Maharashtra News Updates : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३ मार्च) सुरू होत आहे. आज विधीमंडळात राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात होईल. दरम्यान, हे अधिवेशन वादळी ठरेल असं दिसतंय. कारण राज्यात मोठी उलथापालथ चालू आहे. राज्यात महिला सुरक्षेचा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांचं प्रमाम वाढलंय. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. एका मंत्र्याला (माणिकराव कोकाटे) न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तर, दुसरा मंत्री (धनंजय मुंडे) बीडमधील हत्या प्रकरणामुळे विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. या सर्व घटनांमुळे विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात. तसेच पुण्यातील बलात्काराचं प्रकरण, जळगावात केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या छेडछाडीचं प्रकरण ताजं असल्यामुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होऊ शकतात. अधिवेशनातील या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. तसेच राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा