Mumbai rains Updates : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे आजही हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु, मुंबईसह आजूबाजूच्या शहरांतही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. परंतु, अनेक ठिकाणी निरभ्र आभाळ आहे. असं असलं तरीही मुंबई लोकल उशिराने धावत आहेत. १५-२० मिनिटांनी लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यास उशीर झाला आहे. तर, दुसरीकडे मुंबईतील हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी मिहीर शाहाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत कविता नाखवांच्या पतीची आणि लेकीची हृदयद्रावक प्रतिक्रियाही समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधान परिषदेतील कामकाज पाहा.

विधान सभेचं कामकाज पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.

Live Updates

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घ्या

13:09 (IST) 9 Jul 2024
नागपुरात चिकनगुनियाचा प्रकोप, या भागात सर्वाधिक रुग्ण…

नागपूरः उपराजधानीत चिकनगुनियाने डोके वर काढले आहे. मागील ३५ दिवसांमध्ये या आजाराचे तब्बल ३७ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.अनियमित पावसामुळे शहरातील वातावरण दमट झाले आहे. असे वातावरण डासांची घनता वाढवण्यासाठी पोषक असते.

सविस्तर वाचा

13:07 (IST) 9 Jul 2024
परीक्षा वेळेत घ्या, अन्यथा… युजीसीचा उच्च शिक्षण संस्थांना इशारा काय?

पुणे : शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकानुसार परीक्षा न घेणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने चाप (यूजीसी) लावला आहे.

सविस्तर वाचा…

12:57 (IST) 9 Jul 2024
बीए/बीएस्सी बीएड, विधि पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना सुरुवात

मुंबई : विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या संभाव्या वेळापत्रकानुसार विधी पाच वर्ष आणि बीए, बीएस्सी बीएड इंटीग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

12:46 (IST) 9 Jul 2024
कल्याणमधील गांधारी नदीत गाळात अडकलेल्या वृध्द महिलेला वाहतूक पोलिसांनी वाचविले

कल्याण – कल्याणमधील गांधारी नदी पात्रात घरातील निर्माल्य टाकण्यासाठी गेलेली महिला रविवारी नदीला आलेल्या पुरातील चिखलात अडकली होती. ही माहिती नदी काठाने चाललेल्या एका नागरिकाला समजात त्याने हा विषय गांधारी नदी काठच्या वाहतूक चौकीत असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना सांंगितला.

सविस्तर वाचा

12:43 (IST) 9 Jul 2024
“कशाला चालवताय सभागृह? विधानसभेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने विरोधकांचा संताप!

ज्यावेळेला राज्याचे विरोधी पक्षनेते भाषण करतात, तेव्हा मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात हजर असत. आता दोन उपमुख्यमंत्री आहेत. ते दोघेही नाहीत. संबंधित खात्याचे मंत्रीही नाहीत. सभागृहात काय चाललंय हे. कशाला चालवताय सभागृह. आम्ही खाली मान घालून ऐकतोय. सभागृह स्थगित करा – भास्कर जाधव

दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करा – विजय वडेट्टीवार

उद्धवजी मुख्यमंत्री असताना केव्हा हजर राहिले होते -गिरीश महाजन

महाराष्ट्रात ग्राम विकास मंत्र्‍याव्यतिरिक्त एकही सीरिअस मंत्री नाही – जयंत पाटील</p>

12:26 (IST) 9 Jul 2024
पुरावा नसतानाही अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांनी…

वर्धा : सराफा व्यवसायिकास लुटणाऱ्या व लुटीचे दागिने खड्ड्यात पुरणाऱ्या टोळीस २४ तासात अटक करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. त्यांचे या तपासाचे कौतुक करीत त्यांना ५० हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले आहे.हिंगणघाट येथील वणा नदीच्या पुलावर वडनेरच्या सराफा दुकानदारास रस्त्यात अडवून लूटमार करण्यात आली होती.

सविस्तर वाचा

12:14 (IST) 9 Jul 2024
मुंबईत दिवसभर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज

मुंबई : मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली असून वाहतूक आणि रेल्वे सेवा कोलमडली होती. यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. दरम्यान, मुंबईत मंगळवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सविस्तर वाचा

11:47 (IST) 9 Jul 2024
कल्याणमध्ये औषध दुकान सुरू करण्यासाठी लाच मागणारा औषध निरीक्षक अटकेत

कल्याण – कल्याणमध्ये एक औषध दुकान सुरू करण्यासाठी एक लाख रूपयांची लाच मागणारा कल्याण विभागाचा अन्न आणि औषध प्रशासनाचा औषध निरीक्षक संदीप नारायण नरवणे आणि कल्याण मधील या लाचेसाठी मध्यस्थी करणारा औषध विक्रेता सुनील बाळू चौधरी (५७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई पथकाने येथील डी मार्ट समोरील रस्त्यावर सोमवारी रंंगेहाथ अटक केली.

सविस्तर वाचा

11:46 (IST) 9 Jul 2024
शेअर व्यवहारातून कल्याणमधील वृध्दाची १९ लाखाची फसवणूक

कल्याण – आपण शेअर्समध्ये ऑनलाईन माध्यमातून गुंतवणूक केली तर आपणास अल्पावधीत दामदुप्पट परतावा मिळेल, असे चार भामट्यांनी कल्याण मधील खडकपाडा भागातील आरटीओ परिसरात राहत असलेल्या एका ७० वर्षाच्या वृध्दाला सांंगितले.

सविस्तर वाचा

11:37 (IST) 9 Jul 2024
“हिट ॲन्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला सुरतला लपवलंय की…”, संजय राऊतांचा आरोप

हिट अॅन्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. त्यांच्या पक्षातील ते मुख्य नेते आहेत. या मुख्य आरोपीला सूरतला लपवलं आहे की गुवाहटीला लपवलं आहे, याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी करावा. या मुंबईत कायदा सुव्यवस्था आहे की नाही, पण नाही हे मी खात्रीने सांगू शकतो- संजय राऊत

11:04 (IST) 9 Jul 2024
काय सांगता! महाराष्ट्र बँकेकडे ७८५ कोटींच्या ठेवी पडून, कोणीही दावा न केल्याने…

नागपूर : महाराष्ट्र बँकेकडे दावा न केलेल्या ७८५ कोटी, ५२ लाख ९३ हजार, १२० रुपयांच्या ठेवी पडून असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या इतर तपशीलानुसार, या बँकेने १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यानच्या काळात ४ हजार क्रेडिट कार्ड ग्राहकांना दिले.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 9 Jul 2024
‘मुन्ना भाई एमबीबीएस’ डॉक्टरांची ओळख पटविणे झाले सोपे; ‘क्यूआर कोड’ स्कॅन करा अन्…

नागपूर : सर्वसामान्य नागरिकांना बोगस आणि नोंदणीकृत डॉक्टर ओळखता यावेत, यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरांना एक क्यूआर कोड देणार आहे. हा कोड स्कॅन करताच डॉक्टरची अचूक माहिती समोर येणार आहे.

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 9 Jul 2024
भाच्याच्या सुखी संसारात ‘शकुनी’ मामीने संशयाचे विष पेरले, पण भरोसा सेलने…

नागपूर : एका युवकाने प्रेमप्रकरणानंतर घरच्यांचा विरोध झुगारून मित्राच्या मदतीने पळून जाऊन लग्न केले. पती-पत्नीचा व्यवस्थित संसार सुरू असताना युवकाच्या शकुनी असे नाव असलेल्या मामीने पत्नीशी मित्राचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप लावून भाच्याचा संसार विस्कटवला.

सविस्तर वाचा…

11:01 (IST) 9 Jul 2024
मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’च्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, ‘आयडॉल’कडून सुधारित तारखा जाहीर

मुंबई : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राने (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) मंगळवार, ९ जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा ‘आयडॉल’ने जाहीर केल्या आहेत.

सविस्तर वाचा…

10:46 (IST) 9 Jul 2024
वसंत मोरे आज बांधणार ठाकरेंचं शिवबंधन, पदाधिकारी अन् कार्यकर्तेही ठाकरे गटात!

वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकून वसंत मोरे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर अनेक नेते आणि पदाधिकारीही ठाकरे गटात येणार आहेत.

अंधेरी सब वे ( Express photo by Sankhadeep Banerjee )