16:26 (IST) 18 Apr 2025

"वैभव नाईकांना दबक्या आवाजात माहिती होती, त्यामुळे मृतदेहाची माहितीही असेल"; बिडवलकर हत्याप्रकरणात निलेश राणेंचा पलटवार

प्रकाश बिडवलकर हत्याप्रकरणाची माहिती तारखेनुसार माहिती सांगतो. वैभव नाईक म्हणाले की दोन वर्षांपूर्वी या प्रकरणाची नोंद झाली होती. परंतु, अशी कोणतीही केस नोंद झाली नव्हती. २०२५ ला पहिल्यांदा गुन्हा नोंद झाला. ९ एप्रिल २०२२५ ला तक्रार गेली, त्याअगोदर २७ फेब्रुवारीला एका डिजिटल चॅनेलवर ही बातमी प्रसिद्ध झाली होती. वैभव नाईकांच्या म्हणण्यांनुसार दोन वर्षांपूर्वीचीही ही केस आहे. "खरंतर दोन वर्षांपूर्वी ही घटना घडली. दबक्या आवाजात तेव्हाही चर्चा होती", असं वैभव नाईक म्हणालेत. दोन वर्षांपूर्वीच तुम्हाला कळलं, तेव्हा तुम्ही आमदार होतात. तुम्ही तेव्हाच आवाज का नाही उचलला? २०२५ ला नातेवाईकांनी तक्रार केली, त्यानंतर वैभव नाईकांनी बिडवलकरचा व्हिडिओ टाकला. ते आधी पोलिसांकडे गेले नाहीत? ते १६ एप्रिलला पोलिसांकडे गेले. जर आपल्याकडे कोणत्याही गुन्ह्याची माहिती आली तर ती पोलिसांना दिली पाहिजे. पण त्यांनी सोशल मीडियावर टाकली.

दोन वर्षांपूर्वी तुम्हाला दबक्या आवाजात माहिती होती, म्हणजे मृतदेह कुठे आहे ते सांगा - निलेश राणे

16:20 (IST) 18 Apr 2025

मृत्युपंथाला लागलेला सोलापूर जिल्हा दूध संघ पुन्हा संचालक मंडळाकडे, प्रशासक नियुक्तीचा निर्णय सहकार विभागाकडून रद्द

जिल्हा दूध संघाचा कारभार पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात गेला असला तरीही यातून कोणतीही सकारात्मकता दृष्टिपथाला येण्याची शक्यता धूसर असल्याचे सहकार वर्तुळात बोलले जात आहे. ...अधिक वाचा
15:34 (IST) 18 Apr 2025

सांगली बाजार समितीचे त्रिभाजन; जत, कवठेमहांकाळसाठी स्वतंत्र बाजार समिती

शासनाच्या या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी सांगितले. ...वाचा सविस्तर
15:16 (IST) 18 Apr 2025

आई-वडिलांना त्रास देणाऱ्या भावाचा खून

कार्तिक नामदेव यादव (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा धाकटा भाऊ तुषार (वय २४) यास पोलिसांनी अटक केली असून, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. ...सविस्तर वाचा
15:03 (IST) 18 Apr 2025

गिरीश फोंडेंवरील निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा

कोल्हापूर : वादग्रस्त विधान केल्याने निलंबित करण्यात आलेले कोल्हापूर महापालिकेचे सहायक शिक्षक गिरीश फोंडे यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी या मागणीसाठी गुरुवारी इंडिया आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व कर्जमाफीसाठी फोंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी चित्रफीत अग्रेषित केली होती. त्यामध्ये प्रक्षोभक विधान असल्याचा ठपका ठेवून महापालिकेने फोंडे यांना तडकाफडकी निलंबित केले होते. ही कारवाई राजकीय अकसातून केल्याची टीका विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केली होती.

आज इंडिया आघाडीतील घटक पक्ष, शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कामगार संघटना कृती समिती, विद्यार्थी संघटना कृती समिती आदींच्या वतीने कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर महापालिकेवर मोर्चा काढला. मुस्कटदाबी करणाऱ्या शासनाचा निषेध असो, शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.

माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संपत पवार पाटील, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड आदींचे भाषण झाले. शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देऊन निलंबन कारवाई रद्द न केल्यास महापालिकेचे शिक्षक संपावर जातील, असा इशारा दिला.

15:03 (IST) 18 Apr 2025

इचलकरंजीत सात महिलांविरोधात गुन्हा

कोल्हापूर : इचलकरंजी येथे गावभाग पोलीस ठाण्यातच आर्थिक देवाणघेवाणीतून महिला एकमेकांना भिडल्या. पोलिसांनी जमावबंदी आदेशाबाबत कल्पना देऊनही त्या ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात ७ महिलांच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.

पद्मजा इंगवले आणि सुदर्शना ऊर्फ गंगा कांबळे यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाला होता. तो पोलीस ठाण्यात पोहचला. कांबळे - इंगवले यांच्यासह अन्य महिला ठाण्यातच शिवीगाळ करत एकमेकींच्या अंगावर हातात चपला घेऊन धावून गेल्या. पोलिसांनी त्यांना जमावबंदी आदेश लागू असल्याची कल्पना देऊनही त्या एकमेकांना चोप देत राहिल्या.

या घटनेप्रकरणी पोलीस रामा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पद्मजा इंगवले, गंगा कांबळे, अश्विनी कुबडगे, यास्मिन सनदी, जोस्ना भिसे, सावित्री हजारे, सपना भिसे या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15:01 (IST) 18 Apr 2025

इचलकरंजीत सात महिलांविरोधात गुन्हा

कोल्हापूर : इचलकरंजी येथे गावभाग पोलीस ठाण्यातच आर्थिक देवाणघेवाणीतून महिला एकमेकांना भिडल्या. पोलिसांनी जमावबंदी आदेशाबाबत कल्पना देऊनही त्या ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात ७ महिलांच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.

पद्मजा इंगवले आणि सुदर्शना ऊर्फ गंगा कांबळे यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाला होता. तो पोलीस ठाण्यात पोहचला. कांबळे - इंगवले यांच्यासह अन्य महिला ठाण्यातच शिवीगाळ करत एकमेकींच्या अंगावर हातात चपला घेऊन धावून गेल्या. पोलिसांनी त्यांना जमावबंदी आदेश लागू असल्याची कल्पना देऊनही त्या एकमेकांना चोप देत राहिल्या.

या घटनेप्रकरणी पोलीस रामा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पद्मजा इंगवले, गंगा कांबळे, अश्विनी कुबडगे, यास्मिन सनदी, जोस्ना भिसे, सावित्री हजारे, सपना भिसे या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14:46 (IST) 18 Apr 2025

Maharashtra Live News :

राज्य शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची करण्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून घाटकोपरमध्ये मनसेने निदर्शने केली आहेत.

14:21 (IST) 18 Apr 2025

जळगाव जिल्ह्यात बालिकेचा जीव घेणारा बिबट्या जेरबंद

घटनेच्या २४ तासाच्या आत बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ...वाचा सविस्तर
14:14 (IST) 18 Apr 2025

जळगावात हप्ते वसुली, आरोपींशी पोलीस अधिकाऱ्यांचे लागेबांधे…उपनिरीक्षकासह दोन पोलिसांवर कारवाई

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणताच धाक न राहिल्याने जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी सर्रास लाच व हप्तेखोरी करताना आढळून येत असल्याने एकूणच पोलीस दलाच्या कार्यपद्धतीविषयी नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ...सविस्तर बातमी
14:01 (IST) 18 Apr 2025

‘अभियांत्रिकी’च्या संख्येत मराठवाड्यापेक्षा विदर्भ पुढे, लातूरच्या तंत्रनिकेतनचा प्रश्न मार्गी, पण जालना लटकले

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संख्येमध्ये मराठवाड्याचा ‘अनुशेष’ ठेवून विदर्भ एक पाऊल पुढेच राहील, याची खबरदारी घेतली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...सविस्तर वाचा
13:52 (IST) 18 Apr 2025

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या कार्यालयात कोयता घेऊन प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील महावितरणच्या दोन कार्यालयांमध्ये कोयता हातात घेऊन दहशत माजवणारा आणि कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी शेख कैसर शेख युनूसवर जिन्सी व क्रांती चौक पोलीस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील माहिती महावितरणकडून देण्यात आली.

महावितरणच्या क्रांती चौक शाखा कार्यालयांत कनिष्ठ अभियंता सनी लंगोटे १५ एप्रिल रोजी दुपारी कामकाज करत होते. त्यावेळी शेख कैसर हा तिथे आला आणि ‘तुम्ही माझ्या गल्लीतील मीटर का काढले’ असे म्हणत लंगोटेंना शिवीगाळ केली. त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता ‘तुम्हाला बघून घेईन व तुमचे मुंडके कापून टाकीन’ अशी धमकी कैसरने लंगोटेंना दिली.

याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात लंगोटेंच्या तक्रारीवरून शेख कैसरवर गुन्हा दाखल आहे. त्यानंतर शेख कैसर अहिंसानगर शाखा कार्यालयात गेला. तेथे प्रधान तंत्रज्ञ कैलास पवार यांच्यासह अनेक कर्मचारी होते. त्यावेळी शेख कैसरने हातात कोयता घेऊन आरडाओरड केली. कर्मचाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यासंदर्भातील तक्रार प्रधान तंत्रज्ञ कैलास पवार यांनी जिन्सी ठाण्यात नाेंदवली.

13:51 (IST) 18 Apr 2025

नांदेड : पाणीपुरी खाल्ल्याने ३० विद्यार्थ्यांना विषबाधा

नांदेड : नांदेड शहरालगत असलेल्या विष्णुपुरी परिसरातील एका पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ३० ते ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.

नांदेड शहरालगत विष्णुपुरी येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालय यासह काही खासगी काॅलेज व शिकवणी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहेत. शैक्षणिक केंद्र म्हणून या परिसराची ओळख झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांतील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी राहतात.

या भागात छोटे-मोठी हाॅटेल, खानावळ, वेगवेगळे चाट भांडार, तसेच अनेक उपाहारगृह आहेत. काल, बुधवारी काही विद्यार्थ्यांनी एका पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरीचा आस्वाद घेतला. पण काही वेळाने त्यांना उल्टी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. सहकारी विद्यार्थ्यांच्या मदतीने या सगळ्यांना विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर रुग्ण आल्याने तारांबळ उडाली होती. पण उपस्थित डाॅक्टरांनी योग्य उपचार केल्याने सर्वांची प्रकृती स्थिर झाली. काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले, तर काही विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. संबंधित पाणीपुरीचालकावर गुन्हा दाखल करून अन्न व औषध प्रशासनाने सर्व नमुने तपासावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Mumbai News Live Today in Marathi

Mumbai-Maharashtra News Live Today 18 April 2025 : राज्यातील घडामोडी वाचा एका क्लिकवर