Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३ मार्च) सुरू होत आहे. आज विधीमंडळात राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात होईल. दरम्यान, हे अधिवेशन वादळी ठरेल असं दिसतंय. कारण राज्यात मोठी उलथापालथ चालू आहे. राज्यात महिला सुरक्षेचा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांचं प्रमाम वाढलंय. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. एका मंत्र्याला (माणिकराव कोकाटे) न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तर, दुसरा मंत्री (धनंजय मुंडे) बीडमधील हत्या प्रकरणामुळे विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. या सर्व घटनांमुळे विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात. तसेच पुण्यातील बलात्काराचं प्रकरण, जळगावात केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या छेडछाडीचं प्रकरण ताजं असल्यामुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होऊ शकतात. अधिवेशनातील या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. तसेच राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Maharashtra Live News Update Today, 3 March 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
‘रामन राघव’ वरील सिनेमा पाहून केली हत्या, १३ वर्षाच्या मुलाच्या क्रूरतेने पोलीसही चक्रावले
वसई- आपल्या ६ वर्षीय मामेबहिणीची हत्या करणार्या १३ वर्षीय मुलाच्या क्रुरतेने पोलीस देखील चक्रावले आहे. कुख्यात सिरियल किलर रामन राघव याच्यावरील सिनेमा पाहून हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली.
मोटरसायकलने जात असलेल्या युवकावर वाघाचा हल्ला
अमरावती : मासे विकून मोटरसायकलने आपल्या गावी परत जात असलेल्या आदिवासी युवकावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. चिखलदरा तालुक्यातील खोंगडा बीट अंतर्गत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रेल्वेमध्ये महिलांचा सोन्याचा ऐवज चोरणारा चेंबूरचा चोरटा अटकेत
कल्याण – मेल, एक्सप्रेसमध्ये रात्रीच्या वेळेत प्रवासा दरम्यान आसनावर झोपलेल्या महिलांच्या उशाखालील, पिशवीतील सोन्याचा ऐवज, मोबाईल चोरणाऱ्या चेंबूर येथील एका सराईत चोरटयाला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने अटक केली आहे.
भिवंडी खाडी किनारा भागातील वाळू माफियांच्या बोटी भस्मसात, भिवंडी तहसीलदारांची कारवाई
कल्याण – भिवंडी खाडी किनारा भागातील दिवे, खारबाव, केवणी, पिंपळास, कोन परिसरात दिवसा, रात्री पुन्हा वाळू माफियांकडून वाळूचा उपसा करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाल्यावर भिवंडीचे तहसीलदार अभिजीत खोले यांनी कारवाई पथकाला सोबत घेऊन वाळू उपसा करणाऱ्या सर्व बोटी जप्त केल्या.
Video : आई सोबत आहे, तर काय कुणाची भीती! वाघिणीसोबत बछड्यांचा मॉर्निंग वॉक व मस्ती…
भंडारा : उमरेड करंडला अभयारण्यातील एफ-२ या वाघिणीने पर्यटकांना भुरळ घातली आहे. एफ-२ वाघीण आणि तिचे पाच बछड्यांचे पर्यटकांना दर्शन होत असल्यानं पर्यटक सुखावले आहेत. हा व्हिडिओ पेंच येथील कौशल नेवारे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
अहिल्यानगर : ५९ वर्षांनी एकाच वर्गातील सर्व मित्र-मैत्रिणींचा पुन्हा त्याच शाळेत वर्ग भरतो तेव्हा….
कर्जत : सुमारे सहा दशके वेगवेगळ्या वाटांनी प्रवास केल्यानंतर, एका शाळेतील १९६६ बॅचचे जुनी अकरावी या वर्गातील विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. ५९ वर्षांनी झालेल्या या अनोख्या पुनर्मिलनात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आनंदाश्रूंच्या सरींनी वातावरण भारावून गेले.
गडकरींचे ऑरेंज व्हिजन! स्पेनची टॅंगो संत्री विदर्भात बहरणार…
वर्धा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे अफलातून कल्पना व त्याची पुरेपूर अंमलबजावणी. विदर्भातील शेतकऱ्यांविषयी ते विशेष आस्था बाळगत असल्याचे ऍग्रो टेक व अन्य उपक्रमातून दिसून आले आहे.आता जागतिक पातळीवर मागे पडलेल्या नागपुरी संत्र्यास पूढे आणण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. संत्री फळाची काशी म्हणून स्पेन या देशाची ओळख आहे. तेथील युरोसोमीलास या कंपनीस ते ३२ शेतकऱ्यांसह भेट देऊन आले आहेत.
‘माझी टीएमटी’ मोबाईल ॲपला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद
ठाणे – परिवहन सेवेतील प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत ऑक्टोबर २०२४ मध्ये लोकार्पण केलेले माझी टीएमटी ॲप्लिकेशन काही तांत्रिक कारणामुळे सुरु होऊ शकले नव्हते. अखेर जानेवारी महिन्यापासून माझी टीएमटी ॲप्लिकेशन प्रवाशांसाठी कार्यान्वित करण्यात आले.
महायुतीसाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या….आता थेट भाजपच्या माजी मंत्र्यानेच…….
सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप, महायुती आणि जनहितासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे महत्त्वाचे आहे, असे भाष्य केले आहे.
प्रशांत कोरटकरचा पुतळा चपलांनी तुडवला….देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी अमरावतीत….
प्रशांत कोरटकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी अमरावतीत ‘शिवसन्मान’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
सुवर्णवार्ता! सोन्याच्या दरात मोठी घसरण; सात दिवसांत…
नागपूर: नागपूरसह देशभरात सोन्याचे वाढणारे दर ग्राहकांची चिंता वाढवत आहे. परंतु मागील सात दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच सराफा व्यवसायिकांनी सोन्याच्या दराबाबत मोठे भाकित केले आहे.
ठाणे प्रादेशिक परिवहन अंतर्गत १४ हजार रिक्षांचे रिकॅलिब्रेशन पूर्ण
ठाणे – राज्य परिवहन विभागाने लागू केलेल्या नविन भाड्यांमध्ये चालकांना त्यांचे रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेट करावे लागते. त्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत आतापर्यंत १४ हजार ४२८ रिक्षांच्या मीटरचे रिकॅलिब्रेट करण्यात आले असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
देशात कोट्यवधींची कामे करणाऱ्या नितीन गडकरींनी त्यांच्या जन्मगावात किती कोटींची कामे केली माहिती आहे का?
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या अफलातून कामासाठी फार प्रसिद्ध आहेत. त्यांनी देशात आतापर्यंत कोट्यवधींचे रस्ते आणि उड्डाणपूल बांधलेले आहेत. परंतु नागपूर जिल्ह्यातील त्यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा येथे त्यांनी कोट्यावधीच्या कामाचे भूमिपूजन केले आहे. आपल्या जन्म गावात केलेल्या कामांबद्दल गडकर्यांनी काय सांगितले ते पाहूया.
सलाम या हिमतीला!! चक्क धावत्या ऑटोतून उडी मारून त्या दोघींनी वाचवला आपला जीव, अन्यथा…
अकोला : दहावीच्या परीक्षेचा पेपर देऊन घरी निघालेल्या दोन बहिणींवर ऑटो चालकाची वाईट नजर पडली. त्याने आपल्या एका मित्राच्या मदतीने दोन्ही बहिणींना ऑटोत बसवून निर्जनस्थळी नेण्यासाठी भरधाव ऑटो पळवला. ऑटो चालकाच्या वाईट वृत्तीचा अंदाज येताच दोन्ही बहिणींनी विरोध केला. चक्क धावत्या ऑटोतून रस्त्यावर उडी मारत दोन्ही बहिणींनी आपला जीव वाचवला. वाशीम जिल्ह्याच्या कारंजा शहरात ही धक्कादायक घटना घडली.
मनमाड बस स्थानकात सुरक्षेसंबंधी उपाय
मनमाड आगारात केवळ एक बस मुक्कामी असते. ती आगारात उभी असते.
बीएस्सी नर्सिंग, विधि अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी करण्यास मुदतवाढ; सीईटी कक्षाचा निर्णय
मुंबई : बीएस्सी नर्सिंग आणि विधि तीन आणि पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज नोंदणीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाला १० मार्चपर्यंत, तर विधि तीन वर्षे व पाच वर्ष अभ्यासक्रमांसाठी १७ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
उल्हासनगर पालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला म्हारळमधील रहिवाशाकडून मारहाण
कल्याण – कल्याण जवळील म्हारळ येथील उल्हासनगर महापालिका सर्वोपचारी रुग्णालयात येऊन एका कर्मचाऱ्याला म्हारळमधील एका रहिवाशाने शुक्रवारी मारहाण केली आहे. रुग्णालयातील प्रतिबंध असलेल्या दालनात येऊन ही मारहाण झाल्याने उल्हासनगर महापालिका सर्वोचपचारी रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
कल्याणच्या एस. टी. बस आगारात प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरीला
कल्याण – कल्याण पश्चिमेतील नवीन एस. टी. बस आगारात एका बसमध्ये गर्दीतून चढत असताना एका ३३ वर्षाच्या तरुणाच्या गळ्यातील सोन्याची साखळी भुरट्या चोराने हिसकावून चोरून नेली आहे. गेल्या आठवड्यात सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. या चोरीप्रकरणी प्रवाशाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
उल्हासनगर : अभय योजनेबाबत थकबाकीदारांचा निरुत्साहच, आठवड्याभरात अवघ्या १२ कोटींची वसुली
उल्हासनगर: सुमारे ९९५ कोटी मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी उल्हासनगर महापालिकेने लागू केलेली अंतिम अभय योजना करदात्यांच्या निरुत्साहामुळे निष्प्रभ ठरल्याची चर्चा आहे.
विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे यांची नियुक्ती, बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरण
राज्यात काही ठिकाणी रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोरांनी बनावट जन्म दाखले प्राप्त केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
धक्कादायक! अमानुष मारहाण करून तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न ? बेशुध्दावस्थेत आढळलेल्या…
गडचिरोली : राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शौचासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करून अमानुष मारहाण करण्यात आली. तरुणी बेशुध्दावस्थेत आढळली. तिच्या डोळ्याखाली काळे व्रण असून हाताला दुखापत आहे. जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन तिला अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.
पाणीटंचाईचे दुष्टचक्र कायमच, बुलढाणा जिल्ह्यात मार्च महिन्याच्या प्रारंभीच…
बुलढाणा: मागील वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला असतानाही यंदा मार्च महिन्याच्या प्रारंभीच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे! अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे पाणी पुरवठ्याचे दुष्टचक्र सुरु झाले आहे हजारो गावकऱ्यांची तहान या विहीर भगवीत आहे. जिल्ह्यातील दुर्गम आणि जलस्रोत नसलेल्या गावातील रहिवासी प्रामुख्याने आया बहिणींची घडाभर पाण्यासाठी कैक मेल भटकंती सुरु झाली आहे.
“मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणातील संशयित शिंदे गटाचे”, आमदार चंद्रकांत पाटील यांचीही पुष्टी
आई म्हणून मी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आली आहे. माझीच मुलगी सुरक्षित नाही तर इतरांचे काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
प्रशांत कोरटकरकडे ‘रॉल्स रॉईस’ ही आलिशान कार आली कुठून? चीटफंड घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या…
चीटफंड घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या महेश मोतेवारची आलिशान कार कोरटकर वापरत असल्याची माहिती पुढे आली आहे. आलिशान कारचे फोटो आणि व्हिडिओ कोरटकरने स्वतःच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणात चार संशयितांना अटक
मुक्ताईनगरातील कोथळीत सुरू असलेल्या संत मुक्ताईच्या यात्रेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची शुक्रवारी छेड काढल्याचा प्रकार घडला.
केंद्रीय मंत्र्यांचं कुटुंब सुखरूप नसेल तर सामान्य जनता सुरक्षित कशी राहणार? अनिल देशमुखांचा प्रश्न
सामान्य जनता सुरक्षित कशी राहणार? महाराष्ट्र राज्य कायदाशून्यकडे चाललं आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. महादेव मुंडेंच्या पत्नीने पतीच्या हत्येबाबत प्रश्न निर्माण केला आहे, राज्य सरकार याबाबतही संवेदनशील नाही.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयास ‘कर्मवीर काव्य करंडक’
राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धेत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत २०२५ च्या कर्मवीर काव्य करंडकावर नाव कोरले.
मुंबईत मराठी माणसाला घर खरेदीसाठी आरक्षण हवे, ‘पार्ले पंचम’चे सर्व आमदारांना पत्र
सदनिका खरेदी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मराठी माणसांना मांसाहारी असल्यामुळे बहुतेक विकासक विविध कारणे सांगून घर विकण्यास तयार होत नाहीत.
सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात, इतर पाच अधिकाऱ्यांचीही याचिका; उद्या सुनावणी
भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच आणि इतर अधिकाऱ्यांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली.
अपघातासाठी जमीनमालकाला दोषी धरता येत नाही, न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात आरोपी अनिल बोरकर यांनी जमीन आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेले अनिल यांनी २०१५ साली या जमिनीवर मंगल कार्यालय तयार करण्याचा निर्णय घेतला.