Maharashtra Political Crisis Today, 10 August 2022 : राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु असताना सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने-सामने असून पक्षाचं चिन्ह मिळावं यासाठी संघर्ष सुरु आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. न्यायलयाच्या आदेशानंतरही शिंदे-फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून पावसाची संततधार काम आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशा विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर वाचता येईल…

Live Updates

Maharashtra Breaking News Today : राज्यातील राजकारण, पावसाचे अपडेट आणि इतर घडामोडींची माहिती एका क्लिकवर

14:15 (IST) 10 Aug 2022
“…म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली”, बिहारमधील राजकीय भूकंपानंतर सुशील मोदींचा मोठा खुलासा

महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये देखील राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झालं आहे. मात्र, या दोन्ही राज्यांमध्ये एक मुलभूत फरक आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर भाजपा सत्तेत आली, मात्र बिहारमधील सत्तांतराने भाजपाला सत्तेबाहेर जावं लागलंय. या पार्श्वभूमीवर बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना इशारा देताना महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना का फोडली याचा मोठा खुलासा केला आहे.

सविस्तर बातमी…

14:14 (IST) 10 Aug 2022
जम्मू काश्मिरमधील बडगाममध्ये चकमक, ३ दहशतवाद्यांची नाकेबंदी

जम्मू काश्मिरमधील बडगाम भागात बुधवारी (१० ऑगस्ट) पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सैन्याने लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांची नाकेबंदी केली आहे. यात कुप्रसिद्ध लतिफ रादर या दहशतवाद्याचाही समावेश आहे. त्याच्यावर राहुल भट, अमरीन भटसह अनेक नागरिकांच्या हत्येचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर बातमी…

14:07 (IST) 10 Aug 2022
आठ हजार टपाल पत्रांमधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी संदेश

उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयातील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या ७५० विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सात हजाराहून अधिक टपाल पत्रांवर शुभेच्छा संदेश लिहिले आहेत.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 10 Aug 2022
ठाणे : खासगी शाळांच्या बसगाड्यांमुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण

ठाण्यातील खासगी शाळांचा मनमानी कारभार आता शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरू लागला आहे. शहरातील अनेक खासगी शाळा त्यांच्या बसगाड्यांना शाळेच्या आवारात प्रवेश बंदी करत असतात. त्यामुळे या बसगाड्या भर रस्त्यात उभ्या केल्या जात असून त्याचा शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागला आहे.

सविस्तर वाचा

13:49 (IST) 10 Aug 2022
मुंबई : कुलाब्यात एक मजली बांधकाम पडून दोघे जखमी

गेल्या चोवीस तासात कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुलाबा येथील एक मजली झोपडीचा भाग पडून एका बालकासह दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

सविस्तर वाचा

13:36 (IST) 10 Aug 2022
चंद्रपुरात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बल्लारपूर ते हैदराबाद रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या वाघाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली.रेल्वेच्या धडकेत वाघाच्या शरीराचे दोन तुकडे झाले.

सविस्तर वाचा

13:34 (IST) 10 Aug 2022
मेट्रो स्थानक फलाटावरील काचेच्या सुरक्षा भिंतीचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न

दहिसर ते आरे मेट्रो मार्गिकेतील दहिसर पूर्व स्थानकावर ७ ऑगस्टला सायंकाळी काही तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने (एमएमएमओसीएल)ने तात्काळ दूर केला. मात्र त्यानंतर या स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता एक धक्कादायक बाब समोर आली. एक तरुण प्रवासी स्थानकावरील फलाटावर बसविण्यात आलेल्या काचेच्या सुरक्षा भिंतीचा(प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर सिस्टीम (पीएसडी)) स्वयंचलित दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करताना दिसला.

सविस्तर वाचा

13:25 (IST) 10 Aug 2022
कोपर रेल्वे स्थानकातील दिवा बाजूकडील पादचारी पुलाचे सोमवारी उद्घाटन?

डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकातील दिवा बाजुकडील पादचारी पुलाचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येत्या सोमवारी उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका उच्चपदस्थ सुत्राने दिली. या पादचारी पुलामुळे कोपर पश्चिम भागातील पादचाऱ्यांना डोंबिवली पूर्वेतील आयरे, म्हात्रेनगर भागात आणि पूर्वेतील नागरिकांना कोपर पश्चिमेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सविस्तर वाचा

11:59 (IST) 10 Aug 2022
“नाराजी आहेच, आम्ही…”, मंत्रीमंडळ विस्तारानंतर बच्चू कडू यांचं मोठं विधान

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून यामध्ये अपक्षांना स्थान देण्यात आलेलं नाही. यामुळे शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडू नाराज असल्याची असतानाच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. नंदनवन बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीनंतर बोलताना बच्चू कडू यांनीदेखील थोडी नाराजी असल्याचं कबूल केलं आहे. पूर्ण मंत्रीमंडळ विस्तार होईपर्यंत वाट पाहू असं ते म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी

11:54 (IST) 10 Aug 2022
कोल्हापुरात पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने, राधानगरी धरणाचे 2 दरवाजे उघडले, नागरिकांचे स्थलांतर सुरू

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर राधानगरी धरणाचे दोन दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्याचे बुधवारी जाहीर केले. कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे.

सविस्तर वाचा

11:52 (IST) 10 Aug 2022
केदार दिघे यांच्यावर बलात्काराचा आरोप नाही, अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने केले नमूद

ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख केदार दिघे यांच्यावर केवळ पीडितेला धमकी दिल्याचा आरोप असून प्रकरणातील सहआरोपींवर बलात्काराचा मुख्य आरोप आहे, असे मुंबई सत्र न्यायालयाने दिघे यांना बलात्कार आणि धमकी प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर करताना नमूद केले.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 10 Aug 2022
“भाजपा कधीही विश्वासघात करत नाही,” नितीश कुमार यांनी युती तोडल्यानंतर पी चिदंबरम यांचं विधान

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती तोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून जनता दल (संयुक्त) आणि भाजपाची युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तीव्र राजकीय अटकळींनंतर मंगळवारी अखेर युती तोडल्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे. नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी यावरुन भाजपाला लक्ष्य केलं असून टोला लगावला आहे.

सविस्तर बातमी

11:34 (IST) 10 Aug 2022
तलावक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, पावसाचा मुक्काम कायम; पाणीसाठा ९३ टक्क्यांवर

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. सातही तलावांतील पाणीसाठा ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. काल एका दिवसात १८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला आहे.

सविस्तर वाचा

11:29 (IST) 10 Aug 2022
आश्रय योजनेतील घोटाळाप्रकरणी लोकायुक्तांकडे आज सुनावणी; भाजपची तक्रार

मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी आखलेल्या आश्रय योजनेप्रकरणी आज लोकयुक्तांसामोर सुनावणी होणार आहे. या योजनेच्या कामात १८४४ कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याची तक्रार भाजपच्या लोकप्रतिनिधींनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती.

सविस्तर वाचा

11:26 (IST) 10 Aug 2022
उधारी मागितल्याने चहावाल्याला मारहाण; अंबरनाथ पूर्वेतील पिंकसिटी परिसरातील प्रकार

नेहमी चहा पिण्यासाठी येणाऱ्या एका ग्राहकाला चहावाल्याने त्याची ११० रूपयाची उधारी असल्याचे सांगत ती देण्याची मागणी केल्याने, संतापलेल्या ग्राहकाने चहावाल्याच् डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

11:22 (IST) 10 Aug 2022
रस्त्यांची दुरवस्था कायम; पावसाने पुन्हा नवे खड्डे, दुरुस्ती केलेले रस्तेही उखडले

गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा समोर आली आहे. अनेक रस्त्यांवर नव्याने खड्डे पडले असून, यापूर्वी दुरुस्ती केलेले रस्तेही उखडू लागले आहेत. त्यामुळे पालिकेने दुरुस्तीसाठी केलेला अडीच कोटींचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, देखभाल दुरुस्तीचे दायित्व (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याप्रकरणी महापालिकेच्या पथ विभागाने सात अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सविस्तर वाचा

11:17 (IST) 10 Aug 2022
१५ डबा लोकलच्या वाढीव फेऱ्यांचे स्वप्न धूसर

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर नऊ वर्षांपूर्वी पहिली १५ डब्यांची लोकल दाखल झाली. मात्र त्यानंतर आजतागायत या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे रेल्वेला शक्य झालेले नाही. या लोकलच्या वाढीव फेऱ्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणखी तीन ते चार वर्षे लागण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह