Maharashtra Political Crisis Today, 10 August 2022 : राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु असताना सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने-सामने असून पक्षाचं चिन्ह मिळावं यासाठी संघर्ष सुरु आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. न्यायलयाच्या आदेशानंतरही शिंदे-फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून पावसाची संततधार काम आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशा विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर वाचता येईल…

Live Updates

Maharashtra Breaking News Today : राज्यातील राजकारण, पावसाचे अपडेट आणि इतर घडामोडींची माहिती एका क्लिकवर

19:17 (IST) 10 Aug 2022
पुणे : राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित पक्षबांधणीसाठी मैदानात शुक्रवारपासून तीन दिवसांचा पुणे दौरा

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महासंपर्क अभियानासाठी अमित ठाकरे शुक्रवारपासून (१२ ते १४ ऑगस्ट) या कालावधीत पुणे दौऱ्यावर येणार असून महाविद्यालयीन तरूणांशी अमित ठाकरे संवाद साधणार आहेत.

सविस्तर वाचा

19:16 (IST) 10 Aug 2022
पुणे : सनदी लेखापाल फाऊंडेशन परीक्षेत २५.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या फाऊंडेशन परीक्षेचा निकाल द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) बुधवारी जाहीर केला. त्यात देशभरातील २५.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सविस्तर वाचा

18:44 (IST) 10 Aug 2022
यवतमाळ : वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार; सहा गावांचा संपर्क तुटला, सात मार्ग बंद

वणी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुन्हा हाहाकार उडाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि धरणातून होत असलेला विसर्ग यामुळे तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

सविस्तर वाचा

18:31 (IST) 10 Aug 2022
पिंपरी : अंधांसाठी शिक्षण, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची पिंपरी पालिकेकडे मागणी

दिव्यांग बांधवांच्या प्रति केवळ सहानुभूतीची भावना न ठेवता त्यांना सहकार्याचा हात द्यावा, असे सांगत पालिका हद्दीतील अंध बांधवांसाठी शाळा तसेच रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी मागणी प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

17:49 (IST) 10 Aug 2022
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर होण्याची चिन्हे

केंद्र आणि राज्य शासनाकडून ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळालेली नसतानाही त्या प्रकल्पाच्या नावाखाली जुन्या ठाण्यातील म्हणजेच, नौपाडा भागातील धोकादायक अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासास पालिकेकडून परवानगी नाकारली जात आहे.

सविस्तर वाचा

17:14 (IST) 10 Aug 2022
चोरलेल्या एटीएम कार्डद्वारे खरेदी करणाऱ्या तिघांना अटक

चुनाभट्टी परिसरात वास्तव्यास असलेले अविनाश चव्हाण ६ ऑगस्ट रोजी येथील एका बँकेच्या एटीएम केंद्रांत पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढल्यानंतर चव्हाण तेथेच एटीएम कार्ड विसरून निघून गेले. हे एटीएम कार्ड आरोपी रुपेश पोखरकर (३२), प्रणय पाशीलकर (२३) आणि राजेश पवार (३२) यांना मिळाले. या तिघांनी या कार्डच्या माध्यमातून काही दुकानांमध्ये वस्तूंची खरेदी केली.

सविस्तर वाचा

17:00 (IST) 10 Aug 2022
नागपूर : सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस दोन दिवस रद्द

भुसावळ विभागात विविध तांत्रिक कामे सुरू असल्याने नागपूर मुंबई आणि नागपूर- पुणे एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.भुसावळ विभागात पाचोरा येथे तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.

सविस्तर वाचा

16:29 (IST) 10 Aug 2022
मुंबई महानगरपालिकेला १.५० लाख सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारची घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेने ३५ लाख राष्ट्रध्वजाचे मोफत वितरण करण्याचा संकल्प सोडला आहे. मात्र कंत्राटदाराकडून तब्बल तब्बल एक लाख ५० हजार सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली.

सविस्तर वाचा

16:22 (IST) 10 Aug 2022
नारळी पौर्णिमेच्या वाहतूक बदलामुळे कोंडीची शक्यता ; कळवा पूल परिसरातील वाहतूक बदल

नारळी पौर्णिमेनिमित्ताने कळवा येथील खाडीजवळ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी कळवा पूलावर होत असते. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गुरुवारी सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत ठाणे शहरात वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

16:19 (IST) 10 Aug 2022
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास; कात्रज भागातील घटना

स्वस्तात सोन्याचे बिस्कीट देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेकडील ६० हजारांचे दागिने दोन महिलांनी लांबविल्याची घटना कात्रज पीएमपी थांब्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिलेची विवाहित मुलगी हडपसर भागात राहायला आहे. ज्येष्ठ महिला मुलीला भेटण्यासाठी पीएमपी बसने हडपसरकडे जात होत्या.

सविस्तर वाचा

16:14 (IST) 10 Aug 2022
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मोफत ऑनलाइन श्रेयांक अभ्यासक्रम; प्रवेशासाठी ३१ ऑगस्टची मुदत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक बहुमाध्यम केंद्र (ईएमएमआरसी) आणि शैक्षणिक संज्ञापन महासंघातर्फे (सीईसी) यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या विविध ऑनलाईन श्रेयांक अभ्यासक्रमांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वयम् संकेतस्थळावर उपलब्ध असलेले हे सर्व अभ्यासक्रम विनामूल्य असून, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर स्वयम् मार्फत परीक्षा घेऊन संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि श्रेयांक गुण प्रदान करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

16:13 (IST) 10 Aug 2022
कल्याण : नोकरीचे आमिष दाखवून कल्याण मधील नोकरदाराची पाच लाखाची फसवणूक

कल्याण मधील एका नोकरदाराला मोठ्या पदावरील नोकरीचे आमिष दाखवून भामट्यांनी त्यांची ऑनलाईन माध्यमातून मुलाखत घेतली. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्याने पदस्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि पाठविलेली एक जुळणी नोकरदाराला उघडण्यास सांगून त्या माध्यमातून नोकरदाराच्या वेगळ्या बँक खात्यामधून एकूण चार लाख नऊ हजार ६४९ रुपये स्वताच्या खात्यांवर वर्ग करुन फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा

15:58 (IST) 10 Aug 2022
ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिरंगा रथाचे उद्घाटन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याची अस्मिता व अभिमानाचे प्रतिक असलेला राष्ट्रीय ध्वज तिरंगा ठाण्यातील घराघरांमध्ये फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.शहर भाजपाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

15:43 (IST) 10 Aug 2022
काँग्रेसच्या पदयात्रेच्या मार्गातून ठाणे जिल्हा वगळला; राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण

भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने राज्यातील विविध जिल्ह्यात ७५ किमी आझादी गौरव पदयात्रेला सुरुवात केली आहे. ९ ऑगस्टपासून सुरु झालेल्या या यात्रेच्या मार्गामध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश होता. मात्र, त्यात अचानकपणे बदल करत ठाणे जिल्हा वगळण्यात आला असून यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सविस्तर वाचा

15:36 (IST) 10 Aug 2022
डोंबिवलीत बंद घरातील १६ नळांवर चोरट्याचा डल्ला

डोंबिवली पश्चिमेतील एका रहिवाशाचा बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातील इतर किमती ऐवज चोरून नेण्याऐवजी घरातील स्नानगृह, स्वच्छतागृह, हातधुणी भांड्यातील एकूण १६ नळ काढून त्यांची चोरी केली आहे. बाजारभावाप्रमाणे या नळांची किंमत ३१ हजार रुपये आहे. या चोरीप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात रहिवाशाने तक्रार केली.

सविस्तर वाचा

15:35 (IST) 10 Aug 2022
भाजपा इतर पक्षांना संपवतो या शरद पवारांच्या आरोपावर आशिष शेलारांचा पलटवार

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर भाजपाकडून प्रादेशिक तसेच इतर पक्षांना संपवण्याचे काम केले जाते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवारांच्या याच आरोपाला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे. ज्यांच्या पक्षाचा जन्मच दुसऱ्या पक्षाला फोडून झालेला असेल, त्यांना भाजपाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे शेलार म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर

15:35 (IST) 10 Aug 2022
बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार, नितीशकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथे नितीशकुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी भाजपासोबत असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद) तसेच इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना केली आहे. नितीशकुमार यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. वाचा सविस्तर

15:33 (IST) 10 Aug 2022
बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपाची प्रतिक्रया, शेलार म्हणाले

मंत्रिपद न मिळाल्यामुळे हे धोका देणाऱ्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता होतो, त्यालाच मंत्रीपद मिळते असे उपहासात्मक भाष्य बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू यांच्या याच भाष्यावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांना प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. बच्चू कडू यांनी हा अधिकार त्यांच्यापुरता मर्यादित ठेवावा, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे. वाचा सविस्तर

15:26 (IST) 10 Aug 2022
मोटारीच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू; विश्रांतवाडी भागात अपघात

मोटारीच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. पसार झालेल्या मोटारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. अमित मोहन शिंदे (वय ३०, रा. धानोरी रस्ता, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. अमितचा मामेभाऊ राहुल कांबळे (वय ३६, रा. विश्रांतवाडी) याने या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा

15:25 (IST) 10 Aug 2022
पुणे : संतसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॅा. वसुंधरा बनहट्टी यांचे निधन

डॉ. वसुंधरा बनहट्टी यांनी संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, संत सखु, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, संत जनाबाई आणि समर्थ रामदास या संतांवर आणि त्यांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण लेखन केले होते. त्यांचे लेखन प्रसाद, युगबोध, रसिक या नियतकालिकामधून प्रसिद्ध झाले.

सविस्तर वाचा

15:24 (IST) 10 Aug 2022
नागपूर: समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लाबंणीवर ?

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे १५ ऑगस्ट रोजी होणारे लोकार्पण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळाले आहेत. महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 10 Aug 2022
नागपूर : रेल्वे व संरक्षण क्षेत्राच्या खासगीकरणाला कडाडून विरोध – हिरणमय पंड्या

केंद्र सरकारची नीती ही कामगारांच्या विरोधात असेल तर सरकारच्या विरोधात जाऊन आंदोलन करू. कामगारांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकारने घेतले नाही तर त्याचा फटका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सरकारला बसण्याची शक्यता आहे, असा इशारा भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरणमय पंड्या यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा

14:42 (IST) 10 Aug 2022
आयएनएस ‘विक्रांत’प्रकरणी किरीट सोमय्यांना कायमस्वरूपी अटकेपासून दिलासा; अटक झाल्यास तात्काळ जामीन

आयएनएस ‘विक्रांत’ वाचविण्यासाठी जमा केलेल्या निधीच्या अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांना उच्च न्यायालयाने बुधवारी अटकेपासून कायमस्वरूपी दिलासा दिला. सोमय्या यांना अटक झाल्यास त्यांची जामिनावर तत्काळ सुटका करण्याचेही न्यायालयाने त्यांची अटकपूर्व जामिनाची याचिका निकाली काढताना स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

14:40 (IST) 10 Aug 2022
ठाणे : खरी शिवसेना आमच्यासोबतच ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काढला उद्धव ठाकरेंना चिमटा

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता. पण, आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे.

सविस्तर वाचा

14:34 (IST) 10 Aug 2022
मुंबई : बॅनरमुळे मध्य रेल्वे विस्कळीत

ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने मध्य रेल्वे उपनगरीय डाउन मार्गावर धावणाऱ्या धीम्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. सकाळी ११ च्या सुमारास ही घडना घडली. ओव्हरहेड वायवरून बॅनर काढण्यासाठी २५ मिनिटे लागली आणि त्यानंतर लोकल सेवा सुरळीत झाली.

सविस्तर वाचा

14:23 (IST) 10 Aug 2022
पुणे : ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेतून नऊ लाखांचे दागिने लांबविले ; मीरा सोसायटीतील घटना

ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेतून चोरट्यांनी नऊ लाख आठ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीत घडली.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाची सदनिका मीरा सोसायटीत आहे.

सविस्तर वाचा

14:22 (IST) 10 Aug 2022
अलिबाग : मुरुड जवळच्या समुद्रात अडकून पडलेल्या मच्छीमारांची सुटका

मुरुड येथील पद्मदुर्ग किल्ल्याजवळ बोटीवर अडकून पडलेल्या गुजरात मच्छीमारांची तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली. हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्वांना बोटीतून बाहेर काढण्यात आले.गुजरात येथील वलसाड बंदरातून हरेश्वरी मच्छीमार बोटीवर मासेमारीसाठी अरबी समुद्रात आली होती.

सविस्तर वाचा

14:17 (IST) 10 Aug 2022
VIDEO: मुंबईत भीषण अपघात! बसने आधी चालक बसलेल्या रिक्षाला ठोकलं अन् नंतर…, अंगावर काटा आणणारी घटना

मुंबईतील बसचा 'ब्रेक फेल' झाल्याने ज्योती हॉटेलकडून संतोष नगरकडे जाताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चारजण जखमी झालेत. यात चालक आणि प्रवाशांचा समावेश आहे. सर्व जखमींवर वेदांत हॉस्पीटल आणि ट्रामा हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे अपघात झाला तेव्हा बसमध्ये प्रवासी होते आणि ज्या वाहनांना बसने धडक दिली त्यातही चालक बसलेला होता. त्यामुळे या घटनेने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. या प्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सविस्तर बातमी…

14:17 (IST) 10 Aug 2022
“भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, कारण…”, शरद पवारांचा गंभीर आरोप

देशात महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पंजाबमधील शिरोमणी अकाल दलाचं उदाहरणही दिलं आणि अकाली दलाला भाजपाने संपवल्याचा आरोप केला.

सविस्तर बातमी…

14:16 (IST) 10 Aug 2022
“आजच लिहून ठेवा, हे सरकार कोसळणार आणि तेही…”, बिहार भाजपा नेते सुशील मोदींचा इशारा

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झालं आहे. मात्र, सत्तांतरानंतर महाराष्ट्रात भाजपा सत्तेत आली आहे, मात्र बिहारमध्ये भाजपाला सत्तेबाहेर जावं लागलंय. त्यामुळे बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना त्यांचं राष्ट्रीय जनता दल व काँग्रेससोबतच सरकार कोसळणार आहे आणि तेही २०२५ पूर्वीच कोसळेल, असा इशारा दिला आहे.

सविस्तर बातमी…

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह