Maharashtra News Updates: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात एकीकडे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना दिसत असताना दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापू लागलं आहे. ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने ही निवडणूक होणार असून सर्वच पक्षांनी आपापल्या विधानसभ आमदारांना क्रॉसव्होटिंगपासून दूर ठेवण्यासाठी ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच अधिवेशनात वरळी हिट अँड रन प्रकरणाचे पडसादही उमटताना पाहायला मिळत आहेत.

Live Updates

Maharashtra News Today Live Updates: राज्य विधिमंडळ अधिवेशनातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

19:40 (IST) 10 Jul 2024
‘गिरीश महाजनांना अधूनमधून वळवळ होते’, मनोज जरांगेंची टीका

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज धाराशिव जिल्ह्यात जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना काही मंत्र्यांनाही लक्ष्य केले. यावेळी गिरीश महाजन यांचा उल्लेख करत असताना ते म्हणाले की, त्यांना अधूनमधून वळवळ होते. जामनेर विधानसभेत १ लाख ३६ हजार कुणबी मराठे आहेत. ते कुणबी जरी असले तरी आमचे पाव्हणे आहेत. तिथले लोक मला येऊन भेटले, ते म्हणाले, यावेळी याचा टांगा पलटी करतो. त्यामुळे मराठ्यांच्या नादी लागू नका, असे आव्हानच जरांगे यांनी दिले.

19:19 (IST) 10 Jul 2024
शेगावच्या राजाचे सोलापूर शहरात थाटात स्वागत

सोलापूर : आषाढी यात्रेसाठी विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी बाळगून दूर अंतरावरून पायी चालत निघालेल्या श्रीक्षेत्र संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी सकाळी तुळजापूरमार्गे सोलापूर शहरात दाखल झाला. रुपाभवानी मंदिराजवळील पाणी गिरणी चौकात पालखी सोहळ्याचे प्रमुख लोकप्रतिनिधी व प्रशासनासह हजारो भाविकांनी भक्तिभावाने स्वागत केले.

19:02 (IST) 10 Jul 2024
"अमृतावहिनी जशा...", तेजस ठाकरेंच्या नृत्यानंतर सुषमा अंधारेंची टीका

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा अनंत अंबानीच्या संगीत समारंभातील नृत्याचा व्हिडीओ पोस्ट करून टीका केली होती. या टीकेला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "तोरणादारी/मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो.. हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे. अमृतावहिनी जशा राजकारणात नाहीत. त्यांना वैयक्तिक आयुष्य, जगण्याचा अधिकार आहे. तसंच आहे ते. बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का?

https://twitter.com/andharesushama/status/1810962198375923733

18:55 (IST) 10 Jul 2024
कोल्हापुरात आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन ; पालकमंत्र्यांचे मार्ग काढण्याचे आश्वासन

कोल्हापूर : आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश झाले आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे याचे लाभ मिळत नसल्याने बुधवारी या प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन छेडले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कृष्णा खोरे मंडळाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्प रखडला आहे आणि प्रकल्पग्रस्तांचीही वाताहत होत आहे. या प्रकल्पात ८२२ प्रकल्पग्रस्त असून ३५५ शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या असता त्यांना लाख ते दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.जमीन द्यायला विरोध केलाअशांना हेक्टरी ३५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. असा भेदभाव झाला असल्याने प्रकल्पग्रस्त सतत आंदोलन करत आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर रास्त नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश देऊनही ती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.प्रशासनाच्या निषेधार्थ जलसमाधी घेण्यासाठी प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने धरण स्थळावर जमले होते. उप विभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार समीर माने पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पाटबंधारे उपयोगी अधिकारी आदिनाथ फडतरे यांच्यासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

18:01 (IST) 10 Jul 2024
सोलापूर : उजनी धरणात महिनाभरात १३ टीएमसी पाणीसाठा वधारला, पावसाचा आशा-निराशेचा खेळ सुरूच

सोलापूर : भीमा खोऱ्यात अधुनमधून कमीजास्त पडणाऱ्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात मागील महिनाभरात १३ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे. वजा पातळीवर तब्बल ६० टक्क्यांपर्यंत खालावलेल्या धरणात सध्या वजा ३७.७५ टक्के पाणीसाठा आहे. त्यात कासवगतीने का होईना, वाढ होऊ लागल्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रासह सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र भीमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसात सातत्य नसल्यामुळे अजूनही धरण वधारण्याच्या अनुषंगाने सतत पावसाची गरज आहे.

सविस्तर वाचा....

17:30 (IST) 10 Jul 2024
Maharashtra News Live Updates: विरोधकांचा बोलवता धनी कोण? आशिष शेलार यांचा विधानसभेत सवाल!

विरोधकांचा बोलवता धनी कोण?

https://twitter.com/ShelarAshish/status/1810939836070494590

17:21 (IST) 10 Jul 2024
भूकंप मराठवाड्यात, हादरे बुलडाणा जिल्ह्यात!

बुलढाणा : मराठवाड्यातील भूकंपाचे धक्के बुलढाणा जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यातील अनेक गावांत जाणवल्याचे वृत्त आहे. यामुळे हजारो गावकरी भयभीत झाले. मात्र, भूकंप दूरवरच्या हिंगोली जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाल्यावर स्थानिक प्रशासन आणि गावखेड्यातील गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

सविस्तर वाचा

17:21 (IST) 10 Jul 2024
सासुच्या छळाने त्रस्त पोलीस पत्नीची कल्याणमध्ये आत्महत्या

कल्याण - चार महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या जळगाव जिल्ह्यातील एका महिलेने कल्याणमध्ये सासरच्या घरी सासुच्या सततचा त्रास, हुंड्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी आणि त्याला मुंबई पोलीस दलात पोलीस असलेल्या पतीची साथ अशा अनेक कारणांमधून २४ वर्षाच्या विवाहितेने आपल्या कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी भागातील राहत्या घरी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सविस्तर वाचा

17:18 (IST) 10 Jul 2024
नवी मुंबई : अवैध वाहतूक करणाऱ्या एक हजार वाहनांवर कारवाई, पन्नास लाख रुपयांहून अधिक रकमेची दंडवसुली

नवी मुंबई : अवैध प्रवासी वाहतूक, अवैध मालवाहतूक, मद्य पिऊन वाहन चालवणे, भरधाव वाहने हाकणे असे प्रकार करून कायद्याचा भंग करणाऱ्या एक हजारहून अधिक वाहनांवर नवी मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली असून त्यातून तब्बल ५० लाख रुपयांहून अधिक दंडवसुली केली आहे.

सविस्तर वाचा....

17:06 (IST) 10 Jul 2024
नवी मुंबई : दंड कमी करण्यासाठी वाहनचालकांची लोकअदालतीमध्ये धाव

नवी मुंबई : केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्यामुळे दंडाची रक्कम वाढली आहे. त्यामुळे वाहतूक नियम तोडल्यानंतर आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम लोकअदालतमध्ये ५० टक्के कमी करावी म्हणून २३० वाहनचालकांनी अर्ज भरले.

सविस्तर वाचा....

16:52 (IST) 10 Jul 2024
मुंबई : दुय्यम अभियंत्यांनी अधिक सक्रियपणे खड्डे शोधून भरावेत, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश

मुंबईः मुंबईत एका दिवसात अवघ्या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सखल भागात जोरदार पावसामुळे पाणी साचले. परिणामी, काही रस्ते खरबडीत होण्याची, तर काही ठिकाणी खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पालिकेच्या २२७ प्रभागातील दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या क्षेत्रात स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे दौरे करून खड्डे शोधावेत आणि खड्डे छोट्या आकारांचे असतानाच ते भरावेत. पावसाची उघडीप मिळताच खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत रस्ते सुस्थितीत ठेवावेत, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

सविस्तर वाचा....

16:30 (IST) 10 Jul 2024
नवी मुंबई : महापालिकेत भटक्या श्वानांचा वावर, सर्व प्रवेशद्वारांवर सुरक्षा रक्षक, नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : राज्यातील सर्वात आकर्षक मनपा मुख्यालयांपैकी नवी मुंबई मनपा मुख्यालयाचा आवर्जून उल्लेख केला जातो. मात्र आता याच मुख्यालयात भटक्या श्वानांचा मुक्त वावर असून ८ ते १० श्वान पार्किंगमध्ये फिरत असतात.

सविस्तर वाचा....

16:30 (IST) 10 Jul 2024
कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेतील सहायक आयुक्त सुनील तांबे यांची बदली; काय आहे कारण?

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरण, तसेच अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांचे विशेष शाखेत बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...

16:30 (IST) 10 Jul 2024
‘कमला मिल’च्या रमेश गोवानी यांना अटक

मुंबई : खार येथील एका व्यावसायिकाची ६७ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कमला मिल्स कंपाऊंडचे मालक व बांधकाम व्यावसायिक रमेश गोवानी (६०) यांना अटक केली आहे.

सविस्तर वाचा....

16:20 (IST) 10 Jul 2024
Mumbai News Update: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीरला पोलीस कोठडी

वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने मिहीरला पुढील तपासासाठी १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

16:15 (IST) 10 Jul 2024
पोलीस पाटलांंच्या भरतीचा गैरव्यवहार पोहोचला काेर्टात....कमी गुण घेणाऱ्यांना मौखिक परीक्षेत....

भंडारा: भंडारा उपविभागांतर्गत भंडारा आणि पवनी तालुक्यात रिक्त असलेल्या ४८ पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया २०२३ मध्ये राबविण्यात आली होती. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शारदा बुधे यांच्यासह दहा उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

सविस्तर वाचा

16:15 (IST) 10 Jul 2024
घरी रुग्णाना बेड, प्राणवायू सिलेंडर, साहित्य हवे....मग, उचला फोन आणि या क्रमांकावर.....

नागपूर: वैद्यकीय उपचाराचा खर्च वाढल्याने कुणी आजारी पडल्यास कुटुंब आर्थिक कोंडीत सापडते. काही रुग्णांना घरात उपचाराचीही गरज भासते. या रुग्णांसाठी रुग्णशय्या (बेड), प्राणवायू सिलेंडर वा इतरही साहित्याची गरज भासते. हे साहित्य खूप महाग असल्याने सर्वांनाच खरेदी करता येत नाही. या रुग्णांसाठी नागपुरात सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य प्रकल्पाद्वारे मदतीचा हात दिला जात आहे.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 10 Jul 2024
दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याची मागणी का होते आहे? नेमके कारण...

नागपूर : राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचे नामांतर 'चैत्यभूमी’ करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सभागृहात केली.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 10 Jul 2024
भूकंपांचे हादरे अन् नागरिकांची पळापळ; उमरखेड, पुसद भागात...

यवतमाळ: जिल्ह्यातील उमरखेड , पुसद भागात आज बुधवारी भूकंपांचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ७.१५ वाजता गडगड आवाज करत जमीन हादरली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे.

सविस्तर वाचा

13:36 (IST) 10 Jul 2024
Maharashtra News Live Updates: शिंदे गट आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण, अभिषेक मनु सिंघवींनी सुनावणीची केली विनंती, १९ जुलै रोजी होणार पुढील सुनावणी!

https://twitter.com/LiveLawIndia/status/1810905075021181167

13:34 (IST) 10 Jul 2024
Maharashtra News Live Updates: राहुल नार्वेकरांच्या दालनात बैठक सुरू

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीसाठी उपस्थित.

13:26 (IST) 10 Jul 2024
Mumbai News Update: राजेश शाह यांना शिवसेनेनं उपनेतेपदावरून हटवलं

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटानं उपनेते पदावरून हटवलं आहे.

13:21 (IST) 10 Jul 2024
Maharashtra News Live Updates: विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

एकीकडे विधानसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ झालेला असताना दुसरीकडे विधानपरिषदेतही तेच चित्र दिसून आलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळामुळे विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याच मुद्द्यावरून विधानसभेचं कामकाज आधी ५ मिनिटं, नंतर १० मिनिटं आणि तिसऱ्यांदा थेट पाऊण तासासाठी तहकूब करावं लागलं.

13:17 (IST) 10 Jul 2024
११२ दुकानांसाठी विक्रमी बोली; म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या तिजोरीत जमा होणार १७१ कोटी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ई लिलावात १७३ पैकी ११२ दुकानांसाठी बोली लागली आहे. तर ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. असे असले तरी ११२ दुकानांच्या ई लिलावाला विक्रमी बोली लागली आहे. मुंबई मंडळाने ९७ कोटी ७४ लाख रुपये अशी बोली निश्चित केली असताना प्रत्यक्षात ११२ दुकानांसाठी १७१ कोटी ३८ लाख रुपयांची बोली लागली आहे.

सविस्तर वाचा

12:59 (IST) 10 Jul 2024
खुशखबर... 'बामणी प्रोटीन्स' कंपनी लवकरच सुरू होणार;  शेकडो कामगारांना दिलासा

चंद्रपूर : महाराष्ट्राचे सरकार गतिशील आणि कृतिशील आहे, काळजी करू नका, तुमची कंपनी लवकरच सुरू होईल, असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन्स कंपनीच्या शेकडो कामगारांना दिलासा मिळाला आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनीच्या संचालकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करून आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे आणि कंपनी लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या.

सविस्तर वाचा

12:54 (IST) 10 Jul 2024
खुशखबर... 'बामणी प्रोटीन्स' कंपनी लवकरच सुरू होणार;  शेकडो कामगारांना दिलासा

चंद्रपूर : महाराष्ट्राचे सरकार गतिशील आणि कृतिशील आहे, काळजी करू नका, तुमची कंपनी लवकरच सुरू होईल, असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन्स कंपनीच्या शेकडो कामगारांना दिलासा मिळाला आहे.

सविस्तर वाचा

12:41 (IST) 10 Jul 2024
Maharashtra News Live Updates: विधानसभेचं कामकाज मराठा आरक्षणावरून तहकूब

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याचं दिसून आलं. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांना लक्ष्य केल्यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हाच गोंधळ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भाषणावेळीही पाहायला मिळाला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काही काळासाठी सभागृह तहकूब केलं.

12:30 (IST) 10 Jul 2024
वर्धा: श्रेयवादात खासदार एक पाऊल पुढेच! मध्यरात्रीच मेगाब्लॉक व गर्डर लॉंचिंग..

वर्धा : वाहतुकीची कोंडी होत असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक असलेल्या बजाज चौकात उड्डाण पूल आवश्यक ठरला होता.तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांनी तशी भूमिका मांडत मंजुरी मिळविली. मात्र काम पुढे सरकेना. मगा खासदार रामदास तडस हे दहा वर्ष यासाठी प्रयत्नशील राहले. पण तरीही काम मार्गी लागले नाही. प्रश्न गर्डर  लॉंचिंगचा राहला.

सविस्तर वाचा

12:09 (IST) 10 Jul 2024
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात का होतेय घट? राज्यातील 'प्लेसमेंट'चा टक्का ...

नागपूर : गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणामध्ये राज्यात नव्या संस्थांची सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांचा ओढा व्यावसायिक शिक्षणाकडे वाढला असताना प्लेसमेंटमध्ये मात्र, राज्याचा आकडा सातत्याने माघारत चालल्याचे दिसते. विशेष म्हणजे, गेल्या २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ या वर्षीत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्लेसमेंटमध्ये वीस हजारांची घट नोंदविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

सविस्तर वाचा

11:50 (IST) 10 Jul 2024
डोंबिवली एमआयडीसीतील न्यूओ ऑर्गेनिकच्या कंपनी मालकावर आगी प्रकरणी गुन्हा

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसीतील न्यूओ ऑरगेनिक केमिकल कंपनीतील आग प्रकरणी मानपाडा पोलिसांनी निष्काळीपणाचा ठपका ठेवत या कंपनीचे मालक, चालक आणि व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी या कंपनीत शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली होती.

सविस्तर वाचा

Maharashtra Live Updates

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Maharashtra News Today Live Updates: राज्य विधिमंडळ अधिवेशनातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Story img Loader