Maharashtra News Updates: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात एकीकडे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना दिसत असताना दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापू लागलं आहे. ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने ही निवडणूक होणार असून सर्वच पक्षांनी आपापल्या विधानसभ आमदारांना क्रॉसव्होटिंगपासून दूर ठेवण्यासाठी ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच अधिवेशनात वरळी हिट अँड रन प्रकरणाचे पडसादही उमटताना पाहायला मिळत आहेत.
Maharashtra News Today Live Updates: राज्य विधिमंडळ अधिवेशनातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज धाराशिव जिल्ह्यात जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना काही मंत्र्यांनाही लक्ष्य केले. यावेळी गिरीश महाजन यांचा उल्लेख करत असताना ते म्हणाले की, त्यांना अधूनमधून वळवळ होते. जामनेर विधानसभेत १ लाख ३६ हजार कुणबी मराठे आहेत. ते कुणबी जरी असले तरी आमचे पाव्हणे आहेत. तिथले लोक मला येऊन भेटले, ते म्हणाले, यावेळी याचा टांगा पलटी करतो. त्यामुळे मराठ्यांच्या नादी लागू नका, असे आव्हानच जरांगे यांनी दिले.
सोलापूर : आषाढी यात्रेसाठी विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी बाळगून दूर अंतरावरून पायी चालत निघालेल्या श्रीक्षेत्र संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी सकाळी तुळजापूरमार्गे सोलापूर शहरात दाखल झाला. रुपाभवानी मंदिराजवळील पाणी गिरणी चौकात पालखी सोहळ्याचे प्रमुख लोकप्रतिनिधी व प्रशासनासह हजारो भाविकांनी भक्तिभावाने स्वागत केले.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा अनंत अंबानीच्या संगीत समारंभातील नृत्याचा व्हिडीओ पोस्ट करून टीका केली होती. या टीकेला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “तोरणादारी/मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो.. हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे. अमृतावहिनी जशा राजकारणात नाहीत. त्यांना वैयक्तिक आयुष्य, जगण्याचा अधिकार आहे. तसंच आहे ते. बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का?
तोरणादारी/मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात असो हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे.
— SushmaTai Andhare? (@andharesushama) July 10, 2024
अमृताहिनी जशा राजकारणात नाहीत. त्यांना वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तसंच आहे ते.
बाय द वे तुम्हाला भांडी घासायलाही बोलावलं नाही का ?
@ShivSenaUBT_ @ShelarAshish https://t.co/vFThIAV3FU
कोल्हापूर : आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश झाले आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे याचे लाभ मिळत नसल्याने बुधवारी या प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन छेडले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कृष्णा खोरे मंडळाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्प रखडला आहे आणि प्रकल्पग्रस्तांचीही वाताहत होत आहे. या प्रकल्पात ८२२ प्रकल्पग्रस्त असून ३५५ शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या असता त्यांना लाख ते दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.जमीन द्यायला विरोध केलाअशांना हेक्टरी ३५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. असा भेदभाव झाला असल्याने प्रकल्पग्रस्त सतत आंदोलन करत आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर रास्त नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश देऊनही ती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.प्रशासनाच्या निषेधार्थ जलसमाधी घेण्यासाठी प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने धरण स्थळावर जमले होते. उप विभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार समीर माने पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पाटबंधारे उपयोगी अधिकारी आदिनाथ फडतरे यांच्यासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सोलापूर : भीमा खोऱ्यात अधुनमधून कमीजास्त पडणाऱ्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात मागील महिनाभरात १३ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे. वजा पातळीवर तब्बल ६० टक्क्यांपर्यंत खालावलेल्या धरणात सध्या वजा ३७.७५ टक्के पाणीसाठा आहे. त्यात कासवगतीने का होईना, वाढ होऊ लागल्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रासह सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र भीमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसात सातत्य नसल्यामुळे अजूनही धरण वधारण्याच्या अनुषंगाने सतत पावसाची गरज आहे.
विरोधकांचा बोलवता धनी कोण?
विरोधकांचा 'बोलवता धनी' कोण?
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 10, 2024
मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याबाबतीत सर्वपक्षीय बैठक ठरलेली असताना विरोधक कोणत्या कारणाने त्यात गैरहजर राहतात असा खडा सवाल आज आम्ही सभागृहात विचारला. समाज आंदोलन करत असताना, आपल्याकडून न्यायाची अपेक्षा करत असताना हेच कैवार दाखवणारे विरोधक… pic.twitter.com/PtzaUaxJoX
बुलढाणा : मराठवाड्यातील भूकंपाचे धक्के बुलढाणा जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यातील अनेक गावांत जाणवल्याचे वृत्त आहे. यामुळे हजारो गावकरी भयभीत झाले. मात्र, भूकंप दूरवरच्या हिंगोली जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाल्यावर स्थानिक प्रशासन आणि गावखेड्यातील गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
कल्याण – चार महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या जळगाव जिल्ह्यातील एका महिलेने कल्याणमध्ये सासरच्या घरी सासुच्या सततचा त्रास, हुंड्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी आणि त्याला मुंबई पोलीस दलात पोलीस असलेल्या पतीची साथ अशा अनेक कारणांमधून २४ वर्षाच्या विवाहितेने आपल्या कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी भागातील राहत्या घरी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
नवी मुंबई : अवैध प्रवासी वाहतूक, अवैध मालवाहतूक, मद्य पिऊन वाहन चालवणे, भरधाव वाहने हाकणे असे प्रकार करून कायद्याचा भंग करणाऱ्या एक हजारहून अधिक वाहनांवर नवी मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली असून त्यातून तब्बल ५० लाख रुपयांहून अधिक दंडवसुली केली आहे.
नवी मुंबई : केंद्रीय सुधारित मोटार वाहन कायद्यामुळे दंडाची रक्कम वाढली आहे. त्यामुळे वाहतूक नियम तोडल्यानंतर आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम लोकअदालतमध्ये ५० टक्के कमी करावी म्हणून २३० वाहनचालकांनी अर्ज भरले.
मुंबईः मुंबईत एका दिवसात अवघ्या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सखल भागात जोरदार पावसामुळे पाणी साचले. परिणामी, काही रस्ते खरबडीत होण्याची, तर काही ठिकाणी खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पालिकेच्या २२७ प्रभागातील दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या क्षेत्रात स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे दौरे करून खड्डे शोधावेत आणि खड्डे छोट्या आकारांचे असतानाच ते भरावेत. पावसाची उघडीप मिळताच खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत रस्ते सुस्थितीत ठेवावेत, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
नवी मुंबई : राज्यातील सर्वात आकर्षक मनपा मुख्यालयांपैकी नवी मुंबई मनपा मुख्यालयाचा आवर्जून उल्लेख केला जातो. मात्र आता याच मुख्यालयात भटक्या श्वानांचा मुक्त वावर असून ८ ते १० श्वान पार्किंगमध्ये फिरत असतात.
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरण, तसेच अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेतील सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांचे विशेष शाखेत बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई : खार येथील एका व्यावसायिकाची ६७ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कमला मिल्स कंपाऊंडचे मालक व बांधकाम व्यावसायिक रमेश गोवानी (६०) यांना अटक केली आहे.
वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने मिहीरला पुढील तपासासाठी १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भंडारा: भंडारा उपविभागांतर्गत भंडारा आणि पवनी तालुक्यात रिक्त असलेल्या ४८ पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया २०२३ मध्ये राबविण्यात आली होती. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शारदा बुधे यांच्यासह दहा उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
नागपूर: वैद्यकीय उपचाराचा खर्च वाढल्याने कुणी आजारी पडल्यास कुटुंब आर्थिक कोंडीत सापडते. काही रुग्णांना घरात उपचाराचीही गरज भासते. या रुग्णांसाठी रुग्णशय्या (बेड), प्राणवायू सिलेंडर वा इतरही साहित्याची गरज भासते. हे साहित्य खूप महाग असल्याने सर्वांनाच खरेदी करता येत नाही. या रुग्णांसाठी नागपुरात सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य प्रकल्पाद्वारे मदतीचा हात दिला जात आहे.
नागपूर : राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचे नामांतर ‘चैत्यभूमी’ करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सभागृहात केली.
यवतमाळ: जिल्ह्यातील उमरखेड , पुसद भागात आज बुधवारी भूकंपांचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ७.१५ वाजता गडगड आवाज करत जमीन हादरली. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण, अभिषेक मनु सिंघवींनी सुनावणीची केली विनंती, १९ जुलै रोजी होणार पुढील सुनावणी!
#SupremeCourt #Mentioning
— Live Law (@LiveLawIndia) July 10, 2024
Sr Adv Dr AM Singhvi mentions Uddhav Sena's plea challenging Maharashtra assembly speaker's refusal to disqualify members belonging to the Eknath Shinde-led group#ShivSena pic.twitter.com/n46oQeIFv7
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीसाठी उपस्थित.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटानं उपनेते पदावरून हटवलं आहे.
एकीकडे विधानसभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ झालेला असताना दुसरीकडे विधानपरिषदेतही तेच चित्र दिसून आलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळामुळे विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याच मुद्द्यावरून विधानसभेचं कामकाज आधी ५ मिनिटं, नंतर १० मिनिटं आणि तिसऱ्यांदा थेट पाऊण तासासाठी तहकूब करावं लागलं.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ई लिलावात १७३ पैकी ११२ दुकानांसाठी बोली लागली आहे. तर ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. असे असले तरी ११२ दुकानांच्या ई लिलावाला विक्रमी बोली लागली आहे. मुंबई मंडळाने ९७ कोटी ७४ लाख रुपये अशी बोली निश्चित केली असताना प्रत्यक्षात ११२ दुकानांसाठी १७१ कोटी ३८ लाख रुपयांची बोली लागली आहे.
चंद्रपूर : महाराष्ट्राचे सरकार गतिशील आणि कृतिशील आहे, काळजी करू नका, तुमची कंपनी लवकरच सुरू होईल, असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन्स कंपनीच्या शेकडो कामगारांना दिलासा मिळाला आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनीच्या संचालकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करून आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे आणि कंपनी लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या.
चंद्रपूर : महाराष्ट्राचे सरकार गतिशील आणि कृतिशील आहे, काळजी करू नका, तुमची कंपनी लवकरच सुरू होईल, असे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन्स कंपनीच्या शेकडो कामगारांना दिलासा मिळाला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याचं दिसून आलं. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांना लक्ष्य केल्यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हाच गोंधळ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भाषणावेळीही पाहायला मिळाला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काही काळासाठी सभागृह तहकूब केलं.
वर्धा : वाहतुकीची कोंडी होत असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक असलेल्या बजाज चौकात उड्डाण पूल आवश्यक ठरला होता.तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांनी तशी भूमिका मांडत मंजुरी मिळविली. मात्र काम पुढे सरकेना. मगा खासदार रामदास तडस हे दहा वर्ष यासाठी प्रयत्नशील राहले. पण तरीही काम मार्गी लागले नाही. प्रश्न गर्डर लॉंचिंगचा राहला.
नागपूर : गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणामध्ये राज्यात नव्या संस्थांची सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांचा ओढा व्यावसायिक शिक्षणाकडे वाढला असताना प्लेसमेंटमध्ये मात्र, राज्याचा आकडा सातत्याने माघारत चालल्याचे दिसते. विशेष म्हणजे, गेल्या २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ या वर्षीत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्लेसमेंटमध्ये वीस हजारांची घट नोंदविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील न्यूओ ऑरगेनिक केमिकल कंपनीतील आग प्रकरणी मानपाडा पोलिसांनी निष्काळीपणाचा ठपका ठेवत या कंपनीचे मालक, चालक आणि व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी या कंपनीत शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली होती.