Mumbai rains Updates : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे आजही हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु, मुंबईसह आजूबाजूच्या शहरांतही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. परंतु, अनेक ठिकाणी निरभ्र आभाळ आहे. असं असलं तरीही मुंबई लोकल उशिराने धावत आहेत. १५-२० मिनिटांनी लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यास उशीर झाला आहे. तर, दुसरीकडे मुंबईतील हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी मिहीर शाहाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत कविता नाखवांच्या पतीची आणि लेकीची हृदयद्रावक प्रतिक्रियाही समोर आली आहे.
विधान परिषदेतील कामकाज पाहा.
विधान सभेचं कामकाज पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ०.८ मि. मी. पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक १६.१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या १३ जून रोजी शेगाव येथून प्रस्थान ठेवलेला हा पालखी सोहळा सुमारे ७५० किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जाणार आहे.
घराचे कुलूप तोडून आत जाऊन पाहाणी केली असता, घरात प्रियंकाचा मृतदेह अर्धवट कुजलेला आणि अर्धनग्न अवस्थेत असल्याचे आढळून आले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. थोड्याच वेळात मुंबईत सर्वपक्षीय बैठक सुरु होणार आहे. मात्र, या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते गैरहजर राहण्याची शक्यता आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सभागृहातच चर्चा करावी, असं विरोधकांचं म्हणणं आहे.
संगीता बिराजदार हिने पीडित तरूणीला भेटून, तुला काम देते, त्याबद्दल ५० हजार रूपये देते. पण मी जे काम सांगेन, ते करावे लागेल, अशी अट घातली.
ठाण्यातील एका महिलेने बँकेतून कोणतेही कर्ज घेतलेले नसतानाही तिला कर्ज वसुली प्रतिनिधीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती.
सिडकोतील नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या २२ वर्षाच्या युवतीवर ओळखीच्या युवकाने मित्र आणि मैत्रिणीला बरोबर घेत अत्याचार केला.
विधान परिषदेत भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत लक्षवेधी प्रश्न मांडला होता.
मी रडलेले आईला आवडणार नाही. त्यामुळे मी माझं रडणं आवरतेय. पण मी स्वतःला थांबवू शकत नाहीय. मला माझी आई परत हवीय. ती माझ्यासाठी सर्वकाही होती. ती सर्वांसाठी सर्वकाही होती. मला माझी आई परत हवीय. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही – मृत कविता नाखवा यांची मुलगी
Mumbai Police arrest BMW hit and run accused Mihir Shah along with 12 more people from Shahpur..
— Sunaina Holey ( Modi Ka Parivar ) (@SunainaHoley) July 9, 2024
Mihir Shah was absconding since 3 days..
I am sure @Dev_Fadnavis & @mieknathshinde will not leave any stone unturned to punish this coward mur derer no matter who he is and which… pic.twitter.com/nQXGkbyTc2
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुटी जाहीर केली.
सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरात जलनिस्सारणच्या प्रश्नाकडे या पुर्वी दुर्लक्ष झाले असले तरी प्राधान्याने हे प्रश्न कायमचे निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ पिता पुत्राने धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली.
कल्याण – उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना आपल्या माळशेज घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपातून उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचीव आणि शेतघराच्या मालकीण गीता खरे यांच्यासह चार जणांवर मंंगळवारी गुन्हा दाखल केला.
वरळीतील हिट अॅण्ड रन प्रकरणात मिहिर शाहाला पोलिसांनी अटक केली असून त्याची आता चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आज ते विधानसभेत बोलत होते.
I have demanded that Mihir Rajesh Shah- the accused, must be tried for murder and not just hit and run.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 9, 2024
Why was he allowed to be on the run for 60 hours? Who was shielding him? https://t.co/4VdXUbSVtY
नागपूर : शहरालगत कोंढाळी गावाजवळ एका बिबट्याने माकडाला त्याची शिकार करायचे ठरवले. झाडांवर माकडांचा कळप होताच, पण खालीही काही माकड होते. त्या माकडांच्या मागे तो धावला, पण माकड त्यापेक्षाही शहाणे. ते भराभर झाडावर चढले आणि माकडाला आपली शिकार करण्याच्या नादात बिबट एका शेतातील विहीरीत पडला. हे नाट्य एवढ्यावरच थांबले नाही.
कराड : कराडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल ९६ कोटी ५० लाखांच्या निधीची घोषणा झाल्याने राज्यातील तालुकास्तरावरील हे सर्वात भव्य अन् आंतरराष्ट्रीय सेवा- सुविधांनी परिपूर्ण असे पहिले स्टेडियम साकारले जाणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने या भरघोस निधीची घोषणा करताच क्रीडाप्रेमिंसह विशेषतः भाजप व ‘महायुती’च्या कार्यकर्त्यांनी कराडच्या शिवतीर्थावर फटाक्यांची आतषबाजी करीत लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला. तर, या निधीसाठी पाठपुरावा करणारे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेवून त्यांचे कराडकरांच्यावतीने आभार मानले.
शिवाजी स्टेडियममध्ये सन १९८५ पासून ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण सुरु असून, रणजी क्रिकेट सामनेही झालेत. येथे सराव करणाऱ्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. एकंदरच हे स्टेडियम कराड शहरातीलच नव्हे; तर ग्रामीण खेळाडूंनाही उपयुक्त असून, त्याचा कायापालट होणार असल्याने क्रीडाप्रेमींनी जल्लोष केला आहे.
कल्याण – मुसळधार पाऊस सुरू असताना कल्याण, डोंबिवली शहरांच्या अनेक भागात, एमआयडीसी परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मुबलक पाणी पुरवठा नागरिकांना करण्यात यावा, या मागणीसाठी रहिवासी मोर्चा, ठिय्या आंदोलन करून रस्त्यावर उतरले आहेत.
नागपूर : मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून नागपूरला येणाऱ्या तसेच नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.मुंबईत रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत सोमवारी पूरस्थिती निर्माण झाली.
नागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये झालेले कमी मतदान लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी दोनशे सदनिका असलेल्या इमारतीत स्वतंत्र मतदान केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासन विचार करीत आहे.
हिट अँड रनप्रकरणातील मिहिर शाहाला पोलिसांनी केली अटक आहे. त्याला शाहपूर येथून अटक केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. त्याला पळून जाण्याकरता एकूण १२ जणांनी मदत केली होती. या १२ जणांनाही अटक करण्यात आली आहे.
Worli (Mumbai) hit-and-run case | Mumbai Police arrest accused Mihir Shah, who was absconding.
— ANI (@ANI) July 9, 2024
नागपूर: नागपूरसह देशभरात सातत्याने सोन्याच्या दरात बदल होत असल्याने ग्राहकांमध्येही दागिने खरेदीबाबत संभ्रम आहे. २४ तासांपूर्वी ९ जुलैरोजी सकाळी नागपुरातील सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात उसळी बघायला मिळाली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी हे दर प्रती दहा ग्राम सुमारे ४०० रुपये ते ६०० रुपये दरम्यान घसरल्याचे दिसत आहे.
गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सापुतारा घाटात रविवारी सायंकाळी पर्यटकांची खासगी बस दरीत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाला.
नागपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी बजावल्यानंतर या पक्षाचे ‘हौसले बुलंद’ झाले असून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालवली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी आंदोलने, बैठकांचा धडाका लावला असून विधानसभेसाठी इच्छुकांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.
स्वगृही परतलेल्या वसंत मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत. आम्ही सर्व पाहत होतो की लोकसभा निवडणुकीआधी वसंतराव काय करत आहेत. काय करायचं हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. तुम्ही शिवसैनिक होतात. मधल्या काळात तुम्ही दिशा चुकलात होतात असं मी म्हणणार नाही. पण इतर पक्षातील अनुभव घेऊन तुम्ही स्वगृही परतला आहात. तुमची जबाबदारी फार मोठी आहे. तुमच्या हाती शिवबंधन बांधत असताना अनेकजण म्हणाले की आम्हीही शिवसैनिक होतो. त्यामुळे तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे. शिक्षा हा फार गमतीचा शब्द आहे. ही जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीने देशाला दिशा दाखवली आहे. लोकशाही धोक्यात आणली होती. लोकशहातीतील गद्दारी खोकेबाजी आणि महाराष्ट्राच्या अस्तित्त्वाची लढाई होणार आहे. पुणे हे उद्याच्या सत्ताबदलाचं केंद्र असलं पाहिजे. सत्ताबदलाचा पाया, खडकवासल्यातील खडक पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे. आता मी शिवसेनेचा मेळावा घ्यायला येणार. सर्वांसमोर सर्वांच्या भेटीला यायचं आहे. शिवसेनेचे पाच आमदार होते पुण्यात, ते मला पुन्हा निवडून आणायचे आहेत – उद्धव ठाकरे</p>
प्रथम मी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. १९९२ साली पहिल्यांदाच कात्रजमध्ये शिवसेना शाखाप्रमुख झालो. माझ्या १६ व्या वर्षी शिवसेनेची शाखा झाली होती. पण १८ वर्षे पूर्ण नसल्याने शाखाध्यक्ष होऊ शकलो नव्हतो. परंतु, बारावी पास झालो आणि शाखाप्रमुख झालो. वयाच्या ३१ व्या वर्षांपर्यंत मी उपविभागप्रमुखापर्यंत पोहोचलो. नंतर मनसेत प्रवेश केला. मला अनेकजण म्हणतात की शिवसेनेत माझा प्रवेश आहे. परंतु, माझा प्रवेश नाहीय तर मी पुन्हा शिवसेनेत आलो आहे. २५ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची ताकद उभी करू. १७ शाखाध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष १ शहारध्यक्ष, दोन सचिव आणि महिला आघाडीच्या पाच शाख्याध्यक्ष यांच्या सर्वांसह मी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. १२ मार्च रोजी मी मनसेचा राजीनामा दिला तेव्हाच यांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता – वसंत मोरे
Shivsena #LIVE | UddhavSaheb Thackeray | जाहीर पक्षप्रवेश – वसंत मोरे | मातोश्री, मुंबई ⬇️ https://t.co/S7nkeTPCLa
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 9, 2024
मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सहा गुंडाविरोधात न्यायालयात १७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले.सागर पाल, विक्की गुप्ता, सोनू कुमार बिश्नोई, हरपाल सिंह उर्फ हॅरी, मोहम्मद रफिक चौधरी आणि अनुज थापन यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मोक्का) तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण – ठाणे महापालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत समुह विकास योजना राबविण्यासाठी प्रशासन सर्वाधिक प्रयत्नशील आहे. पालिका हद्दीतील धोकादायक इमारती, चाळी, त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न विचारात घेऊन समुह विकास योजनेच्या माध्यमातून शहराचे वेगवेगळे भाग विकसित करण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहे, असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
गडचिरोली: नगररचना विभागातील सहायक संचालकास खून प्रकरणात झालेल्या अटकेनंतर जिल्ह्यातील भूखंड घोटाळा चर्चेत आहे. अशातच शहरात कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आले आहे. बनावट संमतीपत्राआधारे एन.ए. परवाना मिळवून भूखंडाची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी बहीण- भावाला ८ जुलै रोजी गडचिरोली पोलिसांनी अटक केली.
यवतमाळ : शहरात किरकोळ वादातून सुरू असलेल्या खुनांचे सत्र कायम असून सोमवारी सायंकाळी वर्दळीचा दत्त चौक खुनाच्या घटनेने हादरला. अनेक नागरिक, लहान मुले, महिलांसमोर आरोपींनी तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याला जागीच ठार केले. सुजल कैथवास (२२), रा. इंदिरानगर, भोसा नाका असे मृताचे नाव आहे.